मराठी भाषा गौरव दिन अभंग

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
27 Feb 2022 - 8:14 pm

मीही एक वारकरी
माय मराठी पंढरी,
नतमस्तक होवू तेथे
जेथे कवींची पायरी.

करु रिंगण सोहळा
खेळ शब्दांचा मांडून,
शब्दसृष्टीच्या ईश्वरा
तेथे करुया नमन.

दिव्य सारे अलंकार
सजवू आपल्या देवाला,
नाचवू दिंड्या पताका
गुंफू शब्दांची तुलसीमाला.

आपल्या इवल्या पावलांनी
चालू मोठ्यांची पायवाट,
शब्दसृष्टीचे मायबाप
होवो सदा कृपावंत,

हजारो वर्षांचा सोहळा
रंगतो भाषेचा हा मेळा,
चालो समृद्धीच्या वाटे
लाभो स्वर्गाच्या कळा.

तुझ्या नामाचा ग टिळा
लागावा माझ्या माथी,
बोल माझा चिमखडा
रुजू व्हावा तुझ्या गाथी.

तुझ्या ऐश्वर्याचा घडा
सजे महाराष्ट्राच्या मनी
तुझ्या अमृताचा लाभ
घेई माय मराठीचा धनी.

२७/०२/२०२२
मराठी भाषा गौरव दिन

अभंगमाझी कवितामुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

Bhakti's picture

27 Feb 2022 - 9:45 pm | Bhakti

खुपचं सुंदर!

कर्नलतपस्वी's picture

27 Feb 2022 - 10:25 pm | कर्नलतपस्वी

सुंदर आवडली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2022 - 10:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुप छान. रचना आवडली.

-दिलीप बिरुटे

बाजीगर's picture

27 Feb 2022 - 11:58 pm | बाजीगर

समयोचित आणि कल्पनेची उंची उडान !!

श्रीगणेशा's picture

27 Feb 2022 - 11:59 pm | श्रीगणेशा

खूप छान!

आपल्या इवल्या पावलांनी
चालू मोठ्यांची पायवाट

_/\_

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2022 - 5:57 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर !

&#128150

हजारो वर्षांचा सोहळा
रंगतो भाषेचा हा मेळा,
चालो समृद्धीच्या वाटे
लाभो स्वर्गाच्या कळा.

सोहळा असाच कायम रंगत राहिल आणि समृद्धीकडे वाटचाल करून पताका फडकवेल असा ठाम विश्वास वाटतो !

व्वा सागरसाथी _/\_

सागरसाथी's picture

28 Feb 2022 - 8:32 pm | सागरसाथी

सर्वांचे आभार