नमस्कार मिपाकर.
आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत.
तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल. चॅनेल व रेसिपी आवडल्यास सगळ्यांनी जरुर आमच्या चविष्ट चॅनेलला सब्सक्राईब करा तसेच येणा-या नविन रेसिपींवरही लाईक, कमेंट करा व आपल्या इतर मित्र परीवार, कुटुंबातील व्यक्तिंनाही शेयर करा. खाली आत्ता पर्यंत केलेल्या रेसिपीजच्या लिंक देत आहे.
चविष्ट - https://youtube.com/channel/UCZUKXjMnkZaGDrLSFRU3naQ
मटार पॅटीस - https://youtu.be/OLv5iyQwX68
आंब्याची कढी - https://youtu.be/aFv7F4aA_RE
Blue lagoon mojito - https://youtube.com/shorts/JuxoKbYEa0c?feature=share
रानभाजी कुर्डू - https://youtu.be/u5iXgtqu_9०
व्हेज स्प्रिंग रोल - https://youtu.be/B8pFLgXcNl4
बोंबिल फ्राय - https://youtu.be/MNaQIABvkSY
रानभाजी - कुलू/फोडशी - https://youtu.be/TT2Xr9tERoo
कांदा भजी - https://youtu.be/eeGljj7MjgE
सेजवान पोटॅटो - https://youtu.be/MIjqz2KKufk
शेवळाची आमटी - https://youtu.be/mdmiKhKSkQA
करंदी - https://youtu.be/afzyEvjHIQg
जवळा - https://youtu.be/5y6wea39eeY
प्रतिक्रिया
9 Jul 2021 - 2:38 pm | गुल्लू दादा
Subscribe केले, जे आवडले ते like सुद्धा करू हळूहळू. चॅनेल चे नाव मराठी मध्ये का नाही ठेवले. नवीन नवीन पदार्थ नियमित टाकत जा आम्ही आहोतच बघायला आणि घरी try करायला. धन्यवाद.
9 Jul 2021 - 4:45 pm | प्रसाद गोडबोले
Subscribe करण्यात आलेले आहे!
9 Jul 2021 - 5:40 pm | मदनबाण
शुभेच्छा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama
9 Jul 2021 - 5:41 pm | विजुभाऊ
तुमच्या रेसिपी भारीच असतात जागुतै
9 Jul 2021 - 5:58 pm | चौथा कोनाडा
झकास आहे हा चॅनेल !
😋
नांव पण आवडलं, चविष्टच आहे !
आता स्टार्ट कांदाभजी करून पाहणार मी !
9 Jul 2021 - 8:04 pm | जागु
गुल्लू दादा, मार्कस, मदनबाण, विजूभाऊ, छौथा कोनाडा. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
10 Jul 2021 - 8:59 pm | चौथा कोनाडा
जागु तै,
माझ्या नांवाचा "छौथा" करण्याच्या आपल्या क्रियेटीव्हिटीचे कौतुक आहे !
😂
कृ ह घे
हा .... हा .... हा ...
10 Jul 2021 - 9:26 pm | जागु
साॅरी हा. मी गडबडीत पाहिलच नाही. तुम्हीही हलके घ्या. :))
9 Jul 2021 - 8:33 pm | गुल्लू दादा
आम्ही शिकाऊ मुलं सोबत राहतो. आमच्याकडे एक भांडे, एक चमचा मोठा आणि एक प्लेट आहे त्यावर झाकायची. बाकीचे मसाले आणि गरजेचे सामान आहे. तेव्हा कमीत कमी समान टाकून होणाऱ्या रेसिपीज तुमच्या चॅनेलवर स्वतंत्र playlist बनवावी. तुफान गाजेल ती. यावर नक्की विचार करा. आता रविवार येतोय जवळ शक्य असल्यास चिकनची रेसिपी टाका लवकर. या रविवारी माझा नं. आहे बनवायचा.
9 Jul 2021 - 10:03 pm | जागु
नक्की प्रयत्न करु आम्ही. खुप छान चॅलेंजींग आहे हे. धन्यवाद.
9 Jul 2021 - 10:18 pm | शेखर
सबस्क्राईब केले आहे... शुभेच्छा
10 Jul 2021 - 8:24 pm | जागु
धन्यवाद.
10 Jul 2021 - 12:25 am | सुक्या
जागुतै . . . ते तुमचे नाव "अन्नपुर्णा" ठेवता आले तर पहा :-)
तुमचे धागे पाहिले की साक्षात अन्नपुर्णा येते समोर .. _/\_
10 Jul 2021 - 10:49 am | जागु
पहिला इतकी मोठी काॅम्ल्पिमेंट दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ज्या रेसिपी मला येतात त्या मी सादर करत गेलेय बाकी विशेष काही नाही त्यात. आणि यापुढेही सादर करेन. थांबले यासाठी होते की मी आधी पिकासा वरुन फोटो अपलोड करायचे. पिकासा बंद झाला आणि माझे फोटोला अाधारीत सगळे लेखन इथे थांबले. जर इथे फोटो अपलोड करण्याचा दुसरा सोपा मार्ग असेल पिकासा सारखा तर प्लिज मला सांगा.
नाव आता नाही बदलता येणार कारण अन्नपूर्णा नावाने दुसरे यू ट्युब चॅनेल आहेत.
11 Jul 2021 - 11:33 am | सुक्या
खाली नावातकायआहे यांनी लिंक दिलीच आहे. मी स्वतः गुगल फोटो वापरुन ते अपलोड करतो.
एकदा / दोनदा केले की जमुन जाईल.
तुमच्या रेसेपी टाकत जा ... थांबु नका ...
11 Jul 2021 - 6:52 pm | जागु
नक्कीच. प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद.
10 Jul 2021 - 12:44 pm | नावातकायआहे
https://www.misalpav.com/node/48991
10 Jul 2021 - 8:25 pm | जागु
हे मला खुप उपयोगी पडेल. धन्यवाद.
10 Jul 2021 - 8:32 pm | नावातकायआहे
कंजूस साहेबांचे आभार! मी फक्त लिंक डकवली.
10 Jul 2021 - 9:26 pm | जागु
हो त्यांनाही धन्यवाद.
10 Jul 2021 - 3:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन आणि शुभेच्छा...! आपल्या मिपावरील रेशीप्या एकापेक्षा एक आणि भन्नाटच आहे, कायम सरस राहील्या आहेत. मिपाच्या आजच्या पिढीला किती माहिती आहे ते माहिती नाही. पणआपल्या रेशीप्यांचा एक अपना खुद का मिजाज है, अपना एक नाम है. आपल्या रेशीप्या पाहिल्या की आम्ही वाचक हळवे होतो. मिपावर आपलं आजही तेच अढळ स्थान आहे, चंद्राचं, शुक्रता-याचं एक स्थान आहे, तसंच आपलं मिपावर कायम एक अढळ स्थान आहे......!
मिपाला आपण कायम समृद्ध केलं आहे, तेव्हा दोन तीन वेगवेगळ्या मेल आयडींनी आपलं युट्यूब चायनल सब्स्क्राइब करीन. अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा. :)
-दिलीप बिरुटे
10 Jul 2021 - 8:29 pm | जागु
डाॅ. दिलिप तुमच्या प्रतिसादाला उत्तर द्यायल शब्द नाहीत. खुप खुप धन्यवाद. मिपाकरांनी प्रोत्साहन दिल्यामुळे हे सगळे लेखन घडले. मिसळपावलाही खुप खुपधन्यवाद.
10 Jul 2021 - 11:41 pm | गुल्लू दादा
जागु यांनी तात्काळ मला काही रेसिपीज व्यनि केल्याने त्यांचे जाहीर आभार. कदाचीत मी त्यांचे काम वाढवले असेल पण चलता है बॉस. धन्यवाद.
11 Jul 2021 - 6:51 pm | जागु
पण तुमचे सजेशनही छानच आहे. धन्यवाद.
11 Jul 2021 - 12:47 pm | टर्मीनेटर
मनःपूर्वक शुभेच्छा...
चविष्ट युट्युब चॅनलला नक्कीच भेट देणार आहे. तुमच्या मिपावरील पाककृती बघितल्या आणि आवडलेल्या असल्याने चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करणे ओघाने आलेच 👍
11 Jul 2021 - 6:49 pm | जागु
मनापासून धन्यवाद.
11 Jul 2021 - 6:53 pm | जागु
नविन रेसिपी टाकली आहे.
https://youtu.be/e4t_Z4N0lhw
12 Jul 2021 - 11:08 am | नंदन
चॅनलला सब्स्क्राईब केलं आहे; पारंपरिक पाककृतींना प्राधान्य मिळालेलं पाहून बरं वाटलं.
मिपावर व अन्यत्र आलेल्या जागुतैंच्या पाककृतींप्रमाणेच चॅनलवरीलही आगामी पाकृही उत्तम असणार यात शंकाच नाही - अशाच नवनवीन पाकृंच्या प्रतीक्षेत!
13 Jul 2021 - 11:07 pm | जागु
धन्यवाद नंदन.
13 Jul 2021 - 11:07 pm | जागु
13 Jul 2021 - 11:07 pm | जागु
13 Jul 2021 - 11:08 pm | जागु
13 Jul 2021 - 11:08 pm | जागु
14 Jul 2021 - 6:44 am | वामन देशमुख
सबस्क्राइब्, लाइक्, शेअर्, कॉमेंट् केले आहे.
पाकृ सादरीकरण आवडले.
एक जनरल् सल्ला - शक्यतो विडिऔ दोन-तीन मिनिटांचाच करावा, खूप मोठा नको.
14 Jul 2021 - 1:03 pm | प्रसाद गोडबोले
छोट्या व्हिडीओज ना युट्युब आणि गूगल अॅड्सेन्स च्या मोनोटायझेशन चा फायदा घेता येत नाही. व्हिडीओ किमान १० मिनिटांचा असेल तरच त्यावर जाहीराती दाखवल्या जातात अन त्या मार्गे क्रियेटर्स ना उत्पन्नाचा सोर्स निर्माण होऊ शकतो.
अर्थात हे केवळ माझ्या ऐकीव माहीतीवरुन लिहिले आहे. मिपावर कोणी सक्रिय युट्युबर असल्याने सोशल मिडीया मोनोटायझेशन वर स्वतंत्र पणे लिहावे ही नम्र विनंती.
14 Jul 2021 - 10:01 pm | गॉडजिला
तरीच बरेच युट्यूबर्स पाल्हाळ लावूंन माहिती देत असतात... प्रत्यक्ष माहिती मोठी आहे म्हणून जास्त लांबीचा व्हिडीओ बनला असे फार क्वचित होते
14 Jul 2021 - 2:16 pm | जागु
ओह. वर माझ्याच पोस्ट तीनदा पडल्यात हे आत्ता पाहिल.
वामन युट्युब पहाणारे काही जणांना छोटे व्हिडिओ आवडतात तर काहिंना अगदी डिटेल माहिती असणारे मोठे. आम्ही दोघांधला
14 Jul 2021 - 2:18 pm | जागु
दोघांमधला समन्वय साधण्याचा प्रयत्न करतोय.
धन्यवाद.
मार्कस सध्या तरी हौसेखातर चालू केला आहे चॅनेल. बाकी नियम वगरे अजून अभ्यासायचे आहेत. पण कोणी माहीती दिली तर नक्की उपयोग होईल त्याचा.
17 Jul 2021 - 1:02 am | जागु
दोन नविन रेसपी टाकल्या आहेत.
अळूचे फतफते - https://youtu.be/alw-YwQxFAA
आगरी पद्धतीचे मटण - https://youtu.be/4fo1cQz6Woc
17 Jul 2021 - 10:51 am | सुमो
मिपावर आणि इतरत्र तुमच्या रेसिपीज वाचल्या आहेत. मत्स्याहारी चाळीस एक रेसिपीजची मालिका केवळ अप्रतिम आहे. अलिकडे तुमचे लेखन कमी झालंय.पण नवीन प्रांतात पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
चॅनल सबस्क्राईब केलंय हे.वे.सां.न.ल
17 Jul 2021 - 6:27 pm | जागु
धन्यवाद सुमो. नविन लेखनही येईल लवकरच आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळे.