शिकार - भाग १

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in जनातलं, मनातलं
7 Mar 2009 - 12:53 pm

(कथा पुर्ण काल्पनिक. घटना, पात्रं ह्यांचा कोणाही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी नामसाधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.)

रात्रभराच्या रिपरिपीनंतरची एक ओलीचिंब मरगळलेली कुंद सकाळ. नाल्यातलं वाहतं पाणी अडवणार्‍या अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपड्यांच्या भिंतींचे कोपरे इंच इंचभर भिजलेले, साठलेल्या पाण्यात खेळणारी उघडी नागडी मळकट मुलं आपल्या विश्वात दंग होऊन वरच्या पट्टीत एकमेकांना शिव्या देत आलेला दिवस सुरु करत होती. त्यांच्या आयांचा मधूनच आपल्या पोराला हाक मारण्यातून होणारा गलका, शेजारच्या रुळांवरुन धडधडत जाणार्‍या लोकल ट्रेन, रहीमचाचाच्या लेदरच्या वर्कशॉपमध्ये चाललेल्या मशिनची घरघर नविन सकाळ उजाडल्याचं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होती.
रात्रभराच्या पावसानं साठलेल्या पाण्याची ओल झोपडीच्या भिंतींपासुन झिरपत येऊन जमिनीत शिरली होती. येणारे सगळे आवाज बंद करुन परत झोपण्याच्या प्रयत्नात त्यानं कुस बदलली आणि जमिनीत झिरपलेलं पाणी त्याच्या उघड्या पाठीला झोंबलं. खाडकन त्यानं डोळे उघडून पाहिलं..झोंबणारी ओल तशीच पाठीशी घेऊन पोपडे उडालेल्या छपराकडं भकास नजरेनं पहात तो पडून राहिला. काही मिनीटं तशीच गेली. रात्रभर पावसामुळं पसरलेला गारवा अन् रिकाम्या पोटात भुकेचा आगडोंब ह्यामुळे झोप तशी लागलेली नव्हतीच. पहाटे पहाटे कसाबसा डोळा लागला होता इतकंच. असं पडून राहणं आपल्याला परवडणार नाही ह्याची त्याला अचानक जाणीव झाली. कसंबसं उठून तोंडावर पाणी मारुन तरतरी आणण्याचा एक फोल प्रयत्न करत अंगावर कपडे चढवले. झोपडीतून बाहेर पडताना पहिली जाणीव झाली ती पोटातल्या आगीची. खिशात चाचपून पाहिलं, दहाची एक नोट, पाचची एक आणि सात रुपयांची चिल्लर...शिट्ट! काल मंग्यासाठी गोल्डफ्लेक आणायला नको होती. आता आज पायीच जावं लागणार!

गल्लीतून बाहेर पडल्यावर पावलं आपसूक हमीदभाईच्या इराणी हॉटेलकडं व़ळली. नेहमीप्रमाणे कोपर्‍यातलं टेबल धरुन बसला.
ग्लासभर पाणी पितापिता हिशेब मांडला आणि ऑर्डर दिली 'दो डबल..कडक, एक बन, दो बैदा'! बारक्याच्या चमकलेल्या नजरेची जाणीव नाही झाली पण जाताजाता त्यानं मारलेला टोमणा मात्र ऐकू आला.."मंज्यादादा इश्टेट नाम पे करके गयेला दिखताय."
टचकन पाणी आलं डोळ्यात. साला डोळ्यात पाणी? भें**, काय होतंय काय हे? आजवर पोलिसांनी इतक्यांदा पकडून नेलं, नागडं करुन ढुंगणावर पट्ट्यानं सालं निघेपर्यंत मारलं पण एक थेंब नाय काढला डोळ्यातून...हो! मंज्यादादाला आजिबात नाही आवडायचं रडलेलं. रडलं की लाथेनं तुडवायचा. म्हणायचा, "भड्व्या, रडतो काय गांडूसारखा? मर्द आहेस, मर्दासारखा लढ!"....

मंज्यादादा! नात्याचा ना गोत्याचा. नेहमीप्रमाणे स्टेशनवर दुनियादारी करताना मंज्यादादाला एक तीन साडेतीन वर्षांचा पोरगा मुतारीपाशी सापडला. एखादी गावभवानी आई पोराला सोडून गेलेली असणार हे न कळण्याइतका मंज्या खुळा नव्हता. सरळ पोराला उचललं आणि धारावीत आणलं. त्यादिवसापासून मंज्यादादा त्या पोराचा बापच झाला. सडाफटिंग मंज्या कधी गजाबाहेर कधी गजामागे! पोराकडं कोण बघणार? मंज्याची रखेल अमिनाबीनं पोराची जिम्मेदारी घेतली. मोठ्या प्रेमानं नाव ठेवलं उस्मान. आता पोर हिंदू होतं की मुसलमान की ख्रिश्चन की आणखी कोण, कोणालाच प्रश्न पडला नाही. अमिनाबीसाठी उस्मान, मंज्यादादासाठी भड्व्या आणि उरलेल्या दुनियेसाठी उस्म्या! बस्स इतकीच ओळख! आणखी लागते तरी किती?

मंज्यादादानं, अमिनाबीनं, ह्या धारावीनं बरंच काही शिकवलं. मंज्याच्या हाताखाली शिकून पाकिटं मारत, कधी गांजा विकत, उरलेला खर्च मंज्यादादाकडून घेत ग्रॅज्युएशन केलं. आख्खी गल्ली त्यादिवशी उस्म्या बी.कॉम.म्हणुन हाका मारत राहिली. पण दुनियेनं लायकी दाखवून दिली. धारावीतल्या झोपडपट्टीसाठी उस्म्या बी.कॉम झाला ही मोठी गोष्ट होती, 'कॉर्पोरेट्स'साठी नाही. नोकरी मिळणार नव्हतीच, नाहीच मिळाली. मंज्यादादासोबत छोट्या मोठ्या झोलमध्ये कामं करुन काहीबाही कमवणं इतकाच उस्मानचा 'इन्कमसोर्स'. रडतखडत का होईना, पण बरं चाललं होतं.

त्यादिवशी मंज्यादादाला एका लॉटमध्ये चुकुन आलेलं युरोप क्वालिटीचं चरस सापडलं. ती पुडी स्वतःकडं ठेऊन बाकीचा माल पोरांबरोबर डिस्पॅच करुन टाकला. सकाळी दहापासुन संध्याकाळी सातपर्यंत दादा त्या चरसच्याच तारेत होता. संध्याकाळी अपोझ्झिशनच्या लोकांचा आवाज बंद करायची सुपारी द्यायला कॉर्पोरेटर ठाकूर आला तर मंज्यादादानं नशेत त्याच्या सगळ्या दोन नंबरी धंद्यांचा पाढाच गल्लीपुढं वाचला. वर, "अपुनकी ये झोपडपट्टी सुधारनेका तूने प्रॉमिस किया था, वो पैला दे, बाद में तेरे अपोझिशनवाले को टपकाउंगा" अशी बोंब मारली. बस्स! दादा असला तरी फक्त धारावीतल्या झोपडपट्टीतल्या गल्लीतला..पायरी विसरला मंज्या! त्याच रात्री मंज्यादादा क्रॉसिंगब्रिजवरुन रेल्वे ट्रॅकवर पडून गेला....

मंज्याच्या आठवणींनी बनचा मोठ्ठा तुकडा उस्मानच्या घशात अडकला. परवाच मंज्यादादाचा तेरावा घातला. फुल्टू हिंदूपध्द्तीनं. विधी उरकल्यावर मंज्यादादाकडं काम करणारी सगळी पोरं आपापला हिस्सा घेऊन निघून गेली. उस्मान दादाची गँग चालवू शकत नव्हताच. कोणी ऐकलंच नसतं त्याचं. तेराव्यालाच उस्मानचं दिवाळं निघालं. इतके दिवस मंज्याचा आधारतरी होता. आता पैसा कुठुन आणि कसा आणायचा, जगायचं कसं, अमिनाबीचा कँन्सरचा इलाज करायचा कसा ह्या विचारांनी त्याची कवटी ढवळून निघाली होती. भणंगगिरीपुढं आपलं माणूस गेल्याचं दु:ख कुरवाळत बसण्याइतकी ऐपत अजुनतरी नव्हती. उस्मान तोंडातला बन चघळत, समोरच्या ग्लासातल्या चहाकडं सुन्नपणे बघत बसला. इतक्यात समोरची खुर्ची सरकली. साधारण पन्नाशीचा एकजण येऊन बसला.

उस्माननं नजर उचलुन पाहिलं. एकदम पिक्चरमधल्या एखाद्या चर्चच्या प्रेमळ फादरसारखा दिसत होता समोरचा माणूस. चमकणारी भुरकट नजर, कपाळातून निघालेलं सरळ्सोट नाक, उंच गालफाडं, उन्हात रापलेला मुळचा गोरा-गुलाबी रंग आणि चेहर्‍यावर आश्वासक स्मित. "क्या हुआ भाई? भोत टाईम से देख रहा हुं, कुछ परेशानी है क्या?" म्हातारा बोलला.
जिथे सख्या नात्यातले एकमेकांना विचारत नाहीत तिथे ह्या परक्यानं दाखवलेल्या आपुलकीनं उस्मान भारावला. "वही मगजमारी चच्चा, पैसा मंगताय, पर काम नही मिलता"
"नाम क्या है तेरा?" म्हातार्‍यानं विचारलं.
"उस्मान"...
"कुछ पढेला है क्या?" म्हातार्‍यानं बसल्या जागीच इंटरव्ह्यू मांडला.
शिक्षणावर येऊन गाडी थांबल्याबरोबर उस्मान परत ढेपाळला. चहाच्या ग्लासात नजर बुडवत कुजबुजला, "बी.कॉम....सेकंड क्लास"
"क्या काम करेगा? अकाउंटंट बननेका क्या तेरेको?" म्हातारा.
"क्या साब, डान्सबारमें कॅशियर का भी काम करुंगा, कुछ है क्या बोलो! खालीपिली काय को दिमाग चाट रहेले सुब्बा सुब्बा?" उस्मान आता तडकला. इसके मां की....सकाळसकाळी टाईमपासला घेतय म्हातारं...
"देने को तो बहोत काम है मेरेपास| लेकीन पहले तेरी औकात तो जान लुं|" म्हातारा चेहर्‍यावर हसु खेळवत बोलला.
"देख मामू, आपुन बी.कॉम.भी है, कॉलेजमें अ‍ॅक्टिंग भी कियेलाय, जेबकतरेकी लाईनमें भी था, चरस-गांजा भी बेचेलाय, थोडाबहुत खर्चापानी भी दियेलाय| इतकी औकात काफी है क्या तुम्हारे काम के वास्ते?" उस्मानचा ताबा सुटत चालला होता. त्याच्या चढलेल्या आवाजामुळे तीनचार टेबलांवरची डोकी ह्या कोपर्‍याकडं वळून पुढच्या तमाशाची वाट बघायला लागली होती. हमीदभाई काउंटर सोडून आणि पक्या माल मोजायचा सोडून होणारा राडा निस्तरण्याच्या तयारीनं टेबलाकडं निघाले.

म्हातारा अजुनही शांतच होता. चेहर्‍यावरचं हसु तसंच. उस्मानच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, "उस्मान बेटा, मै तेरेको परख रहा था| हिरा है तू हिरा! बहुत दिनोंसे तलाशमें था मै ऐसेही एक असली मर्द के| चल बेटे, कही और बैठ के इत्मिनान सें बात करते है| मेरे तरफ से काम का ऑफर पक्का!"
उस्मान भंजाळला! सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्‍याकडं पहातच राहिला.
"भाईजान, उस्मानका बील भी मेरे बीलमें डाल देना| कित्ता हुआ?" उस्मानकडं पुर्ण दुर्लक्ष करुन पन्नासची नोट काउंटरवर फेकत म्हातारा मागे वळूनही न पाहता बाहेर पडला. उस्मान धडपडत टेबल सोडून स्पेलबाउंड झाल्यासारखा त्याच्यामागोमाग चालत निघाला.

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

7 Mar 2009 - 12:55 pm | अवलिया

अरे काय चाललेय काय?
चक्क धमाल मुलाने लेख लिहिला... ? अरे वा वा...

अवांतर - प्रतिक्रिया लेख न वाचता दिली आहे, सविस्तर लेख वाचुन देतो.

--अवलिया

अवलिया's picture

7 Mar 2009 - 1:03 pm | अवलिया

लेख वाचला, वातावरण निर्मिती, कथानायकाची मानसिक स्थिती अतिशय सुंदर रितीने उभी रहाते.

बाकी, याकदम झांटमाटीक स्टोरी दीख रहिले बाप!
अपन को आवड्या है...
जास्ती टैम नै लगानेका... वरना... तेरेकु मालुम है ना आपुन कैसा है...
भोत टैम लगायेगा तो ... रेल लाईन से रेल आज भी दौडती है ध्यान मे रख !
क्या.. समजा ना..?
शाम तक शेकंड पार्ट आने को मंगता !!
बस बाकी अपने कु मालुम नही!!

--अवलिया

दशानन's picture

7 Mar 2009 - 12:59 pm | दशानन

उठक्तांवर्धक सुरवात..
स्वतः सर्व पाहतो आहे असे वाटले !

पुढील भाग वाचण्यासाठी लायनीत उभा... !

लै भारी धम्या.. ! जबरा सुरवात.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Mar 2009 - 12:40 pm | घाशीराम कोतवाल १.२

राजे और नाना ने बोला वोईच होना मांगता
बाकि कुच नहि ऐसा लग रेला है कि स्लमडॉग देखरेला है
स्टोरी मस्त है मामु और आने दो जल्दी वरना खरडी डाल के परेशान करुंगा
आज हिच २ पारट आना मांगता है
बोले तो फुल्टु मस्त लिखेला है तुने मस्त जबर्दस्त‍
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

विंजिनेर's picture

7 Mar 2009 - 1:01 pm | विंजिनेर

झोपडपट्टीचा गलिच्छपणा आणि पावसाचा कुंदपणा मस्त उतरलाय!!
बाकी, सुरवात दणक्या झाली आहे.
क्रमशः योग्य जागीच पल्डा!
पुढचे भाग लवकर येउद्या....

परिकथेतील राजकुमार's picture

7 Mar 2009 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार

सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्‍याकडं पहातच राहिला.

क्या बात है धम्मु ;) मस्त एकदम, उत्कंठा ताणली आहे, पुढचा भाग येउ दे लवकर :)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

मिंटी's picture

7 Mar 2009 - 1:06 pm | मिंटी

धम्या काय रे???????? चक्क तु लेख टाकला आहेस ????? आता लेख वाचते आणि प्रतिक्रिया देते......
बाकी तुला लगेच क्रमशः चं वारं लागलेलं दिसतयं.....

लगे रहो. :)

प्रकाश घाटपांडे's picture

7 Mar 2009 - 1:07 pm | प्रकाश घाटपांडे

व्यक्ति डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. धम्या भारी लिवलय. क्रमशः वाचल्याने अजुन पुढील भाग येनार याची खात्री.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Mar 2009 - 1:15 pm | बिपिन कार्यकर्ते

धम्या बर्‍याच दिवसांनी तू मेनस्ट्रीम मधे परत आलास... बरं वाटलं. धम्याने सुरू केलेला धागा बर्‍याच दिवसांनी दिसला.

कथा एकदम कडकच. वातावरण निर्मिती क्लास. उत्तम लिखाण. पुढचा भाग लवकर येऊ दे...

बिपिन कार्यकर्ते

भाग्यश्री's picture

7 Mar 2009 - 3:10 pm | भाग्यश्री

सहमत!!
धमालचे लेख्/चर्चा काहीच नाही दिसलं बर्‍याच दिवसात..

ही कथा वाचून एकदम आश्चर्य आणि नक्की चांगलं वाचायला मिळणार या खात्रीने वाचले..
सहीच चालू आहे! बिपाशाची कोटी मस्तच! कॉफी उडाली ना भौ किबोर्डवर !! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2009 - 1:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धम्या, तू पण लिहिलेलं पाहूनच आधी आनंद झाला. आणि त्याच्या सातपट आनंद लिहिलेलं वाचून झाला. लवकर टाक भाग नाहीतर घरी येऊन "त्या दिवशीची" खरी स्टुरी सांगेन धमीला! ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

घाटावरचे भट's picture

7 Mar 2009 - 1:41 pm | घाटावरचे भट

कडक!!!

निखिल देशपांडे's picture

7 Mar 2009 - 2:40 pm | निखिल देशपांडे

छानच सुरुवात झालि आहे.....उत्कंठा ताणली आहे.....

पुढ्च्या भागा साठि वाट पाहत आहोत.... लवकर येवु द्या.....

सहज's picture

7 Mar 2009 - 2:42 pm | सहज

कडक! सुरवात एकदम दमदार केली आहेस धमु.

जास्त वेळ लावु नकोस पुढच्या भागाला. :-)

नंदन's picture

7 Mar 2009 - 3:04 pm | नंदन

सुरूवात छान झालीय. वातावरणनिर्मिती, छोटे-छोटे बारकावे मस्त टिपलेत. पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अभिजीत मोटे's picture

7 Mar 2009 - 3:19 pm | अभिजीत मोटे

सुंदर ........ दुसरा शब्दच नाही वर्णन करायला =D> =D> .

सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्‍याकडं पहातच राहिला.
...............काय उपमा दिलीय राव... :)) :))

पुढील भाग पण लवकर टाका.

............अभिजीत मोटे.

श्रावण मोडक's picture

7 Mar 2009 - 3:24 pm | श्रावण मोडक

सोडलीत पुढे तर याद राखा. हातभर लांब समीक्षा करेन आणि पंचाईत करेन. :)
अर्थात पुढील भागांच्या प्रतिक्षेत. लवकर टाकावेत.

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Mar 2009 - 6:43 pm | ब्रिटिश टिंग्या

वाचतो आहे!
पुढिल भागाच्या अपेक्षेत!

विनायक प्रभू's picture

7 Mar 2009 - 6:47 pm | विनायक प्रभू

धम्या छान लिहितोस रे तु.

यशोधरा's picture

7 Mar 2009 - 9:29 pm | यशोधरा

मस्त रे धमु!

शितल's picture

7 Mar 2009 - 9:53 pm | शितल

धम्या,
८ जुलै नंतर जी लेखणी थांबली होती ती आज सुरू झाली. ;)
एकदम जबरदस्त वातावरण निर्मीती, हा भाग मस्तच झाला आहे लवकर दुसरा लिहि. :)

लवंगी's picture

7 Mar 2009 - 10:09 pm | लवंगी

मस्तच लिहिलय रे मुला तू. लवकर टाक पुढचा भाग.

ऍडीजोशी's picture

7 Mar 2009 - 11:03 pm | ऍडीजोशी (not verified)

शाब्बास रे धम्या. झक्कास लेख.

पटापट येऊ दे पुढचे भाग.

आनंदयात्री's picture

8 Mar 2009 - 12:42 am | आनंदयात्री

उत्तम रे ढाक्या !!
खरडवह्या, खरडफळा गाजवल्यास आता ट्रॅकरवर पण तुझेच नाव दिसले पाहिजे सगळीकडे !!

विसोबा खेचर's picture

8 Mar 2009 - 12:45 am | विसोबा खेचर

वाचतो आहे, लक्ष ठेवून आहे...

तात्या.

रेवती's picture

8 Mar 2009 - 1:12 am | रेवती

सुरूवात तर झकास!
आता एकदम शेवटच्या भागाला प्रतिसाद देइन.

रेवती

टिउ's picture

8 Mar 2009 - 1:44 am | टिउ

भोत अच्छे मामु! सही जा रेला है...

फुल्ल फिल्मी स्टोरी वाटतेय. पुढचा भाग लवकर टाका...

मदनबाण's picture

8 Mar 2009 - 6:04 pm | मदनबाण

धमालराव एकदम वंट्टास मे लिखेला हय तुम्,,,बोले तो एकदम सॉलिड्ड..
पुढचा भाग लवकर येउदे.

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

अमित.कुलकर्णी's picture

8 Mar 2009 - 10:13 pm | अमित.कुलकर्णी

पहिला भाग आवडला.
पुढचे भाग वाचालया उत्सुक !

-अमित

मेघना भुस्कुटे's picture

8 Mar 2009 - 10:29 pm | मेघना भुस्कुटे

सॉलिड मजा येतेय रे वाचायला. पण धक्के देण्याच्या आणि उत्सुकता ताणून धरण्याच्या मोहापायी गोष्ट लांबवणार नाहीस अशी आशा आहे. लवकर गोष्ट पुरी कर.

प्राजु's picture

8 Mar 2009 - 10:47 pm | प्राजु

पात्र, वातावरण निर्मिती उत्तम जमली आहे.
पुढे लवकर लिही. तुझ्याकडून अशाप्रकरचं लेखन पहिल्यांदाच वाचते आहे. मस्त !!
पुढचा प्रतिसाद आता शेवटचा भाग वाचूनच लिहिन.
बाकी,
सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्‍याकडं पहातच राहिला.
हे वाक्य फारच आवडलं.. ती बिपाशा नाहीतरी तशीच दिसते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

9 Mar 2009 - 1:16 am | आनंदयात्री

>>हे वाक्य फारच आवडलं.. ती बिपाशा नाहीतरी तशीच दिसते.

अर्थाचा अनर्थ करुन आमच्या हिंदी चित्रपटांच्या अस्मितेला दुखावल्याबद्दल निषेध !! अर्थातच असहमत !!

;)

मॅन्ड्रेक's picture

9 Mar 2009 - 1:07 pm | मॅन्ड्रेक

चाबुक.
at and post : janadu.

झेल्या's picture

9 Mar 2009 - 1:26 pm | झेल्या

जोरदार बॅकग्राऊंड...

एकदम सरावलेल्या प्रोफेशनल कथाकाराच्या लेखणीतून उतरल्यासारखं वाटतंय..!

पहिल्या भागाने चांगलीच पकड घेतलीय...

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

अभिरत भिरभि-या's picture

9 Mar 2009 - 2:10 pm | अभिरत भिरभि-या

मजा आली राव !!

म्ह्रोरला भाग टाक बिगीनं !

अनिल हटेला's picture

9 Mar 2009 - 2:51 pm | अनिल हटेला

ऐसाईच बोलताये !!
एकदम कट टू कट ईष्टोरी लिखेला धम्या भाय !! ;-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मनिष's picture

9 Mar 2009 - 2:43 pm | मनिष

धम्या भाय, सही आहे. लवकर दुसरा भाग टाक आता!

चेतन's picture

9 Mar 2009 - 5:51 pm | चेतन

सही रे भाउ

बर्‍याच दिवसांनी लिहलयस पण खतरनाक

पुढील भागाची वाट पाहतोय

अवांतरः धम्या स्लमडॉगने ईन्स्पायर झाला की काय :?

चेतन (स्वरुप)

सँडी's picture

10 Mar 2009 - 8:10 am | सँडी

येक णंबर!

- सँडी

प्रभाकर पेठकर's picture

10 Mar 2009 - 8:45 am | प्रभाकर पेठकर

नुकतेच लग्न झालेले आणि कथेचे शीर्षक वाचून वाटले 'आला हाही आपल्या कंपूत चार अश्रू ढाळायला'. पण नाही. कथा विषय आणि मांडणी मस्त आहे.
पहिल्या भागात कथेचा 'पाया' पाहून नजिकच्या भविष्यातील 'उत्तुंग इमारतीचे' चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.

सुलभ शौचालयाच्या रांगेत 'घाई' असेल तर बिपाशा बासू काय माधूरी दिक्षित दिसली तरी मन रमायचे नाही.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

प्रकाश घाटपांडे's picture

10 Mar 2009 - 1:40 pm | प्रकाश घाटपांडे

सुलभ शौचालयाच्या रांगेत 'घाई' असेल तर बिपाशा बासू काय माधूरी दिक्षित दिसली तरी मन रमायचे नाही.

आता कशे? खर आहे. नैसर्गिक भुकेचा प्राधान्यक्रम वेगळा असतो. आम्हाला स्वगत मधील 'पोटाला नाही आटा आन म्हन चोटाला उटन वाटा.' उक्तीची आठवण आली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ऋचा's picture

10 Mar 2009 - 2:01 pm | ऋचा

तुला सांगु धम्या..... थोड फार सुशी वाचतेय असं वाटलं.....
फीरोज च्या जागी उस्मान वाटला....
छान लिहिल आहेस..............

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

सागर's picture

10 Mar 2009 - 2:30 pm | सागर

सु.शि.. टच प्रकर्षाने जाणवला...
कदाचित सुहास शिरवळकरांनी अशा प्रकारचे प्रसंग अनेक वेळा त्यांच्या कादंबर्‍यांतून साकारले असल्यामुळे असे वाटत असावे
पण लेखनशैली मात्र धमालरावांचीच आहे....

येऊ द्यात अजून पुढचे भाग धमालराव....
- सागर

सागर's picture

10 Mar 2009 - 2:28 pm | सागर

मस्तच धमाल्या...

सुरेख कथा ... धक्का तंत्र छान वापरले आहे...

पुढच्या भागांची प्रतिक्षा....

सागर

राजाराजे's picture

3 Jul 2009 - 2:10 pm | राजाराजे

कथेवर सु.शि. चा जबरदस्त प्रभाव जानवतो, असुदे पन लई भारी

वाटाड्या...'s picture

4 Jul 2009 - 7:39 am | वाटाड्या...

आँ एकदम ..सुटला आहेस...लेका...

टमरेल..बिपाशा...एकदम वंट्टास...आणि धम्या वाहता झाला...

- वाटाड्या...

Nile's picture

4 Jul 2009 - 8:17 am | Nile

च्यायला इथे नोकरी देणारा भेटला तरी नडग्या फोडणं काय सुटत नाय राव? ;) सोडा ते अन पुढचा भाग टाका!

श्रीयुत संतोष जोशी's picture

4 Jul 2009 - 12:17 pm | श्रीयुत संतोष जोशी

उत्कंठावर्धक सुरूवात. जरा पटापट पुढील भाग येऊ देत.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अनंत छंदी's picture

5 Jul 2009 - 5:32 pm | अनंत छंदी

=D> =D> =D> =D> =D>

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2009 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल्या, पहिला उतारा अगदी प्रस्थापित लेखकाला लाजवील असा लिहिला. नंतरच्या संवाद आणि निरिक्षणाने कथेने एक आकार घेतला.

उत्सुकता ताणली गेली आहे, सुंदर लेखन...! लगे रहो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे