ताज्या घडामोडी जून २०२२

निनाद's picture
निनाद in राजकारण
1 Jun 2022 - 7:05 am

मूर्तीची तोडफोड का?

अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.

कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.

प्रतिक्रिया

काड्यासारू आगलावे's picture

6 Jun 2022 - 12:03 pm | काड्यासारू आगलावे

टागोरांचं कशाबद्दल?? जन गणं मनं हे पंचम जाॅर्ज च्या स्वागतासाठी गाणं लिहीलं म्हणून?

केवढी मोठी संधी लोकांनी bjp ल दिली होती.
2014,2019 लागोपाठ पूर्ण बहुमत .
ह्या संधी चे सोने करायला पाहिजे होते.
कायद्या च्या कक्षेत राहून आणि बिलकुल भडकावू भाषा न वापरता हिंदू चे आणि त्याच बरोबर भारताचे हीत जपता आले असते.
अनधिकृत व्यवसाय, बंद करता आले असते.
गुन्हेगारी वृत्तीचे जे मुस्लिम आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली असती.मौलाना ,जे मशीद मध्ये मुस्लिम लोकांना भडकवत असतात त्यांच्या वर कायद्याने च नियंत्रण ठेवता आले असते.
देशाच्या आर्थिक प्रगतीत अडथळा निर्माण करणारे नियम बदलले असते.
प्रशासनात असलेल्या भ्रष्ट अधिकारी कर्मचारी ह्यांना घरचा रस्ता दाखवत आला असता.
एक आदर्श सरकार कसे असावे हे देशाला दाखवून देता आले असते.
पण आलेली आणि जनतेने दिलेली संधी चा फायदा bjp ल करता आला नाही.
फक्त विरोधी पक्षांच्या राज्य सरकार ना त्रास देणे,केंद्रीय एजन्सी चा गैर वापर ,चुकीची आर्थिक धोरणे,आणि सर्वात ठळक बाब.
हिंदी न्यूज चॅनेल वर पूर्ण नियंत्रण ते फक्त 24 तास bjp चाच अजेंडा चालवत आहेत.
त्यांच्यावर काही तरी प्रचंड दबाव आहे.
कोणताही हिंदी चॅनेल कोणत्या ही वेळी लावा.फक्त धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चर्चा किंवा बातम्या.आणि bjp चे गुणगान हे
च चालू असत.
हे इतके उघड पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.

खुप मोठ्या प्रमाणात भारतीय गल्फ मधील देशात नोकऱ्या करत आहेत
गवंडी,bigari ह्या कष्टकरी वर्गाला चांगले दिवस त्याच देशांनी दाखवले आहेत
Sony ब्रँड चे टीव्ही वापरायची कुवत त्याच देशांनी दिली.
एक्सपोर्ट पण आपण तिथे करतो.
ते आपल्या भांडणात पडत पण नाहीत पाकिस्तान बरोबर असलेल्या.
तेच नाराज झाले आणि बायकॉट इंडिया गूड्स
अशी घोषणा त्यांनी केली
म्हणून लगेच नुपूर आणि जिंदाल वर कारवाई केली.
अंबानी,अडाणी ह्यांचे पण प्रोजेक्ट नाहीतर धोक्यात आले असते.
मित्र फर्स्ट ही तर bjp ची निती आहे.

sunil kachure's picture

6 Jun 2022 - 3:08 pm | sunil kachure

कारण भारत हा सक्षम देश नाही.१४०, कोटी लोकसंख्या असलेला अतिशय गरीब देश
देशातील प्रतेक आर्थिक गटा मधील लोकांचे जीवन कान कसे सुधारेल
ह्याची बिलकुल अक्कल नसलेले सरकार ,दर्जा हिन प्रशासन.
स्वार्थी आर्थिक तज्ञ,आणि विचारवंत.
अमेरिका,रशिया,चीन किंवा बाकी प्रगत देश ह्यांची तुलना फक्त महामूर्ख च करू शकतात.
अमेरीकेत शेती विषयी काय धोरण आहे,रशिया चे आर्थिक धोरण काय आहे चीन मध्ये कास कामगार च पगार कमी आहेत
ज्या मधील काहीच तिथे तसे नाहीं
चीन मध्ये जीवन व्यवस्थित चालावे इतके पगार तिथे आहेत
अमेरिका मध्ये शेतकरी खुश आहेत त्यांचे हीत जपले जाते.
रशियन लोक भारतीय लोकांपेक्षा खूप सुखी आहेतं
पण बकवास तज्ञ,फालतू अर्थ तज्ञ, स्वार्थी नेते,स्वार्थी उद्योगपती ह्यांनी भारताची वाट लावली आहे
शेती विषयक कायदे ह्या बकवास अविचारी लोकांचे ऐकून च अपरिपक्व bjp सरकार नी आणलें
कतार काय उद्या नेपाळ पण भारताला दम देईल.
तयारी ठेवा

आयएएस आणि आयपीएस ह्यांची निवड च चुकीच्या पद्धतीने होत आहे.
ते प्रशासन चालविण्यास योग्य व्यक्ती नाहीत..

निवड पद्धत पूर्ण पने बदलली पाहिजे.
मोदी सरकार चा एक निर्णय ह्या बाबत योग्य वाटतो.
सरकार स्वतः योग्य व्यक्ती निवडेल.
राजकीय असला तरी तो व्यक्ती नक्की सक्षम असेल.

आयएएस आणि आयपीएस ह्यांची निवड च चुकीच्या पद्धतीने होत आहे.
ते प्रशासन चालविण्यास योग्य व्यक्ती नाहीत..

येऊ द्यात तुमच्या तर्फे काही सुधारणा निवडप्रक्रियेमध्ये.

स्वधर्म's picture

6 Jun 2022 - 6:03 pm | स्वधर्म

ही शांतता जाणवण्यासारखी आहे खरी. वरचे सगळे आय डी हुषार आणि बोलके आहेत. आता निदान काहीतरी मत यावं किंवा आपला समज चुकीचा होता हे मोठ्या मनाने सांगावं, ही किमान अपेक्षा. नाहीतर भाऊ आणि यांच्यात काय फरक?

sunil kachure's picture

6 Jun 2022 - 3:46 pm | sunil kachure

जे स्वतःला शहाणे समजतात ह्यांची हीच अवस्था होते.
कतार ,मुंबई इतका पण नसेल पण ह्यांना पूर्ण शरण यायला लावले.
आज पर्यंत बाकी सरकार कोणत्या ही ही पक्षाची असू ध्या...
महत्वाचे निर्णय प्रतेक व्यक्ती चे मत ऐकून घेत होते.
भले तो विरोधी पक्षातील असेल तरी.
Bjp चे अती शहाणे फक्त जय मोदी आणि जय अमित शाह.
हेच करत राहिले.
पुढे अजून नालस्ती होणार आहे.
ही फक्त झलक होती.

मुक्त विहारि's picture

6 Jun 2022 - 6:49 pm | मुक्त विहारि

लोचट माणसांच्या नादी लागत नाही

पण,

खालील वाक्यांत त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे ..... Mipa चा वापर करून आर्थिक फायदा करून घेत आहेतं....

अशावेळी, गप्प बसलो तर, संशयाला वाव राहतो ...

काड्यासारू आगलावे's picture

6 Jun 2022 - 6:56 pm | काड्यासारू आगलावे

तुमचे एककल्ली प्रतिसाद पाहीले की तसेच वाटते. म्हणजे पुणे महापालीकेतील (जिथे भाजपची सत्ता आहे) गैरव्यवहारासाठी तुम्ही राज्य शासनाला जबाबदार धरले होते. तेव्हा पासून बर्याच मिपाकरांना ही शंका वाटतेय.

काड्यासारू आगलावे's picture

6 Jun 2022 - 6:54 pm | काड्यासारू आगलावे

मुद्द्यात हरलो की विषय भरकटवायचा म्हणूनसमोरच्याला मुर्ख ठरवण्याची तुमची कला वाखाणणिया जोगी आहे.

शलभ's picture

6 Jun 2022 - 7:54 pm | शलभ

+1000 टू श्रीगुरुजी

श्रीगुरुजी's picture

6 Jun 2022 - 10:41 pm | श्रीगुरुजी

आधी - शिवसैनिकांनीच बाबरी पाडली.
(अर्थात मुंबईत घरात बसून रिमोट कंट्रोल वापरून बाबरी पाडली)

आता - श्रीराममंदीरासाठी हजारो शिवसैनिकांनी बलिदान दिले.
(अर्थात अयोध्येत पाऊल न ठेवता मुंबईत बसून जिवंत राहून बलिदान दिले)

नंतर - शिवसैनिकांनीच समुद्रावर सेतू बांधून लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला रावणाच्या बंदीवासातून मुक्त केले.

सुक्या's picture

7 Jun 2022 - 1:44 am | सुक्या

हा हा हा ..
त्यांच्या टिवटिवाटाखाली मस्त प्रतिसाद आहेत. मजा येते वाचायला ... बाकी मोजुन १५ लोक आहेत.

त्या मध्ये सेना च मुंबई मध्ये हिंदू रक्षणासाठी रस्त्यावर होती bjp कार्यकर्ते आणि नेते कुठेच नव्हते.
हे १००% सत्य आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Jun 2022 - 11:40 pm | श्रीगुरुजी
sunil kachure's picture

9 Jun 2022 - 4:12 pm | sunil kachure

जुलै मध्ये भारताचे राष्ट्र पती निवडले जातील.

Dr. कलाम सहेबांसारखे च कर्तुत्व वान राष्ट्रपती भारताला लाभावे अशी इच्छा.
सर्व राजकीय पक्षांनी ...सर्व राजकीय हेतू बाजूला ठेवून बैल राष्ट्र पती न निवडता.
भारतातील अतिशय हुषार आणि स्व बुद्धी असणाऱ्या गैर राजकीय व्यक्ती ला सर्व समंतीने राष्ट्रपती म्हणून निवडावे .
बैल आणि राजकीय व्यक्ती बिलकुल नकोत.

प्रसाद_१९८२'s picture

9 Jun 2022 - 5:35 pm | प्रसाद_१९८२

तुमच्या सारख्या सर्वज्ञानी व अभ्यासू माणसाने राष्ट्रपती निवडणुकीला उभे राहायला हवे. तुमची निवडून यायची शक्यता ९९.९९ टक्के नक्कीच आहे. सातार्‍यातील अभिजीत बिचकुले राष्ट्रपती निवडणुकीला उभा राहु शकतो तर तुमच्या सारखा सर्वज्ञानी का नाही?

बिचुकले आणि राऊत यांच्यापैकी कोणाला निवडाल असे विचारले तर तुमचे उत्तर काय असेल

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2022 - 12:45 pm | श्रीगुरुजी

अर्थातच बिचुकले

इरसाल's picture

10 Jun 2022 - 3:07 pm | इरसाल

राष्ट्रपती सारख्या सन्माननीय पदाच्या समोर बैल अस शब्द लिहीताना किंवा विचार करतान तुम्हाला अजिबातच लाज शरम वगैरे काहीच वाटत नाही कां?

बकवास,भावनिक, बिन कामाचे विषय इथे मांडणारे महत्वाचे विषय कधीच मांडत नाही.
एलआयसी ची share बाजारात एन्ट्री झाल्या बरोबर आणि सरकार त्यांचे शेअर विकणार
हे जाहीर पने सरकार नी सांगितल्या मुळे.
एलआयसी शेअर च भाव रोज कमी कमी होत आहे..
हे हर्षद मेहता सारखे दलाल करत असणार हे नक्की.
म्हणजे अगदी फालतू किमतीत lic ताब्यात घेण्याचा डाव आखलेला आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Jun 2022 - 3:46 pm | चंद्रसूर्यकुमार

आज संध्याकाळी महाराष्ट्रातील सहा राज्यसभा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल लागेल. या निवडणुकीत आमदारांनी मत दिलेली मतपत्रिका पक्षाने नियुक्त केलेल्या निरीक्षकाला दाखवावी लागत असल्याने समजा कोणा आमदाराने पक्षाच्या उमेदवाराला मत न देता अन्य कोणा उमेदवाराला मत दिले तर ते लगेच जगजाहीर होणार असल्याने या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग व्हायची शक्यता त्या मानाने कमी वाटते. अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांनी आयत्या वेळेस मत बदलले तर तीच एक शक्यता आहे. तरीही या निवडणुकीत महाविकास आघाडीची चलबिचल मात्र लगेच जाणवत होती. जर आपले चारही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येतील ही खात्री असेल तर मग भाजपने आपला तिसरा उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती करायला फडणवीसांची भेट घेणे तसेच जिंकून यायला पहिल्या पसंतीची ४१ मते गरजेची असतानाही काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगडींना सगळ्या ४४ काँग्रेस आमदारांना मत द्यायला सांगणे वगैरे गोष्टी महाविकास आघाडीत पसरलेली भिती दर्शवितात. जर काँग्रेसला आपल्या सगळ्या आमदारांवर विश्वास असेल तर मग ४१ आमदारांना प्रतापगडींना मत द्यायला सांगून उरलेल्या तीन आमदारांना शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना मत द्यायला सांगता आले असते. पण तसे होताना दिसत नाही. तसेच शिवसेनेने सगळ्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलात उतरविणे आणि इतकेच नाही तर हॉटेलभोवती शिवसैनिकांचा गराडा ठेऊन आमदारांवर लक्ष ठेवणे हे प्रकार आपल्याच आमदारांवर विश्वास नसल्याचे लक्षण आहे.

२० जून रोजी होणार्‍या विधानपरिषद निवडणुकांमध्ये पूर्णपणे गुप्त मतदान असणार आहे आणि त्या निवडणुकीत आमदारांना आपली मतपत्रिका कोणालाही दाखवावी लागणार नाही. तसेच १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीत मतदान होणार आहे. त्या निवडणुकीतही असे गुप्त मतदान असणार आहे. त्यामुळे जर क्रॉस व्होटिंग व्हायचे असेल तर त्या निवडणुकांमध्ये व्हायची शक्यता जास्त. त्यातून विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपच्या ४ जागा निवडून येणार्‍यातल्या असल्या तरी पक्षाने ६ उमेदवार दिले आहेत. त्यामुळे तिथे क्रॉस व्होटिंग होईल अशी शक्यता पक्षाला वाटते असे दिसते.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2022 - 6:40 am | श्रीगुरुजी

भाजपच्या धनंजय महाडिक यांनी सेनेच्या संजय पवारांचा पराभव करून राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीत धक्कादायक विजय मिळविला. मविआच्या ९ ते १० आमदारांनी महाडिकांना मत दिल्याने संजय पवार हरले. पवार-ठाकरे यांच्या कूटनीतिला फडणवीसांनी धोबीपछाड देऊन सपशेल लोळवून विजय खेचून आणला. मागील काही दिवस उर्मठपणे बरळून फुशारक्या मारणारे संजय राऊत घोडेबाजार वगैरे आरोप करून नैतिक विजय आमचाच झाला अशा फुशारक्या मारतीलच. आता तर राष्ट्रपती पदावर सेनेचाच माणूस बसणार अशी फुशारकी राऊतांनी कालच ट्विटरवर मारली. भविष्यात राष्ट्रपती पदाबरोबर उपराष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, क्रिकेट संघाचा कर्णधार, अमेरिकेचा अध्यक्ष, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस . . . इ. पदांवरही सेनेचाच माणूस बसणार हे नक्की.

सुक्या's picture

11 Jun 2022 - 7:31 am | सुक्या

फडवणीसांचे आजारपण , मविआ चे रेसॉर्ट प्रेशर टॅक्टिस , अपक्ष तसेच सपा व ईतर मुस्लिम पक्षांचे मविआ ला मत वगेरे बाबी बघुन मला महाडिक यांचा पराभव होइल असे वाटले होते. त्यात ठाकरे यांचे नंतर पार्टी करु वगेरे विधान यामुळे आजचा हा निकाल खुप अनपेक्षित होता.

पाण्यासारखा पैसा ओतुनही शेवटी सेनेचा दुसरा उमेदवार हरलाच. संभाजी राजांना पाठिंबा दिला असता तर नाक वाचवता आले असते. आता तेल गेले तुप गेले हाती धुपाटणे अशी अवस्था झाली आहे.

दुसरी मला न समजलेली बाब म्हणजे प्रतापगडी यांना पडलेली ४४ मते. विजयासाठी ४१ मते आवश्यक असताना ४४ मते द्यायला लावणे म्हणजे मविआ मधेच एकमत नाही हे अधोरेखित होते.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2022 - 9:34 am | श्रीगुरुजी

संभाजी राजांना पाठिंबा दिला असता तर नाक वाचवता आले असते.

पक्षात आला तरच पाठिंबा देऊ ही ठाकरेंची भूमिका योग्य होती. मागील सहा वर्षात संभाजीराव भोसलेंनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करता आपल्याला हवे तेव्हा मोदींना विरोधही केला होता . त्याविरूद्ध भाजपला काही करता येत नव्हते. अपक्ष म्हणून निवडून गेले असते तर ते प्रत्येक वेळी सेनेला पाठिंबा देण्याची कोणतीच शाश्वती नव्हती. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा पण मी कोणत्याही पक्षाशी बांधील राहणार नाही, ही भूमिकाच चमत्कारिक होती. मला कंपनीने पगार, भत्ते, बोनस, रजा, निवृत्तीवेतन वगैरे सर्व फायदे द्यावे परंतु मी कंपनीच्या पेरोलवर येणार नाही व नोटीस पिरीयड वगैरे नियम पाळणे माझ्यावर बंधनकारक नाही, असे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत कोणतीही कंपनी करीत नाही. त्यामुळेच या संदर्भात ठाकरेंनी योग्य भूमिका घेतली होती.

केवळ एका घराण्यात जन्माला आले म्हणून लोकांनी त्यांना मन द्यावा किंवा त्यांना कोणतेही प्रश्न न विचारता निवडून द्यावे हि गोष्ट अनाकलनीय आहे.

हे म्हणजे महात्मा गांधीजींच्या मुलांनी आम्हाला खासदारकी मंत्रिपद द्या म्हणण्यासारखे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून जनतेने त्यांना नमस्कार करणे इतपत ठीक आहे.

केवळ त्या घराण्यात जन्माला आले म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणे हे अमान्य आहे

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2022 - 11:15 am | श्रीगुरुजी

छत्रपती घराण्याचा दबाव, मराठा संघटनांचा दबाव, पक्षांतर्गत दबाव, सहकारी पक्षांचा दबाव, माध्यमांचा दबाव अशा कोणत्याही दबावाखाली न झुकता ठाकरे ठाम राहिले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2022 - 12:13 pm | श्रीगुरुजी

ठाकरेंच्या जागी फडणवीस असते तर नक्की दबावाखाली झुकले असते.

रात्रीचे चांदणे's picture

11 Jun 2022 - 1:14 pm | रात्रीचे चांदणे

खासदारकीसाठी एखाद्या पक्षाकडे मते मागण्यात काहीही चूक नाही, बर ही मत मागताना मी राज घराण्यातील आहे म्हणून मलाच मत दिली पाहिजे अशी कोणतीही मागणी त्यांनी केल्याचं मलातरी माहिती नाही.
सध्यातरी राज्यात आशा कोणत्याही पावरफुल मराठा संघटना नाहीत ज्या आहेत त्या कोणत्यातरी पक्षच्या दावणीला बांधलेल्या आहेत. राजघराण्यातील असल्या मुळे लोक फार फार तर त्यांना आदर देतात, उद्या निवडणुकीला उभे राहिले तर पडण्याचीच शक्यता जास्त आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2022 - 7:24 am | श्रीगुरुजी

धनंजय महाडिक = एकूण मते ४१.८६
संजय पवार = एकूण मते ३८.५८

मविआच्या मलिक व अनिल देशमुख यांना न्यायालयाने मत देण्याची परवानगी दिली नाही, तर सेनेच्या सुहास कांदेंचे मत बाद झाले. या तिघांची किंवा किमान दोघांची मते असती तर संजय पवार यांची प्रथम व द्वितीय क्रमांकाची मते मिळून नक्की जिंकले असते.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Jun 2022 - 10:37 am | चंद्रसूर्यकुमार

राज्यसभा निवडणुकीत आलेले मतांच्या आकड्यांमध्ये थोडे जास्त डोकावून बघून काही निष्कर्ष निघतात का हे तपासून बघू.

एकूण मतदारः २८४
पहिल्या फेरीत मिळालेली मते:
पियूष गोयलः ४८
अनिल बोंडे: ४८
इम्रान प्रतापगढी: ४४
प्रफुल पटेलः ४३
संजय राऊतः ४१
संजय पवारः ३३
धनंजय महाडीकः २७

याचा अर्थ महाविकास आघाडीला १६१ तर भाजप आघाडीला १२३ मते मिळाली आहेत. भाजपचे स्वतःचे १०६ आणि रवी राणा, विनय कोरे वगैरे अपक्ष मिळून भाजप आघाडीकडे ११३ मते होती असे सगळे न्यूज चॅनेल्स सांगत होते. याचा अर्थ भाजप आघाडीने महाविकास आघाडीची १० मते फोडली आहेत. हे गणित दिसते तितके साधे आहे का?

भाजप आघाडीला आपल्या सगळ्या ११३ मतांवर पूर्ण विश्वास असेल आणि जिंकून यायला आवश्यक कोटा ४१ मतांचा असेल तर भाजपचे तीन उमेदवारांसाठी ४१+४१+३१ किंवा फार तर ४२+४२+२९ असे गणित असायला हवे होते. जर धनंजय महाडीकांना पहिल्या फेरीत २७ मते मिळाली असतील आणि भाजप आघाडीचे एकही मत फुटले नाही हे गृहित धरले तर भाजपचे गणित ४३+४३+२७ असे होते असे म्हणायला हवे. पण पियूष गोयल आणि अनील बोंडेंना प्रत्येकी ४८ मते मिळाली आहेत. याचाच अर्थ प्रत्येकी कमितकमी ५ (आणि जास्तीतजास्त ७) जास्तीची मते या दोन उमेदवारांना मिळाली आहेत. म्हणजे भाजप आघाडीला जास्तीची १० ते १४ मते मिळाली. जर जास्तीची १० मते भाजप आघाडीला मिळाली असतील तर त्यांचे एकही मत फुटले नाही. पण जास्तीची ११/१२/१३/१४ मते भाजप आघाडीला मिळाली असतील तर त्यांचीही अनुक्रमे १/२/३/४ मते फुटली असे म्हणायला हवे.

भाजप आघाडीचे एक मत फुटले असे शरद पवारांनी म्हटले ते पूर्ण तथ्यहिन नसावे असे वाटते.

समजा सुहास कांदेंचे मत जरी ग्राह्य धरले गेले असते तरी त्यांनी संजय राऊतांना पहिल्या क्रमांकाचे मत दिले असल्याने त्यामुळे निकालात फरक पडला नसता. त्यातही एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुहास कांदे निवडून आले आहेत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मधून पंकज भुजबळांना हरवून. पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये समजा महाविकास आघाडी राहिली तर छगन भुजबळ ती जागा हट्टाने राष्ट्रवादीसाठी मागून घेतील (जशी १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाण्याची जागा ठाकरेंनी शिवसेनेसाठी मागून घेतली होती आणि प्रमोद महाजनांच्या भाषेत भाजपने तो 'राजहट्ट' पुरवला होता) ही शक्यता ध्यानात घेऊन सुहास कांदेंनी पुढे भाजपात जायचा मार्ग मोकळा असावा म्हणून आपले मत बाद होईल अशी कृती मुद्दामून केली होती का? कल्पना नाही.

जर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांची मतेही संजय पवारांना मिळाली असती तर कदाचित ते विजयी झाले असते. पण याविषयी दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतात- एक तर जर-तर ला अर्थ नसतो. त्या दोघांना न्यायालयाने मतदान करायला जायची परवानगी दिली नाही ही सत्य परिस्थिती आहे ती नाकारून काहीच अर्थ नाही. आणि जर-तर चे तर्क लढवायचेच असतील तर मग १९९९ च्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ओरिसाचे मुख्यमंत्री असलेले गिरीधर गोमांगो लोकसभेत उपस्थित राहून त्यांनी वाजपेयी सरकारविरोधात मत दिले नसते तर वाजपेयींचे सरकार एका मताने पडायच्या ऐवजी एका मताने वाचले असते असाही तर्क लढवता येऊ शकेल. पण असे तर्क लढवायला शून्य अर्थ असतो. दुसरे म्हणजे समजा अगदी ती दोन मते मिळून संजय पवार जिंकले जरी असते तरी महाविकास आघाडी वाटते तितकी आणि जितके चित्र उभे केले आहे तितकी अभेद्य नाही, त्यांच्यात भरपूर अंतर्विरोध आहेत हे चित्र लोकांपुढे आणायचा भाजपचा हेतू असेल तो साध्य झालाच. धनंजय महाडीक जिंकणे ही लॉटरी आहे.

कपिलमुनी's picture

11 Jun 2022 - 10:00 am | कपिलमुनी

सेनेचा गेम सर्व पक्षांनी मिळून वाजवला..
सेनेकडे कोणीही चाणक्य नाही हे प्रकर्षाने दिसून आले .
सेनेत सगळा सावळा गोंधळ आहे..

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2022 - 10:44 am | श्रीगुरुजी

चाणक्याचे वडील राऊत आहे की.

कपिलमुनी's picture

11 Jun 2022 - 2:56 pm | कपिलमुनी

राऊत पाचकळ वाचाळवीर आहे..
त्याची लायकी चंपा , शेलार, संबित पात्रा एवढीच आहे

पवार स्वतः मैदानात उतरले नाहीत कारण त्यांना ह्याचा आधीच अंदाज आला होता

sunil kachure's picture

11 Jun 2022 - 10:47 am | sunil kachure

मुकेश पटेल यांना एक मत जास्त मिळाले आहे आणि ते आघाडीचे नाही .ते कोठून आले आहे जे मला माहित आहे असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
म्हणजे bjp मध्ये पण एक फुटीर आहे.
पण तो कोण?
असा प्रश्न निर्माण करून पवार साहेबांनी फडणवीस ह्यांना धंद्याला लावले आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2022 - 6:51 pm | श्रीगुरुजी

नूपूर शर्माच्या समर्थनार्थ एक ऑनलाइन पिटीशन सुरू झाली आहे. समर्थकांनी पिटीशन उघडून सिग्नेचर करावी.

https://chng.it/NRJTGtWQ

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jun 2022 - 9:18 pm | अमरेंद्र बाहुबली

काय ते दुर्दैवं. देशात हिंदूंचं सरकार हवं होतं. एका खरं बोलनार्या स्त्री ला पाठींबा द्यायला पेटीशन काढावी लागतेय.

sunil kachure's picture

12 Jun 2022 - 2:32 am | sunil kachure

Link ओपन करून बघितली 6 दिवसापूर्वी ही सह्यांची मोहीम कोणी तरी सिन्हा आहे त्यांनी चालू केली आहे 113 लोकांनीच सही केली आहे.
येथील bjp समर्थन करणाऱ्या लोकांनी पण सही केली नसणार.

पण राजकारणातील धोरण ठरवतात का?

२) मविआच्या ९ ते १० आमदारांनी महाडिकांना मत दिल्याने संजय पवार हरले. - या महाडिकांचे पक्षातीत मैत्रीसंबंध आहेत काय?

महाविकास आघाडी मध्ये फूट पडलेली आहे.
Mr फडणीस ह्या अती हुशार नेत्याने महाविकस आघदी ल सुरुंग लावलेला आहे.
दोन दिवसात सरकार पडेल .
म्हणजे पडल्यात च आहे.
परवा पासून फडणवीस हे मुख्य मंत्री होतील.
आणि चंद्रकांत पाटील उपमुख्य मंत्री

हिंदू सहित तमाम धर्मीय लोकांनी शांत डोक्याने विचार करण्याची गरज आहे.
धर्म धोक्यात आहे की राष्ट्र ,लोकशाही धोक्यात आहे.
राहुल गांधी ना चोकशी साठी बोलावणे धोक्याचा इशारा देत आहे.
मला काँग्रेस विषयी प्रेम नाही.
पण जर घडतं आहे ते राष्ट्र ,आणि लोकशाही ह्या साठी चांगले नाही.
धर्मात किती गुंतायचे हे लोकांनी शांत डोक्याने ठरवले पाहिजे.

डँबिस००७'s picture

13 Jun 2022 - 2:54 pm | डँबिस००७

राजस्थानचे मुख्य मंत्री गेहलोत यांना अटक !!

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अटक झाल्याची बातमी आहे.

पक्षश्रेष्ठी पाठोपाठ, वरीष्ठ नेत्यांनाही कायद्याच्या अमला खाली आणलय.

कमाल आहे , सावरायला वेळच देत नाहीत .

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2022 - 4:40 pm | श्रीगुरुजी

कोठे आहे ही बातमी?

डँबिस००७'s picture

13 Jun 2022 - 10:11 pm | डँबिस००७

https://youtu.be/KSZ0wyAtdhk

अशोक गेहलोत बरोबर दिग्विजय सींग, दिपेंद्र हुड्डा ह्यांना पण अटक केली होती. संध्याकाळी सगळ्यांना सोडुन देण्यात आले.

सरकार कॉंग्रेस नेत्यांना जेल मध्ये टाकुन काय साध्य करत आहे? कॉंग्रेसचे नेते किती अगतीक आहेत हे समोर दिसत आहेच. राज्याच्या मुख्यमंत्र्यालाच उचलुन जेल मध्ये टाकले. कमाल आहे !!

sunil kachure's picture

13 Jun 2022 - 3:29 pm | sunil kachure

उथळ विचार करणारे आणि बिनडोक लोक ह्यांना पुढच्या संकटाची पुसट शी पण पण जाणीव नाही .
राहुल गांधी हे काँग्रेस चे सर्वोच्य नेते आहेत आम्ही विसरू नका.. .ed सारखी सारखी संस्था त्यांना चोकशी लं बोलावते हे लाजिर वाने आहे.
कंबोडिया सारखी भारताची अवस्था देशातील मूर्ख लोकांन मुळे होवू नये.
हीच इच्छा.
नाहीतर तर अती शहणे आणि बाकी बकवास समर्थक देशात लोकशाही नष्ट करतील
कंबोडिया,जर्मनी ,इटली ह्या देशातील क्रूर हुकूमशाही लोकांना पण लाजे ने मान खाली घालावी लागेल असा हुकूम शाह भारतात निर्माण होईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Jun 2022 - 9:54 pm | अमरेंद्र बाहुबली

एका दंगेखोराला किती आदर देण्यात येतोय पहा. शिर्षक वाचा.
https://www.bbc.com/marathi/india-61786430

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार जावेद अहमद याची बेकायदेशीर इमारत उद्ध्वस्त करताना पोलिसांना घरात अवैध शस्त्रे सापडली . पोलिसांनी घरातून दोन पिस्तुले जप्त केली. याशिवाय आरोपीने अनेक काडतुसेही घरात लपवून ठेवली होती. त्याच्या घरातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा व्यतिरिक्त न्यायालयांवर आक्षेपार्ह टिप्पण्या असलेली अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि पोस्टर्सही जप्त करण्यात आले आहेत.
जावेद अहमद उर्फ ​​पंप यानेच प्रयागराजमधील हिंसाचाराच्या वेळी मुलांना समोर ढकलून पोलिसांवर दगडफेक केली होती. हिंसाचाराच्या वेळी त्याने दगडफेक करणाऱ्या मुलांचा दंगलखोरांची ढाल म्हणून वापर केला.

रात्रीचे चांदणे's picture

14 Jun 2022 - 11:31 am | रात्रीचे चांदणे

हे असले प्रकार जास्त करून शुक्रवारीच घडतात.

sunil kachure's picture

14 Jun 2022 - 12:42 pm | sunil kachure

हुकूमशाही नको असेल तर विचारी हिंदू आणि मुस्लिम लोकांनी एकत्र यावे.
मुस्लिम द्वेष पसरवण्याचे कारस्थान हिंदू ,मुस्लिम लोकांनी एकत्र येवून उधळून लावावे.
संयम खूप महत्वाचा आहे.
ना हिंदू ना धोका आहे ना हिंदू पासून मुस्लिम लोकांना धोका आहे.
राजकारणी लोकांच्या खुर्च्या धोक्यात आहेत.
त्यांना त्यांची जागा संयम ,ठेवून ,शांत डोक ठेवून दाखवून देणे गरजेचे आहे.