२. एका क्षणात विदेहत्व : इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स !
लेखनप्रकार
एकतर तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता किंवा सिद्ध ! जगात यापरता तिसरा पर्याय नाही. इन फॅक्ट, जर तुम्ही स्वतःला सिद्ध मानत नसाल तर स्वतःला व्यक्ती मानण्याखेरीज इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यत्र-तत्र-सर्वत्र सिद्धत्वंच सारे विश्व व्यापून आहे त्यामुळे इथे बाय-डिफॉल्ट, प्रत्येक जण सिद्धच आहे पण एखादं-दुसराच स्वतःच्या सिद्धत्वाची घोषणा करतो हा जगातला सर्वात मोठा विस्मय आहे.
पण खरी मजा तर पुढे आहे, जर असा सिद्ध इतरांना सांगायला लागला की व्यक्तिमत्त्व ही जगणं सोयीचं व्हावं म्हणून असलेली सामाजिक सोय आहे आणि ते सुद्धा बाय-डिफॉल्ट, सिद्धच आहेत तर ते सगळे मिळून त्याच्यावर तुटून पडतात ! कारण त्यांची अशी पक्की धरणा असते की सिद्धत्व ही पारलौकिक घटना आहे आणि शतकानुशतकात, कोट्यवधी लोकात, एखादाच सिद्ध असतो ! अर्थात, त्यांचा उद्वेगही सकारण असतो कारण पूर्वीच्या सिद्धांच्या पश्चात, त्यांच्या भक्तांनी आणि अनुयायांनी, सिद्धांच्याबाबतीत अशा काही स्टोर्या लावलेल्या असतात की बोलता सोय नाही ! उदाहरणार्थ, सिद्धांना त्यांचा ग्रंथ लिहायचा होता पण त्यांचा स्टेनो डेड झाला होता; मग यांनी त्याच्या बॉडीला हाक मारून सांगितलं की रायटिंग कंप्लीट केल्याशिवाय तू एक्झिट मारू शकत नाहीस !आणि आश्चर्य म्हणजे तो डेड फेलो उठला आणि त्यानं पहिले ग्रंथ कंप्लीट केला ! आता हा डबल ट्रबल होतो ! डेड मॅन उठला याला पुरावा काय ? तर त्या ग्रंथात स्टार्टींगलाच भक्तांनी, सिद्धाच्या पश्चात घुसवलेली ही स्टोरी ! एकतर सिद्धाला विचारायची सोय नाही आणि डेड मॅन तर ऑलरेडी डेड होताच म्हणजे वादाला जागाच नाही !
नंतर पुन्हा एखादा सिद्ध लोकांना सांगतो की सत्य सर्व चराचर अंतर्बाह्य व्यापून आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सिद्धच आहात; तर भक्त त्याला विचारतात तू डेड मॅनला उठवू शकतोस का? खल्लास ! म्हणजे कशाचा काही संबंध नाही पण पब्लिक विजयोन्माद साजरा करायला मोकळी. तो सिद्ध सांगतो की ज्या सिद्धाचा तुम्ही दाखला देताय त्यानं सुद्धा त्या ग्रंथात अ-मृताचा उद्घोष केला आहे, मृत्यू शरीराचा होतो, तुम्ही सत्य आहात, तुम्हाला मृत्यू नाही. पण पब्लिकला वाटतं की अमृत हे एक ड्रिंक आहे जे प्यायलं की देह अमर होतो !
ग्रंथात नेमकं तेच सांगितलं असूनही पब्लिक तो मेन कंटेंट धुडकावून स्टोरी फोरग्राउंडला आणते आणि परस्पर ठरवून टाकते की हा स्वतःला सिद्ध समजतो म्हणजे काय ? हा अहंकारी आहे ! आता ही त्याचूपणाची हद्द होते, खरं तर व्यक्तिमत्त्व हाच अहंकार आहे आणि सिद्धत्व म्हणजे व्यक्तित्वाच्या भासाचा निरास आहे, पण पब्लिक ऐकेल तर शपथ !
या पब्लिक मेंटॅलिटीमागे असलेलं एकमेव कारण म्हणजे इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स !
२. व्यक्तिमत्त्व ही सामाजिक उपयोगिता आणि जगणं सोपं व्हावं यासाठी केलेली सोय आहे. जर कुणी विचारलं की तुमचं नांव काय ? आणि प्रत्येक जण `माझं नांव सत्य' म्हणायला लागला तर समाज व्यवस्था कोलमडेल. यावर उपाय म्हणून व्यक्तिमत्त्वाचा फंडा शोधला गेलाय. पण वास्तविकात तुम्ही स्वतःला जे संबोधता (नांव-वडीलांच नांव-आडनाव) तसं कुणीही या जगात अस्तित्वात नाही, नव्हतं आणि नसेल. थोडक्यात, ज्या नांवानं तुम्ही स्वतःला संबोधता तसं कुणी, देह जन्मण्यापूर्वीही नव्हतं, सध्याही नाही आणि देहापश्चात तर नाहीच नाही. सध्या तुम्हाला तुम्ही जी व्यक्ती आहात असं वाटतंय ती केवळ तुमची आणि समाजानं तुमच्यावर लादलेली मान्यता आहे. त्यात सोय नक्कीच आहे पण वास्तविकात तुम्ही सत्य आहात. अर्थात, तुमच्या मान्यतेनं तुमच्या स्वरूपात कणमात्र फरक पडत नसला तरी एक गोष्ट हमखास घडते : तुम्हाला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स येतो ! कारण व्यक्तिमत्त्व हाच इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे. जोपर्यंत आपण सत्य आहोत हे तुम्हाला मान्य होत नाही तोपर्यंत या कॉम्प्लेक्सापासून सुटका नाही, मग तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असा की फुटपाथावरचे भिकारी, त्यानं काहीएक फरक पडत नाही.
पाश्चिमात्य देशातल्या व्यक्ती काँन्फिडंट वाटतात पण तो त्यांच्या संगोपनाचा भाग आहे. तिथे असं शिकवलं जातं की तुम्ही यूनिक आहात आणि हे बाळकडू त्यांना इतकं जबरदस्त पाजलं जातं की ते स्वतःला इतरांशी कंपेअर करत नाहीत त्यामुळे त्यांच्या मनात सहसा कॉम्प्लेक्सच येत नाही. यामुळे जगणं नक्कीच सुसह्य होतं पण व्यक्तिमत्त्वाचा युनिकनेस म्हणजे स्वरूप नव्हे आणि (इंग्रजीतला) काँन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास नाही. मी आत्मा आहे हा विश्वास म्हणजे काँन्फिडन्स ! परिणामी पाश्चात्त्य सुद्धा, स्वतःला यूनिक समजण्याच्या भानगडीत, स्वतःला 'एक यूनिक व्यक्तिमत्त्वच' समजतात; सिद्ध समजत नाहीत.
या उलट आपल्याकडे आपले पालक, गुरुजन, नातेवाईक (आणि काही खास मित्रमंडळी) आपल्याला असं शिकवतात की जोपर्यंत तू यूनिक होत नाहीस तोपर्यंत तू बावळट आहेस ! म्हणजे बाय-डिफॉल्ट तू बावळटच आहेस, तुझा युनिकनेस तुला सिद्ध करायचा आहे. यामुळे आपल्याकडे जगणं इतकं अवघड होतं की लोक फक्त, मी बावळट नाही हे दुनियेला दाखवण्यात आयुष्य खर्ची घालतात. आणि आपण बावळट दिसू नये म्हणून कोणताही नवा आयाम शोधण्याचं साहस करत नाहीत.
अर्थात, स्वतःला बावळट समजणं काय की यूनिक होणं काय की स्वतःला यूनिक समजणं काय ते सगळे व्यक्तिमत्त्वाचेच प्रकार आहेत आणि व्यक्तिमत्त्व हाच अहंकार आहे आणि तोच तुम्हाला तुम्ही सत्य आहात हा उलगडा होऊ देत नाही.
थोडक्यात, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध मानत नाही तोपर्यंत तुमचं जगणं व्यक्तिमत्त्वाच्याच दायर्यात राहतं आणि व्यक्तिमत्त्व हेच अहंकाराचं दुसरं नांव आहे. अध्यात्मात अहंकार म्हणजे स्वतःला कुणी तरी विशेष समजणं असा एक पारंपरिक आणि दृढ गैरसमज आहे आणि अहंकार गेला की सत्योपबलब्धी होईल असं ठासून सांगितलं गेलं आहे. त्यामुळे सर्व आध्यात्मिक आणि (गैर-आध्यात्मिक) मंडळींना असं वाटतं की आपण छपरी आहोत आणि `तो' (म्हणजे देव, ग्रेट आहे) असं समजलं (किंवा किमान इतरांना तसं दर्शवलं), तर यथावकाश आपल्याला सत्याचा उलगडा होईल ! पण या भ्रमात त्यांच्यातला ठामपणा संपून जाण्याशिवाय इतर काहीही होत नाही.
कारण सिद्धत्व ही वस्तुस्थिती आहे आणि व्यक्तिमत्त्व हा प्रत्येकाचा व्यक्तीगत भ्रम आहे. स्वतःला व्यक्ती समजणं, तसंच जगणं आणि वावरणं हे स्वतःला आकारबद्ध करणं आहे. आणि तोच नेमका अहंकार (अहं-आकार) आहे. जोपर्यंत व्यक्तिमत्त्वाचा भ्रम आहे तोपर्यंत इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे; कारण काँन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास नाही आणि इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे काँन्फिडन्सचा अभाव नाही. त्या दोन्ही मानसिकता व्यक्तिमत्त्वाच्याच दायर्यात आहेत.
जर सत्यच सर्व व्यापून आहे तर मी त्यावेगळा असूच शकत नाही ही खात्री म्हणजे आत्मविश्वास आणि ती खात्री होता क्षणी तुमचं व्यक्तिमत्त्व बहारदार होतं, ते आपसूक यूनिक होतं ! कोणतीही शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा सामाजिक उणीव तुमच्यात काहीही कॉम्प्लेक्स निर्माण करू शकत नाही. तुम्ही जाणता की आपण मुळात सिद्ध आहोत, बाय-डिफॉल्ट सिद्ध आहोत आणि व्यक्तिमत्त्व ही वापरायची चीज आहे, ती आपल्याला कधीही घेरू शकत नाही.
____________________________________________________
पहिल्या लेखात सांगितलेली ध्यानसाधना तुम्हाला प्रथम निर्विचारतेकडे नेईल. जशी शांतता सघन होत जाईल तसा व्यक्तिमत्त्वाचा निरास होत जाईल. व्यक्तिमत्त्व हे विचार, धारणा आणि भावनांचा इंटीग्रेटेड परिणाम आहे. व्यक्तिमत्त्वाचा निरास तुम्हाला सर्वप्रकारच्या इन्फिरिऑरिटी काँप्लेक्समधून मुक्त करेल !
वाचने
34322
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
मजेशीर !
इतरांसाठी त्याचुपणा (you know
मानसीक धारणांचा आणखी एक घोळ
गोलात गोल असतो आणि गोलाच्या
गोलात गोल असतो आणि गोलाच्या
या लेखमालेतील लेखांवरचे नेगटीव आणि बाष्कळ प्रतिसाद
In reply to या लेखमालेतील लेखांवरचे नेगटीव आणि बाष्कळ प्रतिसाद by संजय क्षीरसागर
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं
In reply to एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं by प्रसाद गोडबोले
सिद्ध महाराजांच्या ज्ञानरसाने
In reply to या लेखमालेतील लेखांवरचे नेगटीव आणि बाष्कळ प्रतिसाद by संजय क्षीरसागर
व्यक्तिमत्त्वाच्या
चालू ठेवा.
In reply to चालू ठेवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ डिबी : ही आध्यात्मातली अभूतपूर्व लेखमाला असेल !
अचाट आणि अशक्य
In reply to अचाट आणि अशक्य by शंकासुर
त्यांना स्वतःला सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे म्हणून
In reply to अचाट आणि अशक्य by शंकासुर
आपले लिखाण नेहमी प्रमाणे अचाट
In reply to आपले लिखाण नेहमी प्रमाणे अचाट by संगणकनंद
@ त्याचू वैलपान : तुम्ही नाकानी ऐकता
In reply to @ त्याचू वैलपान : तुम्ही नाकानी ऐकता by संजय क्षीरसागर
हाहा... सत्य कटू असतं... झोंबलं...
आयला
In reply to आयला by उन्मेष दिक्षीत
रिंगपासून ते स्ट्रिंगपर्यंतची छपरी भाषा
In reply to रिंगपासून ते स्ट्रिंगपर्यंतची छपरी भाषा by कांदा लिंबू
लॉल
In reply to आयला by उन्मेष दिक्षीत
करावे तसे भरावे
In reply to करावे तसे भरावे by संगणकनंद
कुठ्ल्या लेखांची
In reply to कुठ्ल्या लेखांची by उन्मेष दिक्षीत
सोप्पंय की हे...
In reply to सोप्पंय की हे... by संगणकनंद
अच्छा
In reply to अच्छा by उन्मेष दिक्षीत
कसलं स्कोर सेटलिंग हो.
In reply to आयला by उन्मेष दिक्षीत
कारण
In reply to कारण by प्रसाद गोडबोले
_/\_
छान विनोदी लेख
दोन भागात फुस्सत्व : विनोदी लेखनाची इतिश्री !
In reply to दोन भागात फुस्सत्व : विनोदी लेखनाची इतिश्री ! by संगणकनंद
@ त्याचू वैलपान : आपल्या अध्यात्मिक आकलनाचे यथेच्छ
In reply to @ त्याचू वैलपान : आपल्या अध्यात्मिक आकलनाचे यथेच्छ by संजय क्षीरसागर
"लेखमाला रंगतदार होणार"
@ डॅनी ओशन : पहिल्या लेखावर तुम्ही दिलेला प्रतिसाद
गाढवाला शास्त्रीय संगीताचं काही गम्य नसलं तरी खिंकाळायचा अधिकार असतोच! आता तीन संभावना आहेत : १. सुरक्षा रक्षकांनी गाढवाला हाकलून लावावं म्हणजे मैफिल पुन्हा सुरु होईल. २. सुरक्षा रक्षक काही कारणांनी वेळच्यावेळी धावून येत नसतील तर किमान श्रोत्यांनी गाढवाची रवानगी करावी आणि मैफिल पुन्हा सुरु होईल असं बघावं. ३. वरील दोन्ही पैकी काहीच झालं नाही तर गायकाला गाणं सोडून आधी गाढवाला मैफिली बाहेर काढावं लागेल तरच मैफिल चालू राहिल. इथे नेमका तिसरा प्रकार चालू आहे ! माझ्या हयातीत मी कुणालाही कधीही व्यक्तिगत प्रतिसाद देऊन सुरुवात केलेली नाही कारण एकतर तो माझा स्वभाव नाही आणि दुसरं म्हणजे माझा आभ्यास आणि रेंजच इतकी व्यापक आहे की मी सरळ मुद्यालाच भिडतो. पण गाढवांचा बंदोबस्तही मलाच करायला लागतो हे माझं प्राक्तन असावं. गाढवं कुठे आणि कशी खिंकाळतील याचा नेम नसतो त्यामुळे स्वतःचा ही धागा बघावा लागतो आणि धाग्याचं विडंबन वगैरे झालं तर तेही बघावं लागतं. आता गाढवांचं दुर्दैव असं की माझ्यापुढे ती काय टिकाव धरणार ? पण पब्लिकला असं वाटतं की शेवटचा प्रतिसाद माझाच असावा असा हट्ट असतो, तर ते तसं नाही शेवटच्या प्रतिसादामुळे गाढव गप्प होतं आणि मला पुन्हा मैफिल सुरु करता येते !In reply to @ डॅनी ओशन : पहिल्या लेखावर तुम्ही दिलेला प्रतिसाद by संजय क्षीरसागर
@संक्षी - गाढव कोण आहे हे मिपाकरांना चांगलं माहिती आहे :)
In reply to @संक्षी - गाढव कोण आहे हे मिपाकरांना चांगलं माहिती आहे :) by संगणकनंद
गर्दभगान...
@संक्षी
In reply to @संक्षी by सुबोध खरे
@ सुबोध खरे : तुमचे काहीही न वाचता आणि
In reply to @ सुबोध खरे : तुमचे काहीही न वाचता आणि by संजय क्षीरसागर
.
In reply to . by संजय क्षीरसागर
सिद्ध करता येत नाही म्हणून
आपल्याला देह नाही हा अत्यंत अलौकिक असा तो उलगडा
महाराजाधिराज सिंहासनाधिश्वर सकळ ज्ञान परि पूर्ण श्री क्षीरसागर महाराज कि जय असे तुमचे चमचे म्हणत असतील. पण मिपाकर अजून आपली बुद्धी कुणाच्या चरणी लीन करून (अक्कलशून्य) विचारशून्य झालेले नाहीत.In reply to सिद्ध करता येत नाही म्हणून by सुबोध खरे
@ सुबोध खरे : मी सुरुवातीलाच म्हटलंय
In reply to @ सुबोध खरे : मी सुरुवातीलाच म्हटलंय by संजय क्षीरसागर
मन विचलित झालंय म्हणजे विचार
मीच तेवढा महामहीम हुशार.
In reply to मन विचलित झालंय म्हणजे विचार by सुबोध खरे
@ सुबोध खरे : तुम्ही स्वतःची सर्व अक्कल हुशारी
In reply to @ सुबोध खरे : तुम्ही स्वतःची सर्व अक्कल हुशारी by संजय क्षीरसागर
मी हा प्रयोग अनेक वेळेस करून
In reply to मी हा प्रयोग अनेक वेळेस करून by सुबोध खरे
@ सुबोध खरे : बराचसा रिझनेबल प्रतिसाद आहे
In reply to @ सुबोध खरे : बराचसा रिझनेबल प्रतिसाद आहे by संजय क्षीरसागर
हे एक राहिलं !
In reply to हे एक राहिलं ! by संजय क्षीरसागर
मेंटल अॅक्टीविटी थांबणं हा
In reply to मेंटल अॅक्टीविटी थांबणं हा by सुबोध खरे
@ सुबोध खरे : मनाविषयी तुमचं आकलन शून्य आहे !
In reply to @ सुबोध खरे : बराचसा रिझनेबल प्रतिसाद आहे by संजय क्षीरसागर
रस्ता क्रॉस करतांना करु की
In reply to रस्ता क्रॉस करतांना करु की by सुबोध खरे
@ सुबोध खरे : स्वतःच्या निर्बुद्ध धारणांमुळे
In reply to @ सुबोध खरे : स्वतःच्या निर्बुद्ध धारणांमुळे by संजय क्षीरसागर
आपण इतके बधिर असाल असे वाटले
ह ह पु वा
In reply to आपण इतके बधिर असाल असे वाटले by सुबोध खरे
इ सि जि ची रेषा सरळ झाली
तुम्हाला अजूनही स्वच्छंद जगता
ह ह पु वा
In reply to तुम्हाला अजूनही स्वच्छंद जगता by सुबोध खरे
@ सुबोध खरे : तुमचा प्रतिसाद वाचा
In reply to @ सुबोध खरे : तुमचा प्रतिसाद वाचा by संजय क्षीरसागर
ह ह पु वा
In reply to ह ह पु वा by सुबोध खरे
हॉ !
तरंगत्या शिळेची साधना ?
In reply to तरंगत्या शिळेची साधना ? by गामा पैलवान
गा पै हा लेख वाचा..
In reply to गा पै हा लेख वाचा.. by आनन्दा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by गामा पैलवान
सम्पूर्ण सहमत.
ध्यानपद्धतींबद्दल बोलायचे
एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता
वेल्कम ब्याक सरजी.
In reply to वेल्कम ब्याक सरजी. by चित्रगुप्त
चित्रगुप्तजी