(मेरा कुछ सामान... (भावा...(बघ)..अनुवाद.))

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
11 Nov 2021 - 3:38 pm

सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका...

पेरणा, प्राची ताईची ही कविता
http://www.misalpav.com/node/49553

प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?)

स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून.

माझ्या आता पर्यंतच्या अनुभवावरुन सांगतो हे गाणे असे भारी आहे की दुसऱ्या कोणाlला खरा अर्थ लक्षात येण्याची शक्यताच नाही.

मग म्हटले आपणच खरा भानुवाद करून सर्व होतकरू कविं समोर एक आदर्श निर्माण करावा,

मेरा कुछ सामान... भावा...(बघ)..अनुवाद.

माझ्या काही वस्तू,
चोरट्या तू, ढापुन नेलेल्या
श्रावणात ओल्या ओल्या,
चड्ड्या त्या, दांडी वरल्या,
आणि पुडक्या, राखुंडीच्या,
पत्रात बांधलेल्या
राखुंडी परत दे,
माझ्या सगळ्या वस्तू परत दे (भिकारड्या)
माझ्या काही वस्तू,...

उन्हाळ्याच्या दिवसात कोकमे,
हा हा हा ...काय बरोबर ना?

उन्हाळ्याच्या दिवसात कोकमे,
अन आंबे पाडायचा कोयता,
लगेच देतो सांगून, नेला होता
जीभ कशी झडत, नाही मेल्या,
खोटं बोलता
गुमान कोयता आणून दे,
माझ्या सगळ्या वस्तू परत दे (भिकारड्या)
माझ्या काही वस्तू,...

माझ्या गळक्या छत्री मधे,
अर्धे अर्धे भिजत असताना
पिशवीतले सुकट बोंबील,
पाहिले मी तुला चोरताना
मासळी खाउन,
काटे अंगणात पुरताना,
तो हिशोब आत्ता दे,
माझ्या सगळ्या वस्तू परत दे (भिकारड्या)
माझ्या काही वस्तू,...

एकशे सोळा माडीचे बील,
भरून खांद्या वरून तुला नेले ,
वल्ले काजू, भाजके दाणे
हिशोब यांचे नाही केले
खोटारड्या, वायदे तुझे फार झाले
मला आता तारीख दे ,
माझ्या सगळ्या वस्तू परत दे (भिकारड्या)
माझ्या काही वस्तू,...

एकदा माझ्या, सापड तावडीत,
तुला गाडून टाकेन,
तेव्हाच मी पण सुटेन,
तेव्हाच मी पण सुटेन,

पैजारबुवा,

वरिजनल गाण्याचे लिंक :- https://www.youtube.com/watch?v=4aPHP0n1no8
टिप :- वरीजनल गाणे ऐकता ऐकता भावानुवाद वाचत मोठ्यांदा म्हणून बघा, म्हणजे तुम्हाला कंसातला (भिकारड्या) हा शब्द पण ऐकू येईल, आरडीने तिकडे उगाचच गिटार वाजवली आणि गाण्याचा मूळ अर्थ बदलून टाकला. मूळ कवितेत त्या गिटार ऐवजी "कुत्ते" असा शब्द होता.

अदभूतअविश्वसनीयकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

11 Nov 2021 - 4:06 pm | योगी९००

ह ह पु वा....!! बर्‍याच दिवसांनी एक चांगले विडंबन वाचायला मिळाले

Bhakti's picture

11 Nov 2021 - 5:00 pm | Bhakti

वाह
नेव्हर एव्हर इमाजिनड ,हे गाणं मराठीत असे होईल.
पुढे forward करायची खुमखुमी आली आहे ;)
धन्यवाद

तुषार काळभोर's picture

11 Nov 2021 - 5:00 pm | तुषार काळभोर

द्येवा, उचलले रे बाबा!
हे वाचलं, आता मी डोळे मिटायला मोकळा!

श्वेता व्यास's picture

11 Nov 2021 - 5:25 pm | श्वेता व्यास

wfh आहे म्हणून बरंय, नाहीतर हे वाचताना हसू आवरेना :)

अनन्त्_यात्री's picture

11 Nov 2021 - 7:07 pm | अनन्त्_यात्री

फाॅरवर्ड केला आहे. (: ते मराठीचेही जाणकार आहेत).

(((माऊलींनी अटकपूर्व जामीन घेण्याची व्यवस्था करावी:):):)

सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका.

साष्टांग दंडवत स्वीकारावा, पैजारबुवा.
आधी तुमचे इडंबन, मग मूळ कविता वाचायची, हा पायंडा केवळ तुमच्या इडंबनांमुळेच पडलेला आहे.

एकशे सोळा माडीचे बील...

यातली 'माडी' ही 'ढोसायची' का 'चढायची' तेवढे बरीक सांगावे.
कोटि कोटि प्रणिपात.

प्रचेतस's picture

12 Nov 2021 - 6:03 am | प्रचेतस

यातली 'माडी' ही 'ढोसायची' का 'चढायची' तेवढे बरीक सांगावे.

अगगगगगा, =))

प्रचेतस's picture

12 Nov 2021 - 6:02 am | प्रचेतस

अरारारारा, कहर आहे.

प्राची अश्विनी's picture

12 Nov 2021 - 8:37 am | प्राची अश्विनी

भावाssssss
हहपुवा.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2021 - 10:19 pm | अत्रुप्त आत्मा

=)))))))))))

कुमार१'s picture

14 Dec 2021 - 1:21 pm | कुमार१

हहपुवा..च.

चौथा कोनाडा's picture

14 Dec 2021 - 1:26 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !
एक नंबर, पैजारबुवा !
😂
हहपुवा !

चरणकमल कुठे आहेत आपले !

लैच भारी! चालीत म्हणून दाखवू?

नि३सोलपुरकर's picture

14 Dec 2021 - 3:03 pm | नि३सोलपुरकर

एकशे सोळा माडीचे बील,
वल्ले काजू ....

कहर आहे. बुवा _/\_

टर्मीनेटर's picture

14 Dec 2021 - 3:55 pm | टर्मीनेटर

आज पर्यंत भलताच (श्रुंगारीक) अर्थ काढुन हे गाणे ऐकायचो. पद्य / काव्य / कविता वगैरे प्रकार हे त्यातला गर्भित अर्थ डीकोड करून समज़ुन घेण्याची माझी बौद्विक कुवत नसल्याने मी त्यांच्या वाटेला जात नाही. पण गुलजार साहेबांच्या रचना पद्या पेक्षा गद्याकडे झुकणाऱ्या असतात त्यामुळे त्यांचे अर्थ समजतात असा माझा (गैर)समज होता तो ही आज दुर झाला.
साला आजचे वृश्चिक राशीचे भविष्य वाचायला पाहीजे त्यात जर “जुने गैरसमज दुर होतील” असे कोणी लिहिलेले आढळल्यास आज एकाच दिवशी तुम्ही माझे तब्बल दोन गैरसमज दुर केल्याने कदाचित मी ज्योतिष शास्त्रावर (आत्तापर्यंत नाही) पण विश्वास ठेवायलाही तयार होईन.

माऊली ह्या रचनेचा खरा भावार्थ सांगीतल्याबद्दल तुमचा आजन्म ऋणी राहीन आणि यापुढे गुलजारच्याही नादाला कधी लागणार नाही अशी प्रतिज्ञा करून माझे दोन शब्द संपवतो!

विठ्ठल विठ्ठल 🙏

असं म्हणतात की गुलजार यांच्या ह्या ओळी आर डींना वाचायला दिल्यावर कागद फेकून दिला. म्हणाले उद्या तू पेपर मधली शब्दाची कात्रणं कापून आणून देशील. मला नाही असल्या काही तरी शब्दावर गाणं रचायचं...
जाऊ दे ना, तू चाल लावून बघ मी म्हणून पाहते. मग ते गाणं झालं...!

जव्हेरगंज's picture

9 Feb 2022 - 10:17 pm | जव्हेरगंज

लैच भारी!!! =)))))))