एकतर तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता किंवा सिद्ध ! जगात यापरता तिसरा पर्याय नाही. इन फॅक्ट, जर तुम्ही स्वतःला सिद्ध मानत नसाल तर स्वतःला व्यक्ती मानण्याखेरीज इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यत्र-तत्र-सर्वत्र सिद्धत्वंच सारे विश्व व्यापून आहे त्यामुळे इथे बाय-डिफॉल्ट, प्रत्येक जण सिद्धच आहे पण एखादं-दुसराच स्वतःच्या सिद्धत्वाची घोषणा करतो हा जगातला सर्वात मोठा विस्मय आहे.
पण खरी मजा तर पुढे आहे, जर असा सिद्ध इतरांना सांगायला लागला की व्यक्तिमत्त्व ही जगणं सोयीचं व्हावं म्हणून असलेली सामाजिक सोय आहे आणि ते सुद्धा बाय-डिफॉल्ट, सिद्धच आहेत तर ते सगळे मिळून त्याच्यावर तुटून पडतात ! कारण त्यांची अशी पक्की धरणा असते की सिद्धत्व ही पारलौकिक घटना आहे आणि शतकानुशतकात, कोट्यवधी लोकात, एखादाच सिद्ध असतो ! अर्थात, त्यांचा उद्वेगही सकारण असतो कारण पूर्वीच्या सिद्धांच्या पश्चात, त्यांच्या भक्तांनी आणि अनुयायांनी, सिद्धांच्याबाबतीत अशा काही स्टोर्या लावलेल्या असतात की बोलता सोय नाही ! उदाहरणार्थ, सिद्धांना त्यांचा ग्रंथ लिहायचा होता पण त्यांचा स्टेनो डेड झाला होता; मग यांनी त्याच्या बॉडीला हाक मारून सांगितलं की रायटिंग कंप्लीट केल्याशिवाय तू एक्झिट मारू शकत नाहीस !आणि आश्चर्य म्हणजे तो डेड फेलो उठला आणि त्यानं पहिले ग्रंथ कंप्लीट केला ! आता हा डबल ट्रबल होतो ! डेड मॅन उठला याला पुरावा काय ? तर त्या ग्रंथात स्टार्टींगलाच भक्तांनी, सिद्धाच्या पश्चात घुसवलेली ही स्टोरी ! एकतर सिद्धाला विचारायची सोय नाही आणि डेड मॅन तर ऑलरेडी डेड होताच म्हणजे वादाला जागाच नाही !
नंतर पुन्हा एखादा सिद्ध लोकांना सांगतो की सत्य सर्व चराचर अंतर्बाह्य व्यापून आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सिद्धच आहात; तर भक्त त्याला विचारतात तू डेड मॅनला उठवू शकतोस का? खल्लास ! म्हणजे कशाचा काही संबंध नाही पण पब्लिक विजयोन्माद साजरा करायला मोकळी. तो सिद्ध सांगतो की ज्या सिद्धाचा तुम्ही दाखला देताय त्यानं सुद्धा त्या ग्रंथात अ-मृताचा उद्घोष केला आहे, मृत्यू शरीराचा होतो, तुम्ही सत्य आहात, तुम्हाला मृत्यू नाही. पण पब्लिकला वाटतं की अमृत हे एक ड्रिंक आहे जे प्यायलं की देह अमर होतो !
ग्रंथात नेमकं तेच सांगितलं असूनही पब्लिक तो मेन कंटेंट धुडकावून स्टोरी फोरग्राउंडला आणते आणि परस्पर ठरवून टाकते की हा स्वतःला सिद्ध समजतो म्हणजे काय ? हा अहंकारी आहे ! आता ही त्याचूपणाची हद्द होते, खरं तर व्यक्तिमत्त्व हाच अहंकार आहे आणि सिद्धत्व म्हणजे व्यक्तित्वाच्या भासाचा निरास आहे, पण पब्लिक ऐकेल तर शपथ !
या पब्लिक मेंटॅलिटीमागे असलेलं एकमेव कारण म्हणजे इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स !
२. व्यक्तिमत्त्व ही सामाजिक उपयोगिता आणि जगणं सोपं व्हावं यासाठी केलेली सोय आहे. जर कुणी विचारलं की तुमचं नांव काय ? आणि प्रत्येक जण `माझं नांव सत्य' म्हणायला लागला तर समाज व्यवस्था कोलमडेल. यावर उपाय म्हणून व्यक्तिमत्त्वाचा फंडा शोधला गेलाय. पण वास्तविकात तुम्ही स्वतःला जे संबोधता (नांव-वडीलांच नांव-आडनाव) तसं कुणीही या जगात अस्तित्वात नाही, नव्हतं आणि नसेल. थोडक्यात, ज्या नांवानं तुम्ही स्वतःला संबोधता तसं कुणी, देह जन्मण्यापूर्वीही नव्हतं, सध्याही नाही आणि देहापश्चात तर नाहीच नाही. सध्या तुम्हाला तुम्ही जी व्यक्ती आहात असं वाटतंय ती केवळ तुमची आणि समाजानं तुमच्यावर लादलेली मान्यता आहे. त्यात सोय नक्कीच आहे पण वास्तविकात तुम्ही सत्य आहात. अर्थात, तुमच्या मान्यतेनं तुमच्या स्वरूपात कणमात्र फरक पडत नसला तरी एक गोष्ट हमखास घडते : तुम्हाला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स येतो ! कारण व्यक्तिमत्त्व हाच इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे. जोपर्यंत आपण सत्य आहोत हे तुम्हाला मान्य होत नाही तोपर्यंत या कॉम्प्लेक्सापासून सुटका नाही, मग तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असा की फुटपाथावरचे भिकारी, त्यानं काहीएक फरक पडत नाही.
पाश्चिमात्य देशातल्या व्यक्ती काँन्फिडंट वाटतात पण तो त्यांच्या संगोपनाचा भाग आहे. तिथे असं शिकवलं जातं की तुम्ही यूनिक आहात आणि हे बाळकडू त्यांना इतकं जबरदस्त पाजलं जातं की ते स्वतःला इतरांशी कंपेअर करत नाहीत त्यामुळे त्यांच्या मनात सहसा कॉम्प्लेक्सच येत नाही. यामुळे जगणं नक्कीच सुसह्य होतं पण व्यक्तिमत्त्वाचा युनिकनेस म्हणजे स्वरूप नव्हे आणि (इंग्रजीतला) काँन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास नाही. मी आत्मा आहे हा विश्वास म्हणजे काँन्फिडन्स ! परिणामी पाश्चात्त्य सुद्धा, स्वतःला यूनिक समजण्याच्या भानगडीत, स्वतःला 'एक यूनिक व्यक्तिमत्त्वच' समजतात; सिद्ध समजत नाहीत.
या उलट आपल्याकडे आपले पालक, गुरुजन, नातेवाईक (आणि काही खास मित्रमंडळी) आपल्याला असं शिकवतात की जोपर्यंत तू यूनिक होत नाहीस तोपर्यंत तू बावळट आहेस ! म्हणजे बाय-डिफॉल्ट तू बावळटच आहेस, तुझा युनिकनेस तुला सिद्ध करायचा आहे. यामुळे आपल्याकडे जगणं इतकं अवघड होतं की लोक फक्त, मी बावळट नाही हे दुनियेला दाखवण्यात आयुष्य खर्ची घालतात. आणि आपण बावळट दिसू नये म्हणून कोणताही नवा आयाम शोधण्याचं साहस करत नाहीत.
अर्थात, स्वतःला बावळट समजणं काय की यूनिक होणं काय की स्वतःला यूनिक समजणं काय ते सगळे व्यक्तिमत्त्वाचेच प्रकार आहेत आणि व्यक्तिमत्त्व हाच अहंकार आहे आणि तोच तुम्हाला तुम्ही सत्य आहात हा उलगडा होऊ देत नाही.
थोडक्यात, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध मानत नाही तोपर्यंत तुमचं जगणं व्यक्तिमत्त्वाच्याच दायर्यात राहतं आणि व्यक्तिमत्त्व हेच अहंकाराचं दुसरं नांव आहे. अध्यात्मात अहंकार म्हणजे स्वतःला कुणी तरी विशेष समजणं असा एक पारंपरिक आणि दृढ गैरसमज आहे आणि अहंकार गेला की सत्योपबलब्धी होईल असं ठासून सांगितलं गेलं आहे. त्यामुळे सर्व आध्यात्मिक आणि (गैर-आध्यात्मिक) मंडळींना असं वाटतं की आपण छपरी आहोत आणि `तो' (म्हणजे देव, ग्रेट आहे) असं समजलं (किंवा किमान इतरांना तसं दर्शवलं), तर यथावकाश आपल्याला सत्याचा उलगडा होईल ! पण या भ्रमात त्यांच्यातला ठामपणा संपून जाण्याशिवाय इतर काहीही होत नाही.
कारण सिद्धत्व ही वस्तुस्थिती आहे आणि व्यक्तिमत्त्व हा प्रत्येकाचा व्यक्तीगत भ्रम आहे. स्वतःला व्यक्ती समजणं, तसंच जगणं आणि वावरणं हे स्वतःला आकारबद्ध करणं आहे. आणि तोच नेमका अहंकार (अहं-आकार) आहे. जोपर्यंत व्यक्तिमत्त्वाचा भ्रम आहे तोपर्यंत इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे; कारण काँन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास नाही आणि इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे काँन्फिडन्सचा अभाव नाही. त्या दोन्ही मानसिकता व्यक्तिमत्त्वाच्याच दायर्यात आहेत.
जर सत्यच सर्व व्यापून आहे तर मी त्यावेगळा असूच शकत नाही ही खात्री म्हणजे आत्मविश्वास आणि ती खात्री होता क्षणी तुमचं व्यक्तिमत्त्व बहारदार होतं, ते आपसूक यूनिक होतं ! कोणतीही शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा सामाजिक उणीव तुमच्यात काहीही कॉम्प्लेक्स निर्माण करू शकत नाही. तुम्ही जाणता की आपण मुळात सिद्ध आहोत, बाय-डिफॉल्ट सिद्ध आहोत आणि व्यक्तिमत्त्व ही वापरायची चीज आहे, ती आपल्याला कधीही घेरू शकत नाही.
____________________________________________________
पहिल्या लेखात सांगितलेली ध्यानसाधना तुम्हाला प्रथम निर्विचारतेकडे नेईल. जशी शांतता सघन होत जाईल तसा व्यक्तिमत्त्वाचा निरास होत जाईल. व्यक्तिमत्त्व हे विचार, धारणा आणि भावनांचा इंटीग्रेटेड परिणाम आहे. व्यक्तिमत्त्वाचा निरास तुम्हाला सर्वप्रकारच्या इन्फिरिऑरिटी काँप्लेक्समधून मुक्त करेल !
प्रतिक्रिया
19 Nov 2020 - 9:24 pm | प्रसाद गोडबोले
=))))
तुम्ही ज्याप्रकारे वादद्विवाद करता अन कायम मीच योग्य अन बाकीचे अयोग्य असा जो हेका लावता ना त्यामुळे लोकं तुमच्यावर तुटुन पडतात. तुमच्या लेखनाशी अन त्यातील लॉजिकल अर्ग्युमेन्ट्स्शी त्याचा काहीही संबंध नाही.
जेव्हा तुम्ही मान्य कराल की " ठीक आहे, मी म्हणतो तो अनेक मार्गांपैकी बस्स एक मार्ग आहे , असेच अनेक मार्ग असु शकतात, अन कोण कुठल्यामार्गाने कोठे पोहचतो ह्याने मला अन माझ्या मार्गाला फरक पडत नाही" तेव्हा तुमच्या तुमच्या लेखनावरील वादविवाद बंद होतील हे मी पैज लाऊन सांगतो .
( अर्थात लगेच होतील असे नाही , करण तुमचे संचित कर्म !! जे तुम्ही मानत नाही ;) )
पण तुम्हीच ऐकाल तर शप्पथ . =))))
19 Nov 2020 - 10:10 pm | संगणकनंद
इतरांसाठी त्याचुपणा (you know it) आणि छपरी हे तुच्छतादर्शक शब्द आपल्या लेखात वापर करणाऱ्या आयडीने सिद्धत्वाच्या बाता मारणं हाच मुळात त्याचुपणा आणि छपरीपणा आहे =))
19 Nov 2020 - 10:44 pm | अर्धवटराव
असो. ते आता नित्याचच झालय.
20 Nov 2020 - 1:19 pm | सुबोध खरे
गोलात गोल असतो आणि गोलाच्या बाहेर पण गोल असतो. आतल्या गोलाने जर बाहेच्या गोलाला व्यापले तर मध्य भागी असलेला गोल कुठे असेल?
हे ज्याला समजले तो सिद्ध आणि ज्याला समजले नाहीं तो साधक. मग यातून साध्य काय करायचं आहे तर एक मोठा गोल.
हा बाहेर च्या गोला च्या बाहेर असतो आणि आतल्या गोलाच्या आत असतो.
अध्यात्म समजायला इतकं सोपं आहे!
20 Nov 2020 - 1:19 pm | सुबोध खरे
गोलात गोल असतो आणि गोलाच्या बाहेर पण गोल असतो. आतल्या गोलाने जर बाहेच्या गोलाला व्यापले तर मध्य भागी असलेला गोल कुठे असेल?
हे ज्याला समजले तो सिद्ध आणि ज्याला समजले नाहीं तो साधक. मग यातून साध्य काय करायचं आहे तर एक मोठा गोल.
हा बाहेर च्या गोला च्या बाहेर असतो आणि आतल्या गोलाच्या आत असतो.
अध्यात्म समजायला इतकं सोपं आहे!
21 Nov 2020 - 12:04 am | संजय क्षीरसागर
अनाकलनाची हद्द दर्शवतात. अशा प्रतिसादांनी मला शून्य फरक पडतो पण प्रतिसादकांचं दुर्दैव असं की व्यक्तिमत्त्वाच्या बंदीवासातून मुक्तीची त्यांची एक अपूर्व संधी कायमची हुकली आहे. लेखमाला उत्तरोत्तर रंगतदार होत जाणार आहे याची कल्पना पहिल्या लेखावरील प्रतिसादातून आली आहेच, पण असे सदस्य आता त्यांचे प्रश्न आणि संभ्रम कदापिही सोडवू शकणार नाहीत. कारण एकतर त्यांना प्रश्न विचारताच येणार नाहीत आणि विचारले तरी त्याची उत्तरं मिळणार नाहीत.
21 Nov 2020 - 11:28 am | प्रसाद गोडबोले
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
=))))
21 Nov 2020 - 2:42 pm | संगणकनंद
सिद्ध महाराजांच्या ज्ञानरसाने ओथंबलेल्या धाग्यावर असा प्रतिसाद दिल्याने व्यक्तिमत्त्वाच्या बंदीवासातून मुक्तीची तुमची एक अपूर्व संधी कायमची हुकली आहे. तुम्ही आता तुमचे प्रश्न आणि संभ्रम कदापिही सोडवू शकणार नाही. कारण एकतर तुम्हाला प्रश्न विचारताच येणार नाहीत आणि विचारले तरी त्याची उत्तरं मिळणार नाहीत.
थोडक्यात तुम्ही सिद्ध महाराजांच्या अनुग्रहास मुकल्याने तुमचा आता उद्धार होणार नाही. भोगा आता तुमच्या कर्माची फळे.
21 Nov 2020 - 2:27 pm | सुबोध खरे
व्यक्तिमत्त्वाच्या बंदीवासातून मुक्तीची त्यांची एक अपूर्व संधी कायमची हुकली आहे.
याला हसावं कि रडावं?
मुळात इथे मुक्ती कुणाला हवी आहे?
एखादा पाद्री जसे तुम्ही ख्रिश्चन झाला नाहीत तर तुम्हाला मुक्ती मिळणार नाही असे सांगत असतो तसेच हे महामहोसिद्ध पुरुष सांगत आहेत.
पण असे सदस्य आता त्यांचे प्रश्न आणि संभ्रम कदापिही सोडवू शकणार नाहीत.
मुळात आम्हाला प्रश्न आहेत हे गृहीतच चूक आहे आणि (नसलेला) संभ्रम सोडवायची मुळीसुद्धा हौस नाही.
एकतर त्यांना प्रश्न विचारताच येणार नाहीत आणि विचारले तरी त्याची उत्तरं मिळणार नाहीत.
इथे तुम्हाला प्रश्न विचारण्याची हौस कुणाला आहे? आणि त्यातून उत्तर मिळणार नाही म्हणून कोण लेकाचा रडायला बसलाय?
उगाच स्वतःच्या भोवती आरती ओवाळून घेताय झालं.
बाकी आपल्या धाग्याकडे विनोदी धागा म्हणून पहिले तर करमणूक तर भरपूर होते.
21 Nov 2020 - 12:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या धाग्यातलं ते तर्जन्या बिर्जन्याचं भारी होतं, क्षणभर विचार पॉज झाल्याचं फिलिंग आलं हे कबूल करतो, बाकी हा भाग फार झेपला नाही. लिहिते राहा. चालू ठेवा.
-दिलीप बिरुटे
21 Nov 2020 - 10:07 pm | संजय क्षीरसागर
१ .
ध्यानपद्धतीच इतकी कमाल डिजाईन केली आहे की ती सर्व वैज्ञानिक निकष पूर्ण करते :
अ) ती निर्वैयक्तिक आहे : तुम्ही अध्यात्मिक असा किंवा नसा, स्त्री असा की पुरुष, तुम्ही कोणताही धर्म माना : विचार थांबणारच !
ब ) ती स्थल-किंवा-कालबद्ध नाही : कोणत्याही वेळी आणि कुठेही ध्यानमुद्रा जमवा; रिझल्ट येणारच !
क) ती वारंवारितेचा निकष सिद्ध करते : दिवसातून कितीही वेळा ध्यान करा : निर्विचारता येणार हे ठरलेलं आहे !
आजपर्यंत जगात अशी कोणतीही ध्यानपद्धती विकसित होऊ शकली नव्हती. शिवाय गुरु आणि अनुग्रहाशिवाय साधना फलद्रूप होणार नाही असा एक भंपक फंडा युगानुयुगं रूढ होता आणि एकदा अनुग्रह घेतला की साधक जन्मभरासाठी अडकला, त्याला तो मार्ग बदलणं जवळजवळ असंभव. खुद्द ओशोंनी सुद्धा ही परंपरा कायम ठेवली आणि सध्याचे एकहार्ट आणि रुपर्टही प्रायवेट मेडीटेशन कँप्स घेतात (त्याची फी सामान्यांना परवडणारी नाही). अशाप्रकारे साधक एकामार्गात अडकून जायचा आणि साधना वर्षानुवर्ष चालायची. माझ्या माहितीत ओशोंकडून दिक्षा घेऊन ४०/४५ वर्ष साधना करणारे साधक आहेत, अजून काहीही हाती लागलेलं नाही. कृष्णमूर्तींना ३० वर्ष फॉलो करणारा एक साधक भर सभेत उठून त्यांना म्हणाला होता की इतकं वर्ष मी तुमचं प्रामाणिकपणे अनुसरण करतोयं पण मी जिथे सुरुवात केली तिथेच आहे आणि आता तर काही होणं असंभव वाटतंय !
माझी साधना पद्धती या सर्व पारंपारिक आध्यात्मिकतेला पूर्ण फाटा देते आणि तीची कमाल अशी की ती तत्क्षणी प्रचिती देते!
थोडक्यात, तुम्ही जितकी साधना कराल तितकी तुमची निर्विचारता सघन होत जाईल. तुमच्या जीवनातली टेंशन्स दूर होतील. तुम्ही स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे तुमचा आनंद दिवसेंदिवस वाढत जाईल.तुमचा श्वास मोकळा होत जाईल.
२.
आपण सत्य नाही असं मानणं हाच खरा अहंकार आहे ! अहंकार म्हणजेच स्वतःला व्यक्ती मानणं आणि व्यक्तिमत्त्व हाच इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे !
साधनेतून येणारी निर्विचारता तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा निरास घडवेल . दिवसागणिक तुमची बुद्धीमत्ता आणखी प्रगल्भ होत जाईल, निर्बुद्ध आणि भंपक धारणातून तुम्ही बाहेर पडाल (उदा. तरंगती शिळा डोक्यावर घेऊन एकाग्रता साधणं !)
आणि एक दिवस तुम्ही इतके धन्य व्हाल की संपूर्ण व्यक्तिमत्त्वातूनच मुक्त व्हाल कारण व्यक्तिमत्त्व ही एकमेव धारणा तुमच्या सर्व अस्वास्थ्याचं मूळ कारण आहे, तेच सर्व इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचं कारण आहे. तोच खरा बंदीवास आहे ! थोडक्यात, आपण सत्य नसून व्यक्ती आहोत हा भ्रम नाहीसा होईल आणि तुम्ही म्हणाल संक्षींने क्या लाजवाब फर्माया है !
बस लगे रहो !
21 Nov 2020 - 1:08 pm | शंकासुर
आपले लिखाण नेहमी प्रमाणे अचाट आणि अशक्य दोन्ही गोष्टी एकत्र आणून लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते असेच आहे.
पण माझी एक शंका आहे (आता आयडीच तसा आहे त्यामुळे)
तुम्ही इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स असे नाव का दिले आहे धाग्याला ??
तुम्ही हे काही लिहिले आहे त्यावरून तर इशू "गॉड कॉम्प्लेक्स"चा वाटत आहे.
21 Nov 2020 - 2:36 pm | संगणकनंद
त्यांना स्वतःला सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे म्हणून =))
21 Nov 2020 - 2:50 pm | संगणकनंद
त्यांचे सगळेच नेहमी अचाट आणि अशक्य असते. मग ती प्युबिक रींग असो वा स्मृती स्ट्रींग. त्यांच्या नाकातून येणारा गेंगाणा आवाजही मेंदूच्या मध्यावरुन निघतो आणि ती संगीत क्षेत्राला सर्वोच्च देणगी असते. ते केवळ एका प्रतिसादातून लोकांची आयुष्यभराची ह्रदयविकाराच्या झटक्यातून मुक्ती करतात. एक बुफे पद्धतीच्या हाटेलात जेवण केल्यावर त्याबद्दल इथे लिहीताना ते "हेवन" शब्द वापरतात. त्यांचे इथले सारे लिखाण त्यांची स्वतःची भलामण करणारे आणि इतरांना तुच्छ लेखणारे असते.
29 Nov 2020 - 12:48 am | संजय क्षीरसागर
आणि मेंदूच्या मध्यातून त्याचू टाईप प्रतिसाद टंकता असं दिसतंय. न धड वाचता येत न काही कळण्याची क्षमता. संगिताचा स्वतःचा अभ्यास असेल तर इथे लिहून दाखवा. सतत फालतू पचपच आणि इथे तिथे निर्बुद्ध पिंका टाकत फिरण्यापलिकडे तुमचा काहीही वकूब दिसत नाही.
29 Nov 2020 - 3:46 pm | संगणकनंद
मी जे आहे तेच सांगितलं. या युवतीची रिक्वेस्ट आली मग हे गायलं, त्या युवतीची रिक्वेस्ट आली मग ते गायलं असे शेखी मारत व्हीडीओ टाकत होता. पण कुणी तिकडे फिरकतही नव्हतं.
मग बरेच दिवसांनी एक प्रतिसाद आला, काय तर एकच गाणं ऐकलं. दुसरं गाणं ऐकलं नाही. त्या प्रतिसादाने तुमच्या नाकातून गायलेल्या गेंगाण्या आवाजाला त्याची जागा दाखवून दिली.
21 Nov 2020 - 3:18 pm | उन्मेष दिक्षीत
आधी पण वाद विवाद चालायचे तुमच्या धाग्यांवरती साधारण ३-४ वर्षांपुर्वीपर्यंत, पण काहीतरी स्टँडर्ड होतं, आता मात्र नुसते लेखकाला टार्गेटेड प्रतीसाद येतायत, कंटेंट राहिला बाजुलाच.
वाचतोय, भारी चालु आहे लेखमाला (इफ कंटिन्युड)
21 Nov 2020 - 3:49 pm | कांदा लिंबू
अहो प्रतिसाद सोडा, धागालेखकाची रिंगपासून ते स्ट्रिंगपर्यंतची भाषा पहा आधी - निरुपयोगी, छपरी, त्याचू ... वगैरे शब्द असतात इतर सदस्यांसाठी.
बाकी आपणच एका आईडीद्वारे लेख लिहायचा आणि इतर डुआयडींद्वारे प्रतिसाद लिहून आपली वाहवा करून घ्यायची ही फॅशन केंव्हाच गेलीय हो. सोडून द्या हे असे उद्योग.
21 Nov 2020 - 4:17 pm | उन्मेष दिक्षीत
लुक हु इज टॉकिंग !
>>इतर डुआयडींद्वारे प्रतिसाद लिहून आपली वाहवा करून घ्यायची ही फॅशन केंव्हाच गेलीय हो. सोडून द्या हे असे उद्योग.
आपण जसे असतो तसे जग बघतो, तुम्हाला नसते फालतू उद्योग करताना आता अख्खं जगच डुप्लिकेट दिसत असेल. चालु द्या.
21 Nov 2020 - 4:51 pm | संगणकनंद
कायम स्वतःच्या लेखाची/मतांची/प्रतिसादांची वाहवा करत असतनाच इतरांच्या लेखाची/मतांची/प्रतिसादांची त्याचूपणा, छपरी अशा शब्दात निर्भत्सना करणार्या लेखकाच्या बाबतीत यापेक्षा वेगळे काय होणार?
करावे तसे भरावे किंवा सिद्ध महाराजांच्याच भाषेत बोलायचे झाले ते आपल्या कर्माची फळे भोगत आहेत.
21 Nov 2020 - 5:16 pm | उन्मेष दिक्षीत
http://misalpav.com/user/32727/authored
तुमच्या नेमक्या कुठल्या न लिहिलेल्या लिखाणाची निर्भत्सना झाली ? मेमरी स्ट्रिंग ठिक आहेत ना ? सोत्रींनी निदान घेतला असता आक्षेप तर ठिक आहे कारण त्यांच्या लेखाचा उल्लेख होता.
21 Nov 2020 - 6:03 pm | संगणकनंद
मी तुमच्या वाटेला गेलो नसतानाही तुम्ही संक्षींची बाजू घेऊन माझी उलटतपासणी घेताय, तसंच मी ही करतोय. माझी तर त्यांच्याशी "चर्चा"ही झाली आहे. आणि प्रत्येक लेखात ते न चुकता ते "त्याचू" शब्द वापरुन माझी आठवणही काढतात. मग मी नको का त्यांच्या सादेला प्रतिसाद द्यायला?
बाकी तुम्ही त्यांचाच डुआयडी असावेत असंही वाटतं मला. कदाचित तसे नसेलही. मात्र त्यांची खोड मोडली जाऊ लागली की तुम्ही प्रकट होता. :)
22 Nov 2020 - 11:23 am | उन्मेष दिक्षीत
>> मग मी नको का त्यांच्या सादेला प्रतिसाद द्यायला?
स्कोर सेटलिंगचा प्रयत्न का ? यु प्रूव्ड इट , तुमचा उद्देश ऑलरेडी कळालायच सगळ्यांना, पण संपादक मंडळ काहीही बोलत नाही त्याला काय करणार ? लेखातील वाक्य संपादित करता येतं मात्र डु-आय्डींनी केलेला गोंधळ सपशेल दुर्लक्षीत होतो.
फॉर द रेकॉर्ड , मी संक्षींना उद्देशून लिहिला होता प्रतिसाद, तर तुम्ही त्याच्या खाली मला दिलाय तो रिप्लाय. उलट तपसाणी नव्हे, तुम्हाला आरसा दाखवला.
22 Nov 2020 - 1:23 pm | संगणकनंद
कसलं स्कोर सेटलिंग हो. विनोदी लेखकाच्या विनोदी धाग्यावर थोडी करमणूक. तुम्ही ज्याला डुआयडीचा गोंधळ म्हणत आहात तो लेखकाने घातलेल्या गोंधळाचाच पुढील भाग आहे.
आरसा दाखवण्यासाठी धन्यवाद. तुमचे गुरु जसे अख्ख्या जगाला आरसा दाखवतात, तुम्हीही गुरुकडून छान शिकला आहात.
21 Nov 2020 - 11:19 pm | प्रसाद गोडबोले
कारण प्रॉब्लेम लेखकातच आहे , लेखनातील मुद्द्यात नाही. प्रचंड टोकचा अहंगंड , अहंमन्यता, सतत "मीचीलाल" अॅटिट्युड अन अगदीच स्पष्ट शब्दात बोलायचे झाले तर पोकळ माज सर्वत्र अक्षरशः झळकत असतो लेखनातुन अन प्रतिसादातुनही. सिध्द माणुस जीवनमुक्त असल्याने कसाही वागु शकतो हे मान्य आहे पण सतत माज करत रहाणारा अन ज्या गोष्टींच्या अनुभव नाही त्यावरही भाष्य करत रहानारा जीवनमुक्त माणुन आमच्या अजुन तरी पाहण्यात नाही म्हणुन आम्हाला मजा येते संक्षींचे " विदेहत्व " तपासुन पाहताना = ))))
शेवटी आम्हीं भार्गवकुळातील असल्याने छाताडावर लाथ घालुन अन त्यातुन येणारी प्रतिक्रिया पाहुनच देवत्व सिध्दत्व प्राप्त केलेला कोण आहे हे ओळखणाची कला आम्हांस अवगत आहे ;)
ह्या बद्दल शंकाच नाहीये - आत्मारामात समर्थ म्हणातात -
आत्मा /अस्तित्व/ वस्तु, अक्षर आहे, अनाख्येयं आहे, शाश्वत आहे निरंतर आहे कालातीत आहे अर्थात जे जे नाशिवंत आहे त्याचा त्याग केला की एका क्षणात विदेहत्व येणार ह्यत शंकाच नाही . ज्याला संक्षी ( स्वत्:च्या अहंमन्यतेमुळे ) इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणत आहेत त्याला योग्य शब्द संदेह हा आहे
आपण स्वयंसिध्द वस्तु नाही हा जो संदेह आहे ( संक्षींच्या माजोरड्या भाषेत इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्ष) तेच अज्ञान आहे , एकदा तो संदेह संपुर्ण नामशेष झाला की तत्क्षणी तुम्ही विदेह च आहात हे तुमच्या लक्षात येते !
हे सारे प्राप्त करायला अनेक मार्ग आहेत अनेक मुद्रा आहेत अनेक साधने आहेत . " मी म्हणतो तेच सत्य अन बाकीचे असत्य" असे कोणत्याच सिध्द व्यक्तीने म्हणलेले नाही. ( कारण सिध्द व्यक्ती साठी सत्य असत्य हे द्वैतच नाही मुळात ! सर्वच सत्य. सर्वं खल्विदं ब्रह्म सर्वं विष्णुमयं जगत !!) आत्माराम हे केवळ एक उदाहरण झाले असेच अमृतानुभवातीलही अनेक दाखले देता येतील जे की अगदी सहज सुलभ प्रचीतीला येतात .
:)
पण असो च, कुठे संक्शींच्या धाग्यावर लॉजिकल चर्चा करता ! फक्त गुगली टाका अन मजा घ्या प्रतिसादातुन =))))
3 Dec 2020 - 7:04 am | कोहंसोहं१०
_/\_
आपल्या संतांनी सगळे अगोदरच सांगून ठेवले आहे. दासबोध, गीता/ज्ञानेश्वरी, उपनिषदे जरी वाची तरी लक्षात येईल की संक्षी जे ज्ञान स्वतःच्या नावावर खपवत आहेत तेही मुजोरीपणा करून, ते ऑलरेडी ग्रंथात आहे.
गरजेपुरते ज्ञान उसने घ्यायचे, त्यात स्वतची सरमिसळ करायची आणि लोकांपुढे बढाया मारायच्या तेही त्याच महापुरुषांना कमी लेखून. म्हणायचे माझी पद्धती वापर बाकी सगळे फालतू आहे.
असल्या वृत्तीच्या लोकांमुळे भारतीय अध्यात्माचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.
21 Nov 2020 - 6:31 pm | रंगीला रतन
छान विनोदी लेख
वाचन बंद केले नाही तरी मागे काही वाद विवाद झाले होते म्हणून मी इथे येणे बंद केले होते.
तुमच्या लेखावर प्रतिक्रिया देण्यासाठी इथे परत आवागमन करणे भाग पडले.
असेच विनोदी लेख लिहून वाचकांची करमणूक करत रहा.
23 Nov 2020 - 10:34 pm | संगणकनंद
बढाया मारणार्या विनोदी लेखकाची विनोदी लेखमाला दोनच भागात फुस्स झाली. म्हणे लेखमाला उत्तरोत्तर रंगत जाणार, चार मजा घेणारे प्रतिसाद सोडले तर कुणी फिरकलेच नाही इकडे.
विनोदी लेखकांना विनंती, त्यांनी हतोत्साहीत होऊन थांबू नये. असेच अजून विनोदी लेख लिहावेत.
29 Nov 2020 - 12:24 am | संजय क्षीरसागर
धिंडवडे पहिल्या लेखात निघाले आहेत. अध्यात्म तुमच्या आकलनापलिकडे आहे त्यामुळे लेख आल्यावर ते वाचण्याच्या भनगडीत पडू नका आणि त्यावर (स्वतःच्या नांवाप्रमाणे) त्याचू प्रतिसाद देऊन स्वतःची पुन्हा शोभा करुन घेऊ नका.
29 Nov 2020 - 2:13 pm | संगणकनंद
"लेखमाला रंगतदार होणार" म्हणून मोठी बढाई मारत होतात तुम्ही. प्रत्यक्षात मात्र मिपाकरांनी दुसर्याच भागाकडे ढूंकूनही पाहीलं नाही. चार खिल्ली उडवणारे प्रतिसाद सोडले तर दुसरा प्रतिसाद नाही. हेच लिहीलं होतं आधीच्या प्रतिसादात. त्यानंतरही कुणी फिरकलं नाही तर स्वतःच सहा दिवसांनी मध्यरात्री प्रतिसाद देऊन धागा वर काढला. एका खिल्ली उडवणार्या धाग्याला उपप्रतिसाद देऊन धागा वर आणावा लागला ही तुमच्या धाग्यांची लायकी. आणि या धाग्यांना त्यांची जागा दाखवणारी विडंबनं येत आहेत ती गोष्ट वेगळीच.
तुमच्या धाग्यात खरोखरीच अध्यात्म असतं तर लोकांनी विडंबनं लिहून धिंडवडे काढले नसते तुमच्या धाग्यांचे. माझीच लाल असे लिहीलेल्या तुमच्या धाग्यात अध्यात्म असते असे म्हणणे हा मोठा विनोद आहे.
29 Nov 2020 - 5:51 pm | संजय क्षीरसागर
अत्यंत वॅलीड होता आणि माझ्या संपूर्ण लेखमालेत असे प्रसंग येत राहातील म्हणून इथे उत्तर देतो.
१.
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आहे आणि माझ्या बाबतीत एक कायम अक्षेप असा आहे की मी दुसर्याचं ऐकून घेत नाही. आता नेमका प्रकार काय आहे तो पाहा :
एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत अचानक गाढव घुसून एकदम खिंकाळायला लागवं तसा हा प्रकार आहे !.
गाढवाला शास्त्रीय संगीताचं काही गम्य नसलं तरी खिंकाळायचा अधिकार असतोच
!आता तीन संभावना आहेत :
१. सुरक्षा रक्षकांनी गाढवाला हाकलून लावावं म्हणजे मैफिल पुन्हा सुरु होईल.
२. सुरक्षा रक्षक काही कारणांनी वेळच्यावेळी धावून येत नसतील तर किमान श्रोत्यांनी गाढवाची रवानगी करावी आणि मैफिल पुन्हा सुरु होईल असं बघावं.
३. वरील दोन्ही पैकी काहीच झालं नाही तर गायकाला गाणं सोडून आधी गाढवाला मैफिली बाहेर काढावं लागेल तरच मैफिल चालू राहिल.
इथे नेमका तिसरा प्रकार चालू आहे !
माझ्या हयातीत मी कुणालाही कधीही व्यक्तिगत प्रतिसाद देऊन सुरुवात केलेली नाही कारण एकतर तो माझा स्वभाव नाही आणि दुसरं म्हणजे माझा आभ्यास आणि रेंजच इतकी व्यापक आहे की मी सरळ मुद्यालाच भिडतो.
पण गाढवांचा बंदोबस्तही मलाच करायला लागतो हे माझं प्राक्तन असावं. गाढवं कुठे आणि कशी खिंकाळतील याचा नेम नसतो त्यामुळे स्वतःचा ही धागा बघावा लागतो आणि धाग्याचं विडंबन वगैरे झालं तर तेही बघावं लागतं. आता गाढवांचं दुर्दैव असं की माझ्यापुढे ती काय टिकाव धरणार ? पण पब्लिकला असं वाटतं की शेवटचा प्रतिसाद माझाच असावा असा हट्ट असतो, तर ते तसं नाही शेवटच्या प्रतिसादामुळे गाढव गप्प होतं आणि मला पुन्हा मैफिल सुरु करता येते !
29 Nov 2020 - 6:05 pm | संगणकनंद
त्या धाग्यावर प्रतिसाद संपादीत झाले, धागा वाचनमात्र झाला, तर इथे येऊन खाजवून खरुज काढलीत. अर्थात तुमच्या या प्रतिसादाने गाढव कोण आहे हे आपोआप सिद्ध झाल्याने मी अधिक काही लिहीत नाही. मिपाकर सुज्ञ आहेत. :)
29 Nov 2020 - 6:37 pm | संगणकनंद
प्रत्येक गाढवाला आपले खिंकाळणे हे नेहमी मैफिलच वाटते. मग त्या खिंकाळण्याचे लोक विडंबनातून धिंडवडे का काढेनात, किंवा सुरक्षा रक्षक गाढवाचे खिंकाळणे बंद का करेनात किंवा अगदी पहीलीच खिंकाळी ऐकली पुढच्या खिंकाळया ऐकल्या नाहीत असे लोक अगदी स्पष्ट का म्हणेनात.
बरं गाढवाची एका जागेची खिंकाळण्याची "मैफील" बंद केली तरी गाढव दुसर्या जागी जाऊन खिंकाळण्याची "मैफील" सुरु करायला मोकळे :)
30 Nov 2020 - 9:27 am | सुबोध खरे
@संक्षी
आपल्याला भंपक मेगाबायटी प्रतिसाद द्यायला भरपूर वेळ आहे असे दिसते.
असो
माझा आभ्यास आणि रेंजच इतकी व्यापक आहे की मी सरळ मुद्यालाच भिडतो.
मग मुद्द्याचं एकच सांगा कि आपल्याकडे एका क्षणात विदेहत्व सिद्ध करण्यासाठी f MRI मध्ये केल्या आहेत तशी काही चाचणी केलेली आहे का?
बाकी आपल्या धाग्याकडे विनोदी धागा म्हणून पहिले तर करमणूक तर भरपूर होते.
अजून येउ द्या
30 Nov 2020 - 12:22 pm | संजय क्षीरसागर
कोणताही विचार न करता दिलेले प्रतिसाद मला कायम ख्रिस गेलला मिळालेल्या फुलटॉससारखे असतात ! मी बॉल पार स्टेडियमबाहेर मारतो, तुम्ही बॉल शोधत फिरता आणि मी इकडे यथेच्छ धावा काढतो, त्याला तुम्ही नाईलाज म्हणून मेगाबायटी प्रतिसाद म्हणता.
१.
थोडा जरी विचार केला असता आणि पहिला धागा किमान वाचला असता तरी लक्षात आलं असतं की सगळी चर्चा विदेहत्त्वाची आहे.
तुमचा व्यावसाय जगायला निर्विवादपणे उपयोगी आहे ही सर्वमान्य वस्तुस्थिती आहे पण तो देहांतर्गत घटनांशी संबधित आहे, देहाच्यापलिकडे तुमचा व्यावसाय काहीही जाणत नाही. पण सतत तोच व्यावसाय करत असल्यानं तुम्हाला माझे प्रतिसाद कळण्याची शक्यता शून्य आहे. तो अध्यात्मिक विषय आहे, ते शरीरशास्त्राच्या पलिकडे आहे. तुमचा व्यावसाय माणसाला मृत्यूपासून वाचवण्याची धडपड आहे आणि अध्यात्म ही मृत्यूला पराभूत करण्याची कला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या पोस्टवर कितीही जंगजंग पछाडले तरी तरी मृत्यू ही तुमच्यासाठी वास्तविकताच राहणार आणि अ-मृताचा बोध होण्यापासून तुमच्या धारणा तुम्हाला कायम वंचित ठेवणार !
२.
अर्थात ! ज्यांच्याकडे स्वच्छंद जगायला वेळ नाही ते कितीही श्रीमंत असोत, माझ्या दृष्टीनं ते कायम पोटापाण्याच्या विवंचनेतच आहेत. जी श्रीमंती तुम्हाला बहुरंगी आणि व्यासंगी बनवू शकत नाही ती मला निर्बुद्ध वाटते. कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहू शकणार नाही इतक्या श्रीमंतांबरोबर मी जगलो आहे. अशा अनेक श्रीमंतांचं पूर्ण अंतरंग मी पाहिलं आहे आणि जगातल्या कोणत्याही श्रीमंतापेक्षा माझं पैशाचं ज्ञान अपूर्व आहे कारण माझ्या दृष्टीनं पैशाचा वापरण्यापलिकडे उपयोग शून्य आहे आणि त्यांची सारी प्रतिष्ठा त्यावर अवलंबून आहे.
माझे दोनशे रुपये त्यांच्या दोनशे कोटी रुपयांना भारी आहेत कारण ज्या तन्मयतेनं मी वडासांबार खाऊ शकतो तितक्या एकरसतेनं ते त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. केंव्हा मोबाईल वाजेल आणि फॅक्टरीत काय चालू असेल या विवंचनेत त्यांचा फोकस एका जागी स्थिर होऊच शकत नाही आणि मी कधीही मोबाईल घराबाहेर घेऊन जात नसल्यानं हॉटेलचा तो माहौलच माझा स्वर्ग असतो.
त्यामुळे तुम्हाला अजूनही स्वच्छंद जगता येत नाही याचा अर्थ माझ्या सर्व अतीश्रीमंत क्लायंटससारखं तुम्हालाही माझ्या व्यासंगाचं आणि स्वच्छंद जगण्याचं अप्रूप आहे...फक्त तुमचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स असे तुच्छता दर्शक प्रतिसाद देऊन त्यामागे लपण्याचा प्रयत्न करतो आहे.
30 Nov 2020 - 12:26 pm | संजय क्षीरसागर
आपल्याला देह नाही हा अत्यंत अलौकिक असा तो उलगडा तिथे एमाराय, एक्सरे, सिटी-स्कॅन या गोष्टी निरुपयोगी आहेत.
हे माझ्या प्रतिसादातलं वाक्य आहे, तो खर्यांचा क्वोट नाही.
30 Nov 2020 - 12:36 pm | सुबोध खरे
सिद्ध करता येत नाही म्हणून तिथे एमाराय, एक्सरे, सिटी-स्कॅन या गोष्टी निरुपयोगी आहेत अशी मल्लिनाथी?
मी कुठे म्हटलंय कि केवळ रेडिओलॉजीच्या चाचण्या करा.
१००० लोकांना तुमचं ध्यान करायला लावा आणि सर्वमान्य निकषाने सर्वांचे विचार शून्य झाले आहेत हे सिद्ध करा.
असं तुम्हाला सिद्ध करता येत नाहीये पण आपलं चुकलं हे मान्य करायचा प्रामाणिक पण तुमच्यात नाहीच म्हणून मग असले भम्पक मेगाबायटी प्रतिसाद द्यायचे.
मी म्हणतो म्हणजे विचार शून्यता आली इतका दर्पोक्तीपूर्ण अहंकार केवळ बुवाबाजीमध्ये चालतो.
महाराज म्हणतात म्हणजे तेच अंतिम सत्य यासारखे. आपल्याला देह नाही हा अत्यंत अलौकिक असा तो उलगडा
महाराजाधिराज सिंहासनाधिश्वर सकळ ज्ञान परि पूर्ण श्री क्षीरसागर महाराज कि जय असे तुमचे चमचे म्हणत असतील.
पण मिपाकर अजून आपली बुद्धी कुणाच्या चरणी लीन करून (अक्कलशून्य) विचारशून्य झालेले नाहीत.
30 Nov 2020 - 3:01 pm | संजय क्षीरसागर
की अध्यात्म तुमचा विषय नव्हे, तुम्ही शरीरशास्त्रातच अडकले आहात आणि आकलनाची मर्यादा देहापुरतीच आहे.
१.
मी ज्यांना ज्यांना हे ध्यान करायला सांगितलं त्या एकजात सर्वांना मेंटल एक्टीविटी थांबल्याचा प्रत्यय आला आहे आणि प्रत्येकाला तो हमखास येणारच. तुम्ही तुमच्या डोक्यानी काही तरी भलतीच साधना केली आणि इथे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, मी तो इथे बसून धुडकावून लावला आणि तुम्ही माझी साधना केलीच नाही ही वस्तुस्थिती उघडी केली. (असाच प्रकार तुम्ही स्वतःची बाजू सावरायला वाट्टेल त्या लिंक्स फेकून करता याची पुन्हा आठवण करुन देतो)
तुमची तर्कशक्ती इतकी कमजोर आहे की हजार लोकांना ध्यान करायला लावण्यापेक्षा आपण स्वतः ते करुन बघावं आणि मग इतरांचे अनुभव वेरिफाय करावे हे तुमच्या लक्षात येत नाही. आणि दुसर्यांना काय होतंय यापेक्षा स्वतःची मेंटल अॅक्टीविटी थांबली तर ती अद्भूत घटना असेल आणि आपलं आयुष्य बदलू शकेल इतकी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला समजू शकत नाही म्हणजे नवल आहे.
२.
तुमची लिंका फेकाफेकी, करोना भारतात पसरणारच नाही यावर पार लेख लिहून, तुमच्या नांवानिशी सगळ्यांना सांगा वगैरे वर झालेली शोचनीय परिस्थिती , सोनोग्राफीची रिटर्न्स भरता की नाही हे स्वतःचं स्वतःला माहिती नसतांना त्याची जिएसटी रिटर्न्स भरण्याशी केलेली कंपॅरिजन, साधना न करता लोकांची केलीली दिशाभूल या गोष्टी माझ्या हयातीत मेडीकल फिल्डमधे तरी मला कधीही पाहायला मिळाल्या नाहीत.
30 Nov 2020 - 7:23 pm | सुबोध खरे
मन विचलित झालंय म्हणजे विचार शून्यता आली असे नव्हे.
सर्वमान्य निकषाने सर्वांचे विचार शून्य झाले आहेत हे सिद्ध करा.
मी म्हणतो म्हणजे विचार शून्यता आली इतका दर्पोक्तीपूर्ण अहंकार केवळ बुवाबाजीमध्ये चालतो.
उगाच माझ्या साडे तीन चेल्यांच्या अनुभवात विचार शून्यता आली म्हणून भू भु: कार करून काही निष्पन्न होणार नाही.
तीन चेले मम् म्हणतात आणि चौथा पळून गेला ( म्हणून अर्धवट) असले भंपक पुरावे दाखवत आहात.
अरे अरे
बाकी मागे पण मी लिहिलंय कि बाकी काही सापडलं नाही आणि आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून दुसऱ्या धाग्यांची धुणी इथे धुवू नका.
दुसरीकडची धुणी आणायला लागली याचा अर्थच आहे कि आपलं साफ तोंड आपटलं आहे. (अर्थात तुम्ही ते मान्य करणारच नाही)
मेंदूत विचार आलेच नाहीत याचे स्पष्ट पुरावे असतील तर दाखवा नाही तर वाजवत बसा आपली पुंगी.
बोटाला बोट लावलं आणि विचारशून्यता आली. बुद्धापासून ते ओशोंपर्यंत आणि ज्ञानेश्वर माउलींपासून श्री गोंदवलेकर महाराज सगळे मूढ आहेत आणि मीच तेवढा महामहीम हुशार.
30 Nov 2020 - 9:06 pm | संजय क्षीरसागर
थोडा वेळ बाजूला ठेवून सांगितलेलं मेडीटेशन करुन पाहा. एका क्षणात तुम्हाला मी म्हणतो त्याचा प्रत्यय येईल.
जमल्यास इथल्या लेखिकेनं जे केलंय तसं करुन पाहा. तुमच्या घरच्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ती ध्यानमुद्रा करायला सांगा आणि त्यांचा अनुभव विचारा.
मग काय झालं ते प्रामाणिकपणे इथे लिहा. मेंटल अॅक्टीविटी थांबणं हे काय रिलॅक्सेशन आहे हे तुमच्यासारख्या व्यक्तीला कळायला वेळ लागणार नाही. तो स्वतःचा पराभव किंवा माझा विजय नाही. तुम्हाला लाईफ लाँग मजा येईल.
1 Dec 2020 - 10:22 am | सुबोध खरे
मी हा प्रयोग अनेक वेळेस करून पाहिला आहे आणि त्यात विचार शून्यता येत नसून आपले मन विचलित होते असाच अनुभव आहे.
याचे संपूर्ण शास्त्रीय विश्लेषणही मी वाचले आहे.
मेंदूची विचार शून्य अवस्था हि जिवंत पणी अशक्य आहे.
अगदी (डीप कोमा) प्रगाढ बेशुद्धी मध्ये सुद्धा मेंदूची अनेक केंद्रे जागृत असतात आणि आता f MRI हे तंत्र असे कोणते रुग्ण कोमातून बाहेर येऊन सुधारू शकतील याचा अंदाज बांधण्यासाठी वापरले जाते. या बद्दल अनेक शोध निबंध सुद्धा उपलब्ध आहेत.
मेंटल अॅक्टीविटी थांबणं म्हणजे रिलॅक्सेशन नाही. जागृत आणि सुप्त मनातील विचारांचा कल्लोळ थांबवणे म्हणजे रिलॅक्सेशन हे जोवर आपण स्वीकारत नाही तोवर आपले आणि माझे एकमत होणे अशक्य आहे.
आपल्याला शास्त्रीय ज्ञान थोतांड आहे असेच म्हणायचे असेल तर त्याला माझा नाईलाज आहे.
Meditation is described in traditional yoga texts as three stages, which follow each other in sequence: (i) Focused attention (FA), (ii) Focused attention on the object of meditation (MF), and (iii) Meditation with one-pointed focused attention without effort (ME). When not in meditation the mind is considered to be in a state of normal consciousness characterized by random thinking (RT).
The objective of the present study was to determine the brain areas activated during the three stages of meditation compared to the control state using fMRI. Methods: Functional magnetic resonance images were acquired from twenty-six right handed meditators during MF, ME and random thinking (RT) for comparison. Ten of them were experienced (average age ± SD, 37.7 ± 13.4 years; 9 males) with 6048 hours of meditation, whereas 16 (group average age ± SD, 23.5 ± 2.3 years; all males) were less experienced, with 288 hours of meditation. During the fMRI recordings the participants practiced RT, non-meditative focused thinking (FA), MF and ME, each lasting for 2 minutes. Brain areas activated during the intervention were scanned using a 3.0-Tesla Philips-MRI scanner. Results: During the third phase of meditation (ME) the experienced meditators alone showed significant activation in the right middle temporal cortex (rMTC), right inferior frontal cortex (rIFC) and left lateral orbital gyrus (LOG) (p < 0.05), Bonferroni adjusted t-tests for unpaired data, comparing ME and random thinking. Conclusions:
These changes suggest that ME is associated with sustained attention, memory, semantic cognition, creativity and an increased ability to detach mentally.
https://www.researchgate.net/publication/285019678_A_fMRI_Study_of_Stage...
1 Dec 2020 - 10:47 am | संजय क्षीरसागर
१.
मन विचलित होणं म्हणजे वैचारिक द्वंद्व निर्माण होणं. रस्ता क्रॉस करतांना करु की नको असा झालेला संभ्रम म्हणजे मन विचलित होणं. जर जाणीवेच्या दायर्यात विचारच नसेल तर द्वंद असंभव आहे. तुम्हाला समोरचं क्लिअर दिसेल आणि आजूबाजूचं नीट ऐकू यायला लागेल
२.
निर्विचारता हा मानसशास्त्राचा विषय नाही आणि त्याचं विश्लेषण असंभव आहे कारण विश्लेषण हा पुन्हा विचारच आहे.
३.
ही धारणा सोडा. तुमच्या धारणा पक्क्या असल्यामुळे तुमच्या हिताची गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही.
किमान एक गोष्ट बघा : तुम्हाला शांत वाटण्यात माझा कोणताही लाभ नाही आणि तुम्ही कन्फर्म केलं नाही तरी मला काहीएक फरक पडणार नाही. त्यामुळे तुमच्या कोणत्याही आप्ताला (पूर्वकल्पना न देता) हे मेडिटेशन करायला सांगा आणि त्याचा अनुभव काय आहे ते ऐका.
1 Dec 2020 - 10:54 am | संजय क्षीरसागर
जागृत अवस्थेतली मेंटल अॅक्टीविटी थांबणं हा प्रथम चरण आहे. जसा हा कालावधी वाढत जाईल तशी सबकाँशस माइंड मधली अनावश्यक आणि नेगटिव अॅक्टिविटी पण थांबेल कारण सुप्त मन हा मेंदूचाच भाग आहे.
1 Dec 2020 - 12:13 pm | सुबोध खरे
मेंटल अॅक्टीविटी थांबणं हा प्रथम चरण आहे.
हायला
मेंटल अॅक्टीविटी थांबणं म्हणजे मृत्यू इतकं साधं तुम्हाला समजेना झालंय.
सुप्त मन हा मेंदूचाच भाग आहे.
मागच्या कुठल्या तरी धाग्यात तुम्ही मन नाहीच असं म्हणाला होतात.
या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला काय मोगा खान चावले काय तुम्हाला
1 Dec 2020 - 1:02 pm | संजय क्षीरसागर
१
गरज नसतांना मेंटल अॅक्टीविटी चालू राहणं यथावकाश वेड लागणं, स्मृतीभ्रंश, डिप्रेशन या अवस्थांकडे नेणारा राजमार्ग आहे. वेड्यात आणि तुमच्यात इतकाच फरक आहे की तो विचार मोठ्यानं बोलतो आणि तुम्ही ते काम आतल्या आत करतायं. फरक फक्त वॉल्यूमचा आहे.
गरज नसतांना मेंटल अॅक्टीविटी चालू नसणं हे सर्वोत्तम बुद्धीमत्तेचं आणि मनस्वास्थ्याचं लक्षण आहे.
२.
मेंटल अॅक्टीविटी मेंदूत होते आणि मेंदू नाही असं म्हणायला मी म्हणजे तुम्ही नाही. मन नाही असं मी का म्हणतो हे कळायला तुम्हाला तिसर्या लेखाची वाट पहावी लागेल. अर्थात, तो ही तुम्हाला कळण्याची शक्यता नाही असं तुमच्या एकूण आकलनावरुन दिसतं.
३.
तुम्हाला इतक्या साध्या गोष्टी न कळायला कोण चावलंय ते बघा. आणि माझे लेख समजत नसतील तर वाचू नका. त्यावर तुम्ही लोकांची जितकी दिशाभूल कराल तेवढं तुमचं अज्ञान उघडं पडेल.
1 Dec 2020 - 12:09 pm | सुबोध खरे
रस्ता क्रॉस करतांना करु की नको असा झालेला संभ्रम म्हणजे मन विचलित होणं.
तुमच्या बेसिक्स मध्येच लोच्या आहे.
एखादा विद्यार्थी शाळेत शिक्षक शिकवत असताना बाहेर बघत असेल तर त्याला चित्त विचलित होणे म्हणतात.
रस्ता ओलांडू कि नको याला द्विधा मनस्थिती म्हणतात.
बाकी तुमच्या प्रत्येक मुद्द्याला मुद्देसूद उत्तर देण्यात मला काहीही हशील वाटत नाही.
तुमचं भंपक आत्म कुंथन आणि स्वमतांध दांभिकता चालू द्या.
मी काही माझ्या नातेवाईकांना असल्या भंपक गोष्टी सांगणार नाही
1 Dec 2020 - 12:43 pm | संजय क्षीरसागर
पुन्हा एक चांगली संधी हुकवलीत !
जाणीवेचा रोख एका विचारावर नसणं काय (रोड-क्रॉसिंग) की जाणीवेचा रोख अधांतरी असणं काय (खिडकी बाहेर बघणं) दोन्ही केसेसमधे मेंटल अॅक्टीविटी चालूच असते तुमच्या आकलनानुसार तुम्ही कशाला काय म्हणता यानं काहीही फरक पडत नाही.
मुळ मुद्दा मेंटल अॅक्टीविटी थांबणं आहे हे तुम्हाला लक्षात येत नसेल तर ते तुमचं दुर्दैव आहे. तुम्ही कितीही आपटली तरी माझी ध्यानपद्धती काम करेलच आणि तुमची मेंटल अॅक्टीविटी कायम चालूच राहिल.
1 Dec 2020 - 8:00 pm | सुबोध खरे
आपण इतके बधिर असाल असे वाटले नव्हते.
असो
आपली विचारसरणी पाहून ह ह पु वा
1 Dec 2020 - 8:06 pm | सुबोध खरे
इ सि जि ची रेषा सरळ झाली (flat ecg) कि साधारणपणे माणूस मेला असे जाहीर केले जाते.
परंतु खरं तर इ इ जी ची रेषा सरळ झाली (flat eeg) म्हणजेच मेंटल अॅक्टीविटी थांबणं कि माणूस मेला असे कायद्याप्रमाणे समजले जाते.
An electroencephalogram (EEG) is a test used to evaluate the electrical activity in the brain, a flat line EEG is often an indication that the brain is no longer alive.
पण तुम्ही सरसकट सगळ्यांची मेंटल अॅक्टीविटी थांबते म्हणून परत परत विधाने करताय?
ठाणे येरवडा इथे अशी माणसं बरीच सापडतात.
काळजी घ्या
30 Nov 2020 - 12:40 pm | सुबोध खरे
तुम्हाला अजूनही स्वच्छंद जगता येत नाही
हे सिद्ध करून दाखवा पाहू
याचा अर्थ माझ्या सर्व अतीश्रीमंत क्लायंटससारखं तुम्हालाही माझ्या व्यासंगाचं आणि स्वच्छंद जगण्याचं अप्रूप आहे.
हे मॅनियाचे लक्षण समजावे का? काळजी घ्या बुवा. बायपोलर डिसऑर्डर असेल तर गोची होईल
ह ह पु वा
30 Nov 2020 - 3:30 pm | संजय क्षीरसागर
१.
याचा अर्थ तुमच्या अतीव्यस्त जीवनात, तुम्ही इथे येऊन (काहीही अभ्यास नसलेल्या विषयावर वाट्टेल ते प्रतिसाद देऊन) आम्हाला उपकृत करता असा होतो का ?
30 Nov 2020 - 6:31 pm | सुबोध खरे
ह ह पु वा
30 Nov 2020 - 8:00 pm | डॅनी ओशन
डाक्टर खरे सायबांची आमच्या डोक्यात फोटू 'साहा फूट ऊंच गोरापान मानुस, चेरा लालबुंद झाला आसून खटखटाखट इरोधकांना हानुन काढणारे पर्तीसाद टायप करत हाएत' असा हुता. त्यात "हासुन हासुन पुरे वाट" हे बशेना.
2 Dec 2020 - 9:22 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
निर्बुद्ध आणि भंपक धारणातून तुम्ही बाहेर पडाल (उदा. तरंगती शिळा डोक्यावर घेऊन एकाग्रता साधणं !)
'तरंगती शिळा डोक्यावर घेऊन एकाग्रता साधणं' या प्रकारची कोणतीही साधना अस्तित्वात नाही.
आ.न.,
-गा.पै.
3 Dec 2020 - 10:18 am | आनन्दा
गा पै हा लेख वाचा..
तुमच्या सगळ्या प्रश्नांचि उत्तरे मिळतील.
http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-interesting-mind-story-dr-pa...
3 Dec 2020 - 7:32 pm | गामा पैलवान
दुव्याबद्दल धन्यवाद, आनन्दा! वरवर चाळला तेव्हा लेख पटला.
पण काये की नाथांची बदनामी होत असेल तर ती थांबवावीशी वाटते. तितकाच माझा सहभाग आहे.
आ.न.,
-गा.पै.
3 Dec 2020 - 7:59 pm | आनन्दा
सम्पूर्ण सहमत.
"देव देश धर्म गुरु यान्चे जर चारित्र्यहनन होत असेल तर यथाशक्ती ( किंवा सर्वशक्तीनिशी) प्रतिवाद केलाच पाहिजे", असे शास्त्रवचन आहे
3 Dec 2020 - 6:38 am | कोहंसोहं१०
ध्यानपद्धतींबद्दल बोलायचे झाल्यास ज्यांचा अध्यात्माचा अभ्यास आहे त्यांना संक्षींनी सांगितले त्यात काहीच विशेष वाटणार नाही. अश्या हजारो पद्धती सापडतील ज्या २-४ क्षणापुरत्या विदेहत्वचा अनुभव देतील.
काश्मिरी शैवीजम पंथामध्ये शिवाने पार्वतीला अश्या १०८ ध्यानपद्धती सांगितल्या आहेत. त्यातली कोणतीही एक अवलंबली तरी काही क्षणापुरता का होईना विचार थांबायचा अनुभव येईल.
लोकेषणा आणि वित्तेषणा - अध्यात्मिक वाटचालीतील दोन मोठे अडसर. नेहमीप्रमाणे संक्षींच्या मीच सर्वज्ञ, बरोबर आणि बाकी सगळे चुकीचे हा गर्विष्ठपणा या लेखातही दिसला. जोपर्यंत हे अडसर दूर होत नाहीत तोपर्यंत संक्षी बद्धच आहेत, मुक्त नाहीत हे सांगणे फार कठीण नाही.
बाकी अध्यात्मात खरीच प्रगती करायची असेल तर उगाच अमक्या तमक्याने सांगितलेल्या नवीन मार्गाचा वापर करण्याऐवजी अध्यात्मिक ग्रंथ आणि मुक्त ज्ञानी गुरु (महाराष्टरातील संत तसेच योगानंद, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, आदी शंकराचार्य, रमण महर्षी वगैरे) यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे पुरेसे आहे.
4 Jan 2022 - 5:01 pm | उन्मेष दिक्षीत
ट्रुथ इज नॉट अगेन्स्ट एनिबडी
तर, प्रतिसादाचा उद्देश गडे मुर्दे उखाडना नसून, वेरिफिकेशन आहे ! कोणताही सायंटिस्ट जेव्हा त्याला 'आकळलेली' गोष्ट थिअरी स्वरुपात मांडतो, तेव्हा त्याचे वेरिफिकेशन व्हायला लागते.
इथे शून्यता ही वास्तविकता संक्षींनी मांडली होती आणि वेरिफाय कशी होऊ शकेल हे ही सांगीतले होते, विथ हिज मेथड ऑफ मेडिटेशन. उद्देश, निर्विचारतेतून (ऑलरेडी असणारी वास्तविकता (शून्यता) कळणे. 'कोणाच्याही आत कुणीही नाही'.
मी साधना एकदाच केली होती आणि त्या आधी बराच अभ्यास केला असल्याने, परत नवीन मेडीटेशन करावे वाटेना.
तर मी या साधनेतून शुन्याप्रत पोहोचलो नाही ! पण आता मी सांगू शकतो की संक्षींची मेथड शुन्याचा 'कुणाच्याही आत कुणीही नाही' उलगडा घडवू शकते कारण इट इज अ फॅक्ट आणि मेंटल अॅक्टीविटीचे थांबणे ते घडवू शकते. कारण जाणीव 'कुणाची वैयक्तिक' नाही आणि स्वतःला व्यक्ती समजल्यामुळे आपण (बॉडी) च्या आत कन्फाईन्ड आहोत आणि मरणार असं वाटत होतं.. वास्तविकात देअर इज नो सच कन्फाईन्मेन्ट !
नाऊ चा उलगडा बॅकट्रॅक करताना अचानक झाल्यामुळे मीच नाऊ झालो आणि मन कह्यात येणे म्हणजे काय ते कळले ! आणि त्यानंतर चक्क ऑनलाइन ऑफिस मीटींग मधे असताना मला हा खरंच अफलातून असा उलगडा झाला !
बाकी, कुछ नही बदला, बदलता !
4 Jan 2022 - 6:05 pm | चित्रगुप्त
संक्षींचा णवीण औतार. वेल्कम ब्याक सरजी.
4 Jan 2022 - 8:08 pm | उन्मेष दिक्षीत
"पचनसंस्थेतील वायूनिर्मिती" जोरात चालू आहे नवीन प्रतिसाद मधे, डेथ आहे कि नाही कुणाला पडलंय ?