पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?
मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या
पण सरकारी लोक काय करत असतील ?
पगार तर चालूच असणार
सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ?
पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी
शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ?
रेल्वे बर्र्याच बंद झाल्या होत्या ते लोक घरीच पगार असतील का
बस सेवा बर्यापैंस्की बंद
जमीन खरीदी विक्री तर झोपला असेल
आयकर वाले ED सोडून कोण रेड मारणार ?
पोस्ट पण २ तास चालू होते ,कोरोना मध्ये पार्सल कोण पाठवणार वेळ काढून
हे लोक घरी बसून फाइलस कशा हलवत असतील कारण सगळी खाती ऑनलाईन नसणार
आणि सगळ्यानं पूर्ण पगार मिळतो का ?
प्रतिक्रिया
5 Jul 2021 - 5:32 pm | Rajesh188
हा सर्वात देशाच्या तिजोरीवर असलेला सर्वात मोठा आर्थिक बोजा आहे.रिटर्न काही मिळत नाही फक्त खर्च.
5 Jul 2021 - 5:41 pm | गॉडजिला
यासाठी एखाद्या काकांनी मिपावर पुढाकार घ्यायला हवा असं मनापासून वाटते बाकीच्यांना ते जमणारे काम न्हवे
5 Jul 2021 - 6:01 pm | श्रीगुरुजी
टाळेबंदीपूर्वी सरकारी कर्मचारी जे करीत होते, तेच टाळेबंदीच्या काळात ही सुरू आहे व टाळेबंदीपश्चात तेच सुरू राहील.
5 Jul 2021 - 6:10 pm | धर्मराजमुटके
जास्त पगार आणि कमी काम करणार्यांना सरकारने लोकलची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे (अपवाद क्षमस्व) त्याऐवजी ती गरीबांना दिली असती तर सरकारी कर्मचारी आणि गरीब दोघांनी सरकारला दुवा दिला असता पण बहुतेक सरकार को दुआ की नही दवा की जरुरत होगी !
6 Jul 2021 - 12:50 pm | चौथा कोनाडा
दुष्काळात १३ वा महिना !
(आधीच गलथान अन त्यात लॉकडाऊन)
माकडाच्या हातात कोलीत !
6 Jul 2021 - 3:22 pm | मराठी_माणूस
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ही म्हण जास्त समर्पक वाटते.
6 Jul 2021 - 5:37 pm | चौथा कोनाडा
!!
+१, सही !
12 Jul 2021 - 12:30 am | कासव
३ महिन्या पूर्वी जुनी चारचाकी घेतली होती. आरटीओ ट्रान्स्फर चे कागद लगेच जमा केले होते. गेले ३ महिने काहीही झाले नाही. सगळे आरटीओ वाले हफ्ता वसुली साठी गेले की काय?
बाकी डिपार्टमेंट चे देव जाणे