ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर.
जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं.
सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे.
पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत.
मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं.
या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक.
मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक.
मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो.
मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात.
आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे.
जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती.
हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती.
!जय श्री राम!
प्रतिक्रिया
5 Aug 2020 - 9:55 am | प्रचेतस
काळाची गती अगाध असते. ज्यापायी इतर लोकांनी अनन्वित कष्ट केले, त्यांचं फळ मोदींच्या हाती अलगद पडले.
5 Aug 2020 - 10:18 am | प्रसाद_१९८२
अलगद ?
श्री रामजन्मभुमी आंदोलनात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा सक्रिय सहभाग होता. आदरणीय लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या जी रथयात्रा काढली होती त्याचे सारथ्य व नियोजन श्री मोदींनी केले होते. सुप्रिम कोर्टात राम मंदिर सुनावणी दररोज व्हावी म्हणून मोदींनी व योगी आदित्यनाथ यांनी सातत्याने प्रयत्न केले.
या शिवाय राम मंदिर भुमीपुजनासाठी केंद्रात भाजपा सरकार यावे लागले
नाहीतर या केसची सुनावणी पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस सातत्याने होती.
5 Aug 2020 - 11:52 am | प्रचेतस
तेव्हा मोदींचा सक्रिय सहभाग असेलही/नसेलही पण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, साध्वी ऋतूंभरा, उमा भारती, विनय कटियार, अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि इतरही अनेक करसेवक ह्यांचा खूपच जास्त प्रमाणात सहभाग होता.
5 Aug 2020 - 12:41 pm | प्रसाद_१९८२
अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, साध्वी ऋतूंभरा, उमा भारती, विनय कटियार, अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि इतरही अनेक कारसेवकांचा सहभाग कुणी नाकारल्याचे वाचण्यात/ऐकण्यात आजवर तरी आले नाही.
--
तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे ?
5 Aug 2020 - 12:49 pm | प्रचेतस
ह्यापैकी हयात असलेली कोणीच मंडळी आज अयोध्येत नाहीत किंवा भूमिपूजन समारंभाचे त्यांस आमंत्रणही नाही. इतकेच.
5 Aug 2020 - 1:55 pm | mrcoolguynice
सोने की थाली में जोना परोसा
अरे खाए गोरी का यार, बलम तरसे रंग बरसे...
अरे लौंगा इलायची का बीड़ा लगाया
चाबे गोरी का यार, बलम तरसे रंग बरसे ...
अरे बेला चमेली का सेज बिछाया
हाँ बेला चमेली का सेज बिछाया
सोए गोरी का यार, बलम तरसे रंग बरसे ...
5 Aug 2020 - 2:06 pm | प्रसाद_१९८२
तुम्ही उल्लेख केलेल्या व हयात असणार्या मंडळीना या समारंभासाठी बोलावले असते तर मोदी विरोधी म्हटले असते की जे हयात नाहीत त्यांना का नाही बोलावले. आता अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे वय पाहाता त्यांना आमंत्रण नसेल दिले. शिवाय भुमीपुजन मोदींच्या हस्ते होऊ नये असे ज्यांना वाटते ते काहीही तर्क लावू शकतात.
5 Aug 2020 - 2:38 pm | mrcoolguynice
या सोहळ्याला सुमारे १७६ निमंत्रित व्यक्ती यांचे
सरासरी वय सुमारे ७५ वर्षे असावे.
त्यामुळे वयोमानानुसार आमंत्रण, हा दावा मोदी भक्तांचा बिनडोकपणा वाटतो.
5 Aug 2020 - 3:03 pm | चौकस२१२
'....भूमिपूजन समारंभाचे त्यांस आमंत्रणही नाही'
काही करून येन केन प्रकाराने खुसपट काढायचं ते हेच...
तुम्हाला कधी पासून अडवाणींचा कळवळा ?
हे म्हणजे कसं माहिती का... वाजपेयी वारले तेव्हा हीच कोलेकुई चालू झाली होती तसेच त्यावेळी काय काय तारे तोडले ... ... "आम्हाला ( बिगर भाजपावाले) वाजपेईई कसे वंदनीय होते ( खरा अर्थ हा कि या मोंदींपेक्षा वाजपेयी चंगले वैगरे..)
कोण लक्ष देतो तुमचयकडे ...बसा ठणाणा करत...
खुलासा( मंदिर हे केवळ एक प्रतीक आहे ,,,मुख्य हे आहे कि हिमतीने देशाच्या आणि बहुसंख्यांच्या अपेक्षांकडे वर्षनुवर्षे काँग्रेस ने जे मुद्दामून दुर्लक्ष केले ते बाजूला सारून काही खंबीर निर्णय घेणारे सरकार मिळाले म्हणून माझ्यासारखा निधर्मी पण या विचारांना साथ देतो )
5 Aug 2020 - 3:11 pm | mrcoolguynice
ज्याप्रमाणे मॅच चालू असताना अर्धनग्न चिअरगर्ल्स नाचत असतात. त्यांचा मॅचशी संबंध फक्त टणाटण उद्या मारणे याकडेच असतो, कोण आउट झाला कोण चौके मारतो याचे त्यांना घेणंदेणं नसतं...
त्याचप्रमाणे, परदेशात राहून , भारतीयांना शहाणपण शिकवणाऱ्या वैचारिक अर्धनग्न चिअरगर्ल्स टनाटना नाचू लागल्यात .
5 Aug 2020 - 4:19 pm | चौकस२१२
"थंड" डोक्याचं माणसा अरे काय ते एक ठरव
तुझ्या म्हण्याप्रमाणे मी दोन्ही एकाच वेळी करणे अवघड आहे रे बाबा .."परदेशात वेस्टर्न कमोडवर बसून वर्षानुवर्षे एकाहाताने टिशशू पेपर रगडत बसू आणि अर्धनग्न नर्तकी सारखे पण नाचू"
असो एकूण तुझी एकूण सटकलेली दिसते.. तुझ्यआ सारखे "नग्न " प्रतिसाद तशाच भाषेत देता येतील मला पण ( परदेशात असून सुद्धा) पण त्या पातळीवर जाण्याची इच्छाच नाही..
तू मात्र सावर रे रे बाबा
5 Aug 2020 - 4:39 pm | mrcoolguynice
दोन वेगवेगळ्या प्रतिक्रियेतील गोष्टी एकत्र करण्याचा चौकसपणा करू नका.
आणि वर्ष्यानुवर्षं त्याचं त्याचं घासून गुळगुळीत झालेल्या चिपळ्या आता तरी वाजवत बसू नका. आवरा ...
5 Aug 2020 - 3:12 pm | प्रचेतस
आलात व्यक्तिगत प्रतिसादावर.
उत्तम.
तुमच्याकडून दुसरी अपेक्षाही नाही.
5 Aug 2020 - 3:17 pm | प्रमोद देर्देकर
ते येणारच प्रचेतस भावु त्यांचा तोच तर अजेंडा तोच आहे आणि तोच राहणार.
हे तेच ते दमामी, फिलॉसॉफर, वगैरे वगैरे अणि अगणित आयडी बॅन होवुन सुध्दा परत परत फिरुन नव्याने कुठल्याही कारणाने का होईना फुकाचे खुसपट काढाणारे.
5 Aug 2020 - 3:18 pm | mrcoolguynice
कृपया प्रतिसादाचा थ्रेड नीट पाहून घ्या...
5 Aug 2020 - 1:43 pm | अनुप ढेरे
सहमत आहे.
5 Aug 2020 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि सहमत आहे. लॉटरी म्हणतात, लागली. :)
-दिलीप बिरुटे
5 Aug 2020 - 11:22 am | सुबोध खरे
ज्यापायी इतर लोकांनी अनन्वित कष्ट केले, त्यांचं फळ मोदींच्या हाती अलगद पडले.
असंच कलम ३७०, तीन तलाक, उडी आणि बालाकोट बद्दल पण म्हणून टाका
5 Aug 2020 - 11:50 am | प्रचेतस
कुठून कुठं नेताय तुम्ही प्रकरण?
माझ्या प्रतिसादात मोदींवर टीका केल्याचा एकतरी शब्द आहे का? ज्या धाग्याशी संबंधित प्रतिसाद आहे त्याविषयीच बोला.
तुमच्या प्रतिसादाचा अर्थ काढल्यास राममंदिरापायी इतर लोकांनी केलेल्या कष्टांचे, त्यांच्या बलिदानाचे मोल तुमच्या लेखी काहीच नाही ते दिसते.
तुम्हाला राममंदिर होतेय म्हणून नव्हे तर तर मोदींच्या हातून त्याचे भूमिपूजन होतेय याचाच आनंद होतोय असे एकूण तुमच्या प्रतिसादावरून दिसते.
5 Aug 2020 - 10:18 am | प्रसाद_१९८२
जय श्री राम !
5 Aug 2020 - 10:20 am | सुबोध खरे
त्यांचं फळ मोदींच्या हाती अलगद पडले.
लोकांचे कष्ट असतातच पण श्री मोदींच काहीच कर्तृत्व नाही?
१९९३ सालापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली केस सुनावणीसाठी येते तेथे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणीसाठी घेते मग पाच न्यायाधीशांचे पूर्णपीठ हाच खटला सुनावणीसाठी घेतो. यामागे असलेली कायदेशीर प्रक्रिया समजावून घेतली असती तर असे सवंग विधान केले नसते
5 Aug 2020 - 11:54 am | प्रचेतस
सवंग विधान, हाहाहा.
कायदेशीर प्रक्रिया तुम्ही समजावून सांगाच.
5 Aug 2020 - 2:55 pm | कपिलमुनी
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी प्रक्रियेत सरकार किंवा नेत्यांचा हस्तक्षेप असतो असे तुमचे म्हणणे आहे का ?
5 Aug 2020 - 7:59 pm | सुबोध खरे
सुनावणी प्रकरणात नव्हे तर कोणती केस बोर्डावर येईल. कोणत्या खंडपीठापुढे येईल, कोणता न्यायाधीश आपल्या "बाजूचा" आहे कुणाचा नंबर रांगेत परत परत मागे जातो. इ इ असे बरेच किस्से आहेत.
त्याची चर्चा करण्याचा हा धागा नाही.
5 Aug 2020 - 8:25 pm | कपिलमुनी
अरे देवा !
आणि मी भलत्याच भ्रमात होतो
6 Aug 2020 - 9:20 am | सुबोध खरे
तीन तलाक प्रकरणात हा (bias) पूर्वग्रह येऊ नये म्हणून पाच न्यायाधीशांचे पूर्णपीठ होते.
त्यात एक हिंदू, एक शीख, एक पारशी, एक ख्रिश्चन आणि एक मुसलमान न्यायाधीश होते
न्यायालयात सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व असावे म्हणून काही वेळेस लायक नसलेल्या न्यायाधीशांना पण "चढवले" जाते.
न्या सीरियाक जोसेफ नावाच्या न्यायाधीशांनी दिल्ली उच्च न्यायालयात १०५ खटले सुनावणीकरून निकाल महिनोन्महिने राखून ठेवला आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयात चढवले गेले तेंव्हा हे सर्व खटले पुन्हा सुरुवातीपासून दुसऱ्या पिठापुढे सुनावणीस घ्यावे लागले.
सर्वोच्च न्यायालयात साडे तीन वर्षे काम केलेल्या या महाशयांनी फक्त ७ निवाडे लिहिले होते आणि आपल्या आयुष्यभराच्या कारकिर्दीत त्यांनी १०० सुद्धा निकाल लिहिले नाहीत. केवळ ख्रिश्चन म्हणून त्यांना बढती मिळत गेली.
https://thewire.in/law/he-gave-only-7-judgments-in-3-years-so-how-did-cy...
न्यायालयात निकाल मिळतो. न्याय मिळेलच असे नाही
8 Aug 2020 - 4:11 pm | डँबिस००७
बर आहे ! येऊ नका बाहेर त्या भ्रमातुन !!
:)
5 Aug 2020 - 10:57 am | प्रमोद देर्देकर
तुम्ही म्हणाल असे असेल तर मग तसे सगळ्या पं.प्र. च्या बाबतीत बोलता येईल की कारण ते ५ वर्षे सत्तेवर येण्या आधी कोणीतरी खुप अनन्वित कष्ट केलेलेच असतात.
पण जो पं.प्र. सत्तेवर असतो त्याच्या नावे तर इतिहास लिहला जातो.
आता बोलायचं झालं तर चला तर मग पं. नेहरुं पासुन सुरुवात करु.
5 Aug 2020 - 11:56 am | प्रचेतस
अर्थातच. एकटा माणूस हे करूच शकत नाही
पण मंदिर निर्माण होण्यामागे श्री मोदीच आहेत असा जो सार्वत्रिक समज करून दिला जातोय तो चुकीचा आहे हे फक्त सांगू इच्छितो.
5 Aug 2020 - 12:32 pm | सुबोध खरे
फळ अलगद हातात पडलं याचा साध्या मराठीत अर्थ असा निघतो कि काहीही कष्ट न करता त्याचे फळ मिळालं.
दुसरा अर्थ असेल तर मला समजावून सांगा
5 Aug 2020 - 12:52 pm | प्रचेतस
तुम्हीच सांगा फळ मिळाले की नाही?
बाकी तुम्हाला हवा तो अर्थ घ्या. आमचे काही म्हणणे नाही
5 Aug 2020 - 12:55 pm | सुबोध खरे
फळ अलगद हातात पडलं का?
5 Aug 2020 - 12:56 pm | प्रचेतस
अक्षरे बोल्ड करून काही उपयोग होणार नाही.
5 Aug 2020 - 12:57 pm | सुबोध खरे
ती अपेक्षा नाहीच.
पूर्व ग्रह इतका सहज हटत नाही
5 Aug 2020 - 12:59 pm | प्रचेतस
पूर्वग्रह आहे हे कशावरून हे सिद्ध करा.
5 Aug 2020 - 12:56 pm | सुबोध खरे
न्यायालयीन प्रक्रिया पण एकदा समजावून घ्या आणि तिला चालना देण्यात मोदींचा सहभाग काय तेही समजून घ्या.
बाकी चालू द्या
5 Aug 2020 - 12:58 pm | प्रचेतस
न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगा त्याविषयी सांगितलेच आहे.
5 Aug 2020 - 8:01 pm | सुबोध खरे
शोधा कि जालावर. भरपूर साहित्य सापडेल.
श्री मोदींनी झक्कू लावला नसता तर या केसेस अजून १५-२० वर्षे सुनावणीसाठी आल्या नसत्या.
5 Aug 2020 - 8:10 pm | प्रचेतस
मला जालावर शोध घेण्यात वेळ नाही आणि स्वारस्य तर अजिबात नाही तेव्हा तुम्हाला समजावून सांगता येत असेल तर सांगा नाहीतर सोडून द्या.
6 Aug 2020 - 9:21 am | सुबोध खरे
आपला पूर्वग्रह दूर करावा यासाठी वेळ खर्च करण्याची माझी तयारी नाही.
तसा मला वेळ भरपूर असतो
6 Aug 2020 - 9:47 am | प्रचेतस
पूर्वग्रह आहे हे सिद्ध करा, मग पुढचं बोला.
6 Aug 2020 - 10:37 am | सुबोध खरे
फळ अलगद हातात पडलं
6 Aug 2020 - 10:43 am | प्रचेतस
ते तर पडलंच आहे आणि त्यावर मी ठाम आहे.
पण ह्यात मोदींविषयीचा आकस कुठून दिसतोय हे दाखवा.
6 Aug 2020 - 10:46 am | सुबोध खरे
समोरूनच दिसतोय
6 Aug 2020 - 10:57 am | कांदा लिंबू
5 Aug 2020 - 3:32 pm | चौकस२१२
"पण मंदिर निर्माण होण्यामागे श्री मोदीच आहेत"
असं कोणी म्हणत नाहीये... आणि संघाला तर हे पटणार पण नाही
मोदी आणि योगिनीं कदाचित त्याचा पाठपुरावा जोर धरून केला एवढेच...
5 Aug 2020 - 10:59 am | प्रमोद देर्देकर
वरिल प्रतिसाद श्री वल्ली साहेबांना आणि प्रो. बिरुटे सरांना होता.
5 Aug 2020 - 11:24 am | मदनबाण
जवळपास ५०० वर्षांच्या दमनातुन / वनवासातुन हिंदूंची आज खर्या अर्थाने मुक्तता झाली असे मला वाटते ! या गोष्टीसाठी ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सहभागी झाले त्या सर्व लोकांना नमन !
बोलो सियावर रामचंद्र की जय। पवनसुत हनुमान की जय। धर्म की विजय हो, अधर्म का नाश हो।
Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan LIVE
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ॥ राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥
5 Aug 2020 - 11:30 am | Bhakti
अगदी .. पिढ्या पिढ्या ज्या रामनामाने समृद्ध झाल्या त्या रामाला जन्मभूमीपासून इतके दिवस तिष्ठत राहावे लागले.जय श्रीराम!! कल्याण करी रामराया हो देवराया!!
5 Aug 2020 - 11:39 am | कपिलमुनी
आजचा दिवस साजरा करू
उद्या यावर लिहितो
5 Aug 2020 - 11:53 am | अभ्या..
अडवाणींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातील एक पिढी दोन्ही करसेवेला गेलेले.
त्यांच्या हयातीत हा दिवस त्यांना पाहायला मिळाला.
कोठारी बंधू, विनय कटियार, साध्वी हृतंबरा, उमा भारती, जोशिजी, बाळासाहेब, अशोक सिंहल अशा सगळ्या नावांची आठवण येत राहील.
5 Aug 2020 - 3:34 pm | विजुभाऊ
बाळासाहेबांबद्दल बोलत असाल तर त्यांच्या चिरंजीवांनी आणि नातवाने सगळे मुसळ केरात टाकलय.
आमंत्रण मागात फिरायचे. आणि मिळाले की जाणार नाही म्हणायचे ( बारामतीच्या काकांच्या धाकामुळे).
इकडे राउताने रडायचे आणि तिकडे यांनी खडे फोडायचे.
( मुख्यमंत्री साहेब बहुतेक शीबीआय चौकशीत काय बोलायचे याची प्रॅक्टीस करत असावेत)
6 Aug 2020 - 4:41 am | चौकस२१२
चिरंजीवांनी सगळे मुसळ केरात टाकलय.
१००%
बारामतीच्या काकांच्या धाकामुळे ! ... लै हस्लो
5 Aug 2020 - 12:17 pm | mrcoolguynice
चला मंदिर झालं ...
आतातरी पायभूत सुविधा, अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या ..
5 Aug 2020 - 2:53 pm | चौकस२१२
पायभूत सुविधा, !
थांबा अजून काही वर्ष,, आपला राजकुमार गादीवर येईल आणि एक झटक्यात जादूची कांडी चालवून सुविधा सरळ करतील ना...
तो पर्यंत बर्नाल जवळ असुद्या ...पप्पू गादीवर येईपर्यंत अजून एक दोन झटके बसतील बहुतेक..
5 Aug 2020 - 2:53 pm | चौकस२१२
पायभूत सुविधा, !
थांबा अजून काही वर्ष,, आपला राजकुमार गादीवर येईल आणि एक झटक्यात जादूची कांडी चालवून सुविधा सरळ करतील ना...
तो पर्यंत बर्नाल जवळ असुद्या ...पप्पू गादीवर येईपर्यंत अजून एक दोन झटके बसतील बहुतेक..
5 Aug 2020 - 3:14 pm | mrcoolguynice
परदेशात वेस्टर्न कमोडवर बसून वर्षानुवर्षे एकाहाताने टिशशू पेपर रगडत बसून , दुसऱ्या हाताने मोबाईलवरून भारतीयांना अक्कल शिकवू नये. शिवाय पप्पूला पण तुमच्या सोबत घेऊन जावे.
5 Aug 2020 - 3:25 pm | चौकस२१२
परत कमोड.. अरेरे
5 Aug 2020 - 3:48 pm | mrcoolguynice
जशी प्रतिक्रियेची लायकी त्यानुसार "कमोड" देतो आम्ही...
5 Aug 2020 - 2:55 pm | महासंग्राम
मशिदी साठी दिलेली ५ एकर देशासाठी दिली तर अर्थव्यवस्थेला हातभारच लागेल
5 Aug 2020 - 12:23 pm | तेजस आठवले
आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी जरूर गोडधोड खाऊन हा दिवस साजरा करावा. ज्या साऱ्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांचे अभिनंदन !
आता काशी मथुरा इथल्या मंदिरांचे कायदेशीर पुनर्स्थापन करण्याकडे लक्ष द्यावे. २६/११ चा बदला अजून बाकी आहे. फोंड्यातल्या मशिदीला सुद्धा कायदेशीर पुनर्निर्माणाची गरज आहेच. हे सगळं करायला मोदी आणि कंपनीचीच गरज आहे.
देर्देकर साहेब,
ढुशक्लेमर टाकायची काही गरज नव्हती. दुसऱ्यांच्या दु:खात आनंद मानणारा आपला हिंदू धर्म नाही. अर्थात ज्यांच्या बुडाला आग लागली आहे त्यांच्या दु:खाला आता पारावार राहिला नाही आणि आपण ते दूर करायचा प्रयास करण्याची काहीच गरज नाही. आजचे अग्रलेख पाहिलेत तरी कल्पना येईल. एकतर्फी निर्णयाने हा सोहळा चालू आहे वगैरे दिवे डावरे नक्षली कुबेरांनी पाजळले आहेतच. काही वाकड्या तोंडाच्या लोकांनी जमेल तेवढा काड्याघालू पाचकळपणा करायचा प्रयत्न नेहमीप्रमाणे केलाच. असो. समाजकंटकांकडे दुर्लक्ष करावे.
रावण सीतेला पळवून नेत असताना चिऊसैनिकांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला होता ; ब्रिज बांधायला माकडे पण आम्हीच पुरवली होती ई. ई. असंही म्हणायला काही लोक कमी करायचे नाहीत. श्रेय उपटायला हे लोक काहीही करतील. आपण मज्जा बघावी.
5 Aug 2020 - 3:02 pm | कपिलमुनी
तुमचे वय माहिती नाही पण त्याकाळी जाणत्या असणाऱ्या लोकांना विचारा, बाकी सगळे "आम्ही नाही त्यात" म्हणत असताना फक्त ठाकरे च होते ज्यांनी होय आम्ही पाडली म्हणाले
5 Aug 2020 - 3:34 pm | अनुप ढेरे
पाडली असेल तर अभिमान आहे असे म्हणाले होते. आम्ही पाडली असे नाही.
5 Aug 2020 - 3:38 pm | विजुभाऊ
ठाकरे यांनी थेट आम्ही पाडली असे न म्हणता ' पाडणारात शिवसैनीक असतील तर त्यांचा मला अभिमान वाटेल असा नरो वा कुंजरोवा पावित्रा घेतला होता.
त्या बोलण्याचा विपर्यास केलाय लोकांनी आणि अर्थातच सेना त्याचे श्रेय परस्पर घेतेय
6 Aug 2020 - 9:25 am | सुबोध खरे
याचे कारण श्री अडवाणी यांच्यावर खटला भरला तसा आपल्यावर येऊ नये म्हणून हि पळवाट शोधली.
त्यांना स्पष्ट विचारले होते कि आपण शिवसैनिकांना पाठवले होते का? त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले होते.
हि मुलाखत मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती.
अर्थात मशीद पाडल्याचा आपल्याला आनंद झाला एवढे मात्र ते स्पष्टपणे म्हणाले हि सुद्धा वस्तुस्थिती आहे.
त्यांनी उगाच सर्वधर्म समभाव, फुरोगामी पणा वगैरे दाखवला नाही
6 Aug 2020 - 6:29 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
माझ्या मते वादग्रस्त वास्तू पाडणं नियोजित नसून उत्स्फूर्त होतं. त्यामुळे बाळासाहेबच काय कोणीही असा दावा करू शकंत नाही की मी माणसं पाठवलेली.
आ.न.,
-गा.पै.
7 Aug 2020 - 9:59 am | सुबोध खरे
आपण शिवसैनिकांना पाठवले होते का? त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले होते.
7 Aug 2020 - 2:26 pm | Gk
मी तुम्हास जेवण पाठवले नाही,
म्हणजे तुम्ही उपाशी आहात , असे ठरवायचे का ?
7 Aug 2020 - 3:12 pm | चौकस२१२
जि के,
मुळात हि वेळ का आली ( जमावाने मशीद पडण्याची) याचा विचार केलाय कधी?
स्वान्त्र्यापासून "सर्वधर्मसमभाव " या शब्दाचा बरोबर उलट अर्थ काँग्रेस ने राबवला
(मुस्लिम आक्रमकांनी सत्ता स्थापन करताना स्थानिक धर्म कसा नेस्तनाबूत करता येईल हे पहिले .. हा इतिहास पण जणू घडलाच नाही !)
अल्पकसंख्याकांचे "टोकाचे" लांगुनचालन केले
आणि केवळ म्हणून आज लोक :"काँग्रेस इतर " पर्याय स्वीकारू लागले ते सुद्धा लोकशाही मार्गाने . तरी तुम्ही मात्त्र फक्त विरोध आणि असले फुकाचे वाद घालत राहा...
मंदिर झाले त्याने काही देशाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत... हे भाजपसमर्थकांना हि कळते
बरं अजून एक सांगा.. असे सक्तीचे प्रार्थनास्थळ बदलणे जर तुम्हाला आक्षेपार्थ वाटते ना तर मग "हया सोफिया" चे परत सक्तीने मशिदीत रूपांतर केले तेव्हा ख्रिस्ती लोकांनां दुख्ख वाटले तेव्हा त्यांना साथ दिलीत का? तेव्हा मूग गिळून गप्प.. ( आणि वरती हि मखलाशी करू नका " कि हा भारताचा प्रश्न नाही!")
7 Aug 2020 - 7:43 pm | सुबोध खरे
मी तुम्हास जेवण पाठवले नाही,
म्हणजे तुम्ही उपाशी आहात , असे ठरवायचे का ?
ठरवा कि
तुम्ही मुखत्यार आहात.
त्यात काय अयोध्येत पूर्वेकडच्या मक्का आणि काबा पण आहे म्हणा कि.
फक्त उघड पणे असं (मक्का आणि काबा) म्हणून नका. नाही तर सैतान म्हणून तुम्हाला दगड पण मारतील.
))=((
7 Aug 2020 - 6:01 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
अगदी बरोबर. जे खरंय ते सांगितलं.
आ.न.,
-गा.पै.
5 Aug 2020 - 1:23 pm | बोलघेवडा
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम् ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।
5 Aug 2020 - 1:30 pm | Gk
या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक.
हं
त्या काळात शाळेत गल्लीत टीव्ही , स्क्रीन , इंटरनेट होते का ?
5 Aug 2020 - 1:42 pm | Gk
बाबरी कमिटीला पाच एकर दिलेत म्हणे , त्याचे काय झाले ?
8 Aug 2020 - 7:10 am | llपुण्याचे पेशवेll
सर्व जात आणि धर्म यांनी आपल्या मधले देहभाव विसरुन आणि राम मंदिर सिद्ध झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ एकत्र येऊन या पाच एकर जागेवर सर्व धर्मांच्या एकतेचे प्रतीक असलेली एखादी हॉस्पिटलची मोठी वास्तू बांधावी
5 Aug 2020 - 1:42 pm | प्रमोद देर्देकर
अरे जी के तुझे जी. के. खरंच कमी आहे काय रे?
बाकी सगळं न्हवतं पण रेडियो तर होता ना. त्या द्वारे तरी संवाद साधता आला असता ना?
5 Aug 2020 - 2:40 pm | कंजूस
कुणी मनातून कुणी हातातून, धनातून पाठिंबा दिला त्या सगळ्यांनाच श्रेय देतो.
बाकी मोदींनी त्यांच्या पद्धतीने खुर्चीत बसून संसदीय आणि न्यायालयाच्या मदतीने काम केलं हे नाकारता येत नाही. पूर्वी याच गोष्टी तरवारीच्या धारेवर केल्या गेल्या आहेत. पण आताचा काळ लोकशाहीचा.
यावरून आठवलं. मध्य प्रदेशच्या झाशी, उज्जैन, इंदोरमध्ये फिरताना होळकर आणि शिंदे यांनी प्रांताला गतवैभव प्राप्त करून दिलं याची त्यांना मनोमन जाण आहे.
अहिल्याबाईंनी तर सोमनाथ, काशिविश्वेश्वरासह कित्येक मंदिरे परत उभारली.
8 Aug 2020 - 7:07 am | llपुण्याचे पेशवेll
नाशिकचे त्र्यंबकेश्वर जे मुसलमानांनी बटवले होते ते पेशव्यांनी परत बांधले. प्रेम मंदिर ज्याची मशीद झालेली होती ते पुन्हा ताब्यात मिळण्यामध्ये पेशव्यांचे सरदार फडके आणि सरदार नारोशंकर यांचे मोठे कर्तृत्व होते. तसेच उज्जैन चा महाकाल हादेखील मशिदीत परावर्तित झालेला होता जो शिंदे यांचे सरदार सुखटणकर यांनी हस्तगत केला आणि आणि मंदिराची मशिद करण्यासाठी जे बांधकाम होते ते काढून पूर्वीचे मंदिर मोकळे केले.
8 Aug 2020 - 7:09 am | llपुण्याचे पेशवेll
गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या म्हणण्यानुसार अहिल्यादेवींनी केलेल्या या आणि अशा अनेक "धर्म' कार्यामुळेच यांना "देवि" ही उपाधी प्राप्त झाली
5 Aug 2020 - 2:52 pm | गणेशा
प्रस्तावनेची गरज नव्हती..
राम मंदिर निर्माणाला मनापासुन शुभेच्छा..
आजचा दिवस खासच
...
वयक्तिक मत -
लालकृष्ण अडवाणी यांना बोलवायला पाहिजे होते..
5 Aug 2020 - 3:05 pm | Gk
अभिनंदन
राजीव गांधी , बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचेही अभिनंदन
5 Aug 2020 - 3:23 pm | चौकस२१२
बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचेही ( जुन्या ) अभिनंदन मान्य , पण राजीव गांधींचे?
5 Aug 2020 - 3:36 pm | महासंग्राम
शाहबानो प्रकरणात ठेच पोचल्यावर हिंदूंना सांभाळण्यासाठी राजीव गांधींनी शिलान्यासाला परवानगी दिली होती
5 Aug 2020 - 4:34 pm | चौकस२१२
हे माहित नवहते... आणि असेल तसे ,, पण म्हणजे हा जुलमाचा रामराम होता ( नो पन इंटेंडेड !)
एक वेळ नसती दिली परवानगी तरीचालले असते,, (न्यायालयीन प्रयतन चालूच राहिले असते ) ..राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणी जे देशातील महिलांचे नुकसान केल ते जास्त धोकादायक होतं
5 Aug 2020 - 5:05 pm | Gk
राजीव गांधींनी वादग्रस्त इमारतीचे कुलूप काढले व हिंदूंना पूजा करण्यास परवानगी दिली, शिलान्यासही केला होता
https://youtu.be/tsOpzH38oN4
गेल्या आठवड्यात भाजपाचे सुब्रमण्यम स्वामीही हेच बोलले
5 Aug 2020 - 5:19 pm | महासंग्राम
पण नंतर न्यायालयाने ती परवानगी रद्द केली होती
7 Aug 2020 - 7:46 pm | सुबोध खरे
राजीव गांधींचे नक्कीच अभिनंदन करायला पाहिजे.
कारण त्यांनी जन्माला घातलेल्या नररत्नाच्या कृपेनेच भाजप ला दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने सतत मिळाली आहे.
त्यांच्या इतका भाजपचा स्टार प्रचारक दुसरा नसेल.
तेंव्हा त्यांचे आभार मानलेच पाहिजेत.
7 Aug 2020 - 10:42 pm | बाप्पू
त्याचबरोबर त्या नररत्नाचे देखील आभार मानायला पाहिजेत.. कि त्याने अजुन एखाद्या नर रत्नाला जन्माला घातले नाहीये.. या भूमीवर उपकार अनंत उपकार केलेत. Thank you.
BTW,
ज्यांच्या रक्तातच गांधी आडनावाची हुजरेगिरी करायची सवय भिनलीये फक्त त्यांच्यासाठी एखादया वद्रा राजपुत्रालाच गांधी म्हणून प्रोजेक्ट करतील.. असे वाटते.
8 Aug 2020 - 10:38 pm | Gk
शहाचे पोर्गे क्रिकेट बोर्डात घातले आणि करोना येऊन क्रिकेट बंदच पडले
पनवती शहा
ह्याच्यापेक्षा नेहरू गांधी परवडले
5 Aug 2020 - 3:14 pm | महासंग्राम
गेलाबाजार पुरोगाम्यांचे सध्याचे दैवत श्री रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा, मेघनाद, इंद्रजित यांचे अभिनंदन त्यांना का सोडा
उगाच त्यांना वाईट वाटायला नको.