अस्वल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
20 Apr 2009 - 7:04 am

का रागावलात हो बाबा माझ्यावर.
मला न सांगताच निघुन घेलात.
तीन दिवसांसाठी आजीकडे गेले, परत आले तेंव्हा दिसलाच नाहीत.
फोन पण करत नाहीत तुम्ही.
आधी कसे कॉलेजमधे पोचताच फोन करायचात.
तुमचा फोन आल्याशिवाय मी शाळेत जायची नाही.
'ठकु' म्हणायचात तुम्ही मला.
मला ते खुप आवडायचे.
बाबा, मी सध्या कुणाशी जास्त बोलत नाही. आईशी सुद्धा नाही.
आधी किती बड्बड करायची मी.
ती पण किती बदलली आहे.
तुम्ही असताना कुठे लिपस्टीक लावायची.
आता भडक रंगाच्या लावते.
आधी नेहेमी साडी घालायची.
आत्ता कसले कसले गाउन घालते.
सिनेमातल्या हिरॉइन सारखे
मला नाही आवडत.
शाळेतल्या 'मिस' म्हणतात
ठकु तुझे लक्ष कुठे असते?
काय करु हो बाबा,
सारखे अस्वल डोळ्यासमोर येते.
मला नाही वाटत तुम्ही निगुन गेल्याचे मम्मीला फारसे वाईट वाटले
हो , बाबा आजकाल तीला आई म्हटलेले आवडत नाही.
सगळच काही बदलले आहे हो बाबा, तुम्ही गेल्यावर
आधी तुम्ही दोघे मला जवळ घेउन झोपायचा.
एक हात तुमच्यावर एक आईवर.
आता मात्र वेगळ्या खोलीत.
हो, आता घर पण बदलले आहे आईने.
१४ व्या माळ्यावर आहे हे घर.
मला भिती वाटते हो.
सारखे पडेन की काय ची.
आधीचे बैठे
घर किती छान होते.
रात्री एकटे झोपताना तुमची खुपच आठवण येते हो बाबा.
मग हळुच दप्तरातला तुमचा फोटो काढते.
रात्री पहिल्या सारखी झोपत नाही मी.
खुप वेळा दचकुन उठते.
परत अस्वल डोळ्या समोर नाचायला लागते.
शाळेत झोप येते.
मिस एकदा रागावल्या.
मग त्यांना अस्वलाबद्दल सांगितले.
लगेच जवळ घेतले त्यांनी मला.
कुरवाळले. डोक्यावरुन कितीतरी वेळ हात फिरवत होत्या.
डोळ्यात पाणी होते.
आधी आई घ्यायची ना तसे.
आता माझा १ ला नंबर येत नाही.
लक्षच लागत नाही अभ्यासात
कानात अस्वलाचे हसणे घुमत असते सारखे.
'आताशा कुठे जगायला सुरु केले आहे' म्हणजे काय हो बाबा?
आजीला म्हणत होती आई फोनवर
तुम्ही किती शांत होतात.
इंग्लीश चे प्रोफेसर असुन सुद्धा माझ्याशी मराठीत बोलायचात.
म्हणायचात, 'शाळेतले पुरे'
मातृभाषेशी नाते तोडायचे नाही.
मग तुम्ही आपल्या ठकुशी का नाते तोडलेत हो.
तुम्ही घरी आल्यावर हातपाय धुउन देवाची आराधना करायचात.
ह्या घरात देव्हारा नाही आहे हो बाबा.
त्या मुळे शाळेत जाताना देवाला पाया पडायचा प्रश्नच राहीला नाही.
दर शनिवारी पार्टी असते ह्या घरात
माझी रवानगी खोलीत.
बाहेरुन बंद
एकदा चुकुनु उघडा राहीला दरवाजा.
मी बाहेर आले.
सगळे जण खिदळत होते.
घाणेरडा सिनेमा बघत होते.
ड्रीक घेत होते.
चहाटळ पणा करत होते.
मी बाहेर आले म्हणुन अस्वलाला राग आला.
खसकन हाताला धरुन परत खोलीत बंद केले.
अजुनही हात दुखतो हो बाबा.
बहुतेक माझी हकालपट्टी आजी कडे होणार असे दिसते.
बरे, होईल.
निदान अस्वलापासुन माझी सुटका होईल.
मला सहनच होत नाही त्याचा वास
रोज नवीन सेंट लावतो तो.
पुरुष कधी एवढी पावडर लावतात का?
किती सिग्रेटी ओढतो.
मला श्वासच लागतो.

आ़जी कडे गेल्यावर तुम्ही मला भेटायला याल का हो बाबा?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

20 Apr 2009 - 7:09 am | प्राजु

आता काय रात्री झोप येणार आहे.. हे इतकं जीवघेणं वाचल्यावर!!!
मास्तर, काळीज फाडलंत!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

20 Apr 2009 - 7:11 am | दशानन

:(

ह्यांना आवरा कुणी तरी आता.... सकाळ सकाळी जिवघेणं वाचायला देत आहेत.

विनायक प्रभू's picture

20 Apr 2009 - 9:42 am | विनायक प्रभू

ठीक आहे. शक्यतो टाळीन असले लेखन.

दशानन's picture

20 Apr 2009 - 9:45 am | दशानन

टाळा म्हणत नाही आहे, पण जरा वाचकांना उसंत तरी घेऊ द्या, आधी तुमचा त्या मुलीचा लेख वाचून डोकं गरगरलयं त्यात परत ही लहान मुलगी, माय गॉड.

निखिल देशपांडे's picture

20 Apr 2009 - 9:45 am | निखिल देशपांडे

काय काय वाचायला लावता हो मास्तर!!!!
दिवस खराब जाणार बहुतेक आजचा....

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

सालोमालो's picture

20 Apr 2009 - 10:22 am | सालोमालो

आधीच आजकाल stress खूप जास्त आहे. त्यात असं वाचलं की वेडं व्हायला होतं. तुमचं हे लिखाण कुणाच्याही डोळ्यातून पाणी काढण्याइतकं प्रखर आहे. याला स्तुती समजा. पण पुन्हा असं लिखाण मिपा वर टकू नका. भेटल्यावर वाचून दाखवा. एकत्र रडण्याचे खूप फायदे असतात. किमान कोणीतरी कंबर कसतं आणि रडणार्‍याला सावरतं. positive energy pass करतं. एकत्र रडूयात पण यावर काहीतरी मार्ग काढूयात.

कित्येक घरात अशा 'ठकू' असतील. त्यांचा विचार जीव घेतो.

सालो

मदनबाण's picture

20 Apr 2009 - 3:20 pm | मदनबाण

काय मास्तर काय चाललयं काय ???
आधी मारुती,,,
आत्त्त अस्वल !!!
मग पुढे काय ?

(झिंगा लाला हुल हुल)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Apr 2009 - 10:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बर्ट्रांड रसलचं एक वाक्य आठवलं, "नवरा-बायको विभक्त होणं सोपं असतं पण आई-वडीलांनी शक्यतोवर विभक्त होऊ नये."

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

अवलिया's picture

20 Apr 2009 - 10:33 am | अवलिया

सहमत.
अदितीच्या प्रतिसादाशी शब्दशः सहमत

--अवलिया

विनायक प्रभू's picture

20 Apr 2009 - 11:00 am | विनायक प्रभू

अगदी बरोब्बर बोल्लात हो.

निखिल देशपांडे's picture

20 Apr 2009 - 11:09 am | निखिल देशपांडे

ह्या वाक्यशी पुर्ण सहमत......

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2009 - 10:54 am | परिकथेतील राजकुमार

असेच म्हणतो.
एकदम नेमक्या वाक्यात प्रतिसाद दिला आहे अदितीने.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाटावरचे भट's picture

20 Apr 2009 - 11:00 am | घाटावरचे भट

छान!

स्वाती दिनेश's picture

20 Apr 2009 - 11:23 am | स्वाती दिनेश

वाचून त्रास झाला. अदितीने उध्दृत केलेले रसेलचे वाक्य अगदी १००% बरोबर, हे प्रकटन वाचल्यावर तर ते आणखीनच पटते आहे.
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2009 - 3:14 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर वाचून वाईट वाटतंच!!!

बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तर's picture

20 Apr 2009 - 3:25 pm | भडकमकर मास्तर

आहे का नाही त्रास !!!. ..
आता पुन्हा उतारा म्हणून गोड गोष्टी शोधणं आलं,
जे न देखे रवि वाचणं आलं,
... ~X(

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/