देवाचं नांव कुणी ठेवलं ?

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
16 Jun 2020 - 12:34 pm

देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !

कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.

कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.

कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.

घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !

आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________

देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !

प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !

कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्‍यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.

एका प्रष्णात काम तमाम !

_____________________________

एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.

मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्‍यांच्या आणि भींत चालवणार्‍यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्‍या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्‍यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्‍या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.

चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.

एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !

अगदी आजपासून !

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

मला सर्वांचेच विचार पटतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jun 2020 - 1:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

या धाग्यावरील उद्बोधक चर्चे साठी धागाकर्त्याला आणि सर्व प्रतिसादकर्त्यांना माझ्या तर्फे श्रेयसची थाळी (एका व्यक्तीस एक थाळी या तत्वानुसार, धागाकर्ता / प्रतिसादकर्ता स्वतः उपस्थित असला पाहिजे रीप्ल्समेंट चालणार नाही, स्वीट डिश, मसाला पान, बीडी काडी, इतर प्रकारची पेये किंवा इतर किरकोळ किंवा ठोक स्वरुपाचा खर्च स्वतःचा स्वतः करावा लागेल. येण्याजाण्याचे भाडे मिळणार नाही)

अटी फक्त दोनच :-
१. धागाकर्ता व सर्व प्रतिसादकर्ते एकाच वेळी श्रेयस मधे उपस्थित हवेत (एकही जण कमी चालणार नाही) आणि
२. त्यांच्या पैकी कोणीही एकाने इतर सर्वांच्या वतीने "देव आहे का नाही?" या प्रश्णाचे सर्वसंमत उत्तर द्यायचे आणि बाकी सर्वांनी त्या उत्तराला कोणताही प्रतिवाद न करता "आमेन" म्हणायचे

मग चला पटकन तुम्हाला सोयीच्या दोन तीन तारखा ठरवा त्यातील एक सर्वसंमती ने एक दिवस ठरवुया.

टीप :- १. जगात फक्त एकच श्रेयस आहे त्यामुळे कुठेले श्रेयस? अशा फालतु चौकशा करु नयेत
२. या धाग्यावर या नंतरही भेटायच्या तारखे पर्यंत प्रतिसाद देणार्‍यांसाठी ही योजना लागू आहे. सर्वजण आमेन म्हणाले की त्या नंतर प्रतिसाद देणार्‍यांसाठी ही योजना बंद होईल.

पैजारबुवा,

शाम भागवत's picture

30 Jun 2020 - 1:17 pm | शाम भागवत

:)

गामा पैलवान's picture

30 Jun 2020 - 4:49 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणार्‍यांनी ते काम देव आणि धर्मासाठी केलंय,
स्वतःचे प्राण पणाला लावण्याइतक्या इतक्या उदात्त आस्तिकतेचं
हे जगासमोर आलेलं सर्वात रिसेंट आणि अत्यंत ठळक उदाहरण आहे.

वाळवंटी पंथांचा हिंदू धर्माशी संबंध नाही. अगदी हिंदूंतही धर्माच्या नावाखाली अधर्म करणारे भरपूर आहेत. त्यांच्यापायी सज्जनांना दोष देता येणार नाही. किंबहुना धर्माचरण
करणाऱ्या सज्जनांना उचित प्रसिद्धी मिळंत नाही, ही खरी व्यथा आहे.

देवामुळे सन्मार्गाला लागलेल्यांत सर्वात परिचित उदाहरण व्यसनमुक्तीवाल्यांचं आहे. अगदी नास्तिक अवचटांच्या व्यमुकेंद्रातही देवाची प्रार्थना करायला शिकवतात.

२.

धर्माचा किंवा देवाचा आणि निती-मूल्यांचा शून्य संबंध आहे याचा इतका उघड पुरावा,
इतिहासात नोंदवण्यासारखा आहे.

शिवाजी महाराज हे देवावर प्रगाढ विश्वास असलेले नीतिवान राज्यकर्ते होऊन गेले. देवाधर्माचा व नीतीमूल्यांचा निकट संबंध दाखवणारा हा उघड पुरावा इतिहासाने नोंदवलेला आहेच.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : वर्ल्ड ट्रेड सेंटर मुस्लीम अतिरेक्यांनी उडवलं ही भाकडकथा आहे. कुठल्याही अमेरिकी कोर्टाने हिच्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. चर्चेकरिता खरी म्हणून गृहीत धरलीये.

पण वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवायला जी हिंमत लागते ती देव आणि धर्माच्या नांवाखालीच येते.

भारतात धर्म राजकारणासाठी वापरला जातो.
तो उघड गुन्हा, हा छुपा प्रकार
इतकाच काय तो फरक !

पण मूळ कल्प्रिट देव ही संकल्पनाच !

गामा पैलवान's picture

30 Jun 2020 - 5:04 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

संकल्पना गुन्हेगार कशी काय? तिच्यावरनं प्रेरणा घेणारा मेंदू गुन्हेगार म्हणायला पाहिजे ना?

बाकी, धर्माधर्मात फरक मी करतोच. हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे मी उघडपणे सांगतो.

आ.न.,
-गा.पै.

संकल्पनाच तर प्रेरक आहे. ती नसेल तर मेंदू काय काम करणार ?

> हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे मी उघडपणे सांगतो

आता आलात करेक्ट लाईनवर !
असंच तर प्रत्येक धर्माला वाटतं आणि त्यामुळेच तर सर्व बखेडा आहे.

नीती-मूल्य अंगीकारायला देवाची काहीही गरज नाही.
खोट्या कल्पनेचा धाक घालण्यापेक्षा,
सरळ नीती-मूल्यांचा सुसंकृतपणा अंगी बानवणं जास्त प्रगल्भतेचं आणि सोयीचं आहे.

पिंपळाचे झाड तोडू नये अशी श्रद्धा आहे आणि ती पाळली जवी म्हणून भीती पण दाखवली गेली.
चांगला परिणाम झाला लोक पिंपळाचे झाड तोडण्याची हिम्मत करतच नव्हते .
निसर्ग वाचवण्यासाठी ते किती तरी महत्वाचे ठरले.
देव ,धर्म,पाप नाकारून फक्त पिंपळाचे महत्व सांगितले असते तर लोकांनी ऐकले असते का.?
कायद्या च्या राज्यासाठी कडक शिक्षा असावीच लागते आणि निती matte sathi धर्माचा आधार लागतोच..

कोहंसोहं१०'s picture

30 Jun 2020 - 6:13 pm | कोहंसोहं१०

असंच तर प्रत्येक धर्माला वाटतं आणि त्यामुळेच तर सर्व बखेडा आहे ---> चुकताय तुम्ही. केवळ वाटण्यानं काही होतं नसतं. खरा बखेडा मला जे श्रेष्ठ वाटत केवळ तेच श्रेष्ठ आणि इतरांची धारणा चुकीची असं म्हणुन मी जे श्रेष्ठ मानतो तेच तुम्हीपण मानायला हवं ह्या अतिरेकी विचारात आणि येनकेनप्रकारेण तो इतरांवर बिंबवण्यात आहे.
(जे या धाग्याला सुद्धा लागू आहे)

शाम भागवत's picture

30 Jun 2020 - 6:52 pm | शाम भागवत

व्वा! बैलाचा डोळा

गामा पैलवान's picture

30 Jun 2020 - 7:58 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

१.

आता आलात करेक्ट लाईनवर !

मी ही लाईन कधीच सोडली नव्हती.

२.

असंच तर प्रत्येक धर्माला वाटतं आणि त्यामुळेच तर सर्व बखेडा आहे.

प्रत्येक धर्म मिळून मिसळून वागायला शिकवतो. बखेडा माजण्याचं कारण धर्माच्या नावाखाली अधर्म करणं हे आहे.

३.

नीती-मूल्य अंगीकारायला देवाची काहीही गरज नाही.

मान्य. पण देव मानल्याने नीतीमूल्यं अंगिकारायला आधार लाभतो. विशेषत: जे गरीब आहेत त्यांना.

४.

खोट्या कल्पनेचा धाक घालण्यापेक्षा,
सरळ नीती-मूल्यांचा सुसंकृतपणा अंगी बानवणं जास्त प्रगल्भतेचं आणि सोयीचं आहे.

असू शकतं. फक्त खिशात पैसा पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

सतिश गावडे's picture

30 Jun 2020 - 8:09 pm | सतिश गावडे

३.

नीती-मूल्य अंगीकारायला देवाची काहीही गरज नाही.

मान्य. पण देव मानल्याने नीतीमूल्यं अंगिकारायला आधार लाभतो. विशेषत: जे गरीब आहेत त्यांना.

४.

खोट्या कल्पनेचा धाक घालण्यापेक्षा,
सरळ नीती-मूल्यांचा सुसंकृतपणा अंगी बानवणं जास्त प्रगल्भतेचं आणि सोयीचं आहे.

असू शकतं. फक्त खिशात पैसा पाहिजे.

याचा अर्थ असा निघतो गरीब माणसाच्या खिशात पैसा नसतो. त्यामुळे त्याला जर देवा-धर्माचा धाक नसेल तर ते अनैकतिकने वागतील.
हे जरा जास्तच सरसकटीकरण होतंय असं नाही का वाटत तुम्हाला?
अतिशय वाह्यात निष्कर्ष काढला आहे तुम्ही आपल्या मुद्द्याच्या समर्थनासाठी.

शा वि कु's picture

30 Jun 2020 - 8:37 pm | शा वि कु

अगदी स्नॉबिश दावा आहे.

गामा पैलवान's picture

1 Jul 2020 - 1:09 am | गामा पैलवान

सतिश गावडे,

याचा अर्थ असा निघतो गरीब माणसाच्या खिशात पैसा नसतो. त्यामुळे त्याला जर देवा-धर्माचा धाक नसेल तर ते अनैकतिकने वागतील.

उपरोक्त विधानात धाकाच्या जागी विश्वास/प्रेम पाहिजे. सरसकटीकारण होतंय खरं, पण अशा प्रकारचा दावा कार्ल मार्क्सने केलाय. मार्क्स जेव्हा धर्माला अफूची गोळी म्हणतो, त्याच परिच्छेदात तो धर्माला हृदयशून्य जगाचं हृदय असंही म्हणतो.

आ.न.,
-गा.पै.

अर्धवटराव's picture

1 Jul 2020 - 2:13 am | अर्धवटराव

वाघाला त्याचा आळस, सर्पाला त्याचा भित्रेपणा आणि दुष्ट व्यक्तीला त्याचा दुबळेपणा आपोआप कंट्रोलमधे ठेवतो.

आता प्रत्येक दुबळी, गरीब व्यक्ती दुष्ट असते का? तर अजीबत नाहि. अर्थ एव्हढाच आहे कि virginity could be because of lack of opportunity.
आम्हि अगदी स्वच्छ चारित्र्याचे, शुण्य भ्रष्टाचारी अहोत.. का? तर आजव सत्ता मिळाली नाहि म्हणुन :)

गायी ही हिंदुत पवित्र मानली जाते तिची विक्री आणि हत्या करणे पाप आहे असा धर्माचा आदेश आहे.
बहुसंख्य हिंदू चा गायी ची हत्या करायची अजुन पण हिम्मत नाही. विक्री आता करतात पण 70 वर्ष पूर्वी विक्री पण केली जात नसे .
शेतकऱ्यांना फायद्याचं हा वंश त्या मुळे वाढला आणि टिकला ना.
त्या वर्गातील प्राणी किती उपयोगी होते हे माहीतच असेल.
ही धर्माची ताकत आहे.
प्रतेक गोष्टी मागे शास्त्र आहे फक्त त्या श्रद्धा नाहीत.
पण श्रद्धा कशा चुकीच्या आहेत हे सांगायचे पण त्या मागे काय शास्त्र आहे हे मात्र दुर्लक्षित करायचे ह्याला तर ढोंग म्हणतात.

Gk's picture

20 Aug 2020 - 4:12 pm | Gk

डुक्कर अपवित्र मानले तर डुक्करही आहेत की.

आणि 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत, सगळे तुमच्यामुळे जगलेत का ?

कपिलमुनी's picture

21 Aug 2020 - 8:14 pm | कपिलमुनी

पहिला जीव कसा जन्मला ? माणूस हे साध्य करू शकतो का ?

बिग बँगच्या आधि काय होते ?

पहिला दगड कसा तयार झाला ?

शा वि कु's picture

21 Aug 2020 - 9:58 pm | शा वि कु

१) जीवन कसे तयार झाले/विश्वोत्पत्ती कशी झाली माहित नाही. शोधत राहूया.
२) देव/इतर तत्सम स्पष्टीकरण.