नको आता वेदनांचे प्रमाण पुन्हा एकदा
नको आता आनंदाला उधाण पुन्हा एकदा
नको ग्रीष्मात सोनेरी क्षणाची सावली
नको आता सुखाचे विधान पुन्हा एकदा.
हरवून गेले ओळखीचे रस्ते संभ्रमामध्ये
नको आता ते आयुष्याचे भान पुन्हा एकदा.
डंख होतो पुन्हा पुन्हा स्वप्नांच्या इंगळीचा
नको आता निद्रेला अवताण पुन्हा एकदा.
देवा तुच धर हात माझा या मावळतीला
झालो आहे बालकासम अजाण पुन्हा एकदा.
प्रतिक्रिया
4 Mar 2022 - 10:16 am | ज्ञानोबाचे पैजार
कवितेचे शिर्षक वाचून मोठ्ठा गैरामज झाला, वाटले श्रुंगारीक कविता असेल आणि मोठ्या अपेक्षेने कविता उघडली.
पहिल्या दोन ओळी वाचल्यावर तर खात्रीच झाली की कविता नक्की त्याच्या बद्दलच आहे
पण पुढच्या ओळींनी एकदम भानावर आलो.
पैजारबुवा,