तुझ्या आठवात मन चैत्रपालवी
धुंद मोग-याचा गंध लपेटून प्रीत जागवी
तुझ्या विरहात मन वैशाखवणवा
जळे तनमन, आसुसला प्राण शोधतो गारवा
तुझ्या चिंतनात मन आषाढमाया
शामरंगी घन आभाळी रेखिती काजळछाया
तुझ्या संगतीत मन श्रावणहिंदोळे
भिजल्या मातीत हिरवा अंकुर उघडतो डोळे
तुझ्या सावलीत मन शरदचांदणे
सावळ्या रात्रीच्या अंगांगी फुलली लक्ष गोंदणे
तुझ्या प्रणयात मन रंग फाल्गुनी
घननीळा, तुझ्या रूपात विरली राधा उन्मनी
प्रतिक्रिया
8 Apr 2009 - 9:50 pm | प्राजु
संपूर्ण वर्ष!!!!
तूच तू...!
जबरदस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Apr 2009 - 10:07 pm | मीनल
सर्व ऋतु यात आहेत.शिवाय पृथ्वीवरचे त्यावेळचे बदल आहेत.
प्रणयात येणारे मनाचे चढ उतार आहे. जसे की आठवण,विरह,चिंतन, संगीत.
त्यातही personification उत्तम साधले आहे.
Personification is giving human traits (qualities, feelings, action, or characteristics) to non-living objects (things, colors, qualities, or ideas).
उदा:
मोग-याने गंध लपेटून घेतला आहे आणि तो प्रीत जागवत आहे.
प्राण गारवा शोधतो आहे.
हिरवा अंकुर डोळे उघडतो आहे.
सर्वच काव्य उत्तम आहे.
मीनल.
ये लोग जो काव्य करते है ना, वे कौनसे चक्की का आटा खाते है ? :/ किसेको कोई पता है?
मुझे भी मंगानाका है.
मीनल.
8 Apr 2009 - 11:10 pm | पक्या
सुंदर कविता.
9 Apr 2009 - 7:08 am | मनीषा
सुंदर कविता ...
9 Apr 2009 - 7:18 am | उमेश कोठीकर
क्रान्ति,सर्व सोहळे आले प्रेमाचे वर्षातील. खूप सुंदर.
9 Apr 2009 - 7:21 am | अनिल हटेला
सुंदर कविता !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
9 Apr 2009 - 7:26 am | मदनबाण
क्रान्ति ताय लयं भारी !!!
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
9 Apr 2009 - 11:23 am | अवलिया
मस्त :)
--अवलिया
9 Apr 2009 - 11:24 am | विशाल कुलकर्णी
सुरेख !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
9 Apr 2009 - 12:13 pm | जागु
सुंदर.
9 Apr 2009 - 3:48 pm | जयवी
क्या बात है....... क्रान्ति..... तेरा जवाब नही !!
किती सुरेख गुंफला आहेस पूर्ण वर्षाचा प्रणय सोहळा....!! अ प्र ति म !!
10 Apr 2009 - 7:23 am | दशानन
सुरेख !
=D>