ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर.
जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं.
सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे.
पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत.
मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं.
या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक.
मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक.
मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो.
मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात.
आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे.
जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती.
हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती.
!जय श्री राम!
प्रतिक्रिया
5 Aug 2020 - 3:40 pm | विजुभाऊ
बाबराचे पण आभार माना.
त्याने तेथे मशीद बांधली नसती तर ती पाडण्याची वेळच आली नसती. आणि मशीद पाडली गेली नसती तर त्याजागी मंदीराचा शिलान्यास करायचीही वेळ आली नसती
5 Aug 2020 - 7:39 pm | गणेशा
इतिहासाच्या घटना
-------------
पुन्हा मुळ लेख वाचला...
वरती मी रिप्लाय दिला होताच आजचा दिवस खास, आणि त्यात प्रस्तावना देण्याची गरज नव्हती..
पुन्हा लेख वाचताना लक्षात आले, की मंदिर, श्री राम या पेक्षा ही मोदींनी करून दाखवले हे जास्त सांगण्यात आले..
मी त्यांचा जाहीर विरोधक आहे.. आपल्याला नाटकी माणसे आवडत नाहीत.. पण तीन तलाख, काश्मिर आणि राम मंदिर या मुद्द्यावर मला आताचे सरकार योग्य वाटते..
मात्र मूळ लेखात लिहिलेले, नोटबंदी, अर्थव्यवस्था ह्या एकदम फसलेल्या गोष्टी. अत्यंत चूकीच्या पद्धतीने हाताळल्या..
याखेरीज सामाजिक ऐक्य बिघडवण्यात हि या सरकारचा जास्त हात आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.. आणि सोशल वार यांचीच निर्मिती आहे..
याचा अर्थ असा नाही मी की आधीच्या काँग्रेस सरकारला माझा पुर्ण पाठींबा किंवा अंध भक्ती होती, त्यांच्या हि बऱ्याच भ्रष्ट गोष्टींना माझा कायम विरोध होता..
हे सांगण्याचे कारण की तेंव्हा विरोधात बोलले तरी कोणी मनावर घेत नव्हते, जे बरोबर ते बरोबर असे होते, आता चूक असो वा बरोबर मोदीच अंतिम सत्य आहेत, नाहीतर तुमच्यावर शाब्दिक हल्ले, देशविरोधी इतकेच काय तुम्ही हिंदू विरोधी असे हि बोलले जाते..
माझ्या वयक्तिक मताने.. बाबर हा बाहेरून आलेला मुस्लिम होता, आणि नंतर बांधलेल्या मशिदी ह्या बऱ्याचदा मंदिर तोडून बांधलेल्याच होत्या.. हे माझे वयक्तिक मत आहे, त्यामुळे एक हिंदू भावनिक किणार या मंदिर प्रकरणाला होती..
असो..
तरीही भाजपा सरकार मुळेच ह्या मंदिराच्या बाजूने निकाल लागला हि सत्य परिस्थिती आहे..
या हि पुढे जाऊन, राम मंदिर प्रेम की राजकारण ह्यात नक्कीच अंतर असेल असे माझे साधे मन म्हणत आहे..
बाकी लेख हा पुर्ण इतिहासात्मक किंवा राममंदिर किंवा रामावर आधारित हवा होता.. पण
येथे हि पुन्हा मोदीच श्रेष्ठ हे ठसवण्यात आल्या सारखे लिहिलेले आहे..
असो प्रत्येकाचे मत वेगळे असते.. त्याचा आदर आहेच..
असो जास्त बोलत नाही... एक लिंक सापडली त्रिपाठी यांनी लिहिलेली ती पहिल्या लाईनीत दिली आहे.
तोच इतिहास असा माझा दावा नाही, पण त्यात घटना व्यवस्थित दिल्या आहेत, काय काय झाले बाबर नंतर..
बघा वाचून आणि अभिप्राय सांगा.. काय खरे काय खोटे माहित नाहि..
5 Aug 2020 - 8:11 pm | कानडाऊ योगेशु
आज दिवसभर मनाची एखादा सण असावा तशी उत्सवी अवस्था होती.
(मी कट्टर मोदी समर्थक नाही आहे पण मोदींना पर्याय म्हणुन ओवेसी,रागा आणि उठा शपा ह्यांच्याकडे पाहायची हिंमत होत नाही.)
5 Aug 2020 - 8:48 pm | Gk
मोदी नव्हते तेंव्हा देश चालत नव्हता का ?
मोदी नाहीत म्हणून जसोदाबेन उपाशी राहिली का ?
ते स्वतःच बोलतात , मी झोला घेऊन जाईन तुम्ही आत्मनिर्भर व्हा
मोदींशीवाय कोण आहे का ? असे विचारणारे मूर्ख आहेत , मोदी स्वतः बोलतात , आत्मनिर्भर व्हा , आणि हे मोदी मोदी करत नाचतात, मोदींचा वैचारिक पराभव त्यांचे भक्तच करतात
5 Aug 2020 - 9:53 pm | कानडाऊ योगेशु
इतके सैरभैर का होताय भौ!
तुमचे बरोबर आहे. मोंदीचा पराभव त्यांचे भक्त करतात आणि मोंदीना मोठे त्यांचा पराकोटीचा द्वेष करणारे नमोरुग्ण करतात.
5 Aug 2020 - 8:32 pm | Bhakti
मी देखील आजच्या या सुवर्णक्षणाचा संबंध कोणत्याही राजकारणाशी लावू इच्छित नाही.पण ही खुप मोठी प्रक्रिया होती.आधी बाबरच आक्रमण, इंग्रजांची दुफळी, हिंदूंची घुसमट, वैज्ञानिक रीतीने सिद्ध होऊनही न्यायालयाची २ पिढ्यांची लढाई.आणि शेवटी रामलल्लाचा आज ५०० वर्षांपासूनचा वनवास संपणे. ज्यांच्यामुळे घडलं त्यांच कौतुक .
5 Aug 2020 - 11:13 pm | अर्धवटराव
आज खरच सोनियाचा दिनु आहे.
याच साठी केला होता अट्टहास... हिच अनेकांची भावना असेल आज.
अवांतरः
टेक्नीकली हा मंदीर-मशीद वाद न्यायालयाने सोडवला आहे. त्यामुळे कोण्या एका माणसाला/संघटनेला श्रेय देता येत नाहि.
पण.. गोष्टी खरच इतक्या सरळ असतात का? तसं वाटत नाहि. संवेदनशील प्रकरणांत सरकार आणि न्याययंत्रणेत काहि ना काहि अंडरस्टँडींग नक्कीच असेल.
पुरातत्व विभागाने आपले अहवाल नि:संदीग्धपणे मंदीराच्या बाजुने दिले. सरकार पातळीवर अभय नसतं तर त्यात फेरफार झाले नसते काय? सांगता येत नाहि. उदारणार्थ, लालुंनी स्थापन केलेल्या समितीने गोध्रा रेल्वे जळीतकांड एक अपघात होता म्हणुन निर्णय दिला होता.
शेवटच्या चरणात न्यायीक प्रक्रीयेची रोज सुनावणी होणे, इतर कुठल्याच पक्षाला/पिटीशनला एका विशिष्ट तारखेनंतर त्या प्रकरणी ढवळाढवळ न करु देणे, सगळ्या संबंधीत पार्ट्यांना स्ट्रीमलाईन करायला आवष्यक तिथे नोकरशाहीचा वापर करणे... हे सर्व भाजपाची केंद्रात आणि राज्यात स्वबळावर सत्ता नसताना झालं असतं काय? शंकाच आहे. भाजपचे सरकार असुन देखील मोदि पं.प्र. नसते तर हे घडलच नसतं का? सांगता येत नाहि. शक्यतो इतर कुठल्याही भाजप पं.प्र. ने हे प्रकरण तडीस नेलच असतं... मोदिंच्या बाबतीत मात्र हि गॅरेण्टी अगदी १००% होती.
कोरोना प्रकरण नसतं तर सिनियर भाजपेयी नेत्यांचा आणि इतर मान्यवरांचा सोहळा सहभाग असताच असता. निदान अडवाणी, जोशी मंडळी तरी नक्की आली असती. मोहन भागवतांनी तसाही अडवाणींचा उल्लेख केला आपल्या भाषणात.
रामनामाचा आनंद भोगण्याचा दिवस आहे. उगाच खुसपटी काढुन आपल्याच आनंदात विरजण पाडुन घेऊ नये.
_/\_ जय श्री राम _/\_
5 Aug 2020 - 11:26 pm | धर्मराजमुटके
आज खरोखरीच आनंदाचा क्षण आहे. राम मंदिर व्हावे ही इच्छा बाळगणार्या सर्वांनाच आज आनंद झाला आहे. वर उल्लेख केलेल्या प्रमाणे काही व्यक्तींना राम मंदीर प्रकरणी मोदींचे योगदान कमी व नगण्य वाटते मात्र देशभर डाव्यांनी, महाराष्ट्राच्या जा.रा. इत्यादींनी पंतप्रधानांनी धार्मिक कार्यक्रमास हजेरी लावू नये, धर्मनिरपेक्षता जपावी अशा जो लकडा लावला होता त्यास न जुमानता ह्या कार्यक्रमास हजेरी लावली तेच माझ्यामते सर्वश्रेष्ठ योगदान आहे.
राम मंदिराची अजून एक लढाई साता समुद्रापार न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर देखील लढली गेली. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला.काही मुस्लिम संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता मात्र त्यांच्या विरोधास योग्य ती जागा दाखविली गेली.
कलम ३७० हटविणे, राम मंदिर बांधणे हे आपल्या वचननाम्यातील दोन महत्वाचे वायदे पुर्ण केल्यामुळे माझे पुढील लोकसभेचे मत भाजपालाच. मग पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणी का असेना.
9 Aug 2020 - 3:28 pm | माझा_डूआइडी
सजीव माणसाचे चित्र हे हराम आहे.
10 Aug 2020 - 1:39 am | गामा पैलवान
माझा_डूआइडी,
राम सजीव आहे तर! प्रगती आहे एकंदरीत.
आ.न.,
-गा.पै.
6 Aug 2020 - 12:18 am | Gk
व्हॅटसप वर नवा राम मंदिर ईमोजी आला आहे
व्हॅटसप इमोजी वर वर जिथे गाडी चा लोगो आहे त्या गटात आहे
दर्शन घ्यावे
6 Aug 2020 - 1:54 am | गामा पैलवान
मोदी है तो मुमकीन है.
-गा.पै.
6 Aug 2020 - 7:35 am | Gk
रामाचे वारस आले नव्हते का ? भारतातील श्रीमंत 10 स्त्रियांत आहे म्हणे ती कुणीतरी राणी.
15 ऑगस्ट 47 ला चांगले महाल , सोने नाणे , शेतजमीन , प्लॉट , हे सगळे खजिने राज वारसांना मिळाले
आणि सामान्य लोकांना इतिहासाची प्रॉपर्टी मिळाली
खंड ( पुस्तकांचे)
खिंड
खिंडार पडलेले बुरुज
खंदक
खंडहर
खिद्रापूर वगैरे देऊळ
खांब मोडके , लेण्यांमधले
खापराचे तुकडे म्युझीयममध्ये
6 Aug 2020 - 9:30 am | सुबोध खरे
भारतातील श्रीमंत 10 स्त्रियांत आहे म्हणे ती कुणीतरी राणी.
चंपाबाई
याला काही पुरावा वगैरे?
6 Aug 2020 - 9:44 am | Gk
https://trendcelebsnow.com/diya-kumari-net-worth/
दिया कुमारी
याशिवाय अजून काही राज घराणी आहेत
शिवाय , नंतर अयोध्येची फाळणी होऊन 5 तुकडे झाले , त्यातून नाग , निषाद वगैरे अजून वंश उत्पन्न झाले. नळराजा , नहूश , शुद्धोधन , गौतम बुद्ध हे सगळे रघुवंशीच
6 Aug 2020 - 10:40 am | सुबोध खरे
यात श्री रामाचें वारस आहेत असं कुठे म्हटलंय?
राज घराणी तर लैच हैत. त्यांचं काय करताय?
6 Aug 2020 - 11:12 am | Gk
https://youtu.be/rh5SgXh-mLQ
रामाचे वंशज
6 Aug 2020 - 11:52 am | सुबोध खरे
त्यांनी दावाच केला आहे ना? त्यात काय मोठंसं?
काही लोक आपण शिवाजी महाराजांचे पाईक असून शिवाजी महाराजांचे "जाणता राजा" हे बिरुद मिरवतात.
काही मांजरं अंतर्गोल आरशात पाहून मिशा फेंदारून वाघ असल्याचा दावा करतातच ना
मग तुम्ही करा कि दावा कि मी औरंजेबाचा वंशज आहे.
हा का ना का
6 Aug 2020 - 11:21 am | बाप्पू
gk आणि mrcoolguynice
तुमची जळजळ होतेय हे स्पष्ट दिसतेय म्हणून तुम्ही तर्कहीन आणि वयक्तिक प्रतिसादांचा रतीब घालताय इथे. हजारो मंदिरे पाडून तिथे मुद्दामहून मस्जिदी उभी करायची, इतर धर्मियांचे खचीकरण आणि अपमान करून स्वतः ला श्रेष्ठ समजणाऱ्या संस्कृती चे पाईक तुम्ही.. तुमच्याकडून तर्कशुद्ध प्रतिसादाची अपेक्षा फोल आहे. असो.
मोदी स्वतः कुठेही येऊन फक्त मी आणि माझ्या मुळेच राममंदिर झाले असे म्हणाले नाहीयेत. त्यामागे लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारीं वाजपेयी आणि असंख्य कार्यकर्ते आहेत आणि हे मोदींनी कालच्या भाषणात मान्यच केलेय. आणि ते जगजाहीर आहे.
सध्या मोदी पंतप्रधान आहेत त्यामुळे ते समारंभास उपस्थित राहिले पण म्हणून ते पूर्ण श्रेय घेतायेत... किंवा त्यांच्या हातात हे फळ आयते पडले वगैरे वगैरे असे बिनबुडाचा आरोप तुम्ही त्यांच्यावर इंडिरेक्टली करता आहात. यातून तुमचा फक्त मोदीद्वेष आणि दिसून येतो
असे श्रेय घेण्याचे काम ( करून दाखवले वगैरे ) चिवसेनेत चालते, तिथे त्यासाठी खास माणसे ठेवली जातात आणि वर्तमानपत्र सुद्धा चालवले जाते. पण आता एका सो कॉल्ड धरनिरपेक्ष पक्ष्याच्या आधारामुळे आणि काकांच्या धाकामुळे आपला उत्साह त्यांना दाबून ठेवण्याखेरीज पर्याय नाहीये.
6 Aug 2020 - 12:01 pm | Gk
आयते फळ मिळाले , हे मी बोललो नाही
मी अभिनंदन बोललो आहे , नवीन व्हॅटप वर चित्र आहे , ते दिले आणि हा आता ऐतिहासिक खजिना व रामाच्या वंशाच्यावर प्रतिसाद लिहिला आहे
बाकी मोदी आयते वगैरे मी लिहिलेले नाही
6 Aug 2020 - 12:29 pm | Gk
आयते मिळाले वगैरे मोदीच राहुल गांधीबद्दल बोलतात,
पण तसे काही नसते , काही ना काही प्रत्येकाला आधीपासून मिळालेले असतेच , मोदींचे वडील पंतप्रधान नव्हते , पण म्हणून काही मोदींनी सुरुवात आदिमानवाच्या गुहेतून लाकूड घासून नव्हती केली.
मागचे घ्यावे , पुढंचयानाही द्यावे , अशी आमची काँग्रेसी संस्कृती आहे , त्यामुळे कुणाला काही मिळत असेल तर आम्ही पोट दुखावून घेत नाही, राफेल आल्यावरही पूर्वीच्या 3000 शस्त्रात 5 नवीन आले , असाच आनंद आम्ही मानतो.
मनुष्याला संचित , क्रियमाण व प्रारब्ध अशी 3 फळे भोगावी लागतात, कुणी काही आयते वगैरे म्हणत असेल तर ते प्रारब्धाचे फळ असते.
8 Aug 2020 - 11:11 am | सुबोध खरे
काँग्रेसी संस्कृती
संस्कृतचा द्वेष करणारे आपली संस्कृती आहे म्हणून बोलतात
याचा अर्थच असा आहे कि तुम्ही किती वल्गना केल्या तरी संस्कृत/ संस्कृती तुमच्या आत्म्यातून जात नाही.
जसे भारताच्या आत्म्यातून "राम" जाणारच नाही. मग
बाकी शब्द छल कितीही करा.
8 Aug 2020 - 11:14 am | सुबोध खरे
मागचे घ्यावे , पुढंचयानाही द्यावे , अशी आमची काँग्रेसी संस्कृती आहे
अशी नाही तर
मागच्यानी खावे आणि पुढंचयानी ही खावे ,
एकमेका लांच देऊ अवघे होऊ श्रीमंत
अशी आमची काँग्रेसी संस्कृती आहे
10 Aug 2020 - 9:45 am | महासंग्राम
नरसिंह रावाचं पार्थिव दिल्लीत जाळू न देणारी हि काँग्रेसची संस्कृती आहे
6 Aug 2020 - 2:23 pm | चौकस२१२
वयक्तिक प्रतिसादांचा रतीब घालताय इथे
अगदी बरोबर खास करून स्वतःला "कुल" म्हणवणारी घाणेरड्या मनोवृत्तीचे दर्शन, घडवणारी व्यक्ती...
मग सतत कमोड काय , अर्धनग्न काय आणि "फ... अप" काय
मुद्दा नसला कि हे
6 Aug 2020 - 1:41 pm | Gk
शिवसेना आम्हीच पाडली असेच सांगताहेत ना ? मग बिघडले कुठे ?
अडवाणींनी कोर्टात तो मी नव्हेच असे सांगितले म्हणे
6 Aug 2020 - 1:58 pm | रात्रीचे चांदणे
शिवसेना आम्हीच पाडली असेच सांगताहेत ना ?...........
नाही.
शिवसैनिकांनी पाडली असेल तर अभिमान आहे असे शिवसेना सांगत होती. अत्ता शिवसेना काहीच सांगत नाही.
6 Aug 2020 - 2:02 pm | Gk
असू दे
अडवाणी तर तो मी नव्हेच असेच म्हणणार , शेंगदाणे मोदी शहाने नेले, फोलपटे कुठे उचलत बसणार ?
म्हणून मी शेंगदाणे खाल्ले नाहीत , ते बिचारे असेच बोलणार
7 Aug 2020 - 10:02 am | सुबोध खरे
मोगा खान
जहाँ राम का जन्म हुआ था
मंदिर वही बनायेंगे
असे सोमनाथ ते काशी आणि अयोध्या म्हणत कोण रथ चालवत होते?
बाकी जळजळ होते आहे तर अडवाणी मुरली मनोहर जोशी याना बोलावले नाही म्हणून मनाचे समाधान करून घ्यायचे असेल तर घ्या
पण मंदिर वही बन रहा है हि वस्तुस्थिती मात्र स्वीकारावीच लागेल
7 Aug 2020 - 10:05 am | सुबोध खरे
जखमेवर मीठ चोळणे कशाला म्हणता येईल?
कमल नाथ यांनी हनुमान चालिसा म्हटला
प्रियांका वाद्रा आणि राहुल गांधी जय श्रीराम म्हणत आहेत
अजून किती अच्छे दिन हवे आहेत?
असदुद्दीन ओवैसी ने रामरक्षा म्हणायला हवे आहे का?
7 Aug 2020 - 8:15 pm | Gk
तुम्हाला ह्यातले काय काय येते ??
10 Aug 2020 - 10:00 am | सुबोध खरे
राम रक्षा येते कि!
7 Aug 2020 - 8:14 pm | Gk
बाबरी मशीद पाडल्यानंतर बिजेपी नेते सुंदर सिंग भंडारी यांच्या तोंडचं वाक्य - "बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली". त्यावेळेला किती शिवसैनिक घुमटावर चढले, कितींनी हातोडा मारला याचा पुरावा शोध्णं कठिण आहे. पण तुम्हि तुमच्याच नेत्यांचं भाष्य मान्य कराल कि नाहि? अडवाणींनी सुद्धा त्यावेळेला हात वर केले. म्हणजे जेंव्हा गरज असते, हिंदु खतरेमे असतो तेंव्हा तुम्हि दारं खिडक्या लावुन घरी बसणार. थोडक्यात तुमचा "तो मी नव्हेच" मधला लखोबा लोखंडे होणार. आणि सगळं आलबेल झाल्यावर, ऐटित क्रेडिट घ्यायला सगळ्यात पुढे. काय, बरोबर ना...
7 Aug 2020 - 9:14 pm | बाप्पू
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीनामे लिहिले होते..
आणि अफजलखानाला देखील आपण घाबरलोय असे सांगितले होते. पण दोन्ही वेळेला नंतर काय झाले हा इतिहास आहे....
तसेच बाबरी मशिदी च्या बाबतीत कित्येक नेत्यांनी जे घडले कदाचित उघडपणे मान्य केलेही नसेल पण ते महत्वाचे नसून आज काय झाले ते इतिहासाच्या पानात नक्की च लिहिले जाईल.
स्थळ वेळ काळ परिस्थिती पाहून राजकारण करावे लागते मोगा भाऊ..
बाकी तुमच्यात आणि तुमच्या आका (पप्पू, खुजलीवाल, ओवेसी वगैरे) यांच्यात खरं बोलायची एवढीच खुमखुमी असेल तर मुगलांनी आणि इतर इस्लामी आक्रमकानीं हजारो मंदिरे आणि प्रार्थना स्थळे ( त्यात अयोध्या पण आले ) पाडून जबरदस्ती मशिदी उभ्या केल्यात हे उघडपणे बोलून दाखवा.. !
मग पुढे बोलू..
7 Aug 2020 - 10:10 pm | कोहंसोहं१०
मंदिराच्या बाबतीत हिंदूंनी जास्तच सहिष्णुता दाखवली म्हणायला पाहिजे. राम कृष्ण हे सर्व इथले पूजनीय आहेत आणि त्यांचे मंदिर जन्मभूमीवर बनणार नाही तर काय पाकिस्तानात आणि अरबस्तानात बनणार? तरीही हिंदूंनी सहिष्णुतेच्या मार्गाने अगदी न्यायालयीन लढाई ३० वर्षे लढवून आणि अनेक विघ्ने पार पाडून मंदिर बनवायला घेतले आहे.
जगातल्या इतर कोणत्याही धर्माच्या लोकांनी इतका संयमितपणा दाखवला असता हि शक्यता खूपच कमी आहे.
एक साधा प्रश्न - जर मोहम्मद पैगंबरांच्या जन्मभूमीवरील प्रार्थनास्थळ दुसऱ्या धर्माच्या लोकांनी आक्रमणात पाडले असते तर सद्यपरिस्थितीत तेथील मुस्लिम लोकांनी त्यांचे प्रार्थस्थळ उभे करायला न्यायालयीन मार्ग अवलंबून धीराने आणि नेटाने ३० वर्षे लढाई लढली असती का?
५०० वर्षापूर्वीचे चर्च म्युझियम एका झटक्यात मशिदीत रूपांतरित करण्याच्या आणि इतर घडणाऱ्या जसे की इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला करणे, खोदकामात इतर धर्माच्या निगडित काही गोष्टी सापडल्या जसे की मूर्ती तर त्या नष्ट करणे असे प्रकार पाहता वरील शक्यता ना च्या आसपास आहे.
रिझवान अहमद यांनी काही मुद्दे खरेच खूप छान मांडले आहेत या विडिओ मध्ये. अश्या विचारांची समाजाला जास्त आवश्यकता आहे.
https://www.youtube.com/watch?v=gyryX0Owq9U
8 Aug 2020 - 7:42 am | चौकस२१२
+१ आनि बाप्पू न पन +१
7 Aug 2020 - 10:46 pm | Gk
https://youtu.be/zxySITIhz40
अयोध्या करती है आव्हान
गीत रवींद्र जैन
.....
अयोध्या करती है आव्हान,
ठाट से कर मंदिर निर्माण,
शीला की जगह लगा दे प्राण,
बिठा दे वहां राम भगवान ।
सजग हो रघुवर की संतान,
ठाट से कर मंदिर निर्माण ।
हिन्दू है तो हिन्दुओ की आन मत जाने दे,
राम लला पे कोई आंच मत आने दे,
कायर विरोधियो को शोर मचाने दे,
जय श्री राम,
कायर विरोधियो को शोर मचाने दे,
लक्ष्य पे रख तू ध्यान ।
अयोध्या करती है आव्हान,
ठाट से कर मंदिर निर्माण ॥
मंदिर बनाने का पुराना अनुंबध है,
सब तेरे साथ पूरा पूरा प्रबंध है,
कार सेवको के बलिदान की सौगंध है,
जय श्री राम,
कार सेवको के बलिदान की सौगंध है,
बढ़ चल वीर जवान ।
अयोध्या करती हैं आव्हान,
ठाट से कर मंदिर निर्माण ॥
इत शिवसेना उत बजरंग दल है,
दुर्गावाहिनी में शक्ति प्रबल है,
प्रण विश्वहिंदू परिषद का अटल है,
जय श्री राम,
प्रण विश्वहिंदू परिषद का अटल है,
जो हिमगिरि की चट्टान ।
अयोध्या करती है आव्हान
ठाट से कर मंदिर निर्माण ।
जिस दिन राम का भवन बन जाएगा,
उस दिन भारत में राम राज आएगा,
राम भक्तो का ह्रदय मुस्काएगा,
जय श्री राम,
राम भक्तो का ह्रदय मुस्काएगा,
खिलते कमल समान ।
अयोध्या करती है आव्हान
ठाट से कर मंदिर निर्माण ।
सजग हो रघुवर की संतान
ठाट से कर मंदिर निर्माण ।
॥ जय श्री राम ॥
7 Aug 2020 - 10:47 pm | Gk
रवींद्र जैन आंधळे होते तरी त्यांना शिवसेना दिसली.
महाराष्ट्राची सत्ता गेल्यापासून भाजप्याना डोळे असूनही शिवसेना दिसायची बंद झाले आहे.
8 Aug 2020 - 11:19 am | बाप्पू
G. K उर्फ मोगा भाऊ.. बाकी सगळं ठीक आहे.. पण तुम्ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने किल्ला लढवता आहात हे वाचून डोळे पाणावले..
अच्छे दिन ते हेच का??
8 Aug 2020 - 10:43 pm | Gk
भाजपावालेही मागची 35 वर्षे बाळासाहेबांच्या नावे साक्षात करवा चौथ करत होते म्हणे
आणि 35 वर्षांनी भाजपा रिया चक्रवर्ती झाली पण सेना म्हणजे सुxxxx नव्हे , 1 दिली हाकलून आणि 2 आणले
10 Aug 2020 - 9:59 am | सुबोध खरे
मोगा खान शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने किल्ला लढवत आहेत
अजून किती अच्छे दिन हवे आहेत?
8 Aug 2020 - 11:27 am | सुबोध खरे
कमल नाथ यांनी हनुमान चालिसा म्हटला
प्रियांका वाद्रा आणि राहुल गांधी जय श्रीराम म्हणत आहेत
मोगा खान शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने किल्ला लढवत आहेत
अजून किती अच्छे दिन हवे आहेत?
असदुद्दीन ओवैसी ने रामरक्षा म्हणायला हवे आहे का?
9 Aug 2020 - 3:26 pm | माझा_डूआइडी
त्यात चुक का आहे? राजकार्नात सगळं चालू शकते.
10 Aug 2020 - 9:58 am | सुबोध खरे
चूक कोण म्हणतंय?
पण ज्यांनी राम हा काल्पनिक आहे असे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्रात म्हटलंय.
त्यांनीच त्याचे स्तोत्र म्हणावे यापेक्षा नैतिक पराभव कोणता असावा ?
8 Aug 2020 - 4:31 pm | डँबिस००७
मोगा खान,
अब बस भी करो,
सिर्फ बर्नॉल लगाओ, जलेपे बस वोही काम आता है !!
10 Sep 2020 - 2:57 pm | Gk
https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulen...
In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques.
It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone.
वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे
दाम करी काम वेड्या दाम करी काम रे