खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे
खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१||
मनात कटूता असूनी वाहवा करती
हसूनी खोटे वार करती पाठीवरती ||२||
तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई
पाठ वळता निंदा करण्याची करती घाई ||३||
स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी
कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी ||४||
खोटे चेहरे वागवीत खोटे जीवन का जगावे?
मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे ||५||
- पाषाणभेद
२१/०९/२०२१
प्रतिक्रिया
21 Sep 2021 - 9:28 am | गॉडजिला
मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे
संपूर्ण जग जिथं मुखवटा पांघरून जगते तिथे खरा चेहरा ठेऊन वागायला सुरुवात केली तर तुम्हाला वेड लागलं आहे असे ठरवायला देखील जग हटणार नाही...
त्यापेक्षा आपल्यातील केमिकल लोच्या लोकांपासुन लपवून मी फलाना फलाना मानसशास्त्रातील पुस्तकात ढीमका अमुक तमुक गोष्ट सांगतो अशा पुड्या सोडत जगा अनेक लोक नुसती वाहवाच करतील असे न्हवे तर तुमच्याकडे राहूनही जातील.
21 Sep 2021 - 9:32 am | श्रीरंग_जोशी
__/\__.