सहज ओघळावेत तशा थेंबाप्रमाणे ओघळणार्या तुझ्या आठवणींच्या मागोव्याने मनात घर केलं! :)
(पुढच्या वेळी कॅमेरा विसरु नकोस म्हणजे ते क्षण काही अंशी तरी घट्ट पकडून ठेवल्याचे समाधान मिळेल तुलाही आणि आम्हालाही)
लेखनाला लाघवी म्हणता येईल की नाही ठाऊक नाही. पण हे तसं लेखन आहे. फक्त त्याक्षणी माझ्याकडे कॅमेरा नसल्याचं मला खूप खूप वाईट मात्र वाटलं. अर्थात, असता तरी ते सौंदर्य जसंच्या तसं, मला पकडता आलं असतं की नाही, कोणास ठाऊक.
गरज नाही. असे चित्रदर्शी लिहिता येत असेल तर कॅमेराची गरज नाही. फोटोनाही कॅप्शन द्यावी लागत असते अनेकदा.
एक सांगू? काही वेळा ना, कॅमेरा सोबत नसतो तेच बरं असतं. मनात उमटलेलं ते चित्र कॅमेरा तितक्याच ताकदीनं कागदावर नाही उतरवू शकत. मग उगाचच आपण खट्टू होतो.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
नॅशनल जिऑग्राफिक किंवा अॅनिमल प्लॅनेटवर, भटंकती करणारे अन् वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटी देणारे महान लोक पाहिले, की मला त्यांचा हेवा वाटल्याखेरीज रहात नाही. एक तर असं मस्त काम करा आणि त्यातून कमवा पण! कसलं ग्रेट! असलं काहीतरी मला जमायला हवं होतं, हे आयटी मधे रमण्यापे़क्षा... कसली धमाल आली असती!
छान लेखन :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अवलियाजी, प्राची, मोडकसाहेब, स्वातीताई, राजे, टारझन, मृदुला, मास्तर, अभिज्ञ, रेवती खूप आभार. :)
रेवती, खरच खूप शांत आहे गं तो परिसर, शांतता वेढते आपल्याला तिथे गेल्यावर.
मस्तच लिवलंय!!! मला काय वरच्यासारखे भारी भारी प्रतिसाद लिहिता येत नाहीत. पण वाचून खूप मस्त वाटलं. आणि क्यामेराचं म्हणाल तर क्यामेरा असला तर आपण सगळा आसमंत त्याच्या चौकटीत बंदिस्त करायला बघतो, आणि मग मेमरी कार्डावर फ्रेम्स साठवायच्या नादात त्या मनाच्या मेमरीत साठवायच्या राहूनच जातात. त्यामुळे कधी कधी क्यामेरा सोबत नसलेलाच बरा.
प्रतिक्रिया
18 Apr 2009 - 10:33 pm | चतुरंग
सहज ओघळावेत तशा थेंबाप्रमाणे ओघळणार्या तुझ्या आठवणींच्या मागोव्याने मनात घर केलं! :)
(पुढच्या वेळी कॅमेरा विसरु नकोस म्हणजे ते क्षण काही अंशी तरी घट्ट पकडून ठेवल्याचे समाधान मिळेल तुलाही आणि आम्हालाही)
चतुरंग
18 Apr 2009 - 10:52 pm | प्राजु
अलंकारिक शब्दयोजना.
मस्त लिहिलं आहेस. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Apr 2009 - 10:55 pm | शितल
यशो,
सहज, सुंदर लिहिले आहेस..
मनाला खुप खुप भावले.:)
19 Apr 2009 - 5:03 am | संदीप चित्रे
तुझी चांगली पोस्ट वाचायला मिळाली
(च्यायला ! 'तुझी चांगली' पोस्ट म्हणजे द्विरूक्ती झाली नाही का? !!)
तुझा अनुभव खूप आवडला. मलाही अशी देवाला देवपण देणारी देवळं(च) आवडतात.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
19 Apr 2009 - 5:55 am | क्रान्ति
खूप सुन्दर लिहिलंय. फोटो नसले तरी वर्णन वाचून सगळी दृश्यं डोळ्यांपुढे आली. मस्त!
=D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
19 Apr 2009 - 7:38 am | चकली
सहज शैलीतले सुंदर लेखन
चकली
http://chakali.blogspot.com
19 Apr 2009 - 7:55 am | यशोधरा
चतुरंगजी, प्राजू, शीतल, संदीप, क्रांती आणि चकली तुम्हां सार्यांचे धन्यवाद.
वाचणार्यांचेही आभार.
19 Apr 2009 - 9:45 am | अवलिया
मस्त ! सुंदर लेखन !!
--अवलिया
19 Apr 2009 - 10:05 am | प्राची
खूप छान लिहिता तुम्ही.सुंदर लेखन. :)
19 Apr 2009 - 11:13 am | श्रावण मोडक
लेखनाला लाघवी म्हणता येईल की नाही ठाऊक नाही. पण हे तसं लेखन आहे.
फक्त त्याक्षणी माझ्याकडे कॅमेरा नसल्याचं मला खूप खूप वाईट मात्र वाटलं. अर्थात, असता तरी ते सौंदर्य जसंच्या तसं, मला पकडता आलं असतं की नाही, कोणास ठाऊक.
गरज नाही. असे चित्रदर्शी लिहिता येत असेल तर कॅमेराची गरज नाही. फोटोनाही कॅप्शन द्यावी लागत असते अनेकदा.
20 Apr 2009 - 5:32 pm | धमाल मुलगा
मोडकसाहेबांच्या शब्दाशब्दाशी पुर्ण सहमत!
मस्त लिहिलं आहेस यशो.
एक सांगू? काही वेळा ना, कॅमेरा सोबत नसतो तेच बरं असतं. मनात उमटलेलं ते चित्र कॅमेरा तितक्याच ताकदीनं कागदावर नाही उतरवू शकत. मग उगाचच आपण खट्टू होतो.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
22 Apr 2009 - 5:01 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
19 Apr 2009 - 11:45 am | स्वाती दिनेश
यशो,
खूप दिवसांनी लिहिलंस, पण खूप सुंदर ,मोडक म्हणतात तसं चित्रदर्शी लिहिलं आहेस, आवडलं.
स्वाती
19 Apr 2009 - 10:30 pm | दशानन
19 Apr 2009 - 12:42 pm | टारझन
आवड्या !!! झकास ! विषेश करून हे ---->
19 Apr 2009 - 4:01 pm | मृदुला
उत्तम लेखन. बंगारू देवळाच्या सहलीचे वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करणारे. आणि शेवट खूप भिडणारा.
19 Apr 2009 - 4:09 pm | भडकमकर मास्तर
छान लेखन :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Apr 2009 - 4:10 pm | अभिज्ञ
हेच म्हणतो.
अतिशय छान लिहिले आहेस.
अभिनंदन.
अभिज्ञ.
19 Apr 2009 - 5:35 pm | रेवती
अगदी सुंदर शब्द.
शांत वाटलं वाचून.
रेवती
19 Apr 2009 - 10:36 pm | यशोधरा
अवलियाजी, प्राची, मोडकसाहेब, स्वातीताई, राजे, टारझन, मृदुला, मास्तर, अभिज्ञ, रेवती खूप आभार. :)
रेवती, खरच खूप शांत आहे गं तो परिसर, शांतता वेढते आपल्याला तिथे गेल्यावर.
20 Apr 2009 - 5:49 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय अतिशय अतिशय सुंदर. एकदम ए१ आहे हे लिखाण. यशोताई.... भरपूर लिहित जा गं. असं कधी मधीच काय लिहितेस? शब्दकळा खूपच छान अवगत आहे तुला.
बिपिन कार्यकर्ते
20 Apr 2009 - 8:56 pm | यशोधरा
धमालशेट, बिपिनदा धन्यवाद. :)
सुचलं की लिहिते की बिपिनदा....
20 Apr 2009 - 9:49 pm | नंदन
लेख, अतिशय आवडला. शेवटचा परिच्छेद तर खास करूनच. मर्ढेकरांच्या 'असे काहीसे होईल अशी होती फार आशा; असे काहीसे झालेले पाहतांच थिजे भाषा' या ओळी आठवल्या.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Apr 2009 - 4:22 pm | यशोधरा
नंदन, थ्यांक्यू :)
22 Apr 2009 - 4:42 pm | घाटावरचे भट
मस्तच लिवलंय!!! मला काय वरच्यासारखे भारी भारी प्रतिसाद लिहिता येत नाहीत. पण वाचून खूप मस्त वाटलं. आणि क्यामेराचं म्हणाल तर क्यामेरा असला तर आपण सगळा आसमंत त्याच्या चौकटीत बंदिस्त करायला बघतो, आणि मग मेमरी कार्डावर फ्रेम्स साठवायच्या नादात त्या मनाच्या मेमरीत साठवायच्या राहूनच जातात. त्यामुळे कधी कधी क्यामेरा सोबत नसलेलाच बरा.
बघा...आणि म्हणे आम्ही कुजकट...
22 Apr 2009 - 6:50 pm | यशोधरा
>>बघा...आणि म्हणे आम्ही कुजकट...
खी, खी... :)
22 Apr 2009 - 4:45 pm | शिप्रा
खरेच खुप छान लिहिले आहेस..