शाण्णवशुन्य अंकसंख्या परिमाण (मुळ पानाचे छायाचित्र टाकले आहे)

मिलिंद's picture
मिलिंद in जनातलं, मनातलं
10 Apr 2009 - 10:07 am

खालील संख्या तुम्हाला मोजता येईल? आणी हो १००० कोटी (एक हजार कोटी) असं वापरायचं नाही तर एकच परिमाण वापरुन मोजा.

१०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,०००

मी सांगू का? वरील संख्या आहे - दशअनंत.

तुम्ही म्हणाल मला कशी कळली?

मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की कोटी पर्यंत मोजल्यानंतर पुढे किती पर्यंत मोजता येईल? याचे उत्तर कित्येकजण खर्व, निखर्व, अमाप अशी नांवे सांगायचे. पण यांची स्थिती (म्हणजे एकं, दहं प्रमाणे) विचारल्यास मात्र ती कोणालाही सांगता यायची नाही. पुराणातल्या किंवा इतिहासातल्या कथांमध्ये "त्याच्याकडे अपार संपत्ती होती" असे उल्लेख वाचलेले आठवतात. पण अशा जर मोजदाद पुर्वी करता यायची तर त्यांची स्थानासहीत पुर्ण माहिती कुठेच का सापडत नाही ही उत्सुकता संपत नव्हती. असाच एकदा गावात फिरत असताना एक कागद रस्त्यावर सापडला आणी त्यात ही सर्व माहिती सापडली. ती तुमच्या करीता या ब्लॉगच्या माध्यमातून आणली आहे.

प्रचलित इंग्रजी किंवा मराठी (की देवनागरी) पध्दतीनुसार अब्ज या संख्येपेक्षा जास्त मोजदाद करणारे एकक हवे असेल तर ते जोडून वापरावे लागते, म्हणजे ४००० कोटी (चार हजार कोटी) आणी इंग्रजीत मिलियन, बिलियन आहेतच की. पण जर अशी दोन किंवा जास्त एकके न जोडता मोजता येऊ शकणाऱ्या संपुर्ण एककांची यादी खाली आहे. ती काळजीपुर्वक नजरेखालून घाला. यातील काही एकके आपल्या कानांवरुन पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा यातून गेली असतील. पण त्यात काही तथ्यांश आहे असे मानले तर आपल्या पुर्वजांकडे नुसतीच संपत्ती नव्हती तर ती मोजता येऊ शकेल किंवा त्याची मोजदाद करता येउ शकेल अशी मोजणीची पध्दती व एककेही होती. हा वारसा जपायला हवा म्हणून माझा हे छोटा प्रयत्न आहे.

मुळात मी वर म्हटल्याप्रमाणे मला एका छोट्या पुस्तकातील पानावरील ही माहिती आहे. मी ह्या माहितीचे पुस्तक खुप शोधण्याचा प्रयत्न केला. कारण या पुस्तकात अजुनही बरीच रंजक माहिती असावी पण पुस्तकाचे नांव किंवा लेखकाचे नांव किंवा प्रकाशकाचे नांव काहीही मला मिळालेले नाही. कोणास माहिती असल्या अवश्य कळवा.

एकं, दहं, शतं, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अर्व, दशअर्व, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिति, दशक्षिति, क्षोभ, दशक्षोभ, ऋध्दि, दशऋध्दि, सिध्दि, दशसिध्दि, निधि, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रम्हांड, दशब्रम्हांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, बव, दशबव, शंकु, दशशंकु, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भीर, दशभीर, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.

मोजा आणि इतरांनाही सांगा.

page1a

page2

संस्कृतीइतिहाससंदर्भ

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

10 Apr 2009 - 10:22 am | मराठी_माणूस

दुर्मिळ आणि जतन करण्या सारखी माहीती , धन्यवाद

मदनबाण's picture

10 Apr 2009 - 10:24 am | मदनबाण

व्वा.चांगली माहिती.
मी पण मध्यंतरी ब्रंम्हदेवाविषयी असाच शोध घेत होतो (फक्त जालावरच... :) ) तर ही रोचक माहिती सापडली.
http://www.indiaheritage.org/rendez/article1.htm

(जर गणिताने ताळमेळ बसतो, तर खरचं ब्रम्ह देव असेल काय ?)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2009 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दशखर्व पर्यंत मोजता येते....!
बाकीचे माहितीसाठी लिहून ठेवले.

धन्यवाद !

निखिल देशपांडे's picture

10 Apr 2009 - 10:27 am | निखिल देशपांडे

चांगलि माहिती...

पक्या's picture

10 Apr 2009 - 12:17 pm | पक्या

खरोखर छान आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद.
मलाही दशखर्व पर्यंत माहित होते. त्यापुढचे नाही. आता कळाले.
पण लेखाच्या शिर्षकात 'शाण्णव अंकसंख्या' असे का म्हटले आहे?

मिलिंद's picture

10 Apr 2009 - 12:35 pm | मिलिंद

एकं स्थानाच्या पुढे एकुण ९६ स्थाने असल्याने शाण्णव अंकसंख्या परिमाण असे म्हटले आहे

विंजिनेर's picture

10 Apr 2009 - 12:18 pm | विंजिनेर

मिसळ-सागरातील शिंपले भाग-१ :)

--
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

अनिल हटेला's picture

10 Apr 2009 - 12:34 pm | अनिल हटेला

नविणच माहिती माझ्या साठी !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

खरोखर छान आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद.
मलाही दशखर्व पर्यंत माहित होते. त्यापुढचे नाही. आता कळाले.

सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..

जागल्या's picture

10 Apr 2009 - 7:49 pm | जागल्या

मिलींद भाऊ,
खरोखर छान आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद.

जागल्या

देऊ शकाल का? माहिती उत्सुकता वाढवणारी आहे!

चतुरंग

मिलिंद's picture

11 Apr 2009 - 9:53 am | मिलिंद

करुन येथे दिलेले आहे. पान खुप जुने असल्याने जीर्ण झाले आहे. नीट निरखून पाहिल्यास हे एका पुस्तकाचे १९५वावे पान आहे पुस्तक शोधण्याचा फार प्रयत्न केला कारण या पुस्तकात १ ते १०० (अथवा जास्त) असे विषय असावेत.

चतुरंग's picture

12 Apr 2009 - 4:25 pm | चतुरंग

चतुरंग

शानबा५१२'s picture

28 Jun 2010 - 11:16 pm | शानबा५१२

मीपण असेच म्हणतो असे म्हणजे 'धन्य्वाद आणी तसेच ही म्हणतो तसे म्हणजे 'थॅन्क यु'. :) :D =)) :H

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

कोणी तुझ्याकडे किती पैसे आहेत असं विचारलं की मी "घंटा" असं उत्तर द्यायचो.

आता कळालं लोकं त्यावेली विश्चास का नाही ठेवायचे ते..घंटा म्हणजे लई रुपये..:)

जोक्स अपार्ट फार छान माहिती आहे. परिमाणां बरोबरच १० चा कितीवा घात ही माहीती देता येईल का? म्हणजे आमच्या सारख्या "टेकीं" ना पटकन अंदाज येईल.

-एक "घंटा"धीश टेकी.

बेसनलाडू's picture

10 Apr 2009 - 10:18 pm | बेसनलाडू

कोणी तुझ्याकडे किती पैसे आहेत असं विचारलं की मी "घंटा" असं उत्तर द्यायचो.
आता कळालं लोकं त्यावेली विश्चास का नाही ठेवायचे ते..घंटा म्हणजे लई रुपये..

सपशेल आडवा झालोय नि पोट धरधरून हसतोय. एकोजीराव, हा विनोद आजची 'फ्रायडे लेगसी' ठरणार आमच्यासाठी!
'घंटाधीश' टेकी सुद्धा लऽय भारी! चालू द्या.
(विनोदी)बेसनलाडू

मिलिंद's picture

28 Jun 2010 - 8:43 pm | मिलिंद

>>परिमाणां बरोबरच १० चा कितीवा घात ही माहीती देता येईल का? म्हणजे आमच्या सारख्या "टेकीं" ना पटकन अंदाज येईल.

इथे सदर माहिती देत आहे.
http://docs.google.com/Doc?docid=0ARCbLFNTuf5TZGNwZm12emdfMjdkOHY1OW1qMg...

अविनाशकुलकर्णी's picture

11 Apr 2009 - 12:13 pm | अविनाशकुलकर्णी

छान माहिति आहे मग स्वीस खात्यात भारताचे १५०० अरब डालर इतके पैसे आहेत अशी जि माहिति बाहेर आलि होति म्हणजे नेमके किति शुन्य...........व महत्वाचे आपल्या कडे परिमाण संबंधि वैदिक अंकशास्त्र संबंधि माहिति असुनहि आपण अरब हे मुसलमान परिमाण वापरुन आपला निध्र्मी पणा व सर्व ध्रम समभाव पण सिध्ध केला

सँडी's picture

11 Apr 2009 - 4:12 pm | सँडी

खुपच माहीतीपुर्ण.

धन्यवाद.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

नर्मदेत ला गोटा's picture

11 Apr 2009 - 8:46 pm | नर्मदेत ला गोटा

प्राचीन भारताबद्दल अधिक माहिती

http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587&hl=en

मीनल's picture

12 Apr 2009 - 6:18 am | मीनल

मी वाचन खुण म्हणून हा लेख साठवला.
अतिशय उपयुक्त माहिती आहे.
मीनल.

सुनील's picture

28 Jun 2010 - 9:23 pm | सुनील

माहिती रोचक खरी पण व्यवहारोपयोगी नाही. अशा अगडबंब (अथवा अतिसूक्ष्म) संख्यांसाठी एक्स्पोनेन्शियल फॉर्मॅटच बरे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नाटक्या's picture

28 Jun 2010 - 10:22 pm | नाटक्या

माहिती रोचक खरी पण व्यवहारोपयोगी नाही. अशा अगडबंब (अथवा अतिसूक्ष्म) संख्यांसाठी एक्स्पोनेन्शियल फॉर्मॅटच बरे!

मला वाटते हे अर्धसत्य आहे, एक्स्पोनेन्शियल फॉर्मॅट उपयुक्त आहे. परंतू बर्‍याचश्या ठिकाणी फिक्स्ड फॉर्मॅट वापरला जातो. अधीक माहिती साठी:
http://en.wikipedia.org/wiki/Fixed-point_arithmetic वाचा.

किंवा Fixed Point arithmetic असे गुगलून बघा बरीच माहिती मिळेल...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

राजेश घासकडवी's picture

28 Jun 2010 - 10:12 pm | राजेश घासकडवी

घंटा, दशघंटा प्रमाणेच
फार, दशफार;
बाप, दशबाप;
गोल, दशगोल;

हेही आवडले...

पुरातन युरोपिअन मोजणीप्रमाणे एकावर शहाण्णव शून्याला सेक्सडेसिलिअन म्हणतात. इथे पहा.

मराठे's picture

28 Jun 2010 - 10:02 pm | मराठे

अब्ज च्या ऐवजी अर्व ह नविन शब्द समजला. पूर्वि कोटी नंतर अब्ज असायचा. (हिन्दिमधे अरब)

विसोबा खेचर's picture

28 Jun 2010 - 10:06 pm | विसोबा खेचर

....ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा...

हम्म..

म्हणजे तूर्तास माझ्याकडे १ घंटा पैसे आहेत.. किंवा सध्या माझ्याकडे घंटा पैसे आहेत असं म्हणायला हरकत नाही.. =))

टारझन's picture

28 Jun 2010 - 10:49 pm | टारझन

=)) =)) आणि माझ्याकडे बुरुज मोडुन दशघंटा उरलीये :)

-(दशघंटापती) टारझन

स्वप्निल..'s picture

28 Jun 2010 - 10:14 pm | स्वप्निल..

मला आजच हे मेल फॉरवर्ड मध्ये मिळाले .. अर्थातच नावाशिवाय!! फक्त लेख कॉपी -पेस्ट

सहज's picture

29 Jun 2010 - 9:19 am | सहज

गंमत.

Manoj Katwe's picture

29 Jun 2010 - 10:25 am | Manoj Katwe

मिसळ पाव मध्ये उपयुक्त आणि चांगली माहिती बर्यान्चदा असते. आणि सगळेच काही मिसळ पाव चे सदस्य नाही. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल तर करीत असतील असा copy - paste प्रकार. मला सुद्धा किती तरी माहिती मेल मधून काही दिवसांनी मिळते.
फक्त माहिती देताना मिसळपाव वरील जर दुवा देता आला तर बर होईल.

ramjya's picture

29 Jun 2010 - 10:51 am | ramjya

चांगलि माहिती...

पाषाणभेद's picture

29 Jun 2010 - 11:03 am | पाषाणभेद

छान लेख. खुपच नविन माहिती मिळाली. पुढील काळात आईबाप नव्या पद्धतीचे मुलाचे नाव म्हणून हि नावेही ठेवतील.

एक उत्सूकता आहे. हा कागद कसा मिळाला? एखाद्या भेळवाल्याकडे? की कोठे? जरा डिटेल्स द्या ना.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

हे पान मी ६-७वीत असताना चणेवाल्याकडून चणे घेताना त्या सोबतच्या कागदांमध्ये सापडले. त्यावेळी या पानाचे महत्व माहित नव्हते. वडीलांना दाखविल्यावर त्यांनी मला कोणता माहितीचा खजिना सापडलाय याची जाणीव करुन दिली, पण वडीलांनी मला हे पान नीट सांभाळून ठेवायला सांगितले. त्यानंतर बरेच वर्षांनी हे पान जुने संग्रहण धुंडाळताना सापडले.
या पानाबरोबर खुप जुन्या लोकप्रभाच्या एका अंकात आलेला “बृहद्-विमानशास्त्र” या ग्रंथाच्या माहितीबाबतचा एक लेखही मी जपून ठेवला होता. (तो अर्थातच आज सापडत नाही.) या लेखात प्राचीन काळात विमान कसे तयार करावे, त्याकरीता धातुंची सिध्दता कशी करावी, विमानांची रचना, आखणी याबद्दलची माहिती होती. अशी कोणाकडे माहिती असल्यास ती द्यावी.

शिल्पा ब's picture

29 Jun 2010 - 11:04 am | शिल्पा ब

छान अन दुर्मीळ माहीती.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/