Hi..
कसला स्मार्ट आहेस तू. ओळखशील आणि तेही इतक्या पटकन, असं वाटलंच नव्हतं. अर्थात खूप आत कुठेतरी तू ओळखावं असंही वाटत होतंच म्हणा!
U know? माझ्या आयुष्यातील हे पहिलं पत्र, तू पाठवलेलं. आणि तेसुद्धा प्रिय न all असं सगळं लिहिलेलं. (मायना म्हणतात नं त्याला??) So cute! तुझी presentations सुद्धा इतकी मस्त असतात ना. इमेल सुद्धा( btw आत्ता सुचलं म्हणून सांगतेय, आपण एकमेकांना पत्रच लिहायची, email ping WhatsApp वगैरे काही नाही. चालेल?? सॉल्लिड मज्जा येईल ना?)
तर काय सांगत होते? हं, तुझ्या कामाच्या मेल्स एकदम भारी असतात. इतके मोठेमोठ शब्द, इतकी formality कशी जमते तुला? मला खात्री आहे, मला असं एकदम एकेरीत "तू" म्हणताना, दहा वेळा विचार केला असशील. हो ना?
तर तुझं पत्र मी washroom मधे जाऊन वाचलं. हो, खरंच. कारण टेबलवर पाकीट पाहिल्यावर माझा चेहरा बदलला असावा. रोमीच्या लगेच लक्षात आलं. Wassup विचारलंच तिनं. काही नाही म्हणत बसले खरी पण लक्षच लागेना. कधी एकदा वाचते असं झालं होतं. मग काय, गेले washroom मध्ये. आणि इतक्यांदा वाचलं मी ते. आणि मग ते. टिकटिक वाजते... वगैरे सगळं काही झालं. I just couldn't believe it.
आणि ओय idiot, "जे मला वाटतं होतं अगदी तस्संच तुलाही वाटतं होतं तर". म्हणजे मी धीर नसता केला नसता तर तू कधीच विचारलं नसतंस?????
जाऊ दे, आत्तापर्यंत तुझ्या लक्षात आलंच असेल की मला फार formal वगैरे नाही लिहिता येत. आणि "मनाला लागलेली आग.." इतकं सुंदर पण नाही लिहिता येत. म्हणून एकदम मुद्द्याचं.
तू कॉफीला हो , नाही उत्तर दिलंच नाहीय्ये. मी काय समजायचं??;)
तुझी.....
Btw काय सुंदर अक्षर आहे रे तुझं! एकदम चित्रासारखं. आणि माझं हे असं.. पहिल्यांंदाच वाईट वाटतंय त्याचं. प्लीज हसू नकोस अक्षराला. आणि सांगू का, बरं झालं तुला पहिलं पत्र पाठवायची बुद्धी झाली नाही ते. तुझं अक्षर पाहून मी लिहायला धजावलेच नसते. ;)
तुझी......
प्रतिक्रिया
28 Jun 2020 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालू द्या....! :)
-दिलीप बिरुटे
29 Jun 2020 - 8:48 am | प्राची अश्विनी
धन्यवाद! पण या "चालू द्या..!" मागे हिमनगासारखं खूप काही दडलंय असं फिलींग येऊन राह्यलंय.;)
28 Jun 2020 - 6:11 pm | शा वि कु
छानयत पत्रं.
29 Jun 2020 - 8:46 am | प्राची अश्विनी
खूप खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल. कारण असा पत्र प्रकार पहिल्यांंदाच करतो य त्यामुळे जमतंय का, आवडतंय का ही मनात धाकधूक आहे