गोठलेले शब्द या जालिंदरांच्या कविता संग्रहातील एक कविता येथे लिहिण्याचा मोह आवरत नाही. वास्तविक हा संग्रह माझ्याकडे नाही. पण ती कविता कधीकाळी त्यांच्या 'भाषणाच्या बदल्यात भाकरी' या भाषणादरम्यान त्यांनी म्हटली आणि मी लिहून घेतली होती असे फिकट आठवते आहे. एखादेवेळी ही कविता त्या संग्रहात संग्राहित केली नसण्याची शक्यताही आहेच. पण आस्वाद घ्यायला काय हरकत? माझ्याकडील कविता एका जीर्ण पिवळ्या कागदावर हिरव्या शाईने लिहिली होती. कवितेतील काही शब्द वृत्त-मात्रांत बसत नसतील तर दोष त्या कागदाच्या प्रतिचा अथवा शाईच्या टिकून न राहण्याच्या गुणधर्माचा आहे.
दक्षीण धृवावर तीस किलोमिटरने अंदाज चुकून हावईछ्त्रीतून खाली उतरलेले जालिंदर जलालाबादी पेंग्वीनच्या थव्यात उतरले. तीथले वातावरण ते त्यांच्या गोठलेल्या शब्दांत कसे वर्णन करतात ते पाहा.
*
किती बर्फ साठला युगानुयुगे तो
की वातावरण नुसते गोठून होते
पृथ्विच्या धृवावर असे काय झाले
की पक्षी सगळे स्तब्ध नि:शब्ध होते
**
पाण्यावरुन आकृती या हिमाच्या
तरंगती जशी मेरु-मांदार असावीत
की मागे तयांच्या कुणी गूढ गणिती
असेल का? विचारून पडलो बुचकळ्यात मी
***
या कवितेची प्रेरणा जालिंदरजींनी धनंजय यांच्या धुकट सकाळ या कवितेतून घेतली आहे की धनंजयांनी जलालाबादींचे स्मरण करुन त्यांची कविता लिहिली होती या वादात आम्ही पडू ईच्छित नाही. या दोन्ही कवितांचा आस्वाद घ्यावा असे आम्हांस वाटते.
जाताजाता रसग्रहणाबाबत थोडे :- कवितेमध्ये आलेला गणिती हा, 'हिमनग एक अष्टमांश पाण्याच्यावरती की खाली की कसे?' याचा शोध घेणारा आहे. जालिंदरांची प्रतिभा वातावरणाचे वर्णन करण्यात फक्त गुंगली नसून ती निसर्गाचे गूढ नियम शोधणारी बुद्धीनिष्ठ आणि सूचक आहे हेच यावरुन आम्हांस दिसते.
--लिखाळ.
(आम्ही उरलो टंकलेखनापुरते)
प्रतिक्रिया
9 Apr 2009 - 5:16 pm | श्रावण मोडक
मार डाला.
लिखाळ इन फुल फॉर्म.
आता रसग्रहणही करून टाका.
धनंजयराव जालिंदरजींची प्रेरणा 'मान्य' करतील याचीही खात्री आहे.
'जालिंदर सत्ताविशी' आठवड्यात पूर्ण होणार बहुदा.
9 Apr 2009 - 7:35 pm | लिखाळ
जालिंदरांचे वाचक इतक्या मोठ्याप्रमाणावर असतील तर होईलच.
जालिंदर प्रसिद्धीपरान्ड्मुख आहेत तरी त्यांची प्रसिद्धी या तर्हेने होते आहे याचा त्यांच्या चाहत्यांना आनंदच असणार.
-- लिखाळ.
9 Apr 2009 - 5:15 pm | निखिल देशपांडे
'जालिंदर सत्ताविशी' आठवड्यात पूर्ण होणार बहुदा.
असेच म्हणतो....
जालिंदर बाबांचा कहर चालुच..
जय जालिंदर बाबा
9 Apr 2009 - 7:36 pm | लिखाळ
जालिंदरांचा विजय असोच !
-- लिखाळ.
9 Apr 2009 - 5:40 pm | पहाटवारा
अहाहा .. यांस म्हणती 'जालिंदर योगायोग' ..
गुरुबंधु विचार करती सम्यक!
गोठ्लेल्या शब्दांमधल्या काव्य-वैभवातील एक सुवर्णपान मज पामरालाहि लाभले होते , कसे लाभले हे सांगायला गुरुंनी भाकरिची शपथ घालुन मनाई केली आहे .. वृत्त-मात्रांधिश्ठित काव्याप्रमाणेच मूक्तकाव्ये हा देखिल त्यांचा हातखंडा होता याचा मिपाकरांना साक्शात्कार देण्यासाठि हा टंकन -प्रपंच !
बर्फावरुन एक एक पाउल जेव्हा पुढे पडते,
तेव्हा ती असते एका ऊन्मत्त पांढर्या हत्तीवर करुन गेलेली एक चाल !
एका निडर, निष्प्रुह पांढरपेषाची !
निष्ठूर बर्फात जेव्हा फसते एखादे पाउल,
तेव्हा ती असते विद्रोहकावर अवलंबलेली एक जीवघेणी खेळी !
त्याच मुजोर पांढर्या हत्तीची !
पण हे पेंग्वीना ,
तू न निव्वळ पांढरपेषा !
मीहि चढ्वेन म्हणतो तुझ्या ह्या क्रुष्ण-पांढरवेषा,
अन करिन म्हणतो नॄत्य-मर्दन , या मुजोर्या पांढर्या नागावर !!
असे ऐकुन आहे कि या काव्य-वाचना नंतर सर्व पेंग्वीन समाज गुरुजींचा दीवाणा होउन गेला होता.
त्या नॄत्य-मर्दनाचा इतका प्रसार झाला कि गुरुंचे विरोधी असा आरोप करु लागले कि दक्षीण धॄवा वरिल निसट्णारे हिमखंड हे पेंग्वीनाच्या नॄत्य-मर्दनाचाच परिणाम आहे.
किती हा हीन दर्जाचा आरोप !
असो , आपण गुरु-कवितेचा आस्वाद घेउया !
बोला जालिंदर बाबा कि जय!!!!
9 Apr 2009 - 7:39 pm | लिखाळ
अतिशय थंड आणि सूस्त अश्या समाजालाच त्यांनी हिमप्रदेशाची उपमा दिलेली असणार.
अत्यंत थंड प्रदेशावर उभे राहून रचलेली ज्वलंत कविता आवडली. पेंग्वीनांच्या नृत्यामुळे हिमखंड सरकतील तर काय नवल. समस्त साहित्यविश्व अश्या कवितांमुळे डळमळू दे !!
-- लिखाळ.
9 Apr 2009 - 6:54 pm | अवलिया
ठ्ठो ! =))
--अवलिया
9 Apr 2009 - 6:55 pm | प्रमोद देव
साक्षात जालिंदरबाबाच्या आवाजातली ही कविता. हा अमूल्य ठेवा मी त्यांच्या समस्त भक्तगणांसाठी खुला करतोय.
ऐका आणि पावन व्हा.
Get this widget | Track details | eSnips Social DNA
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
9 Apr 2009 - 7:42 pm | लिखाळ
कष्टपूर्वक ही कविता मिळवून इथे दिल्याबद्दल देवकाकांचे अनेक आभार. आपल्या सारख्या निष्ठावान, जाणकार आणि व्यासंगी चाहत्यांमुळेच जालिंदर समाजमनापर्यंत पोहोचत आहेत.
पाहा त्यांच्या आवाजातले गांभीर्य. त्यांचा खर्ज तर थेट जीवनाच्या तळाला जाऊन भिडलेला.
मराठी मुलखाबाहेर राहिलेल्या कालिंदरांच्या जीभेवरचा परभाषीय संस्कार अधूनमधून डोकावत होता. तो तर त्यांच्या वैश्विकतेची कथाच सांगत होता.
आभारी.
-- लिखाळ.
9 Apr 2009 - 9:25 pm | शाल्मली
प्रमोदकाका,
तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावेत ते कळेनासे झाले आहे..
तुम्ही उपलब्ध करून दिलेली साक्षात जालिंदरबाबाच्या आवाजातली कविता ऐकून मी भारावून गेले आहे..
कविताही सुंदर आहेच.
जालिंदर बाबाकी जय!!
--शाल्मली.
10 Apr 2009 - 6:01 am | भडकमकर मास्तर
शेवटचा बुचकळ्यात मी ची पुनरावृत्ती मनाला अत्यंत आनंद देऊन गेली...
फार छान काका...
.. आपण ही ध्वनिफीत शोधायला जे कष्ट घेतलेत ते पाहून आनंदाश्रू आले.
8|
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
9 Apr 2009 - 6:59 pm | रेवती
प्रतिक्रिया देण्यासाठी शब्द नाहीत.
=))
रेवती
9 Apr 2009 - 7:00 pm | सूहास (not verified)
ठ्ठो !
सुहास
9 Apr 2009 - 7:48 pm | टिउ
कहर!!!
9 Apr 2009 - 9:32 pm | प्रकाश घाटपांडे
साक्षात लिखाळ यांनीच हे लिहिले आहे म्हटल्यावर जालिंदर जलालाबादी किती थोर व्यक्तिमत्व होते हे दिसुन येते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
9 Apr 2009 - 9:38 pm | आंबोळी
जलालाबादींनी नुसते गारुड केलय मिपावासियांवर....
अगदी जालिंदर सप्ताह सुरु असल्यासारखा धुमाकूळ चाललाय....
मजा येतेय....
पटापटा सत्तावीशी पुर्ण करा.
आंबोळी
9 Apr 2009 - 9:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रो. आंबोळींशी सहमत
डॉ. अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
9 Apr 2009 - 10:42 pm | प्राजु
शॉल्लिट... शॉट्ट!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Apr 2009 - 12:09 am | विसोबा खेचर
लै भारी! :)
10 Apr 2009 - 1:01 am | धनंजय
जालिंदर जलालाबादी यांच्या कवितेच्या अनुषंगाने मला दोन कडवी सुचलीत, याविषयी मला अभिमानाचा गहिवर आला आहे.
पूर्वी वरील कविता मी र्वांडा-बुरुंडी येथील लोकगीत समजत असे. जालिंदरचे ध्वनिमुद्रित भाषण आम्ही डब्बावाला यांच्या घरी ऐकले होते. त्यात श्रोत्यांनी जल्लोशात ही कविता एकसाथ म्हटली, ती पुसट ऐकू आली.
पुढे ती मला तुत्सी बालकाने आपल्या हुतू दाईकडून शिकली होती, तशी म्हणून दाखवली. (तेव्हाच मला शोध लागला की मराठी लोकांनी हुतुहुतू=हुतुतू हा खेळ र्वांडाकरांकडून शिकला होता. तसेच "तुत्सिकरांचा काढा" याला आजकाल "सूत्शेखराचा काढा" अशा अपभ्रष्ट नावाने आपण ओळखतो. "मराठी-तुत्सी हुतुतू साथी" ही म्हण तशीच आपल्याकडे आली.) म्हणून मला हे र्वांडाचे मराठी लोकगीत आहे, असेच वाटले.
ते परमपूज्य जालिंदरांचे काव्य आहे हे वाचून माझे डोळे दृशदर्शित झाले आहेत, व माझे टंकणारे हात टकटंकित झाले आहेत.
॥ जय जालिंदर ॥
(मी ऐकलेली लोकांत अपभ्रष्ट झालेली कविता अशी :
किती मुर्दे साठले रुहेन्गेरी मध्ये
कि वातावरण फार दुर्गंध झाले
किगाली तळ्याशी असे काय झाले
की पक्षी सगळे स्तब्ध नि:शब्ध होते
**
पाण्यावरुन आकृती या मढ्यांच्या
तरंगत्या जशा युद्धफौजा असाव्या
राजकारणाची कशी गूढ गणीते?
विचारून पडलो धप्पकन् तळ्यात मी
**
मूळ जालिंदरजींची कविता वाचल्यानंतर हे साचलेले अपभ्रष्ट पाठभेद मला विसरून जाता येतील.)
10 Apr 2009 - 6:02 am | भडकमकर मास्तर
हे सर्व भन्नाट आहे...
जालिंदर सप्ताह छान चालू आहे. =))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Apr 2009 - 7:15 am | दशानन
शॉल्लिट... शॉट्ट!!! (प्राजु कडून उचलले आहे ;) )
जालिंदर सप्ताह छान चालू आहे =))
असाचा लोळून हसत मी पण असेच म्हणतो ;)
व लिखाळ ह्यांच्या कविते बदल मी पामर काय लिहणार.....
=))
10 Apr 2009 - 10:41 am | बिपिन कार्यकर्ते
मास्तरांशी सहमत.
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
10 Apr 2009 - 11:59 am | श्रावण मोडक
आम्ही धन्य झालो... या काव्याने!!!
10 Apr 2009 - 7:33 pm | टिउ
=))
काहीही चालू आहे! जय जालिंदर...
11 Apr 2009 - 12:13 am | मिसळभोक्ता
किती मुर्दे साठले रुहेन्गेरी मध्ये
कि वातावरण फार दुर्गंध झाले
किगाली तळ्याशी असे काय झाले
की पक्षी सगळे स्तब्ध नि:शब्ध होते
**
पाण्यावरुन आकृती या मढ्यांच्या
तरंगत्या जशा युद्धफौजा असाव्या
राजकारणाची कशी गूढ गणीते?
विचारून पडलो धप्पकन् तळ्यात मी
हे सरळ सरळ साहित्यचौर्य आहे. ही मूळ कविता मिपाकर शरदिनी ताईंची आहे. (शब्दरचनाच बघा, अंदाज येईलच.)
-- मिसळभोक्ता
13 Apr 2009 - 11:05 pm | लिखाळ
हा हा हा .. लै भारी.
टकटंकित हातांनी लिहिलेला प्रतिसाद आणि साचलेल्या अपभ्रष्ट पाठभेदांतील कविता लै भारी :)
-- लिखाळ.
10 Apr 2009 - 5:25 pm | बाकरवडी
भयंकर आहे हे !
@) @) @) @) @) @) @)