पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी
घाण उग्र भपकारा
लांबूनच आला
क्वार्टर टाकून आला
सकाळी सकाळी
फेसाळत्या सोड्यात
बर्फाचा मनोरा
लिंबू जाउन बसले
जरासे बुडाशी
पाय जड झाले
दृष्टी नाही डोळी
अवस्था ही झाली
सकाळी सकाळी
किती पेग गेले
घशातून भरारा
म्हणे आठवांचा
सुटण्या येरझारा
घरचे निष्ठुर
म्हणती पितो देशी
विदेशी न मिळता
सकाळी सकाळी
रिकामी बाटली
अन पुडी फरसाणाची
जणू साक्ष देती
नादान पणाची
दिसे उभे घेउन
कुणी हाती जोडे
का भास व्हावा
सकाळी सकाळी
क्षणात डोळे
खाडकन उघडावे
कुणी तरी खाडकन
थोबाडी हाणावे
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
25 Jun 2020 - 2:20 pm | एस
मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच कच्चा माल आला असे उद्गार निघाले आणि तुमचं फायनल प्रॉडक्ट आलं पण बोर्डावर! जय हो प्रभू! आता मूळ कविता वाचतो.
26 Jun 2020 - 11:38 am | चांदणे संदीप
मला तर शीर्षक वाचून आधी "पैजारबुवा" असेच्च डोक्यात आले. ह्याला म्हणतात कीर्ती. =))
सं - दी - प
25 Jun 2020 - 2:31 pm | प्रचेतस
=))
अरारारारा....
25 Jun 2020 - 3:18 pm | मनोज
मस्त जमल आहे !!!!
25 Jun 2020 - 3:26 pm | राघव
द्येवा.. एकदम थोबाडीत चप्पल पडण्याचा सीन उभा राहिला डोळ्यांसमोर.. काय चित्रदर्शीपणा म्हणावा तो! ;-)
26 Jun 2020 - 12:33 pm | रातराणी
भारी आहे! विडंबन इतकं भारी तर ओरिजन्ल जबरदस्त असेल!
26 Jun 2020 - 1:38 pm | प्रसाद गोडबोले
श्या पैजारबुवा.
इतका सुंदर कच्चामाल, आणि टायटल ही "सकाळी सकाळी" असे पाहुन तांब्या सांप्रदायिक विडंबन येईल अशी अपेक्षा होती.
एकुणच तांबीय परंपरेचे मिपावर झालेले अधःपत्तन पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली =))))
29 Jun 2020 - 12:15 am | टवाळ कार्टा
अग्दी अग्दी