नमस्कार मंडळी!
आषाढ संपत आलाय, आणि लवकरच श्रावण सुरू होणार आहे. श्रावण म्हणजे पाऊस, श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे सणांचा महिना, श्रावण म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल...
सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे दाही दिवस मिपावर श्रीगणेश लेखमालेचा उत्सव असेल. एका संकल्पनेवर/थीमवर आधारित लेखन आपण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत प्रसिद्ध करतो.
या वेळची थीम असेल - आठवणी. नॉस्टॅल्जिया!
आठवणीत रमायला कोणाला आवडत नाही!
शाळा सिनेमा बघताना आपण आपल्या शाळकरी वयात नकळत जातो. प्रचेतस यांचा माझं नाशिक लेख वाचताना आपल्याला आपल्या आजोळच्या भेटी आठवतात.
तर तुमच्या सुखद, रम्य आठवणी, शाळेच्या, कॉलेजच्या, गावाकडच्या आठवणी, मिपाकरांशी शेअर करा, आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करुयात नोस्टॅल्जियामध्ये डुंबून!
अटी अशा काही विशेष नाहीत, गणेशोत्सव हा आनंद आणि चैतन्याचा सोहळा असल्याने लेख सुखद असावेत, त्यात हिंसा, क्रौर्य, वातावरण अन् मन कलुषित करणारे लेखन नसावे, एवढीच अपेक्षा.
आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- १७ ऑगस्ट २०२०!
टीप : थीमव्यतिरिक्त अन्य दर्जेदार/उल्लेखनीय लेखसुद्धा घेता येतील. कविता, पाककृती, बाप्पासाठी नैवेद्य, कथा, भटकंती, फोटोग्राफी, चित्रकला .... जरूर पाठवा. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा.
प्रतिक्रिया
18 Jul 2020 - 9:43 pm | तुषार काळभोर
उत्सुकता.. गणरायाच्या आगमनाची आणि लेखमालेची..
18 Jul 2020 - 11:34 pm | गुल्लू दादा
सहभाग घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. उपक्रमास शुभेच्छा. :)
22 Jul 2020 - 5:05 pm | साहित्य संपादक
तुमच्या लेखाची प्रतिक्षा आहे. जरूर लिहा.
19 Jul 2020 - 10:55 am | गणेशा
छान..
शब्द झाले मोती -2 मधील लिखान असेच झालंय.. त्यातलेच दिले तर चालेल.. कि नविन पाहिजे?
19 Jul 2020 - 12:14 pm | गणेशा
Np..
तेथे बंधनामुळे न टाकता आलेले लिखान, नावे बदलून येथे देतो.. उगाच का पुसाव्यात आठवणी..?
तसे हि नावात काय आहे कोणी तरी म्हंटलेले आहेच :-)) :-))
19 Jul 2020 - 1:43 pm | तुषार काळभोर
बहुतेक शेक्सपिअर ने म्हटलं असेल.
20 Jul 2020 - 11:04 am | विजुभाऊ
त्याच्या तरी नावात काय आहे
19 Jul 2020 - 1:46 pm | तुषार काळभोर
अगदी अगदी..
तशाच जुन्या, सुखद, दरवळणाऱ्या आठवणी..
19 Jul 2020 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साहित्य संपादकसेठ, पहिला फोटो दिसत नै. पहिला फोटो दिसत नसल्यामुळे पुढे काय लिहिले आहे ते वाचले नाही.
मजकूर वाचायला पुन्हा येईन...धन्यवाद.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
(शुभेच्छुक, मिपामित्र मंडळ. औरंगाबाद)
19 Jul 2020 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
योग्य दुरुस्तीबद्दल आभार....! आले का गणपतीबाप्पा. देवा, लेख लिहितो. तितकं करोनाचं बंदोबस्त करु.
लेखमालेला शुभेच्छा. सहभागी असेनच. लेख नाय झाला तरी लेखकांच्या धाग्याला प्रतिसाद नक्की लिहित राहीन.
-दिलीप बिरुटे
22 Jul 2020 - 5:06 pm | साहित्य संपादक
तुमच्या अनुभवसिद्ध लेखाची प्रतिक्षा आहे.
19 Jul 2020 - 8:35 pm | मन्या ऽ
शुभेच्छा!! जमलं तर नक्की लिहीन.. :-)
22 Jul 2020 - 5:08 pm | साहित्य संपादक
नक्की जमवा. लेखाची प्रतिक्षा करत आहोत.
20 Jul 2020 - 9:25 am | प्रचेतस
व्वा...!
उत्तमोत्तम लेखांची वाट पाहतो आहे.
23 Jul 2020 - 6:04 am | कपिलमुनी
अशे उपक्रम आले की चिमण्या उर्फ जॅक स्पॅरो आठवतो.
कुठे बिझी झालाय ? सध्या मिपावर दिसत नाही
23 Jul 2020 - 7:37 pm | अनिंद्य
वाह !
आयोजकांनी विषय फारच छान निवडला आहे - आठवणी, नॉस्टॅल्जिया !
कोविड -करोनामुक्त विषयसूची बघायला आणि गलेमा वाचायला उत्सुक आहे :-)
खूप शुभेच्छा.
26 Jul 2020 - 1:21 pm | साहित्य संपादक
तुमचादेखील लेख वाचण्यासाठी उत्सुक आहोत.
जरूर सहभागी व्हा.
26 Jul 2020 - 7:04 pm | अनिंद्य
अवश्य पाठवीन लेख.
26 Jul 2020 - 7:06 pm | अनिंद्य
लेखासाठी शब्दमर्यादा असल्यास कळवा प्लीज.
27 Jul 2020 - 6:46 am | साहित्य संपादक
नमस्कार,
लेखमालेसाठी शब्दमर्यादा नाही.
( अर्थात एकोळी- दोनोळी - चारोळी लेख अपेक्षित नाही :) )
26 Jul 2020 - 1:00 pm | बिपीन सुरेश सांगळे
मिपा मंडळ ,
मस्त . उपक्रमास शुभेच्छा !
लिहिण्याचा प्रयत्न करतो .
बिपीन
26 Jul 2020 - 1:22 pm | साहित्य संपादक
तुमच्या लेखाची प्रतीक्षा आहे..
14 Aug 2020 - 10:39 pm | साहित्य संपादक
लेखन स्वीकृती साठी.