मूर्तीची तोडफोड का?
अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.
कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.
प्रतिक्रिया
18 Jun 2022 - 2:25 pm | निनाद
काबूल गुरुद्वारावर सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे.
अफगाणिस्थान इस्लामी कट्टरपंथी तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर येथे हिंदू शिल्लक राहिलेले नाहीत. आता फक्त १५० शिख आहेत आणि ते ही भारताकडे मदत मागत आहेत.
18 Jun 2022 - 2:31 pm | निनाद
पुण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपी तरुण रेहान सय्यद याने त्याच्या मित्रांच्या मदतीने पीडित मुलीचा व्हिडिओ शूट केला आणि ती क्लिप लवकरच सोशल मीडियावर व्हायरल होईल अशी धमकी दिली.
रेहान सय्यदने मुलीवर आपले प्रेम जाहीर केले आणि तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपी रेहान सय्यदचा मित्र अरबाज शेख याने गुपचूप रेहान तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचा व्हिडिओ शूट केला. यानंतर आरोपी रेहान सय्यदने ही व्हिडिओ क्लिप त्याचे मित्र शाहरुख आणि सोहेलसोबत शेअर केली. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करू, असे सांगून शाहरुख आणि सोहेल या दोघांनी मुलीला धमकावणे आणि ब्लॅकमेल करणे सुरू केले.
या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने रेहान सय्यदच्या आईला या प्रकरणाची माहिती दिली आणि मदत मागितली. मात्र, रेहानची आई आणि त्याच्या बहिणीने पीडित मुलीला मारहाण करून शिवीगाळ केली. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करू असे सांगून पीडित मुलीला ब्लॅकमेल करण्यासाठी आई आणि बहीण दोघेही सामील झाले.
सर्व आरोपी फरार आहेत!
18 Jun 2022 - 2:34 pm | निनाद
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बंदुकीच्या धाकावर दोन हिंदू बहिणींवर बलात्कार करण्यात आला. दोन्ही पीडित बहिणींचे वय फक्त १६ आणि १७ असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी हा गुन्हा नोंदवण्यासाठी तीन दिवस घेतले. उमर अश्फाक आणि काशिफ अली अशी आरोपींची नावे आहेत आणि त्यांना कोर्टातून अटकपूर्व जामीनही मिळाला आहे!
18 Jun 2022 - 2:40 pm | निनाद
नाटोला भारतासारख्या स्थिर देशांची 'गरज', आहे असे मत स्पॅनिश परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. नाटो आणि भारत यांच्यातील संवादामुळे नाटोला बळ मिळेल असे वाटते आहे.
18 Jun 2022 - 4:02 pm | जेम्स वांड
एरवी जगाला अक्कल शिकवणाऱ्या युरोपियन मूर्खांना आता भारतीय सामरिक शक्ती अन सैनिक क्षमतेचे महत्व पटत असले तरीही भारताने नाटो सारख्या भिकारड्या अन डबघाईला आलेल्या बँकेच्या पोस्ट डेटेड चेकला अजिबात धूप घालू नये, एकतर बाकी नाटो मेंबर्स entertain करणे आपल्याला गरजेचे नाही, नाटोचा बाप असणारा अमेरिका आपल्याशी वन टू वन डील करतोय, नाटो सोबत जाणे म्हणजे रशिया कायमचा दुरावणे, इथे रशिया दुरावणे किंवा अलिप्ततावादी विचार वगैरेच्या अनुषंगाने मी बोलत नसून एक ग्राहक म्हणून महागडे डिफेन्स हार्डवेअर घेताना बार्गेन करण्याची पॉवर गमवण्याविषयी बोलतोय.
"तुम्ही देताय स्वस्त का घेऊ अमेरिका/ रशियाकडून नाहीतर इस्राएल आहेच पुरवठा करायला" टाईप तोल मोल आपण गमावू नाटोच्या कच्छपी लागून , उदाहरणे डोळ्यासमोर आहेत रशियाकडून ट्रायम्फ एस ४००ची डील पूर्ण केली नाही का अमेरिकेकडून आजवर त्यांनी कधी ऑफरही न केलेले अपाचे लॉंग बो हे जगातील सर्वात घातक अटॅक हेलिकॉप्टर मिळाले आपल्याला, त्यामुळे असे नाटो सारखे एकांगी ग्रुप जॉईन करण्यात कवडीची अक्कल नाही, अर्थात सरकार अन राज्यकर्ते असे भावनिक उमाळ्यात मूर्ख निर्णय घेत नाहीच ही एक जमेची बाब आहेच.
18 Jun 2022 - 4:06 pm | जेम्स वांड
म्हणायला तर नाटोचा मेंबर तुर्कस्तान पण आहे हो, एर्दोगानला लागलेले जागतिक मुस्लिम समाजाचे खलिफा होण्याचे डोहाळे तर सगळ्यांना जाहीर ठाऊक आहेत, नाटो जॉईन करून अजून त्यांच्या पाटाला पाट लावून कोण बसणार ! हे म्हणजे डोकेदुखी नसताना खांबावर डोस्के आपटून नंतर डीस्प्रिनची गोळी खाण्यास कारण मिळाल्याचा आनंद साजरा करणे होईल
19 Jun 2022 - 12:08 am | सुबोध खरे
स्पॅनिश परराष्ट्र मंत्र्याला इथे कोण भीक घालणार आहे ?
भारताचा उत्तर अटलांटिक समुद्राशी काहीही संबंध नाही
त्यांना आपला माल (नेवान्शिया पाणबुडी )विकायचा आहे म्हणून भारताला नाटो मध्ये सहभागी करा म्हणून उगाच गूळ लावणे चालू आहे
19 Jun 2022 - 12:09 am | सुबोध खरे
https://www.navyrecognition.com/index.php/news/defence-news/2020/march/8...
20 Jun 2022 - 3:39 am | निनाद
हेच गूळ लावणे दाखवून देण्याचा हेतू होता. भारताचे बूट चाटण्याची एकही संधी नाटो चे देश सोडत नाहीयेत.