अंतर

aanandinee's picture
aanandinee in जे न देखे रवी...
18 Jun 2020 - 11:57 am

तुझं माझं हे दूर असणं
जसे नकाशावरचे दोन ठिपके.
आठवण करून द्यायला जणू,
की कितीही म्हटलं तरी झालोय परके.

तुझ्या माझ्या ठिपक्यांना, जोडणारी ती रेषा
नकाशात ती दोघांमधलं अंतर दाखवते.
पण सरळसोट नाहीच ती,
नात्यांसारखी तीसुद्धा नागमोडी वळते.

मला त्यात नात्याची एक उसवलेली वीण दिसते...

डॉ. माधुरी ठाकूर

भावकवितावाङ्मयकविता

प्रतिक्रिया

ही प्रेमकविता नाही. माझ्या इथल्या एका मैत्रिणीची आई काल रात्री अचानक गेली. आई भारतात, मुंबईत होती. तिथे तिच्या वडलांचं वय जवळ जवळ ऐशी. इथे हिच्या नवर्याला diabetes आणि blood pressure, दहा वर्षांच्या हिच्या मुलीची immunity extremely low! तिने आईला शेवटचं बघायला जावं की या साऱ्यांच्या काळजीने प्रवासाची risk न घ्यावी. मी रात्री तिच्या घरी गेले होते. ती रडत होती, मी तिला समजावलं की वडलांना आधार म्हणून भाऊ आहे ना तिथे, तू आत्ता न गेलेलं बरं म्हणून. आणि घरी येऊन मी स्वतःच रडत होते. त्यातलं किती रडणं तिच्यासाठी होतं आणि किती माझ्या स्वतःसाठीच काय माहीत!

कविता आणि त्याबद्दलचे स्पष्टीकरण दोन्ही निशब्द करून गेले.
कोरोना काळात अश्या असंख्य घटना घडत असतील. कठीण आहे हे सगळे.