ज्वाईनिंग लेटर....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
11 Jun 2022 - 9:13 pm

स्टेशनात धडधडत गाडी आली,घाईघाईत तो गाडीत चढला आणी गाडीने वेग पकडला.

सराईत नजरने सावज हेरले,"उचला रे याला" म्हणत काळ्या कोटातला यमदूत पुढे सरकला.

गाडी थांबली,स्टेशन मास्टरच्या कार्यालयात फुकट्यांची वरात दाखल झाली.

करंगळी दाखवत विचारलं, जाऊ का? होकारार्थी मान डुलली.

रुमाल काढत बाहेर जाताना आणखीन एक काळा कोटधारी दानव येत होता.

वाटले बाहेरच्या बाहेर पळून जावे.

त्याला परत आलेला पाहून पोलीस म्हणाला, "साहेब हा पण".

नाव काय तुझे? काको दानवाने विचारले.

हवालदार बाकीच्यांना टाका आतमधे,याला इथेच सोडा.
.
.
.
.
.
.
.
.
कागद देत म्हणाला,"यार्डात जा, मालगाडी पुण्याकडे चाललीय".
.
.
.
.
.

Joining letter होते ते, केंव्हा खिशातून पडले टेन्शनमधे
लक्षातच आले नाही.
दानव का देव &#128533
हुश्श.......

कथाव्यक्तिचित्रअनुभव

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jun 2022 - 10:02 pm | अमरेंद्र बाहुबली

समजले नाही.

कुमार१'s picture

12 Jun 2022 - 8:54 am | कुमार१

नाही समजली.

कर्नलतपस्वी's picture

12 Jun 2022 - 9:51 am | कर्नलतपस्वी

ही लघुकथा एका आठवणीवर लिहीली आहे.
काही कामा निमित्त सहाय्यक स्टेशन मास्तरच्या कार्यालयात बसलो होतो. रेल्वेची विनातिकीट प्रवासी पकडण्याची मोहिम चालू होती. दोन पोलीस सात आठ फुकटे प्रवासी त्याच्या समोर घेऊन आले. त्याने चौकशीनंतर एक सतरा आठरा वर्षाच्या मुलाला सोडून दिले व बाकीच्यांवर दंडात्मक कारवाई करायला सांगीतली.
कुतूहल म्हणून त्या मुलाला सोडून देण्याचे कारण विचारले,त्यावर तो म्हणाला हा मुलगा जिल्ह्य़ातील भरती दप्तरात परीक्षा देऊन आलाय. जर उद्या भरती झाला तर या कारवाई चा विपरीत परिणाम होऊ शकतो. घरचा गरीब,पैसेच संपले नाईलाजास्तव विनातिकीट प्रवास करत होता. त्याचे वय व प्रामाणिक प्रयत्न बघून त्याला एक संधी दिली तर चांगला परीणाम होईल. हा उद्देश.
मला त्या स्टेशन मास्तरची संवेदनशीलता व आधिकाराचा केलेला वापर खुपच आवडला.

बाकी खिशातला कागद रुमाल काढताना खाली पडतो,तो काळ्या कोटातल्या रेल्वे स्टाफला मीळतो,पुढे त्या मुलाला मदत करण्यासाठी मालगाडीतून त्याच्या गावाकडे पाठवणे . ही सारी वातावरण निर्मीती.

भावना वाचकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडलो. आसो निखळ,स्पष्ट प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

अनन्त्_यात्री's picture

12 Jun 2022 - 12:49 pm | अनन्त्_यात्री

ज्वा??

चौथा कोनाडा's picture

12 Jun 2022 - 1:50 pm | चौथा कोनाडा

बोली मराठीत जॉ-इनिंग ला ज्वा-इनिंग असे म्हणतात!

चौथा कोनाडा's picture

12 Jun 2022 - 1:48 pm | चौथा कोनाडा

छान कथा, आवडली.

कपिलमुनी's picture

12 Jun 2022 - 1:58 pm | कपिलमुनी

विषय चांगला होता पण फुळवताना शब्दांचा कंजूसपणा का??

कर्नलतपस्वी's picture

12 Jun 2022 - 3:46 pm | कर्नलतपस्वी

सहमत आहे. लघुकथा शशक करता लिहीली होती. शब्दांची मर्यादा पण आता शब्द मर्यादा नसल्यामुळे अधिक चांगले लिहीता आले असते.

"शशक का चषक ",स्पर्धेच्या निकाला नंतर प्रथम शिर्षक सुचले मग कथा फुलवण्याचा प्रयत्न केला. वाचून प्रतिसाद द्यावा.

कर्नलतपस्वी's picture

12 Jun 2022 - 3:48 pm | कर्नलतपस्वी

चौको,अनंत यात्री प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

नचिकेत जवखेडकर's picture

13 Jun 2022 - 7:26 am | नचिकेत जवखेडकर

छान आहे. संदर्भ दिल्यावर परत वाचली आणि कळाली.

सस्नेह's picture

14 Jun 2022 - 9:14 pm | सस्नेह

संवेदनक्षम...

सौन्दर्य's picture

14 Jun 2022 - 10:36 pm | सौन्दर्य

कथा छानच लिहिली आहे. शशकच्या धर्तीवर लिहिली गेल्याने पूर्ण समजण्यासाठी दोनदा वाचावी लागली.

जीवनात कधीकधी देव माणसे भेटतात.