मधाळलेल्या कुण्या मिठीची
चव लाघवी पीठीसाखरी,
झळा भोवती वैशाखी तरी
गोड सावली आम्र पाखरी.
एकच पुरतो कटाक्ष तिरका
नजर अशी की तिख्खी मिर्ची,
पेटवते मग रंध्रांध्रातून
अन्वर ज्वाला आसक्तीची.
दातांचा तो चिमणी चावा
करकरीत जणु कैरी कच्ची,
शिरशिर अंगी हवीहवीशी
कशी लपावी नाजूक नक्षी?
स्पर्श असा की शामक अमला
तनामनाचा दाह उतारी,
कषाय जणू तो प्याल्यामधला
क्षणात देतो कशी उभारी.
खट्ट्या मिठ्ठ्या श्वासांमध्ये
शब्द बिचारे हरवून जाती.
नमकीन काही घडून जाते
अर्थ उगाचच शोधत बसती..
प्रतिक्रिया
14 May 2021 - 3:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
अवडलीच,
पैजारबुवा,
14 May 2021 - 3:24 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद!
14 May 2021 - 3:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता लैच आवडली. लिहिते राहा.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
14 May 2021 - 3:38 pm | Bhakti
मस्तच!
14 May 2021 - 3:40 pm | प्रचेतस
क्या बात है..!
एक नंबर.
14 May 2021 - 5:33 pm | प्राची अश्विनी
बिरुटे सर, भक्ती आणि प्रचेतस, धन्यवाद!
15 May 2021 - 1:59 pm | प्रज्ञादीप
खुप छान शब्दवैभव
15 May 2021 - 2:17 pm | चांदणे संदीप
अजून एक शृंगारिक रचना आवडली. पण "सैल असावी मिठी" चा खुमार काही और होता.
सं - दी - प
17 May 2021 - 9:58 am | प्राची अश्विनी
:)
15 May 2021 - 3:03 pm | तुषार काळभोर
एक लंबर लिव्हलंय!
15 May 2021 - 8:28 pm | टवाळ कार्टा
बाब्बो....भारी
15 May 2021 - 9:30 pm | स्वलिखित
आवडली
17 May 2021 - 9:57 am | प्राची अश्विनी
धन्यवाद सगळ्यांना.
18 May 2021 - 6:43 pm | खिलजि
मस्तच तै ..