फक्त 'बी'

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
22 Apr 2009 - 5:59 am

दहा वाजता ठाणे स्टेशनला उतरलो. आता रिक्षाची कटकट. रात्री दहा वाजता स्टेशनला रिक्षा मिळण्यासाठी 'पुर्वपुण्याई' सुद्धा पुरत नाही. त्यादिवशी काही पुण्यकर्म केले असेल तरच. बाहेर येतो तर ही मोठी लाईन. चालायला सुरु केले. म्ह्टल बघु मधे कुठे मिळाली तर.
दहा पावले चाललो नसेन, बाजुला एक रिक्षा उभी राहीली. रिक्षातुन एक चेहेरा डोकावला. "या सर, तुम्हाला सोडतो". लगेच बसलो रिक्षात.
"रामवाडी, ना" चेहेरा बोलला.
"लुईस वाडी" मी
काही हरकत नाही, मी घोड्बंदरला चाललो आहे.
माझ्या काही लक्षात येइना. हा कोण ते.
मला गप्प बघुन तो म्हणाला, "काय, सर ओळखले नाही का"?
" नाही ब्वॉ" मी
त्याने खुलासा केला, आणि लक्षात आले. सुमारे सहा महीन्यापुर्वी हा माझ्या जुन्या घरी मला भेटला होता. बायको सकट. 'मिड्लाईफ क्राईसीस' करता.
"बरेच रीड्युस झाला हो तुम्ही, म्हणुन गोंधळ झाला. मी
"तुमचा सल्ला मनावर घेतला सर. जुने घर विकले. चांगला भाव मिळाला. घोड्बंदरला मोठा फ्लॅट घेतला. आता गाडी नाही वापरत. बसने जातो. स्टॉप वर उतरुन चालत कंपनीत जातो.येता जाता १ तास चालणे होते. वजन लगेच उतरले. आणि सर्व ठीकाणी 'एफिशियन्शी' वाढली." इथे गडगडाटी हास्य.
आता वजनाचा आणि सर्व ठीकाणच्या 'एफिशियन्सी' चा काय संबंध. कै च्या कै.
मी पण हसलो.
गृहस्थ भलताच मुड मधे दिसत होता.
अशा वेळी मी बोलण्याचे टाळतो.
पण त्याचे चर्‍हाट चालुच होते.
बरे झाले ट्रॅफीक नव्हती. घर जवळ आले. मी रिक्षा थांबवली. धन्यवाद म्हणुन मी उतरलो. माझ्या मागोमाग हा पण उतरला.
'सर, दहा मिनीटे वेळ आहे का'?
" आज नको, उशीर झाला आहे. खुप थकलो आहे. लवकर झोपलो नाही तर सकाळी उठायला त्रास होईल.
लगेच परत सातमजली हास्य. मला काही कळेना. काय प्रकार आहे.
"तुम्ही म्हणजे लय भारी बॉ " फक्त दहा मिनिटे. जास्त नाही थांबवणार.
आता टाळणे शक्य नव्हते. वाचलेल्या २० रुपयाची किंमत मोजायलाच हवी होती.
"बोला" मी
"सर, मी नव्या घरात तुम्ही सांगितल्याप्रमाणे 'ईटीरीयर' केले."
मला घराच्या सजावटीबद्द्ल रेतीच्या कणाइतके सुद्धा कळत नाही.
मनातल्या मनात मी मिनिटे मोजत होतो.
" कुठल्याही प्रकारचे फर्निचर टाळले आहे मी. कपाटे नाहीत. वार्डरोब भिंतीला फ्लशकट. (मी मनातल्या मनात हैराण्-आता हे
काय असते ते मला माहीत नाही). डायनींग टेबल सुद्धा फोल्ड करुन भिंतीत जाते. बेड नाही बेडरुम मधे. सरळ गाद्या घालतो. (च्या मारी, ह्याच्याशी माझा काय संबंध)
दोन १ बी.एच्.के. जोडुन फ्लॅट तयार केला आहे.
तुमच्या भाषेत सांगायचे झाले तर आता माझ्या घरात एच नाही के नाही सर्व फक्त "बी"
परत गडगडाट.
"बरे झालो हां, तुम्हाला भेटलो, सर्व काही सुरळीत झाले. आता सर्व पारंपारीक खेळ खेळता येतात. कबड्डी, लंगडी,पकडापकडी, आंधळी कोशींबीर. या एकदा घरी.
ठीक आहे. फोन करुन येतो असे म्हणुन मी कटलो
आता ह्याला मी काय सांगितले होते हे मला काहीही आठवेना.
म्हटले असु दे, सुरळीत आहे ना. बरे आहे.

"

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

22 Apr 2009 - 6:29 am | दशानन

काय आहे जसे देव काय तरी बोलून जातो व विसरुन देखील जातो काय केले ते....

तसेच तुमचे आहे तुम्ही क्रिप्टिक मध्ये काय अतरी बोलून जाता समोरच्याला जे समजायला हवे ते सोडून बाकी सर्व समजते पण त्या काय समजले हे तुम्हाला समजत नाही, पण वर जे समजवण्याचा तुम्ही प्रयन्त केला आहे ते आम्हाला समजले ;)

थोडेसं नवीन !

भडकमकर मास्तर's picture

22 Apr 2009 - 7:20 am | भडकमकर मास्तर

देव काय तरी बोलून जातो व विसरुन देखील जातो
प्रभू की माया है|
:)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 6:39 am | विनायक प्रभू

पकडा पकडी, लंगडी,कबड्डी ठीक.
पण आंधळी कोशीबीर?
आयला कुट धड्पडले तर बील माझ्या नावाने यील की?

विंजिनेर's picture

22 Apr 2009 - 7:25 am | विंजिनेर

काय कळलं नाय बुवा...
फक्त बी म्हंजे काय बुवा??

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 7:26 am | विनायक प्रभू

बी मंजे बेडरुम

विंजिनेर's picture

22 Apr 2009 - 7:34 am | विंजिनेर

बी मंजे बेडरुम

अहो पण लग्न करून रहायचं (किंवा "कसंही" राहायचं झालंतरी) म्हंजे फक्त बेडरूमच मुद्द्याची असते काय?
आता संसार-रथाला किती चाकं असतात आणि त्यातलं कुठलं चाक जास्त महत्वाचं हे सांगणं अवघड नाही काय...
दिलेला सल्ला कितीही मोठा असला तरी तो वापरताना थोडातरी चक्याचाडो चपरवा करायाचा की नाही माणसाने ?

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

रामपुरी's picture

22 Apr 2009 - 11:24 pm | रामपुरी

तुम्ही त्रास करुन घेऊ नका विंजिनेर. यांचा कुठलाही लेख याच "विषयाला" वाहीलेला असतो. (कहर म्हणजे मागे एकदा अगदी लहान मुलाच्या नग्नतेचा संबंध सेक्स शी जोडला होता. त्यावेळीच वाटले होते या माणसाला मानसोपचार तज्ञाची गरज आहे.) तेव्हा आपणतरी डोक्याला फुकट शॉट लावून घेत नाही.

विनायक प्रभू's picture

23 Apr 2009 - 7:02 am | विनायक प्रभू

तुम्ही उपचार करता काय?

दशानन's picture

23 Apr 2009 - 9:50 am | दशानन

:?

तोंड दिले म्हणून वाटेल ते बोलू नये, तोंड फुटतं अश्यानं !

थोडेसं नवीन !

मदनबाण's picture

22 Apr 2009 - 7:38 am | मदनबाण

वाचुन काय बी समजल नाय...पण गुरु ने दिलेल्या सल्ल्याचा शिष्याला फायदा झाला हे मात्र समजले.
मला काही कळेना. काय प्रकार आहे.
ह्म्म...क्रीप्टीक चा अल्गोरिदम बदललेला दिसतो !!!

अति अवांतर :-- रात्री दहा वाजता स्टेशनला रिक्षा मिळण्यासाठी 'पुर्वपुण्याई' सुद्धा पुरत नाही.
ह्म्म... खरं आहे त्यासाठीच मी रिक्शा स्टॅडच्या बाजुला असलेल्या "अचानक मारुतीला" मनोमन नमस्कार करायचो... हल्ली तो मारुती जागेवर दिसत नाही!!!

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 7:50 am | विनायक प्रभू

अरे बाळा, ते 'मिड्लाइफ क्रायसीस' ही लय भारी भानगड असते.
पाठीवरच्या खाजेसारखे.
खाजते पण हात पोचत नाही.
आणि पोचण्यासाठी कोण सर्कस करावी लागते.

निखिल देशपांडे's picture

22 Apr 2009 - 9:47 am | निखिल देशपांडे

मास्तर कायबी कळल नाय बघा....

"कबड्डी, लंगडी,पकडापकडी, आंधळी कोशींबीर. या एकदा घरी."
मास्तर हा तुम्हाला का बोलवतोय हो खेळायला......
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

अवलिया's picture

22 Apr 2009 - 9:52 am | अवलिया

चालु द्या !

--अवलिया

पाषाणभेद's picture

22 Apr 2009 - 11:31 am | पाषाणभेद

त्या फ्लॅटच्या खालच्या लोकांचे काही खरे नाही म्हणजे. तो लवकरच विक्री होणार.

मी पण माझ्या घराचे ईंटीरीअर बदलावे म्हणतो.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 10:45 am | विनायक प्रभू

खीखीखीक्

परिकथेतील राजकुमार's picture

22 Apr 2009 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार

पारंपारीक खेळांना उत्तेजन देणार्‍या प्रभु गुर्जींचा विजय असो !

मंदकेसरी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पारंपारिक खेळांकडे कधी वळले? असो प्रश्न सुटल्याशी कारण!
(मल्लखांबाचा समावेश पारंपारिक खेळात होतो का? :> :? )

चतुरंग

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 12:11 pm | विनायक प्रभू

अग्गायायायायाया.

बाकी हे बी आवडल....पण मारुतीच्या शेपटीच काय झाले? कळाले नाही.
दिव्यावरची भाकरी आता पलटा एकदा.
वेताळ

अभिज्ञ's picture

22 Apr 2009 - 11:50 am | अभिज्ञ

तुमचा सल्ला मनावर घेतला सर. जुने घर विकले. चांगला भाव मिळाला. घोड्बंदरला मोठा फ्लॅट घेतला. आता गाडी नाही वापरत. बसने जातो. स्टॉप वर उतरुन चालत कंपनीत जातो.येता जाता १ तास चालणे होते. वजन लगेच उतरले. आणि सर्व ठीकाणी 'एफिशियन्शी' वाढली."

आता सर्व पारंपारीक खेळ खेळता येतात. कबड्डी, लंगडी,पकडापकडी, आंधळी कोशींबीर

ह्या सर्वावरून हा "मिडलाईफ क्रायसिस" काय आहे/होता ह्याचा अंदाज आला.;)
पण हा गडी तुम्हाला घरी कशाला बोलावतोय? ~X(

अभिज्ञ.

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 12:08 pm | विनायक प्रभू

दाखवण्याकरता हो अभिज्ञ शेट(इंटीरीयरची)

मन्जिरि's picture

22 Apr 2009 - 12:21 pm | मन्जिरि

लेट पेटलि पण लोकान्च्या रिएक्शन वाचुन धमाल आलि बकि तुमचे सर्वच लेख सु॑दर अस्तात

सँडी's picture

22 Apr 2009 - 12:59 pm | सँडी

तुम्हाला भेटल्याला या चेहर्‍याला आपण चांगलाच कानमंत्र दिलेला दिसतोय..:)
कबड्डी, लंगडी,पकडापकडी, आंधळी कोशींबीर
मैदानी कुस्ती, रग्बी आणि अधुन मधुन टेबल टेनिस हे आमचे आवडीचे खेळ.;)

-सँडी
काय'द्याचं बोला?

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 5:06 pm | विनायक प्रभू

ते कसे काय खेळतात बॉ?

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2009 - 5:08 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, सोप्पंय!!! मी ७वी - ८वी मधेच शिकलो होतो खेळायला!!!

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 5:12 pm | विनायक प्रभू

सिंगल विकेट टुर्नामेंट

सँडी's picture

22 Apr 2009 - 5:23 pm | सँडी

ते कसे काय खेळतात बॉ?
हा एक इनडोअर खेळ आहे. बाकीचे तसे मैदानी खेळ, पण जमवलेच तर तेही इनडोअरच. ;)

-सँडी
काय'द्याच बोला?

जागु's picture

22 Apr 2009 - 1:05 pm | जागु

आवडले.

Suhas Narane's picture

22 Apr 2009 - 6:50 pm | Suhas Narane

डोक्यावरुन गेला लेख

शरदिनी's picture

23 Apr 2009 - 10:13 am | शरदिनी

सहमत...
बिट्वीन द लाईन्स फार आहे..

विनायक प्रभू's picture

23 Apr 2009 - 10:25 am | विनायक प्रभू

काही बीट्वीन द लाइन लीहीता येत नाही हो.

प्राची's picture

22 Apr 2009 - 7:18 pm | प्राची

अहो नराणे,
डोक्यावरून लेख गेला काही हरकत नाही,तुमची प्रतिक्रिया पाहून मराठी टंकलेखन थोडंतरी तुमच्या डोक्यात गेलं हेही नसे थोडके. =D>