शिकार - भाग २

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in जनातलं, मनातलं
8 Apr 2009 - 10:22 pm

(कथा पुर्ण काल्पनिक. घटना, पात्रं ह्यांचा कोणाही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी नामसाधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.)
शिकार - भाग १

"भाईजान, उस्मानका बील भी मेरे बीलमें डाल देना| कित्ता हुआ?" उस्मानकडं पुर्ण दुर्लक्ष करुन पन्नासची नोट काउंटरवर फेकत म्हातारा मागे वळूनही न पाहता बाहेर पडला. उस्मान धडपडत टेबल सोडून स्पेलबाउंड झाल्यासारखा त्याच्यामागोमाग चालत निघाला.

============

म्हातार्‍यानं एकवार मागे वळून उस्मान येत असल्याची खात्री करुन घेतली अन् मागोमाग येण्याची खुण करुन चालत रस्त्याकडे निघाला. उस्मान पाठमोर्‍या म्हातार्‍याच्या ताठ चालीकडं निरखुन पहात त्याच्या मागे शाळकरी पोरासारखा गुपचुप निघाला. मेनरोडला येईपर्यंत जेमतेम पाच मिनिटांत उस्माननं म्हातार्‍याचं पाणी जोखलं. 'बुढ्ढेकी चाल तो एकदम कडक है, अजुन पाठीत इंचभरही नाही वाकलेला..नक्की साला एक्स-आर्मी असणार!' उस्मान मनातल्या मनात अंदाज बांधत बोलला. हे देखील धारावीचंच एक देणं! दुनियेत तुम्हाला समोरच्या माणसाचा अंदाज बांधता आला नाही तर गेलात तुम्ही बाराच्या भावात!

खरं तर उस्मान गोंधळलेलाच होता. ओळख ना पाळख, दोन चार मिनिटांच्या बोलण्यावरुन एक म्हातारा काम द्यायला तयार काय होतो, त्यानं चल म्हणलं की आपण पाळलेल्या कुत्र्यासारखं मागंमागं काय जातो...कुछ तो झोल है बाप! ह्या पाच मिनिटांत हिप्नॉटाईझ करुन लुटणार्‍या चोरापासून ते स्मगलर्सच्या क्रू-रिक्रुटरपर्यंत सगळ्या शक्यता पडताळूनही हा म्हातारा कुठल्याच लेबलाखाली बसत नव्हता. जेन्युईन वाटत होता....उस्मानचा गोंधळ उडाला होता तो ह्यामुळेच.

मेनरोडवर पोहोचतानाच लांबून दिसणार्‍या टॅक्सीला म्हातार्‍यानं हात करताच उस्मानच्या डोळ्यापुढे सिनेमात पाहिलेले आपल्याच कमांडमधली एखादी जीप बोलावणारे आर्मी ऑफिसर आठवले...अंदाज आता खात्रीकडं वळायला लागला होता.
"सायन हॉस्पीटल.." म्हातार्‍यानं टॅक्सीत बसता बसता ऑर्डर सोडली. येतो का? चलतो का? वगैरे काही भानगड नाहीच!
जवळचंच भाडं मिळाल्यानं ड्रायव्हरचं तोंड वाकडं झालं, पण म्हातार्‍याच्या असण्याचीच जादू होती की जरब कोण जाणे, वाकडं झालेलं तोंड न उघडता त्यानं मीटर डाऊन केलं.

"सर, आप आर्मीमें थे?" उस्माननं टॅक्सीतली शांतता सहन न होऊन एकदम विचारलं.
उत्तर म्हणून परत एकदा फक्त स्मीत! नजर पुन्हा एकदा विन्ड्स्क्रीनला भेदत समोरच्या रस्त्यावर!
उस्मान गप खिडकीतून बाहेर पहात पुटपुटला..च्यायचं म्हातारडं! स्वतःला काय जेम्स बाँड समजतो की काय? की खरंच आहे?
"बस्स! बरिस्ता के सामने रोक दो|" म्हातार्‍यानं टॅक्सीत चढताना बोललेल्या पहिल्या वाक्यानंतरचं हे दुसरं...उतरताना!
"चलो उस्मान, बरिस्ता में बैठ के बात करते है|" म्हातारा.
"अ‍ॅज यु से सर." उस्मान.
पहिल्यांदाच म्हातार्‍याची भुरकट नजर क्षणभर चमकली. पुन्हा तेच हसु चेहर्‍यावर खेळवत म्हणाला, "लेट्स गो देन!"
आतमध्ये गर्दी फारशी नव्हतीच. इतक्या सकाळी, बरिस्तामध्ये येणारं पब्लिक अजुन घरातला एसी टर्बो मोडवर ठेऊन लोळत पडलेलं असणार..
"आय वील हॅव अ ब्लॅक एस्प्रेसो...अ‍ॅन्ड उस्मान, यू?"
"अ‍ॅन आयरीश वील डू वेल सर"
"ब्राव्हो..नाईस चॉईस उस्मान! एनिथिंग फ्रॉम केक्स?" म्हातार्‍यानं उस्मानला बरोब्बर ओळखलं होतं. कॉलेज सोडून काही वर्षं लोटली असली तरी पोरगा अजुन ऑब्सोलेट नाही झाला...गुड.
"थॅन्क्स सर! आय वील प्रेफर डेट्स अ‍ॅन्ड वॉलनट.."
...........
ऑर्डर देऊन झाल्यावर बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हतं. उस्मान म्हातार्‍याला अन् तो उस्मानला नजरेनं जोखत होते.
उस्मान म्हातार्‍याच्या नजरेला नजर भिडवून डोळे वाचण्याच्या प्रयत्नात तर म्हातारा उस्मानची देहबोली अभ्यासण्यात गर्क!
शेवटी म्हातारा बोलला, "मत ढूंढ बच्चे, कुछ नही मिलेगा|"
उस्मानने संकोचुन नजर भिरभिरवली....
"मै काझी! तुम्हारे लिये अभी बस इतनाही. जब जरुरत पडेगी तब औरभी बताउंगा!"
तीनपत्तीच्या नो लिमीट टेबलावर पहिल्यांदाच बसलेलं असताना समोरच्यानं ब्लाईंडमध्ये खेळत निम्म्या चिप्स डबलबेट केल्यासारखा उस्मान भांबावला...
"देखीये सर, हम जॉब डिस्कस करने आये है, हाईड अ‍ॅन्ड सीक खेलने नही! लेट्स बी क्लीयर ऑन बोथ द साईड्स" उस्मानची कवटी परत तापायला लागली होती. साला हे काय नाटक आहे? बुढ्ढा सहीमें झोलर दिखता है!

काझी पुन्हा तेच गूढ हसु खेळवत म्हणाला, "बहोत गर्म दिखता है तुम्हारा खून! अच्छी बात नहीं है|"
उस्मान समजुन गेला, म्हातारा पोहोचलेली चिज आहे. माईंडगेम खेळतोय. बुढ्ढेको मेरा बॉईलिंग पाँइंट देखना है, ठीक है बेटा, मै भी तेरा बाप हूं|
कॉफीच्या ग्लासाआडून किंचितसं हसत उस्मान म्हणाला, "सच कहा सर आपने|" आणि शांतपणे काझीच्या पुढच्या चालीची वाट पहात आजुबाजुला असलेली तुरळक गर्दी न्याहाळत घोट गोट कॉफी रिचवायला लागला.

काही मिनिटं तशीच अबोल गेल्यानंतर काझीच बोलला, "क्या काम करना चाहोगे? व्हाईट कॉलर बनायचंय का?"
"सर, आमच्याकडं एक म्हण आहे, भिखारी को भिख, जितनी भी मिली ठीक! सध्या मला काम हवंय. कोणतंही! एसी ऑफिसात बसुन आकडेमोडीचंही चालेल अन् कुलाब्यात रस्त्यावर चरस हशीश विकण्याचंही चालेल. पैसा मिळाल्याशी मतलब!"
"ला हौल विलाकुवत! उस्मान तुम हराम का, नशेका पैसा लोगे?" काझीच्या चेहर्‍यावर भूत पाहिल्याचे भाव!
"इतके दिवस आणखी काय केलं? काझीसाब, यह मजहब और उसके सारे नाटक तुम पेटभर खाना खानेवालों के वास्ते! आमच्यासारख्या गरिबांना जगणं हे महत्वाचं. " म्हातार्‍याला त्याच्याच माईंडगेममध्ये अडकवायच्या खेळात मध्येच गरीबीच्या उल्लेखानं उस्मान गंभीर झाला.

क्षणभरानं बोलला, "सर, आप कुछ काम के बारेंमे बोल रहे थे ना?"
"अरे हां, त्यासाठीच तर आपण इकडे आलो आहोत!" काझीही थोडासा गंभीर झाला.
"देखो उस्मान, मी तुझी बरीच माहिती काढली आहे, तू एकदम पाक दिलाचा आणि नेक इन्सान आहेस....."काझीनं दिलीपकुमार स्टाईल पॉझ घेतला.... "लेकीन, क्या तूम भरोसा करने के लायक हो?"
धारावीनं शिकवलेले इन्स्टिंक्ट्स आपोआप जागे होऊन परिस्थिती जोखायला लागले होते.काझीच्या ह्या वाक्यांमुळं उस्मान विचारात पडला. नक्कीच बुढ्ढा काहीतरी झोल आहे...हा लष्करे....छे छे! ते लोक काय असं दिवसाढवळ्या फिरत असतील काय?

"भरोसा..." उस्मान प्रश्नार्थक नजरेनं पहात बोलला, "जर मी हो बोल्लो तर तुम्ही विश्वास ठेवणारे का? आणि, तुम्ही माझी माहिती काढली आहे, मला तर तुम्ही कोण हेही ठाऊक नाही! मी तुमच्यावर भरवसा ठेऊन इथं आलोय तर तुम्हीही विश्वास ठेवायला हरकत नसावी!" मातकट काळसर रंगाच्या त्या कॉफीचा कडवटपणा उस्मानच्या शब्दातून डोकावला.
दिलखुलास हसत काझीनं त्याच्या खांद्यावर थाप मारली. म्हणाला, "खूब...बहोत खूब!"
उस्मान समोर काझीला हसताना त्याच्या भुरकट नजरेत आलेली चमक पाहुन पुन्हा अस्वस्थ झाला. काझी इकडं तिकडं पहात, थोडं पुढे झुकुन हलक्या आवाजात म्हणाला, "काम थोडासा रिस्की है, सिक्रेट भी है! संभाल पाओगे?"
"एक बार ट्रायल तो ले लो सर!" उस्मान सावरुन बसत म्हणाला. इतका वेळ हवेत बाण मारत मारत आत्ता कुठे बुढ्ढ्यानं मुद्द्याला हात घातला होता.

"उस्मान, तुझ्या वस्तीतला शितू जाधव काय काम करतो, माहिती आहे?"
"सर, सांगायला तो सांगतो की 'मिराडोर'ला वेटर आहे म्हणुन. पण असलमें वो अंधेरी से लेके बांद्रा लाईनतक का पंटर है| उधर के सारे पोलिस स्टेशन का खबरी है वो!"
"गुड! तुला त्याच्या कामाबरोबर लोकेशन्सही माहिती आहेत? आय सर्टनली कॅन काऊंट ऑन यू, माय बॉय! यू आर अ जेम!"
"यू माइट बी एक्झॅगरेटिंग सर! आय अ‍ॅम मिअरली अ नोझी पार्कर" संकोचत उस्मान म्हणाला.
"नो नो उस्मान, आय लाईक इट. तुला जॉबची ऑफर अशीच आहे! बोल, वुड यु लाइक टू बी अ‍ॅन अंडरकव्हर एजंट?.....सर्टनली... ऑफरोल!!!" काझी आता सुरु झाला होता.

"उस्मान, तू आत्तापर्यंत ज्या माणसांत काम केलंयस, वावरलायस त्यांच्यात तू सहज मिसळून जाऊ शकतोस. तू शिकलेलाही आहेस, इंग्रजीवर चांगली पकड आहे तुझी, त्यामुळे तू बिझनेस सर्कल्समध्येही मिसळू शकतोस..हां, थोडं ट्रेनिंग लागेल, बट यू कॅन डू इट व्हेरी इझिली! बघ विचार कर. महिना वीस हजार मिळतील, अलाउन्सेस वेगळे!"
उस्मानला हा एक धक्काच होता. तसं पाहिलं तर त्याचा ह्यात बराचसा फायदाच होता. पण जीव कुणाला प्यारा नसतो? एखाद्या भाईशी पंगा घ्यायचा म्हणजे फुकटची लफडी! मंज्यादादापाठोपाठ आपलीही पालखी निघायची....क्रॉसिंगब्रिजवरुन रेल्वेलाईनवर! बरं, पोलीसांचं कव्हर आहे म्हणावं तर ते ऐनवेळी उलट्या काड्या सारायलाही कमी करणार नाहीत ह्याची खात्री! एखाद्या भाईनं प्रेशर केलं तर सरळ आपल्याला पुढं करुन हात झटकून टाकतील........... पण पैशाचा आकडा राहुन राहुन जाळ्यात ओढत होता.

उस्मानच्या चेहर्‍यावर मनातले विचार लिहिल्यासारखे उमटलेले वाचावे तसं काझीनं त्याच्या डोक्यातला किडा ओळखला...
म्हणाला, "डर मत उस्मान, हे काम मुंबई पोलीसांचं नाहीय्ये. अपने देशके वास्ते कुछ करना अपना फर्ज है, आणी तो फर्ज निभावायला तुला पैसेही मिळताहेत. तुला पोलीस काहीही करणार नाहीत ह्याची खात्री बाळग."
उस्मान अजुनच भंजाळला...त्याला नक्की काय चाललंय तेच कळेनासं झालं. जर पंटरगिरी करायचीये तर ती पोलीसांची नाही तर कोणाची? भाई-डॉनची? की टेररिस्ट्सची? मग पोलीस कसे काही करणार नाहीत? विचारांचा ताण असह्य झाला तशी त्यानं खिशातून अर्धवट चुरगाळलेली फोर स्क्वेअर काढून नीट ठोकून ठाकून सरळ करुन शिलगावली. दोन झुरके मारुन झाल्यावर डोकं काहीसं ताळ्यावर आल्यासारखं वाटलं.
उस्माननं विचारलं,"सर, मी पोलीसांसाठी पंटरगिरी नाही करणार तर मग कोणासाठी? भाईलोक? की आणखी कोणी?....."
"आणखी कोणी!" काझी हसत म्हणाला. "तुला काय वाटतं, आणखी कोणी म्हणजे कोण असेल? नक्षल? मुजाहिदीन? लष्कर? की लिट्टे?" असं म्हणुन ठसका लागेपर्यंत हसला म्हातारा!
उस्मान अजुनच बुचकळ्यात! आयला, काय म्हातारा खरंच मजाक करतोय काय? का येडा आहे? मेंटल हॉस्पिटलातून पळून आलाय काय?
काझीनं खिशातून एक कार्ड काढलं. टेबलावर पालथं टाकून उस्मानकडे सरकवलं. उस्माननं काझीवरची नजर तशीच ठेवत फ्लॅशमध्ये ब्लाइंडमधून ओपनला येताना स्टेक वाढवण्याआधी एकेक पान हळूच उचल्तात तसं ते कार्ड उचललं...
त्यावरच्या प्रत्येक अक्षरागणिक उस्मानचा जबडा आपली जागा सोडून छातीकडं धाव घ्यायला निघाल्यासारखा लोंबायला लागला! हातातल्या फोर स्क्वेअरचा निखारा बोटांना येऊन भिडला तसा इसके माँ की....म्हणत सिगारेट फेकत उस्मान शुध्दीत आला.

काझी आणखीनच झुकुन आणी आवाज अगदी कुजबुजल्यासारखा काढत म्हणाला..." यू विल बी वर्किंग फॉर रॉ! विथ इंटर्नल सेक्युरिटी डिपार्टमेंट!! अलाँग विथ ए.टी.एस.!!!"
"सर, यू आर किडींग! "
"नो वे उस्मान! आमच्या बर्‍याचशा एजंट्सचा डेटा आधीच अतिरेक्यांकडे पोचलाय. घरभेदींची कृपा! आता आम्ही तुझ्यासारखे ऑफरोल एजंट्स नेमून देशाची सुरक्षा सांभाळण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुझ्यासारखे कित्येकजण आमचे डोळे असतील, आमचे हात असतील, पण कोणालाच हे ठाऊक नसेल."
"पण पोलीस....." उस्मान अजुनही त्या मुद्द्यावर ठाम होता.
"त्याची काळजी सोड! आम्ही पाहुन घेऊ. जर काम करणार असशील तर तसं सांग. पुढची सगळी व्यवस्था होईल. और एक बात, जरा टेबलाखालुन बघ माझा हात!"
उस्मानने खुर्चीत थोडंसं रेलून नजर टेबलाखाली टाकली आणि थिजलेल्या नजरेनं त्यानं वर पाहिलं. म्हातार्‍यानं बोलता बोलता कधी रिव्हॉल्व्हर काढलं होतं, आणि ते व्यवस्थित रुमालात गुंडाळून धरलं होतं हे उस्मानला कळलंच नाही!
"जादा कुछ बोलने जरुरत तो होगी ही नहीं, बॉलिवूड के पिक्चर तो देखते हो ना तुम? अटमोस्ट सिक्रसी ही पहिली गरज आहे. कुठेही काहीही बोललास, दुसर्‍या दिवसाचा सुर्य पहायला शिल्लक नसशील. मग तू ही ऑफर स्विकार अगर नाकार. सिक्रसी इज टू बी मेन्टेन्ड."
"आय कॅन अंडरस्टँड सर! मी तयार आहे"
"दॅट्स द स्पिरीट उस्मान!" काझी खुष होत म्हणाला. खिशातून एक पाकिट काढून उस्मानच्या हातात देत म्हणाला, "एक काम कर, हा लिफाफा घे. सायन हॉस्पिटलमध्ये एन्क्वायरी काऊंटरवर डॉ.परेरा विचार. त्याला हा लिफाफा दे, तो तुला २० हजार रुपये देईल. किप इट अ‍ॅज जॉइनिंग बोनस! जरा चांगले कपडे घे, केस आणि दाढी वगैरे माणसासारखी करुन घे. परवा सकाळी तुझ्या हमीदभाईकडे एक पत्ता ठेवलेला असेल. तो कलेक्ट करुन तिथे ये. माझे सिनियर्स तुला इंडक्शन आणि ब्रिफिंग करतील. टिल देन, जय हिंद!" असं म्हणुन काझी उठला. शंभराच्या दोन नोटा टेबलावर फेकत वेटरला "किप द चेंज" म्हणून ताडताड पायर्‍या उतरत निघालाही!

भानावर येत उस्मानही उभा राहिला आणि पुटपुटला, "जय हिंद सर!"
--------------------
(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

8 Apr 2009 - 10:33 pm | श्रावण मोडक

इण्टरेस्टिंग. कथेत मजा येतेय. बैठक बरीच टिकवली आहे. ते जरा दिलीपकुमारस्टाईल वगैरे कमी केलं तर बाज टिकून राहील छानसा.
पुढचे भाग झटापट आले पाहिजेत. देशाचं काम आहे हे, असं संथ गतीनं नाही चालणार.
अंडरकव्हर एजंट्स रॉ अशाच पद्धतीने रिक्रूट करते का हा तपशीलाचा भाग. कारण असे एजंट रिक्रूट केल्यानंतर दाढी, कपडे वगैरे पटत नाही. पण असो. आपण कथा पुढे वाचू.

व्यंकु's picture

8 Apr 2009 - 10:53 pm | व्यंकु

सही रे धम्या उत्कंठा शिगेला पोहोचलीये

रेवती's picture

8 Apr 2009 - 11:03 pm | रेवती

हुश्श्य!
आला बाबा दुसरा भाग!
चांगला झालाय पण तिसर्‍या भागासाठी किती वाट पहायला लागणास असा प्रश्न पडलाय.;)

रेवती

पिवळा डांबिस's picture

9 Apr 2009 - 12:56 am | पिवळा डांबिस

किती हा उशीर?
मला तर वाटलं की शिकारीला गेलेल्या धमाल्याला वाघानं फाडून खाल्ला!!!!:)

धम्या, कथा छान रंग घेतेय. फक्त ते मोडकसाहेबांनी सागितलेल्या सूचना लक्षात घे!!
वाट बघतोय पुढल्या भागाची....
-पिडांकाका

विजुभाऊ's picture

14 Feb 2018 - 2:21 pm | विजुभाऊ

फुडचा भाग कुठे आहे याचा

यशोधरा's picture

8 Apr 2009 - 11:17 pm | यशोधरा

मस्त रे धम्या! लवकर लिही बाबा पुढचं आता!

भाग्यश्री's picture

8 Apr 2009 - 11:20 pm | भाग्यश्री

आला फायनली दुसरा भाग!!!
मस्तच जमलाय.. खूप मजा येतेय..
विषय खूप खूप वेगळा आहे.. मी कधी वाचलं नाही यावर..
त्यामुळे पटपट येऊदे आता प्लीज! :)

प्राजु's picture

8 Apr 2009 - 11:22 pm | प्राजु

खूप इंटरेस्टिंग!!
वाचते आहे.
लवकर लिहि आता.. नाहीतर लिंक तुटते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 11:26 pm | विसोबा खेचर

खूप इंटरेस्टिंग!!

हेच बोलू पाहतो..!

तात्या.

चतुरंग's picture

8 Apr 2009 - 11:26 pm | चतुरंग

ओ 'धमाल शिरवळकर' मस्तच जमलाय भाग! एकदम रॉ!! ;)
येऊदेत पटापट!

चतुरंग

अनिल हटेला's picture

9 Apr 2009 - 6:05 am | अनिल हटेला

>>>ओ 'धमाल शिरवळकर '!!!

लवकर येउ द्यात पूढील भाग !!! :-)
सॉलीड लिहितोयेस खरं !! ;-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2009 - 7:15 am | प्रकाश घाटपांडे

आमी बी शेम तेच म्हंतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

संदीप चित्रे's picture

9 Apr 2009 - 12:12 am | संदीप चित्रे

सुरूवात मस्त झालीय रे..... पुढचे भाग लवकर लिही.
आत्ताच डोळ्यासमोर छोटा सिनेमा उभा केलायस :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

नंदन's picture

9 Apr 2009 - 1:47 am | नंदन

एकदम इंटरेस्टिंग, उत्कंठावर्धक भाग. माइंड-गेम्सचे आणि डोक्यात चाललेल्या विचारांचे वर्णन झकास. पुढल्या भागांची वाट बघतो आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शितल's picture

9 Apr 2009 - 2:22 am | शितल

धमाल शेठ,
हा भागात ही मस्त . पण शिकार फार संथ गतीने चालु आहे..
लवकर लिही :)

मदनबाण's picture

9 Apr 2009 - 4:10 am | मदनबाण

ओ धमालराव किती वेळ घेतलात !!! पुढच्या भागाची वाट पाहतोय. :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

सँडी's picture

9 Apr 2009 - 6:00 am | सँडी

एकदम मस्त!
पुढचा भाग येऊ द्या...

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

भडकमकर मास्तर's picture

9 Apr 2009 - 7:12 am | भडकमकर मास्तर

चांगला जमतोय भाग... मस्त..

.. मोडकांच्या सूचनाही मनावर घ्या...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पल्लवी's picture

9 Apr 2009 - 7:12 am | पल्लवी

ठरल्याप्रमाणे खोपडी मारुन मगच लिहीलंस ना ? ;)
नाही, फक्कड जमलय्..म्हणून विचारलं... :D

निखिल देशपांडे's picture

9 Apr 2009 - 9:56 am | निखिल देशपांडे

अरे दुसरा भाग पण मस्तच जमलाय... आता तिसर्या भागा साठी जास्त वाट बघायला लावु नको

निखिल

दिपक's picture

9 Apr 2009 - 10:15 am | दिपक

सही जारेलाय भीडू :)

जय हिंद!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Apr 2009 - 10:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धमू मस्तच रे! झकास लिहितोस, आणि बाकीच्यांप्रमाणे माझंही पालूपद, श्रावण काकांच्या सूचना मनावर घे. शिवाय ते २० हजार रुपये उस्मानच्या शेजार्‍या पाजार्‍यांच्या डोळ्यात येणार नाहीत याचीही काळजी घे.

आधीचा भाग विसरायच्या आत पुढचा भाग टाकल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

ऋचा's picture

9 Apr 2009 - 10:28 am | ऋचा

'धमाल शिरवळकर '!!!

अस्सेच म्हणते.....लैच भारी/.....

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

स्मिता श्रीपाद's picture

9 Apr 2009 - 10:58 am | स्मिता श्रीपाद

मस्त झालाय हा भाग पण....
अजुन किती क्रमशः आहेत? :-(

पुढचा भाग जरा लवकर पाठवा...:-)
आता उत्सुकता खुप ताणली गेली आहे...

-स्मिता

परिकथेतील राजकुमार's picture

9 Apr 2009 - 10:59 am | परिकथेतील राजकुमार

धम्मु मस्त रे !
पुढचे भाग पटापटा येउदे आता नाहितर तुझीच शिकार करतो बघ मेल्या.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Apr 2009 - 11:11 am | घाशीराम कोतवाल १.२

खुप वेळ नको लावुस पटकन टाक
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अवलिया's picture

9 Apr 2009 - 11:04 am | अवलिया

धमालशेट !

एकदम झक्कास !!!
अजुन येवु द्या पुढचे भाग पटापट!! :)

--अवलिया

आनंदयात्री's picture

9 Apr 2009 - 11:27 am | आनंदयात्री

येउद्या पुढचा भाग मालक !!

मनिष's picture

9 Apr 2009 - 11:34 am | मनिष

मजा येतेय....आता पुढचे भाग टाक लवकर! प्लीज?

सुमीत's picture

9 Apr 2009 - 12:48 pm | सुमीत

शिकार तर तू आमची केलीस धम्या, काय स्टाईल मध्ये लिहिले आहेस.

विशाल कुलकर्णी's picture

9 Apr 2009 - 1:17 pm | विशाल कुलकर्णी

धमाल मुला, इंटरेस्ट वाढलाय आता अंत बघु नकोस, लवकर टाक पुढचा भाग !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

ऍडीजोशी's picture

9 Apr 2009 - 1:20 pm | ऍडीजोशी (not verified)

भारी रे धम्या. बघ २ वेळा बँगलोर ला आलास तर कसं भडाभड लिहायला लागलास. आता कायमचा ये इथे म्हणजे आम्हाला अजून असंच भारी भारी वाचायला मिळेल :)

चेतन's picture

9 Apr 2009 - 1:55 pm | चेतन

हा ही भाग मस्त झालायं
भाउ पुढचा भाग लवकर टाक

चेतन १००

सुधीर कांदळकर's picture

9 Apr 2009 - 5:21 pm | सुधीर कांदळकर

निर्माण केलेल्या उत्सुकतेच्या रोलर कोस्टरवर बसलों आहे.

यह मजहब और उसके सारे नाटक तुम पेटभर खाना खानेवालों के वास्ते!
अशा वाक्यांनीं वाचकाची नाडी तर पकडलीच.

एकदम झकास - धमु

सुधीर कांदळकर.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Apr 2009 - 6:17 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!!!!!!!!!!! मस्तच... एकदम झ्याक. सह्ही भिडू. एकदम शिरवळकर, गुरूनाथ नाईक वगैरे नावं आठवली. धम्या लेका... तू तर एकदम भन्नाटच लिहितोस रे!!!!

बिपिन कार्यकर्ते

मयुरा गुप्ते's picture

9 Apr 2009 - 11:47 pm | मयुरा गुप्ते

एकदम छान जमलिये कथा. माइंड गेम्सचे वर्णन झक्कास. एका ईंग्रजी चित्रपटाची आठवण झाली..'स्पाय गेम' .खूपच सुदंर चित्रपट होता. पुढचा भाग लवकर येऊद्या.

--मयुरा

आंबोळी's picture

10 Apr 2009 - 12:45 am | आंबोळी

आयला धम्या, नडग्या फोडता फोडता हे कधी लिहिलस? अत्ताच वाचले दोन्ही भाग..... लै बेष्ट झालेत....
पुढचे भाग पटापटा टाका.....

अवांतरः टेबलावर पाय ठेउन टाईमपास करण्यापेक्षा हा लिहीतोय हे नक्कीच सुखद आहे.

आंबोळी

दशानन's picture

10 Apr 2009 - 7:21 am | दशानन

धम्या,

शॉलिड बॉस.... येऊ दे पुढील भाग लवकर :)

>>अवांतरः टेबलावर पाय ठेउन टाईमपास करण्यापेक्षा हा लिहीतोय हे नक्कीच सुखद आहे.

हेच म्हणतो सेठ.

नंदन's picture

19 Jul 2009 - 5:29 am | नंदन

भाग येऊ द्या की मालक.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सरपंचांच्या धाग्यात याचा दुवा मिळाला.
कथा आवडली पण लेखक मृत्युंजयसारखाच दिसतो...गोष्टी अर्धवट सोडणारा.

असुर's picture

15 Aug 2010 - 4:31 pm | असुर

धमालराव, कडक लिहिलंय!!!

टिपिकल सु.शि. स्टाईल वातावरण असलं, तरी धमालराव जागोजागी जाणवत राहतात. आणि हे फार छान आहे, कारण 'च्योप पस्ते' पेक्षा ओरिजिनल कधी पण बेष्ट!

पण आता जरा सांभाळून, लोक तुम्हाला धमालराव 'शिरवळकर' म्हणतायेत. रहस्यकथांच्या बादशहानं पालखी तुमच्या खांद्यावर दिली असं दिसतंय खरं.

अवघड जबाबदारी घेतली तुम्ही, ती पार न्या राव.

आणि धपाधप लिहा भौ!

-- ('सुशि' आणि 'धशि' चा फ्यान) असुर इराणी

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Feb 2011 - 2:59 pm | घाशीराम कोतवाल १.२

म्होरला भाग कधी येतोय आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या
पुढला भाग ?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Jul 2011 - 4:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

म्होर????

तेच की...आवं म्होरं काय ??

..पुढे काय झालं?

बकुळफुले's picture

28 Oct 2015 - 11:34 am | बकुळफुले

डिट्टो शिरवळकर.
पुढच्या भागाची लिंक द्याल का कोणी?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Oct 2015 - 11:37 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अहो त्या माठ्याला आधि लिहावा लागेल ना? कुट कडमडलय काय माहीत? धुमकेतु...

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2015 - 4:02 pm | बिपिन कार्यकर्ते

बघ ना! एक नंबर फालतू इसम आहे तो! :(

चिंतामणी's picture

29 Oct 2015 - 12:16 am | चिंतामणी

वाहत्या गंगेत हात धुवुन घेतलेत.

चिगो's picture

28 Oct 2015 - 4:48 pm | चिगो

काय कडक कथा लिहीलीय, धम्याभौ.. व्वा.. पण पुढचे भाग कुठे आहेत? च्यामारी, एक तू आणि दुसरे ते पराशेठ, भारी सुरुवात करता आणि लटकत सोडून जाता..

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2015 - 5:04 pm | बिपिन कार्यकर्ते

हो. दोघंही फालतू आहेत. :)

चिगो's picture

28 Oct 2015 - 5:13 pm | चिगो

आता तुमच्याएवढा अनुभव नाही बर्रका, बिका :) तुम्हीच म्हणताय तर असतीलही.. ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2015 - 6:22 pm | बिपिन कार्यकर्ते

डोळे झाकून.

प्यारे१'s picture

28 Oct 2015 - 8:36 pm | प्यारे१

दोघांना हे माहिती आहे की कळवायला लागतं?

बिपीन काकांशी सहमत १०० ट्क्के

राजाभाउ's picture

28 Oct 2015 - 7:19 pm | राजाभाउ

मस्त सुरुवात. पुभाप्र

टवाळ कार्टा's picture

28 Oct 2015 - 8:58 pm | टवाळ कार्टा

हायला...भाहरी

हेमंत लाटकर's picture

29 Oct 2015 - 12:05 pm | हेमंत लाटकर

धन्या भाऊ दोन्ही भाग चांगले आहेत. तिसरा भाग लवकर येऊ द्या.

कायबी करत होतं राव हे बेनं

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Dec 2015 - 1:02 pm | घाशीराम कोतवाल १.२

धम्या शिकार कधी पुर्ण करतो आहेस ?

झिंगाट's picture

4 Dec 2016 - 11:59 am | झिंगाट

पुढच्या भागाची लिंक द्या कोणीतरी रे......
उत्कंठा वाढवून कथा सोडली कि काय????

diggi12's picture

22 Jan 2023 - 5:38 am | diggi12

पुढचा भाग ?