देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
प्रतिक्रिया
19 Jun 2020 - 1:44 pm | Rajesh188
Tv channel tar series चालवली होती त्या मध्ये देव हे आपल्या पेक्षा प्रगत असलेले aliens hote he सांगायचं त्यांनी प्रयत्न केला होता.
त्यांच्या मताला आधार देण्यासाठी पृथ्वी वरील विविध मंदिर,किंवा वास्तू,दगडांवर खोदलेली चित्र ,शिळा लेख ह्यांची उदाहरणे दिली होती.
ह्या प्रचंड विश्वात आपल्या पेक्षा पण प्रगत सजीव सृष्टी असू शकते हे नाकारता येत नाही.
स्पेस एजन्सी जगातील ह्याचा पण निरंतर शोध घेत आहेत पण अजुन यश आले नाही.
किमान 40 ते 45 तरी ग्रह असे असतील तिथे आपल्या पेक्षा पण प्रगत जीव सृष्टी असू शकते असा दावा नुकताच करण्यात पण आला आहे.
पृथ्वी वर करोडो प्राण्या च्या विविध जाती अस्तित्वात असताना फक्त माणसाचा मेंदूचं कसा जास्त प्रमाणात उत्क्रांत झाला हा पण गहन प्रश्न आहेच.ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर पण अजुन सापडले नाही.
19 Jun 2020 - 3:33 pm | शा वि कु
आणि तसही एलिअन्स ची हि थिअरी पण केवळ खळबळजनक दावे आहेत.तुम्ही म्हणताय तो कर्यक्रम नाही पहिला, पण मराठीत एक छोटं पुस्तक आहे "पृथ्वीवर माणूस उपराच" नावाचं त्यामध्ये वाचलीये ही थियरी.
19 Jun 2020 - 6:07 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगेन म्हणतो.
१.
नेमकं हेच इलेक्ट्रॉन बद्दलही म्हणता येतं. इलेक्ट्रॉन हा ही एक भ्रमंच आहे. हा कण नेमका कसा आहे ते कोणीही पाहिलेलं नाही. त्याच्या रुपाबद्दल अनेक वदंता आहेत. पण कोणतीही वदंता नि:संशयपणे तथ्य म्हणून सिद्ध झालेली नाही. तरीपण याच्यावर संशोधनं करून लोकांनी नोबेल पारितोषिक पटकावलं आहे.
मग कालीनेच काय घोडं मारलंय? तुम्ही जसं कालीस काल्पनिक मानता, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन ही सुद्धा एक कल्पनाच आहे.
२.
हिलाच ब्रह्मन म्हणता येईल का? हो असल्यास देवाविषयी चर्चा करण्याऐवजी ब्रह्मनविषयी चर्चा करायला हवी.
३.
अशा ष्टोऱ्या शिवाजी महाराजांबद्दलही सांगितल्या जातात. पण त्यांची थोरवी वेगळ्याच कारणांमुळे प्रसिद्ध झालीये.
४.
नेमकं हेच इलेक्ट्रॉन बद्दलही म्हणता येतं. इलेक्ट्रॉन हा ही एक भ्रमच आहे. हा कण नेमका कसा आहे ते कोणीही पाहिलेलं नाही.
आ.न.,
-गा.पै.
19 Jun 2020 - 6:36 pm | संजय क्षीरसागर
इलेक्ट्रॉनची पूजा करतांना कुणाला पाहिलंय का ?
त्याची मंदीरं लोकांनी बांधलीयेत का ?
त्याच्या नांवावर वेगवेगळे धर्म तयार झालेत का ?
राजकारणी तो निवडणूकात वापरतांना दिसतात का ?
त्यावरनं धर्मयुद्ध झालीयेत का ?
19 Jun 2020 - 6:39 pm | संजय क्षीरसागर
इलेक्ट्रॉनच्याविरुद्ध बोललं तर लोकांच्या भावना भडकतात का ?
(या पोस्टवरनंच बघा आणि सांगा !)
19 Jun 2020 - 9:24 pm | Rajesh188
देव अस्तित्व अमान्य केले की काय घडेल हे तुम्ही सांगितले आहे
१) भीती नष्ट होईल
देव चे अस्तित्व मानणाऱ्या लोकांना कशाची भीती वाटते आणि देवाचे अस्तित्व अमान्य केले की कोणती भीती नष्ट होईल आणि कशी
२)जीवन निर्भर होईल.
देवाचे अस्तित्व मानणारी लोक देव वर अवलंबून असतात निर्भर नसतात हे तुम्ही कशावरून ठरवले काही उदाहरणे ध्या
३)पूजा अर्चा करावी लागणार नाही
पूजा अर्चा चा मानवी मनावर नकारात्मक परिणाम होतो हे तुम्हाला का वाटत उलट पुहा अर्चा केल्यामुळे प्रसन्न वाटते आणि सकारात्मक विचार मनात येतात असा सर्वांचा अनुभव असतो.
तुम्हाला पूजा अर्चा वर आक्षेप का आहे.
४)पवित्रता ,सोवळे
हा मुद्धा तुमचा योग्य आहे पटण्यासारखा आहे अपवित्रता आणि सोवळे ह्या गोष्टी नष्टच झाल्या पाहिजेत असेच आमचे मत आहे.
५)विधी
विधी ,हे रीतिरिवाज चे अंग आहे.आणि त्या मुळे त्या वर आक्षेप असण्याची गरज नाही.
रीतिरिवाज पाळणे हा प्रत्येकाचा कायद्या नी मिळालेला अधिकार आहे आणि कोणते रीतिरिवाज पाळायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रतेक व्यक्तीला आहे.
६) दानपेटी मध्ये जाणारे पैसे वाचतील.
दानपेटीत जाणारे पैसे हे वाया जातात असे तुम्ही कसे म्हणता.
विविध समाज उपयोगी करतो त्या विधीचा वापर केला जातो.
अन्न दान केले जाते किती तरी लोकांना रोज फुकट अन्न दान मंदिर मार्फत केले जाते.
गरीब लोकांचे गंभीर आजाराची बिल मंदिर मार्फत भरली जातात.
आणि अशी खूप काम केली जातात.
7)देव नाकारला की निर्फिड पना येईल.
देव मानणारी लोक नीर्फिड नसतात हे तुम्हाला कोणी सांगितले.
सैन्य पासून गुंडा पर्यंत आणि सामान्य शेतकऱ्या पासून उद्योग पती पर्यंत सर्व स्तरातील लोक देव मानणारी आहेत आणि त्यांनी यशस्वी रित्या संकटांवर मात केलेली आहे.
कसाब ला पकडणार ओंबळे हवालदार देव मानणारा च होता तरी सशस्त्र कसाब ला पकडला ना.
8)ग्रंथ पोथ्या रद्दी मध्ये फेकता येतील.
ग्रंथ आणि पोथ्या फक्त धार्मिक उपदेश करत नाहीत तर जीवन कसे जगावे,जीवनाकडे सकारात्मक रित्या कसे बघावे,चांगले गुण कसे आत्मसात करावेत हे. सर्व ते शिकवतात त्यांना रद्धी तुम्ही का ठरवता .
९)देव मानणारे बावळट असतात.
ह्याची तुम्ही उदाहरणे ध्याच .काही ही baseless दावा करताना त्या साठी पुरावे,उदाहरणे तुमच्या कडे आहेत का.
10) शोध लावणारी लोक देव न मानणारी असतात.
ह्या वर हसावे की रडावे तेच समाजात नाही.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि यशस्वी उद्योगपती मुकेश अंबानी पासून बाकी अनेक उद्योग सम्राट हे देव मानणारे च आहेत.
देव न मानणारा एक तरी यशस्वी उद्योगपती तुम्ही दाखवून द्यावा.
आता पर्यंत जे शोध लागले आहेत त्या मधील मोजकेच तीन चार संशोधक देव म मानणारे असतील बाकी सर्व देव ,धर्म मानणारे चे आहेत,होते
इस्रो चे अध्यक्ष धार्मिक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?.
कमीत कमी खर्चात उपग्रह अवकाशात सोडण्याचे अतुलनीय कार्य त्यांनी केलेले आहे.
19 Jun 2020 - 9:56 pm | कोहंसोहं१०
ह्याची तुम्ही उदाहरणे ध्याच .काही ही baseless दावा करताना त्या साठी पुरावे,उदाहरणे तुमच्या कडे आहेत का. >>>>
टीप: असे प्रश्न विचारू नयेत. आत्तापर्यंत स्वतः केलेल्या एकही विधानाचे कोणतेही पुरावे त्यांनी दिलेले नाहीत. फक्त त्याच त्याच गोष्टी पुराव्याविना सांगत राहणे आणि स्वतःची मते रेटत राहणे यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही आणि करण्याची शक्यताही नाही. विज्ञानवादाची तत्वे धाब्यावर बसवून स्वतःला विज्ञानवादी म्हणवणे आणि बोजड शब्दांचा अतिसार मांडून थयथयाट करणे हेच ते करत आले आहेत. लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि उथळ पाण्याला खळखळाट फार ह्या दोन म्हणी यावर चपखल बसणाऱ्या आहेत.
19 Jun 2020 - 10:58 pm | अर्धवटराव
धागाकर्ता एका विचित्र मानसीक स्थितीत अडकला आहे. काहिशा कारणाने (बहुतेक ध्यानाच्या अभ्यासाने) त्यांना मनाच्या विशिष्ट अवस्थेची ( विचारांचा व्हॉल्युम अत्यंत फीबल झालेल्या अवस्थेची) प्रचिती आलि. इथे त्यांचं मन दुभंगलं. काहिसं स्प्लीट पर्स्नॅलिटी सारखं. त्यांच्या मनाने असा समज करुन घेतला कि ते मन शटडाऊन करु शकतात. त्यांच्यातल्या "मी" आणि "मन" या अंतर्विरोधाला त्यांनी अध्यात्माच्या टॅगखाली स्विकारलं. हि त्यांची अध्यात्मीक एस्टॅब्लिशमेण्ट सर्वमान्य व्हावी हा त्यांचा कळत-नकळ्त अट्टहास झाला. हा अट्टहासच त्यांना आपल्या "मी" पलिकडे काहिच बघु देत नाहि. त्यांना स्वतः ला हे कळतं कि नाहि माहित नाहि.
20 Jun 2020 - 2:45 am | कोहंसोहं१०
धागाकर्त्याची कपोलकल्पित मेमरी स्ट्रिंग वरची वाक्यं, तसेच "आयडी ब्लॉक झाला नसता तर सदस्यांना जिएसटीमुळे देशाचं किती अपरिमीत नुकसान होतंय ते कळलं असतं आणि सत्तांतर होण्याची शक्यता होती" असे भन्नाट दावे, मिपा वर गोंधळ घातल्यामुळे तब्बल ३ वर्षे ब्लॉक झालेला आयडी यावरून त्यांच्या मानसिक स्थितीची कोणीही कल्पना करू शकतो.
20 Jun 2020 - 12:50 am | एस
ईश्वर ही विरोधाभासाने भरलेली एक मानवनिर्मित संकल्पना आहे. ती मान्य करावी असा कुठलाही पुरावा अथवा तर्क मला आजवर सापडलेला नाही. तसा निर्विवाद पुरावा सापडल्यास ह्या संकल्पनेवर विश्वास ठेवण्यास माझी तयारी आहे. तोवर माझे विशुद्ध नास्तिकत्व कायम राहील. ते इतरांवर मी लादत नाही. तसेच इतरांचे आस्तिकत्वही मी बळेच माझ्यावर लादू देणार नाही. इत्यलम।
20 Jun 2020 - 3:06 am | वीणा३
२-३ गोष्टी बद्दल खालील मतं आहेत :
१. देव / कर्ता आहे हि संकल्पना - मला देव/कर्ता आहे का नाही हे माहित नाही, पण असं नक्की वाटतं कि असला तरी आपण त्याला सुखकारक - दुःखहारक म्हणतो तसा नसावा. इट्स जस्ट बिझनेस. एका प्राण्याला जगण्यासाठी दुसऱ्या प्राण्याचं बाळ ओढून खायला लागत. जर तो सुखकर्ता असेल तर त्याची पूजा करणारा प्रत्येक माणूस सुखातच दिसायला हवा. जगात माणूस प्राणी कोणीच दुःखी नसेल, परफेक्ट जग.
२. कर्मकांड - देवळात जाण, पूजाअर्चा करणं - मी करणार नाही. पण माझ्यासाठी हि एक इंडस्ट्री आहे, ज्यात भरपूर लोकांना रोजगार मिळतो. काही लोकांना मानसिक शांती मिळेल, काहीची फसवणूक होईल. काही लोकांना फसवून घ्यायचंच असतं हे चेन मार्केटिंग मध्ये अडकलेल्या कुठल्यापण लोकांना बघून कळेल, ते देवात कर्मकांडात नाही फसले तर अजून कशातरी फसतील.
३. धर्मामुळे वेळ वाया जातो, एकूणच समाजाचं नुकसान होतं. - धर्म नसेल तर अजून काहीतरी शोधतील. मी एकदा (१९९९ मध्ये) निगडीला का कुठेतरी बस ने गेले होते, वाटेत एक झोपडपत्त्ती लागली. कमीत कमी २० मोट्या माणसांचे ग्रुप दिसले पत्ते खेळताना थोड्या थोड्या अंतरावर दुपारी १२ वाजता. त्या दिवशीपर्यंत माझ्या आसपासची कोणीही मोठी माणसं कामाच्या दिवशी दुपारी बसून पत्ते खेळतायत असं कधीच दिसलं नव्हतं. ज्यांना वेळ अनुत्पादक कामात घालवायचंय ते धर्म गेला म्हणून थांबणार नाहीत.
वरती कोणीतरी शरीरातल्या पचन करणाऱ्या सूक्ष्म जंतूंचं उदाहरण दिलाय. माझ्यासाठी देव आहे नाही हे सांगण्यासाठी उत्तम उदाहरण आहे नाही.
१. माणूस ह्या पृथ्वीवर ५००० वर्षांपासून राहतोय (कदाचित त्याच्या आधीपासून, अगदीच भांडायचं असेल तर २००० पकडा )
२. पहिली काही शतकं-सहस्त्रक त्याला पोटातल्या जंतूचा पत्ता नव्हता. पण कोणी एखादा वैद्य - डॉक्टरचा (त्यावेळची काय डिग्री असेल ती) अंदाज असेल कि कदाचित पोटात आपल्याला दिसत नसलेलं काहीतरी आहे. आसपासच्या सगळ्या लोकांनी, दिसत नाही - तस्मात असे काही जंतू अस्तित्वात नाहीत - म्हणून वेड्यात काढलं असेल.
३. त्याच वेळ कोणीतरी अजून एक वेडा मला अजून सूक्ष्म काही बघायचंय किंवा अजून लांबच बघायचंय म्हणून दुर्बिणीवर प्रयोग करत असेल. ते करता करता त्याला अतिसूक्ष्म कण, जो त्याला आधी कधीही दिसला नव्हता तो अचानक दिसला असेल.
४. डॉक्टर वेडा आणि दुर्बीण वेडा एकत्र भेटले असतील, कींवा नसतील, कदाचित त्यांच्या बरोबर असलेल्या सगळ्या दुनियेला ते वेडे, वेळ वाया घालवणारे वाटतं असतानाच मरुन गेले असतील. त्यांनी किंवा भलत्याच कोणीतरी पुढे, अतिसूक्ष्म कण दाखवणारी दुर्बीण पोटातल्या द्रवावर वापरून बघितली असेल आणि पुराव्याने शाबीत केलं असेल कि अतिसूक्ष्म जंतू आहेत आणि ते आपल्या पचनावर परिणाम करतात.
५. तोपर्यंत ते दोन वेडे, आणि पोटात जंतू नाहीच्चे म्हणणारे आसपासचे लोक सगळेच मरून गेले असतील.
हेच देवाला पण लागू होत :
१. हेच देव कदाचित आत्ता एखाद्याला दिसला किंवा जाणवला असेल, त्याला आपण वेड्यात काढत असू.
२. काही लोक देव आहे असं त्यांना दिसला नसला तरी मानत असतील, कारण भोवताली चालणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्यांना समजत नसतील.
३. असाच कोणीतरी वेडा असेल जो देव दाखवणारी दुर्बीण बनवण्याचा प्रयत्न करत असेल. कदाचित त्याला (किंवा त्याच काम जो कोणी पुढे नेईल त्याला ) ५०-१०० वर्षांनी यश येईल, आणि देव / कर्ता त्यातून बघता येईल.
४. बहुतेक ते बघायच्या आधी आपण "देव नाहीच्चे "अशा दृढ विश्वासात मरून जाऊ.
विज्ञानात तरी तुम्ही "कुठलाही" दावा केलात तर त्याला पुरावा द्यावा लागतो, आणि तो फक्त डोळ्यांना दिसत नाही म्हणून नाही असा चालत नसाव बहुतेक. मग दावा देव आहे हा असुदे किंवा नाही हा असुदे. त्यामुळे मी तरी देव आहेच्च किंवा नाहीच्च म्हणायच्या ऐवजी, असेलही कदाचित मला तरी अजून दिसला नाही असं म्हणेन.
20 Jun 2020 - 12:24 pm | संजय क्षीरसागर
१. > जगात माणूस प्राणी कोणीच दुःखी नसेल, परफेक्ट जग.
एकदम सही !
______________________________
२. > २. कर्मकांड - काही लोकांना फसवून घ्यायचंच असतं हे चेन मार्केटिंग मध्ये अडकलेल्या कुठल्यापण लोकांना बघून कळेल, ते देवात कर्मकांडात नाही फसले तर अजून कशातरी फसतील.
बरोब्बर !
फरक इतकाच की चेन मार्केटींगवाल्याला गंडल्याचं लक्षात येतं
पण तिरुपतीला जाणार्याला ते कधीच कळत नाही, उलट
एखादे वर्षी तिरुपतीला जायला जमलं नाही तर
बरेच दिवसात आपण गंडलो नाही म्हणून तो अस्वस्थ होतो !
__________________________________
३. > धर्मामुळे वेळ वाया जातो : ज्यांना वेळ अनुत्पादक कामात घालवायचंय ते धर्म गेला म्हणून थांबणार नाहीत
पैसा ही फार जादुमयी चीज आहे.
लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर,
ते पहिल्यांदा उठून कामाला जातील !
______________________
४. > मी तरी देव आहेच्च किंवा नाहीच्च म्हणायच्या ऐवजी, असेलही कदाचित मला तरी अजून दिसला नाही असं म्हणेन.
हा भाग जरा महत्त्वाचायं !
अ) विज्ञान हा कार्य-कारणाचा शोध आहे :
करोना आहे > कारण शोधा > लस तयार करा > विषय संपवा !
विज्ञान देवाच्या भानगडीत पडत नाही.
ब) कोणताही माणूस कधीही संभ्रमात स्वस्थ राहू शकत नाही
त्याला कायम एका निर्णायक स्थितीत यावं लागतं
थोडक्यात,
देव असेल तर पूजा-अर्चा, कर्मकांड, नवस, दानपेटी, तिर्थाटनं....
नसेल तर विषय संपला ! आपण मोकळे.
आपण आपले प्रॉब्लम्स असेल त्या अक्क्ल हुशारीनं, कुणाच्या मदतीनं, जमतील तसे सोडवू
पण देव असेल किंवा नसेल अशा अनिर्णायक अवस्थेत,
काहीच साधत नाही.
थोडी परिस्थिती हाताबाहेर गेली की शरण जाणार,
सगळं सुरळीत असेल तेंव्हा देवाचा काही संबंध नाही.
मग शरण जाल तेंव्हा मन म्हणणार `आता बरा देव आठवला ?'
त्यापेक्षा निर्णायक स्थिती केंव्हाही चांगली
एकतर सगळी जवाबदारी आपल्यावर, किंवा
मग सगळंच रामभरोसे !
फुल राडा झाला तरी पूर्वसंचित समजून गप पडायचं आणि
उघडपणे आपण एखादी गोष्ट कौशल्यपूर्वक केली, तर
देवानी करवून घेतली असं समजायचं !
_________________
थोडक्यात, जी केवळ कल्पना आहे तिच्यावर सूज्ञ व्यक्ती कधीही भरोसा टाकणार नाही !
22 Jun 2020 - 10:39 pm | वीणा३
तुम्ही फार म्हणजे फारच सिलेक्टिव्ह रिडींग करता हो. असो.
20 Jun 2020 - 2:02 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
प्रत्येक आधुनिक युद्धांत इलेक्ट्रॉनचा वापर झालाय. हिरोशिमा व नागासाकी येथल्या भीषण नरसंहारात तर इलेक्ट्रॉनहून शक्तिशाली अशा प्रोटॉन व न्यूट्रॉन या थोरल्या भावंडांचाही उपयोग झालाय.
तुमच्या मते देव अस्तित्वात नाही. मग त्याच्या मागे का पडता? आधुनिक तंत्रज्ञान हे देवाहून कितीतरी संहारक आहे. त्याच्या मागे तुम्ही का पडंत नाही?
आ.न.,
-गा.पै.
20 Jun 2020 - 2:59 pm | संजय क्षीरसागर
> देवाहून कितीतरी संहारक आहे. त्याच्या मागे तुम्ही का पडंत नाही ?
कारण ते तंत्रज्ञान शेवटी माणसाच्या हातात आहे !
एकदा माणूस सूज्ञ झाला की तंत्रज्ञानाचा उपयोग
मानवी कल्याणासाठी होईल.
20 Jun 2020 - 2:37 pm | Rajesh188
एवढं कळतंय ना मग कशाला तुमचे विचार लोकांनी स्वीकारावे ह्याचा आग्रह धरतात.
लोक सूज्ञ झाली की सोडतील देवाचा नाद.
अशा ठेवा आणि वाट बघा अजुन हजार ,दोन
हजार वर्ष .
किंवा 5 ते 10 वर्षात पण लोक सूज्ञ होतील.
फक्त तो पर्यंत मानव जात टिकून राण्यासाठी
पर्यावरण राखा, अणु बोंब नष्ट करा,
आणि दुसरे महत्त्वाचे उत्क्रांती होवून माणसाच्या मेंदू ची क्षमता कमी होवू नये.
वाढता co2 माणसाच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी करू शकतो असे संशोधक म्हणतात.
20 Jun 2020 - 3:17 pm | संजय क्षीरसागर
बरेच अलिकडे आलात !
पण तरी बेसिक चूक झालीच.
विचार पटणं आणि सूज्ञ होणं या एककालिन घटना आहेत.
आपण कल्पनेच्या मागे धावतोयं,
हे समजता क्षणी धावणं संपतं.
ओशोंचं एक खास वाक्य आहे : `समझ आचरणमें बदल जाती है !'
एकदा लोक सूज्ञ झाले की अणूबाँब, कार्बनउत्सर्ग इत्यादी प्रष्ण आपोआप सुटतील.
20 Jun 2020 - 3:48 pm | Rajesh188
लवकरात लवकर पृथ्वी सोडा नाही तर मानवजात ह्या पृथ्वी वरून नष्ट होईल जसे अनेक प्राणी पृथ्वी वरून नष्ट झाले त्या प्रमाणे.
त्याची कारण पण त्यांनी दिलेली आहेत.
दूषित पर्यावरण आणि त्या मुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती.
अणु बोंब सारख्या घटक शास्त्र चा वापर.
साथीचे रोग.
आणि सर्वात महत्वाचे कारण कृत्रिम बुध्दी मत्तेचा अती विकास
कृत्रिम बुध्दी मत्ता एवढी विकसित होईल की माणसावर भारी पडेल .
आणि माणसाचा विनाश करेल
इथपर्यंत त्यांनी सांगितले आहे.
तुम्ही म्हणताय लोक सूज्ञ झाली की सर्व ठीक होईल पण इथे तर वेगळेच चित्र दिसत आहे.
असे पण एक मत आहे पूर्वी माणूस खूप विकसित झाला होता आता पेक्षा पण जास्त पण त्याला धोके दिसू लागले आणि ते सर्व ज्ञान
नष्ट केले.
हा मार्ग निवडायची आताच्या मानवावर वेळ येवू नये
20 Jun 2020 - 8:16 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
देव हे सुद्धा एक तंत्रज्ञानच आहे असंही मानता येईल ना? उदा. : आत्मा नामक कोणीही कधीही न पाहिलेल्या गोष्टीचं अस्तित्व कल्पून त्याभोवती योग नावाचं कसलंसं तत्त्वज्ञान कुणीतरी रचलं. आसन व प्राणायाम हे त्या योगाचे छोटासे भाग आहेत. त्यांचे नियम पाळले तर आरोग्यदायी लाभ मिळतात. पण या लाभांचा आत्म्याशी थेट संबंध नाही.
त्याच धर्तीवर देवाचं अस्तित्व कल्पून तंत्रज्ञान विकसित करायला काय हरकत आहे?
आ.न.,
-गा.पै.
21 Jun 2020 - 12:07 am | संजय क्षीरसागर
> गोष्टीचं अस्तित्व कल्पून
फार बेसिक मिस्टेक होतेयं गामाश्री !
आत्मा म्हणजे आपण स्वतः !
21 Jun 2020 - 12:08 am | संजय क्षीरसागर
आपण केलेली निराधार `कल्पना '!
21 Jun 2020 - 1:40 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
योगात मीलन अभिप्रेत असतं. म्हणूनंच योग हा द्वैताकडे अंगुलीनिर्देश करतो. आता तुम्ही म्हणता की आत्मा म्हणजे आपण स्वत:. तर योगाद्वारे कोणत्या दोन गोष्टींचं मीलन होणार? एकतर आत्मा हा तरी निराधार आहे, किंवा मग स्वत:ची जाणीव तरी निराधार मानली पाहिजे.
देव ही सुद्धा अशीच 'निराधार' कल्पना असू शकते ना?
आ.न.,
-गा.पै.
21 Jun 2020 - 3:23 pm | संजय क्षीरसागर
पुन्हा एकदा फंडामेंटल मिस्टेक !
१> योगात मीलन अभिप्रेत असतं. म्हणूनंच योग हा द्वैताकडे अंगुलीनिर्देश करतो. आता तुम्ही म्हणता की आत्मा म्हणजे आपण स्वत:. तर योगाद्वारे कोणत्या दोन गोष्टींचं मीलन होणार?
योगा म्हणजे गेटींग कनेक्टेड टू वनसेल्फ !
दुही संपणं म्हणजे योगा !
आता पुढे पण शांतपणे वाचा :
_______________________________________
२. > आता तुम्ही म्हणता की आत्मा म्हणजे आपण स्वत:. तर योगाद्वारे कोणत्या दोन गोष्टींचं मीलन होणार? एकतर आत्मा हा तरी निराधार आहे, किंवा मग स्वत:ची जाणीव तरी निराधार मानली पाहिजे.
अर्थात ! आत्मा निराधारच आहे.
आणि आपणच आत्मा आहोत.
त्यामुळे आपण सर्वव्यापी आणि अभंग आहोत,
आपलं स्वतःपासून विभाजन असंभव आहे.
हे भ्रामक विभाजन संपवण्याचा मार्ग म्हणजे योगा !
एकदा आपणच सत्य आहोत हा उलगडा झाला, की
आपल्याला स्वतःची इंद्रियांमार्फत होणारी,
भ्रामक जाणीव संपते.
उदा. देहाची जाणीव झाली की `आता वय झालं असं वाटणं' थांबतं !
__________________________
त्याबरोबर जाणीवेनं स्वतःचा सतत शोध घेणं थांबतं,
कारण जाणीव आपल्या काह्यात आहे,
आपण जाणीवेच्या काह्यात नाही.
तस्मात, आपली आपल्याला जाणीव होऊ शकत नाही.
आपण केवळ एक कायम स्थिती होऊन राहतो, आणि
जाणीवेचा उपयोग व्यावहार्य कारणांसाठी करतो,
जसा की मी हा प्रतिसाद लिहितो आहे.
_____________________________
> देव ही सुद्धा अशीच 'निराधार' कल्पना असू शकते ना?
आता बरोब्बर लिहिता-लिहिता पुन्हा चूकलात !
आपण निराधार आहोत !
आपल्याला कोणत्याही आधाराची गरज नाही.
तस्मात, देव या आपणच केलेल्या निराधार कल्पनेचा,
आपल्याला काहीही उपयोग नाही.
20 Jun 2020 - 8:28 pm | गामा पैलवान
एस,
या विधानाबद्दल तुमचं अभिनंदन :
अभिनंदन अशासाठी की तुम्ही ज्याला 'विशुद्ध नास्तिकत्व' म्हणता त्याला वेदांतात स्वयंभू सत्य अशी संज्ञा आहे. स्वयंभू सत्याचा पुरावा मिळंत नसतो. म्हणूनंच तुम्हाला तुमच्या विशुद्ध नास्तिकत्वाचा कसलाही पुरावा मिळणार नाही किंवा देता येणार नाही. ते स्वयंभू सत्य आहे.
जाणतेपणी अथवा अजाणतेपणी तुम्ही वेदांताचा प्रचार केला आहे. म्हणून तुमचं अभिनंदन.
आ.न.,
-गा.पै.
टीप : पूर्वी माऊलींनी रेड्यामुखी वेद वदवले होते. त्याच धर्तीवर मी नास्तिकमुखी वेदान्त वदविला. असा पराक्रम करणारा माऊलींनंतर मीच, म्हणून माझंही अभिनंदन. हा पराक्रम यापूर्वीही मी गाजवला आहे : https://www.aksharnama.com/client/article_detail/1703
20 Jun 2020 - 9:31 pm | कानडाऊ योगेशु
प्रोफेसर विद्यासागरांसंबंधीत एक कथा वाचली होती ती आठवली.
स्वातंत्र्यपूर्व काळ होता. प्रोफेसर रोज सकाळी स्टाफरुममध्ये आल्यावर स्वतःच्या केबिनमध्ये पाच-सहा मिनिटे ध्यानधारणा करुन ईश्वराचे स्मरण करत असत. आणि हे पाहुन रोज त्यांचे सहकारी त्यांची टर उडवत असत. ईश्वर नाहीच आहे त्यामुळे विद्यासागरांची रोजची पाच मिनिटे वायाच जात आहेत असे सहकार्यांचे चेष्टेयुक्त स्वरात म्हणणे होते. ही गोष्ट रोज न चुकता होत असे. विद्यासागर सस्मित मुद्रेने दुर्लक्ष करीत असत. पण एकदा अतीच झाल्यावर त्यांनी सहकार्यांना सुनावले. जर ईश्वर नसेलच तर रोज पाच असे धरुन काही वर्षांचा हिशोब करता अमुक अमुक तास जीवनातले ठार वाया गेले असे समजु. पण मी जर ध्यानधारणा केली नसती त्या पाच मिनिटात तरीही तुमच्या सोबत टिंगळटवाळी/धुम्रपान वगैरे करुन ती तशीही वायाच जाणार होती. त्यामुळे हा काही इतका मोठा तोटा नाही आहे. पण समजा जर ईश्वर आहेच तर माझी इतक्या वर्षांची गुंतवणुक नक्कीच कामाला येईल पण तुमचा तर पूर्ण जन्मच वाया गेला कि हो.. ह्या स्पष्टीकरणानंतर विद्यासागरांना त्यांच्या सहकार्यांनी पुन्हा कधी त्यांच्या ईश्वरभक्तीवरुन परत डिवचले नाही.
हाच तर्क इथेही लागु होतो.
21 Jun 2020 - 12:29 am | संजय क्षीरसागर
येत नाही.
इथे देव ही निराधार मानवी कल्पना आहे
याची चर्चा चालू आहे.
21 Jun 2020 - 12:46 am | Rajesh188
देव आहे ह्याचा अनुभव घेता येतो पण सिद्ध करता येत नाही म्हणून देव ही सध्या तरी मानवी कल्पना आहे असे काही व्यक्ती बोलू शकतात.
पण ह्या वाक्यातील सध्या तरी हा शब्द महत्वाचा आहे .
देव ठाम पने नाकारणे हे निरक्षर पणाचे लक्षण आहे.
ज्या बाबतीत संपूर्ण ज्ञान नाही त्या बाबतीत ठाम पने बोलणे ह्याला अडाणीपणा असेच म्हणले पाहिजे.
कारण ज्या गोष्टी का जगात मान्यता आहे आणि अजुन सुध्दा 80 ते 90 टक्के लोक देव आहे ह्या बाबत संशक नाहीत .
ह्याचा अर्थ देव ही कल्पना नसून सत्य आहे.
खोट्या कल्पना करून एवढ्या मोठ्या जन समूहाला मूर्ख बनवता येणार नाही.
देव आहे हे सत्य आहे जोपर्यंत विश्वाचे गूढ पूर्ण पने उकलत नाही तो पर्यंत.
आता आजच्या घडीला विश्व जावू ध्या मानवी शरीराचे पण गूढ पूर्णपणे उकलता आलेले नाही.
पृथ्वी चा अंतर्भाग,समुद्रातील जीव सृष्टी पण माणसाला पूर्ण माहीत नाही .
जो पर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तो पर्यंत देव ही कल्पना नसून सत्य आहे हेच त्रिवार सत्य आहे.
21 Jun 2020 - 4:24 pm | अत्रुप्त आत्मा
विंदा करंदीकर यांची एक बोधप्रद कविता.( बोधप्रद म्हणजे सर्वसामान्य माणसांना कळणारी. त्यात हा आत्मकथीत स्वयंषोशीत धागाकर्ता येत नाही. कारण त्याला काही कळेल,हीच शक्यता सम्प्लेली आहे!)
त्याला इलाज नाही
धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही
देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही
लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही
तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही
ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही
विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही
बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही
असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही
ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही
वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही
21 Jun 2020 - 4:50 pm | शा वि कु
अफाट सुंदर कविता आहे.
21 Jun 2020 - 5:01 pm | संजय क्षीरसागर
टाकलेली दिसते !
कारण ती तुमच्याच लेखाच्या विरोधात आहे :
वाचा :
देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले....
आणि तेच काम मीही करतोयं
अर्थात, तुम्हाला आपण काय करतोयं तेच लक्षात येत नाही
हे प्रतिसादही पुरेपूर दर्शवतात.
_______________________________
पुन्हा वाचा :
मनोरुगण म्हणजे नक्की काय याची ही
तुम्हाला कल्पना नाही, आणि
ते ही सहाजिकच आहे.
ज्याचा ठावठिकाणा माहिती नाही आणि
ज्याला आपली भाषा सुद्धा कळते की नाही याचा पत्ता नाही,
अशा व्यक्तीला :
जो खुळ्यासारखा (तेही दुसर्याच्या घरी जाऊन) हाका मारतो;
आणि त्याही पुढे जाऊन,
आपल्या हाकांमुळे, ठावठिकाणा माहिती नसलेली व्यक्ती
`ऐकणार्यावर' खुष होईल
इतका निर्बुद्ध विचार करु शकतो,
तो खरा मनोरुग्ण
22 Jun 2020 - 12:14 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगेन म्हणतो.
१.
बरोबर. आसनं व प्राणायाम ही योगाची पहिली पायरी आहे. काही लोकांना या पहिल्या पायरीच्या पुढे जाण्यात रस नाही. म्हणून आसनं व प्राणायाम निरुपयोगी ठरतात का?
मग काही लोकांना स्वत:शी कनेक्ट होण्यासाठी देवाची मदत लागंत असेल तर देव भ्रामक कसा काय? जितका योग भ्रामक व सत्य आहे, तितकाच देव ही भ्रामक किंवा सत्य आहे ना?
२.
आपण स्वत: जर सर्वव्यापी आणि अभंग आहोत, तर मग योग हा देखील भ्रामकच ठरतो. तसाच देव हा ही भ्रामक ठरला तर काय बिघडलं?
३.
एकदम मान्य. पण ज्या लोकांना हा उलगडा झाला नाहीये त्यांनी काय करायचं?
माया ही अशी आश्चर्यजनक नदी आहे की ती ओलांडल्यावर मागे वळून पाहता नाहीशी होते. तुम्ही मायानदी ओलांडली आहे हे मान्य. पण माझ्यासारख्या ज्यांनी ती ओलांडली नाहीये, त्यांचं काय?
आ.न.,
-गा.पै.
22 Jun 2020 - 12:53 am | संजय क्षीरसागर
> हे मान्य. पण माझ्यासारख्या ज्यांनी ती ओलांडली नाहीये, त्यांचं काय?
तो एवढा काही मोठा लफडा नाही.
सरळ समोर बघितलं की स्वच्छ स्वरुप दिसतं.
कशाला पाहिजेत त्या प्रतिमा आणि
पूजा अर्चा ?
एकदा टाइमपास सुरु केला की त्याला अंत नाही, आणि
एकदा कत्पना कवटाळली की तोच आधार !
मग भ्रमाला अंत नाही.
त्यापेक्षा सरळ समोर बघा,
हुकलात, काही गोंधळ होतोयं असं वाटलं,
परत शांतपणे समोर बघा
एकदा निराकाराशी संलग्नता जमली की
कोणताही आधार लागत नाही.
22 Jun 2020 - 1:24 am | संजय क्षीरसागर
> हे मान्य. पण माझ्यासारख्या ज्यांनी ती ओलांडली नाहीये, त्यांचं काय?
तो एवढा काही मोठा लफडा नाही.
सरळ समोर बघितलं की स्वच्छ स्वरुप दिसतं.
कशाला पाहिजेत त्या प्रतिमा आणि
पूजा अर्चा ?
एकदा टाइमपास सुरु केला की त्याला अंत नाही, आणि
एकदा कत्पना कवटाळली की तोच आधार !
मग भ्रमाला अंत नाही.
त्यापेक्षा सरळ समोर बघा,
हुकलात, काही गोंधळ होतोयं असं वाटलं,
परत शांतपणे समोर बघा
एकदा निराकाराशी संलग्नता जमली की
कोणताही आधार लागत नाही.
22 Jun 2020 - 12:40 am | Rajesh188
देव आहे ह्याचा पुरावा देता येत नाही.
म्हणून देव नाही हे कोणी स्वीकारत नाही.
बहुसंख्य लोक देव नाकारत नाहीत त्याची कारण आपण चुकीच्या ठिकाणी शोधत आहोत.
कारण अशी खूप लोक आहेत ते विज्ञान मानतात त्याच बरोबर देव पण मानतात.
दिवसभर प्रयोगशाळेत काम करणारा नवीन शोध घेणारा व्यक्ती रात्री पूजा अर्चा करतात.
म्हणजे देव नाही हे सिद्ध करून सुद्धा धार्मिक देव मानणाऱ्या लोकांची संख्या बिलकुल कमी होत नाही.उच्च शिक्षित लोक सुद्धा देव धर्म सोडायला तयार नाहीत
ह्याची कारण वेगळीच आहेत.
ती कारणे कोणती ह्या वर पहिली चर्चा झाली पाहिजे.
22 Jun 2020 - 5:54 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
१.
तेच तर मी सांगतोय. तुम्ही ओलांडलेला लफडा आमच्यासाठी बराच मोठा आहे. तुमच्यासाठी नसेल कदाचित.
२.
ही शांतीच तर बेटी गायब आहे. म्हणून लोकं देवाकडे जातात. नवसात जे काही मागितलं असेल त्यातनं पुढे शांती मिळेल अशी आशा असतेच.
तुम्ही देव मोडीत काढायला निघालात. त्यामुळे लोकं शांत न होता क्षुब्ध होतात. खळबळलेल्या मनात यथार्थ बिंब कसं प्रकट होणार?
आ.न.,
-गा.पै.
22 Jun 2020 - 6:47 pm | संजय क्षीरसागर
> म्हणून लोकं देवाकडे जातात. नवसात जे काही मागितलं असेल त्यातनं पुढे शांती मिळेल अशी आशा असतेच.
तुम्ही देव मोडीत काढायला निघालात. त्यामुळे लोकं शांत न होता क्षुब्ध होतात. खळबळलेल्या मनात यथार्थ बिंब कसं प्रकट होणार?
तुम्ही नेमका मुद्दा काढलात !
प्रचंड धन्यवाद ! अशी चर्चा झाली तर संकेतस्थळाचं भाग्यच !
____________________________
आपणच तर ती शांती आहोत !
आणि नामस्मरणामुळेच तर ती भंगतेयं, म्हणजे
ती हरवल्याचा भास होतोयं.
हेच तर मी कित्येक प्रतिसादात सांगतोयं,
पण लोकांनी अशी काही जालीम स्तोत्रं आणि मंत्र,
दशकानु दशकं घोकलेत की त्यांना वाटतं,
आता आणखी घोकू, आलोयं जवळच !
जोपर्यंत ही नामस्मरणाची घंटा बंद होत नाही,
तोपर्यंत शांतीशी, आपल्या स्वरुपाशी आपण कनेक्ट होणं असंभव आहे
पण पब्लिक विडंबनं काय टाकतंय, कविता काय पाडतायंत,
खरडफळा काय बडवतायंत, धागा काय भरकटवतायंत,
काय वाट्टेल ते चाललंय !
_______________________________
बघा एकदम साधी गोष्ट आहे :
देव हा भंकसपणा आहे कारण त्याच्या बारश्यापासून सगळे सोहोळे आपणच केलेत.
आपण मूळातच मौन आहोत,
भाषा शिकायला लागते, मौन आपला स्वभाव आहे.
तस्मात, संस्कृत काय, वेदघोष काय, मंत्र-स्त्रोतं काय
सगळी भंकस आहे
शांती आपण खुद्द आहोत,
शांतीपासून दूर जाण्याचा उपायच नाही
कारण शांती भंग होऊच शकत नाही,
मग तुम्ही काय वाट्टेल ती बोंब मारा !
पण या नामघोषानी आपलं अवधान मात्र
स्वतःकडे येण्याऐवजी, नामघोषाकडे लागून राहतं
आणि मग जन्मभर आपण शोधत राहतो,
आणि मग म्हणतो : ही शांतीच तर बेटी गायब आहे !
22 Jun 2020 - 10:10 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
मला वाटतं की शांती हा कळीचा मुद्दा आहे. नाम घेतल्याने तुमची शांती बिघडते. याउलट इतरांना ती प्राप्त होत असावी. हे असं का याचा शोध घ्या म्हणून सुचवेन. मी ही घेईन. मला काही सापडलं तर सांगेन तुम्हांस. मी इथे थांबतो.
आ.न.,
-गा.पै.
23 Jun 2020 - 7:50 am | संजय क्षीरसागर
फार बेसिक मिस्टेक केलीत गामाश्री !
शांती तुमची, माझी, इतरांची असा प्रकारच नाही. माझी बिघडते, तुमची वाढते ही कल्पनाच अनुभवशून्यता दर्शवते.
शांतता एकच आहे आणि ते आपल्या सर्वांचं मूळ स्वरुप आहे.
स्वरूप याचा अर्थ जे आपण मुळातच आहोत.
भाषा शिकावी लागते, शांतता आपण खुद्द आहोत.
शांतता आणि माझ्यात काहीही फरक नाही,
तस्मात माझी शांतता कमी जास्त होण्याचा प्रश्रच नाही.
तुम्हाला प्रतिसाद कळला तर तुमचा शोध संपेल !
मला काहीही शोधायची गरज उरलेली नाही.
23 Jun 2020 - 6:11 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुम्ही शांतिस्वरूप आहात हे मान्य. तसे असूनही तुमच्या विधानांवर लोकं इतके प्रक्षुब्ध का होतात, हे एक गूढच आहे. त्याचा छडा लावणे रोचक ठरावे.
उपरोक्त विरोधाभासावरून माझ्या एका जुन्या संदेशाची आठवण झाली. 'प्रेक्षकाचं मन क्षुब्ध राहिलं तर त्या कलाकृतीतून बोध घेता येईल का', असा प्रश्न उपस्थित केला होता. संदर्भ : https://www.maayboli.com/comment/3555998#comment-3555998
असो.
काहीही शोधायची गरज तुम्हाला उरलेली नाही म्हणता, तर या धाग्याचं प्रयोजन काय? हे देखील एक गूढच आहे.
आ.न.,
-गा.पै.
23 Jun 2020 - 7:01 pm | संजय क्षीरसागर
१. > तुमच्या विधानांवर लोकं इतके प्रक्षुब्ध का होतात
कारण त्यांच्या धारणांना धक्का बसतो !
आणि अशा चुकीच्या धारणांचा समुच्चय म्हणजेच : व्यक्तिमत्व !
अहंकार म्हणजे व्यक्तिमत्व,
परंपरागत अध्यात्मातल्या विनम्रभावनं ते फक्त मॉडिफाय होतं.
धारणा संपल्या की व्यक्ती मुक्त होते.
आणि तर्कसंगत विचार करणार्यांना,
धारणा मोडीत निघाल्यानं अतीव शांतता लाभते.
_______________________________________
२. > काहीही शोधायची गरज तुम्हाला उरलेली नाही म्हणता, तर या धाग्याचं प्रयोजन काय?
मला काहीही शोधायची गरज उरलेली नाही, आणि
लोकांचा चुकीच्या मार्गानं चाललेला शोध थांबावा,
त्यांना ही काही शोधायची गरज राहू नये .
पोस्टमधे पाहा :
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
23 Jun 2020 - 5:16 pm | साबु
संक्षी जी .. एक नवीन धागा किंवा ह्यातच अजून एक प्रश्न वाढवा . जर देवाला कोणी पाहिले नाही तर तो कसा दिसतो हे पण माहिती नाही, मग त्याची चित्रे , मुर्त्या कशावरन तयार केल्या? बहुतांश फोटो हे रविवर्म्याच्या चित्रांवरून प्रेरित आहेत असं वाचलेले कुठे तरी.
23 Jun 2020 - 10:33 pm | संजय क्षीरसागर
> तर तो कसा दिसतो हे पण माहिती नाही, मग त्याची चित्रे , मुर्त्या कशावरन तयार केल्या ?
तुमचं बरोबरे > सगळया चित्रकारांच्या कल्पना !
23 Jun 2020 - 11:17 pm | Rajesh188
String theory ni जगाची उत्पती कशी झाली हे स्पष्ट होते आणि जगाच्या उत्पत्ती बद्द्ल आता आम्हाला सर्व काही माहीत झाले आहे अशी भाषा नामांकित संशोधक वापरतात .
खरे तर काहीच माहीत झालेलं नाही.
तर आपल्या सारखी सामान्य लोक मला सर्व माहीत झालेलं आहे आणि बोलतो तेच सत्य आहे असे समजणार च.
त्या मध्ये त्यांचा दोष नाही.
23 Jun 2020 - 10:49 pm | कळस
जवळपास आपण सगळेच लहानपणापासून अस्तिक वातावरणात वाढलो. त्यामुळे सहाजिकच आपण सर्व अस्तिक विचारधारा मानायला लागलो. परंतु शिक्षणामुळे आपली तर्कसंगत विचार करण्याची क्षमता वाढल्याने आपण प्रत्येकाने देव आहे की नाही हा प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा आणि तर्कसंगत विचार करून त्याचा निष्कर्ष काढायला हवा.
हा विषय वाद घालून निकालात काढता येण्यासारखा नाही. पूर्वापार या विषयावर अनेक वाद झाले आहेत आणि होत राहतील. ज्याला देव मानायचा असेल त्यांनी जरूर मानावा, फक्त एकच विनंती की कमीत कमी एकदा धाडसाने त्याच्या अस्तित्वाबद्दल विज्ञानाच्या निकषांवर विचार करावा, तुम्हाला उत्तर नक्की मिळेल.
23 Jun 2020 - 11:38 pm | संजय क्षीरसागर
> त्याच्या अस्तित्वाबद्दल विज्ञानाच्या निकषांवर विचार करावा, तुम्हाला उत्तर नक्की मिळेल.
बरोब्बर !
आणि विज्ञानापर्यंत जाण्याची सुद्धा गरज नाही.
एक साधा विचार की मन हे जीवनाचा आधार असू शकत नाही.
आणि त्यामुळे मानसिक कल्पना तर त्याहून नाही.
पण लोक ज्याला श्रद्धा म्हणतात ती खरं तर भीती असते : फिअर ऑफ द अननोन !
त्यामुळे देवाची कल्पना सोडवत नाही.
आधार शोधून भीतीचा संकोच होईल, पण ती जाणार नाही.
भीती घालवायचा एकमेव मार्ग म्हणजे निराधार होणं !
ते आपल्याला स्वरुपाशी संलग्न करतं, कारण स्वरुप निरालंब आहे.
मग व्यक्ती पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी होते,
भीतीची जागा साहस घेतं !
23 Jun 2020 - 11:07 pm | Rajesh188
अतिशय शिक्षित,लोक दिवसभर रोजच्या जीवनात तर्कसंगत विचार करून विविध क्षेत्रात चांगले काम करत असतात आणि आस्तिक पण असतात.
त्या मुळे हा गैरसमज काढून टाका की आस्तिक लोक तर्कसंगत विचार करत नाहीत.
देव नाकरा ,धर्म नाकारा ह्याची जाहिरात कशाला करताय,आग्रह कशाला धरताय लोक समजदार आहेत काय नाकारायचे ह्याचे उत्तर ते स्वतः शोधतील.
23 Jun 2020 - 11:44 pm | संजय क्षीरसागर
दोनशे २२५ मधले जवळजवळ ३०/४० प्रतिसाद तुमचे असतील !
तुम्ही फक्त एकदा तर्कसंगतीनं देव सिद्ध करुन दाखवाल का ?
23 Jun 2020 - 11:22 pm | Rajesh188
आता सर्व व्यवसाय झाला आहे आताचे संशोधक च विज्ञान चे सर्व नियम पडताळून न पाहता शोध निबंध प्रसिद्ध करतात.
सर्व नियम पाळून शोध निबंध प्रसारित करण्याचे प्रमाण फक्त 18% टक्के आहे
बाकी खोटे पुरावे जोडणे ,दुसऱ्या नी शोधलेले पुरावे स्वतःच्या नावा वर देणे,भलत्याच प्रयोगाचे पुरावे निष्कर्ष वापरणे असले उद्योग करतात.
23 Jun 2020 - 11:42 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
मला वाटतं की लोकांचा चुकीच्या मार्गाने चाललेला शोध तसाच चालू राहू द्यावा. जेणेकरून त्यांना वस्तू गवसल्याचा आनंद लाभेल. या समाधानावर तुम्ही गदा आणीत आहात, अशी काहीशी लोकांची धारणा होत आहे. (परत तिच्यायला धारणा उपटलीच!)
तुमचा मार्ग विहंगम आहे हे मान्य. पण मुंगीला जर आपला प्रवास थांबवून उलटं जायला सांगितलं तर ते पटणार नाही आणि रुचणार तर नाहीच नाही. पुढे अमुकेक अडचणी येण्याची शक्यता आहे, इतकं मार्गदर्शन तिला पुरे.
आ.न.,
-गा.पै.
23 Jun 2020 - 11:52 pm | संजय क्षीरसागर
> तुमचा मार्ग विहंगम आहे हे मान्य. पण मुंगीला जर आपला प्रवास थांबवून उलटं जायला सांगितलं तर ते पटणार नाही
अहो कुठली मुंगी आणि कसला विहंगम मार्ग ?
एकदा सगळंच सत्य आहे म्हटल्यावर आपण ही सत्यच आहोत !
ते ही आत्ता आणि इथेच !
कशाला पुढे कळेल, शोधू दे ?
तुम्हाला कळलं असेल तर जयघोष करा,
नाही तर पुन्हा वाचा !
नक्की कळेल.
24 Jun 2020 - 12:00 am | Rajesh188
गा मा जी फक्त एका व्यक्तीला पेटवण्यासाठी कशाला रक्त आठवतंय.
त्यांना योग्य वाटत ते त्यांनी ठरवावे आपल्याला योग्य वाटत आहे ते आपण करणारच.
24 Jun 2020 - 12:03 am | संजय क्षीरसागर
तुम्ही फक्त एकदा तर्कसंगतीनं देव सिद्ध करुन दाखवाल का ?
24 Jun 2020 - 12:18 am | Rajesh188
मी देव आहे हे प्रत्यक्ष विज्ञान च्या कसोटी वर सिध्द करू शकत नाही कारण देवाचे स्वरूप नक्की काय आहे हे माहीत नाही.
पण विश्वास मात्र आहे की पृथ्वी वरील जीव सृष्टी निर्माण करणार कोणी तरी आहे
(विश्व विषयी बोलत नाही तो विषय अतिशय अवघड आहे)
काही रासायनिक क्रिया होवून सुध्म जीव तयार होतात पण जटिल यंत्रणा असलेले जीव कसे तयार झाले हेच कोणाला माहित नाही.
कधी rna कारणीभूत आहे असा समज झाला पण तो स्वतःची कॉपी करत नाही.
Kadhi dna कारणीभूत आहे ही शक्यता वर्तवली गेली पण अजुन तरी त्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडे नाही.
शेवटी जे मटेरियल जटिल जीवन निर्माण करण्यास कारणीभूत आहे ते नष्ट झाले आहे आणि आता अस्तित्वात नाही हा सोयीचा मार्ग निवडला गेला.
हा प्रश्न जेव्हा सुटेल तेव्हा मी काय सर्वच देव नाकरातील तो पर्यंत संयम ठेवा.
24 Jun 2020 - 8:24 am | शा वि कु
ह्या गोष्टींची उत्तर माहित नाहीत असे म्हणण्यास काय हरकत आहे ? बळेच देवाने केले म्हणण्यास काय अर्थ ?
24 Jun 2020 - 2:54 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला संदेश वाचला. माझं मत सांगतो.
१.
मग लोकांचा भ्रम हे ही सत्यंच ना?
२.
हे पटलं. नामस्मरण असंच असतं. जोवर अनुभूती येत नाही तोवर जयघोष करायचा असतो. मनातल्या मनांत.
एखादी गोष्ट परत परत सांगितली की ती खरी वाटू लागते, असं सु/कु प्रसिद्ध डॉक्टर गोबेल्स म्हणून गेलेत. नामस्मरण ही या नियमाची भारतीय परंपरेतली आवृत्ती आहे.
आ.न.,
-गा.पै.
24 Jun 2020 - 3:53 am | अर्धवटराव
एव्हढे बोलुन मी माझे भाशण संपवतो :ड
24 Jun 2020 - 5:27 am | कोहंसोहं१०
@गामा पैलवान,
तुम्ही शांतिस्वरूप आहात हे मान्य.
माया ही अशी आश्चर्यजनक नदी आहे की ती ओलांडल्यावर मागे वळून पाहता नाहीशी होते. तुम्ही मायानदी ओलांडली आहे हे मान्य >>>>>>>
तुम्ही वरील वाक्ये संक्षींना उद्देशून लिहिली आहेत ते खरोखर तुमचे त्यांच्याविषयीची प्रामाणिक मत आहे की उपरोधपणाने लिहिली आहेत?
उपरोधिक असतील तर ठीक. परंतु तुमचे तसे प्रामाणिक मत असेल तर खालील 'सत्य' जरूर ध्यानात घ्यावे आणि मगच आपले मत बनवावे.
१. जो मनुष्य देवाचे नाव काढले की चवताळून फक्त देव नाही हेच दहावेळा सान्गत बसतो तो शांतीप्रिय असू शकेल?
२. मिपावर गोंधळ घातल्यामुळे ज्याला तब्बल ३ वषे मिपावरून ब्लॉक करण्यात आलं होतं तो शांतीप्रिय असू शकेल?
३. जो मनुष्य स्वतःच्या दुराग्रहाखातर आणि अहंकारामुळे ज्ञानेश्वर, शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस अशा वंदनीय महापुरुषांना चुकीचे आणि भ्रमित ठरवतो, मी म्हणतो तेच बरोबर आणि बाकी सगळं झूट अशी टिमकी लावत बसतो त्याने हि मायानदी पार केली असे खरेच तुम्हाला वाटते?
४. ज्याला ईश्वराचे अस्तित्व मान्य नाही, जो मनुष्य रामायण, महाभारत केवळ कविकल्पना आहेत, राम कृष्ण, कालीमाता सर्व कल्पना आहेत हे टेप लावत बसतो, देवाचे नाव कोणी ठेवले असले निरर्थक प्रश्न विचारत बसतो तो मायानदी ओलांडून पैलतीरी पोहोचायची शक्यता खरीच आहे असे तुम्हाला वाटते?
५. जो मनुष्य "आयडी ब्लॉक झाला नसता सत्तांतर होण्याची शक्यता होती" असली फाजील आणि भंपक विधानं करतो आणि पुन्हा त्याला डिफेन्ड करण्याचा प्रयत्नही करतो, मेमरी स्ट्रिंग प्रत्यारोपण असली अवैज्ञानिक विधाने करून इतरांना वैज्ञानिक प्रोसेस (तेही अर्धवट आणि चुकीची) सांगायला बघतो आणि वैज्ञानिक पुरावे मागतो आणि त्यांना मागितल्यास त्याकडे धादांत दुर्लक्ष करतो तो मायेपलीकडे गेला असू शकेल?
६. ज्या माणसाला सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म यांचे एकत्व अनेकदा समजावून सांगितले तरी मान्य नाही, सर्वच सत्य असेल तर सगुण पूजा पण सत्यच हे कळून घ्यायचे नाही त्याने मायेवर विजय मिळवला असेल असे तुम्हाला वाटते?
आता याची दुसरी बाजू पाहुयात. आपल्याकडे योगमार्गाचे आणि ज्ञानमार्गाचे बरेच संत होऊन गेले परंतु त्यातल्या अनेकांनी भक्तिमार्गाला पाठिंबाच दिला आहे. ज्ञानदेव माउलींनी हरिपाठ सांगितला आहे. साक्षात्कार झाला तेंव्हा ते म्हणतात 'सबाह्य अभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी आज हरी पहिला रे हरी पहिला'.
कट्टर अद्वैतवादी शंकराचार्यांनी इतर कोणीच रचली नसतील तेवढी जवळपास सर्वच देवांची स्तोत्रे रचली आहेत, पंचायतन पूजा सांगितली आहे, अनेक देवळांची स्थापना केली आहे. रमण महर्षी, विवेकानंद यांनी सुद्धा भक्तीचे महत्व सांगितले आहे.
पतंजलीनी योगसूत्रात ईश्वराचे अस्तित्व दर्शवले आहे. या सर्वांनी ज्ञान आणि भक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगून ज्ञानोत्तर भक्ती आणि भक्त्युत्तर ज्ञान हे एकच आहे हे पण वारंवार सांगितले आहे.
बाकी तुम्ही मायानदीचा विषय काढलाच आहे तर या नदीमध्ये कोण कसे बुडून जातात आणि खरे कोण तरून जातात याचे रसभरीत वर्णन आपण ज्ञानेश्वरीत वाचलेले असेलच.
उगाच ४ पुस्तके वाचून केवळ बुद्धीला समजणे वेगळे आणि खरा त्या सत्याचा अनुभव येणे वेगळे हे न समजताच जो अर्धवट ज्ञानाने स्वतः सर्वज्ञ असल्याचा दावा करतो त्या अहंकारी माणसाचे मायानदीतले वर्णन सुद्धा आपण जाणतच असाल.
बाकी मायानदी तरून जाण्यासाठी सद्गुरुरूपी होडीच काय तो एकमेव पर्याय हे जाणून समर्थ म्हणतात तसे सद्गुरूंनी दिलेल्या उपासनेसी दृढ चालवावे. आणि सद्गुरू लाभ झाला नसल्यास इष्टदेवतेचा मंत्रजप, दैनिक पूजा अर्चना, ग्रंथाभ्यास किंवा चित्तशुद्धीसाठी काही साधना हेच सत्य जोपर्यंत मायेत आहोत. बाकी सर्व पोकळ गप्पा आणि शब्दांचे खेळ.
आता हा सर्व संदर्भ लावून वर सांगितलेले गुण उधळणार्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की संत वचनावर याचा निर्णय करणे कोणासही फार अवघड नसावे.
24 Jun 2020 - 10:19 am | संजय क्षीरसागर
मेलेल्याला जीवंत करून त्याच्याकडून पुस्तक लिहून घेतलं इतकी भाबडी कल्पना मान्य करणाऱ्या व्यक्तिच्या लेखनाची दखल,
कुणीही सूज्ञ घेणार नाही.
26 Jun 2020 - 3:19 am | कोहंसोहं१०
मेलेल्याला जीवंत करून त्याच्याकडून पुस्तक लिहून घेतलं इतकी भाबडी कल्पना मान्य करणाऱ्या व्यक्तिच्या लेखनाची दखल >>>>> काय लिहिताय? मेलेल्याला जिवंत करून पुस्तक लिहून घेतले हे मी कधी म्हणालो? इतरांना भ्रमित म्हणता म्हणता तुम्हीच भ्रमित झालेले दिसताय. मी न म्हणालेली वाक्यंपण आता माझ्या नावावर टाकताय. खरंच भ्रमित झालात की प्रत्युत्तर नव्हते म्हणून उगाच खोटे आरोप करताय?
24 Jun 2020 - 5:59 pm | गामा पैलवान
कोहंसोहं१०,
हा सर्व विचार संजय क्षीरसागर यांनी करायचा आहे.
आ.न.,
-गा.पै.
24 Jun 2020 - 12:08 pm | संजय क्षीरसागर
ज्या लॉजिकसाठी तुमच्याशी संवाद चालू होता, तेच हरवतंय !
१. > मग लोकांचा भ्रम हे ही सत्यंच ना ?
काय बोल्ता ?
भ्रम सत्य असेल तर मग नामस्मरण तरी कशाला ?
सत्याचा शोध कशापायी ?
२. > हे पटलं. नामस्मरण असंच असतं. जोवर अनुभूती येत नाही तोवर जयघोष करायचा असतो. मनातल्या मनांत.
एखादी गोष्ट परत परत सांगितली की ती खरी वाटू लागते, असं सु/कु प्रसिद्ध डॉक्टर गोबेल्स म्हणून गेलेत. नामस्मरण ही या नियमाची भारतीय परंपरेतली आवृत्ती आहे.
मग भ्रम गहन झाला की तोतापुरींसारखा अवलिया बोलवावा लागतो,
जो एका झटक्यात सगळा भ्रमनिरास करतो !
त्यापेक्षा माझं काम किती डेलिकेट आहे पाहा :
नुसतं शांतपणे वाचलं आणि
एक साधा प्रश्न स्वतःला विचारला, की घरच्या घरी, बसल्या बसल्या, देव गुल !
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
24 Jun 2020 - 5:55 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
१.
मलाही हाच प्रश्न पडलाय. लोकांनी त्यांचे भ्रम जरूर जोपासु द्यावेत. आपल्याला आपल्यापुरतं सत्य समजलं की झालं.
२.
जो स्वसंवेद्य आहे त्यानेच हे नाव ठेवलं. ॐ आणि अथ हे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातनं सर्वप्रथम बाहेर आले. संदर्भ : http://dnyaneshvari.blogspot.com/2012/02/blog-post.html
आ.न.,
-गा.पै.
24 Jun 2020 - 6:21 pm | संजय क्षीरसागर
१. तुम्ही म्हटलं होतं : मग लोकांचा भ्रम हे ही सत्यंच ना ?
त्यावर मी तो प्रतिसाद दिला आहे.
२. > लोकांनी त्यांचे भ्रम जरूर जोपासु द्यावेत. आपल्याला आपल्यापुरतं सत्य समजलं की झालं.
तुम्ही भ्रम जोपासा, मी सत्याचा उद्घोष करत राहीन > काय प्रॉब्लमे ?
३. > जो स्वसंवेद्य आहे त्यानेच हे नाव ठेवलं. ॐ आणि अथ हे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातनं सर्वप्रथम बाहेर आले ?
अहो, सत्य ही ध्वनीपूर्व स्थिती आहे.
इतका वेळ तुम्ही ज्या` शांतीची' चर्चा करत होतात,
ती स्थिती आहे.
ती अनिर्मित स्थिती असल्यानं तिथे उच्चारणाला काही अर्थच नाही,
मग ते ॐ असो का आणखी काही.
४. > हे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातनं सर्वप्रथम बाहेर आले ?
हा ब्रह्मदेव आता कुठून काढला ?
तो कुणाला आणि केंव्हा भेटला होता ?
त्याच्या कंठातून ॐ आणि अथ हे शब्द आल्याचं त्या ब्लॉगवाल्याला कसं कळलं ?
आणि आता बॅक टू स्क्वेअर वन !
त्याचं ब्रह्मदेव हे नांव कुणी ठेवलं ?
24 Jun 2020 - 6:32 pm | Rajesh188
माणूस बोलायला कधी लागला आणि भाषा कधी निर्माण झाल्या आणि भाषा शोधून काढणाऱ्या लोकांची नावं काय आहेत.
त्या बाबत पुरावा आहे का.
मला वाटतं ह्या प्रश्नांची पहिली उत्तर शोधली पाहिजेत त्या नंतर
देवाचे. नाव कोणी ठेवलं?
हा प्रश्न समजायला सोपा जाईल.
नाव ठेवण्यासाठी पहिली भाषा हवी ना.
तर माझी धागा कर्त्याला विनंती आहे ह्याची उत्तर द्यावीत.
24 Jun 2020 - 6:50 pm | संजय क्षीरसागर
माणूस बोलायला लागल्यावर, त्यानं देवाचं नांव ठेवलं !
थोडक्यात ही सगळी माणसाची करामत आहे,
मग भाषा कुणी का शोधली असेना.
24 Jun 2020 - 7:00 pm | Rajesh188
भाषा असेल तरच नाव ठेवणार ना.
त्या मुळे हा प्रश्न तुमच्या धाग्या शी संबंधित आहे.
हा प्रश्न टाळू नका.
1) माणूस बोलायला कधी लागला?
2) आणि भाषा कशा निर्माण झाल्या त्या कोणी शोधल्या?
आणि पुरावा सहित उत्तर ध्या.
तुम्ही पुरावा शिवाय विश्वास ठेवत नाही ना .
तुमच्या पोस्ट वाचून आमच्यात पण तो गुण आलंय .
24 Jun 2020 - 7:14 pm | Rajesh188
असे कसे .
मग ह्या वाक्याचे अनेक अर्थ निघतील.
भाषा माणसांनी शोधल्याच नाही.
भाषेचा निर्माता माणूस नाही असे आम्ही म्हणू शकतो.
त्या साठी तुम्हाला हे सिध्द करावेच लागेल पुरावा देवून की.
भाषा मानव निर्मित आहेत आणि अमका तमका
त्याचा शोध कर्ता आहे.
आणि हे त्याचे पुरावे .
तुम्ही देवून takach
24 Jun 2020 - 7:25 pm | शा वि कु
पुनश्च.
भाषेचा उगम कुठून झाला हे माहित नाही असा तर्क काढला तरी भाषेची निर्मिती देवाने केली असे म्हणून तुम्ही मोकळे झाला तरी तुमच्या दावा अर्थपूर्ण होणार नाही.
काय राव राजेश. एव्हाना आम्हाला तुमचे सगळे आर्ग्युमेन्ट कळाले. तुम्ही मात्र अजून तोच तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळताय.
24 Jun 2020 - 7:27 pm | शा वि कु
पुनश्च.
भाषेचा उगम कुठून झाला हे माहित नाही असा तर्क काढला आणि त्यावरून भाषेची निर्मिती देवाने केली असे म्हणून जरी तुम्ही मोकळे झाला म्हणजे काय तुमचा दावा अर्थपूर्ण होत नाही.
काय राव राजेश. एव्हाना आम्हाला तुमचे सगळे आर्ग्युमेन्ट कळाले. तुम्ही मात्र अजून तोच तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळताय.
24 Jun 2020 - 7:29 pm | Rajesh188
तुमच्या सोयीचा अर्थ काढण्यासाठी तुम्ही सर्व प्रश्न उडवून लावताय.
ज्याची उत्तर माहीत नाहीत.
ज्या प्रश्नाची उत्तर माहीत नसतात त्या प्रश्नांची संभाव्य उत्तर एका पेक्षा जास्त असतात.
24 Jun 2020 - 7:32 pm | Rajesh188
देवाच्या अस्तित्वाचे सबळ पुरावे नाहीत
म्हणून त्याची दोन संभाव्य उत्तर आहेत.
देव असेल.
किंवा देव नसेल पण.
दोन्ही उत्तर नाकारता येणार नाहीत.
24 Jun 2020 - 7:53 pm | शा वि कु
तुम्ही एक तरी प्रतिवाद प्रतिसाद वाचताय का याबद्दल शंका येत आहे.
1,2
या दोन प्रतिसादांव्यतिरिक्त सुद्धा इथे कोणीही देवाच्या अस्तित्वाची शक्यता नाकारता नाहीच आहे. इथे केवळ आत्ता पुराव्याच्या अभावव्यर देवावर विश्वास ठेवायचा का ? हि चर्चा चालू आहे. पुन्हा विचारतो. ऍटलासच्या/शेषनागाच्या अवयवावर सम्पूर्ण विश्व सामावले आहे, त्यावर पण विश्वास ठेवायचा काय, असे असण्याची अशक्यता सिद्ध करता येत नाही म्हणून ?
24 Jun 2020 - 9:01 pm | संजय क्षीरसागर
इतक्या गंडलेल्या लॉजिकला सुद्धा,
तुम्ही लॉजिकल उत्तर देता !
24 Jun 2020 - 9:30 pm | शा वि कु
उत्सुकता आहे, तर्कामध्ये कुठेही फट उरली नाही की काय रिऍक्शन आहे पाहायची :))
पण अवघड दिसतंय.
24 Jun 2020 - 9:10 pm | Rajesh188
इथे स्वतः धागा कर्ता आणि काही आयडी ठाम पने देव नाही असे म्हणत आहेत.
जे देव मानतात त्यांना देव भोळे ,अडाणी म्हणत आहेत हे तुमच्या वाचनात येत नाही का.
की सरळ सरळ खोटे बोलणे हे पुरोगामी होण्यासाठी आवश्यक गुण च आहे.
प्रश्न ची उत्तर मिळत नाही म्हणून तर निर्माता असावा असे विचार मांडले जातात.
तुम्ही घरी गेला आणि घरात कोणी नसताना घरात सर्व जेवण तयार असेल तर हे जेवण कोणी बनवलं हा प्रश्न पडेल ना तुम्हाला.
आणि हा प्रश्न तो पर्यंत प्रश्न च राहील जो पर्यंत उत्तर मिळत नाही.
24 Jun 2020 - 9:27 pm | शा वि कु
तुम्ही ठामपणे म्हणाल का की ड्रॅगन नावाचा प्राणी अस्तित्वातच नाही ? का तिथेही असू शकतो बुवा असं उत्तर आहे ?
24 Jun 2020 - 9:47 pm | Rajesh188
पृथ्वी वर जे जीवन दिसत आहे ते अतिशय सुनियोजित आहे.
इथे प्रत्येक सजीवाला अन्न आहे.
प्रतेक प्राणी स्वतःची पुनरुत्पादन करतो.
हवेतील सर्व वायूचे प्रमाण योग्य आहे.
हे सर्व अस्तित्वात आहे .नष्ट झालेले नाही .
पण हे एवढे सूनियाजित कसे आहे त्या पाठची कारणे काय आहेत ह्याची उत्तरं अजुन पण माणसाला माहीत नाहीत.
त्या मधील फक्त दोनच उदाहरणे तुम्हाला दिली होती.
जटिल रचना असलेले जीव निर्माण कसे झाले ह्याचे उत्तर कोणाकडे नाही.
फक्त माणसाच्याच मेंदू ची उत्क्रांती का झाली .
भाषा कशा निर्माण झाल्या.
असे किती तरी प्रश्न आहेत.
देव आहे हे सिध्द करता येत नसले तरी जीवसृष्टी आता अस्तित्वात आहे ना ती दिसतोय ना.
ड्रॅगन चे पुरावे नसतील आणि आता पण तो अस्तित्वात नसेल तर तो आहे असे समजायला आम्ही काय वेडे आहोत काय.
24 Jun 2020 - 9:57 pm | शा वि कु
हाच विचार मनात घोळवावा ही ईनंती करून मी माझे भाषण संपवतो :))
24 Jun 2020 - 10:01 pm | Rajesh188
माझ्या पूर्ण प्रतिसाद च अर्थ काय आहे हे चांगले समजून सुद्धा फक्त चारच सोयी ची वाक्य घेवून राजकारणी मंडळी सारखे प्रतिसाद का देताय.
24 Jun 2020 - 10:22 pm | शा वि कु
तुमचा मुद्दा intelligent design सिद्ध करण्यासाठी आहे ना ? कि बुवा इतकं सुसज्ज आणि सुनियोजित जग हे केवळ एक निर्मातच करू शकतो ? खरोखरी उत्क्रांतीची आणखीन माहिती घ्या. हा दावा जेव्हा ख्रिश्चन व्यक्तींनी केला, तेव्हा माणूस 10000 वर्षांपूर्वी असाच्या असा तयार झाला असा त्यांचा (गैर)समज होता.
तुमचा असा समज नसावा. पण तुम्हाला हे जे सुनियोजित जग दिसतंय ते असे काही सुरु नाही झाले. आजूबाजूचे वातावरण काही केवळ आज दिसते तश्या जीवनाला तारण्यासाठी तयार नाही झाले, तर जीवन या वतातवरणात स्वतःला तारता येईल असे निर्माण झाले.
सुरुवातीचा जीव जन्मला तेव्हा एकंदरीत जीवनासाठी परिस्थिती भयंकर प्रतिकूल होती. त्यामुळे जगण्यासाठी आवश्यक हे बदल जीवांमध्ये घडत गेले, आणि मग ही तुमची सुनियोजित पृथ्वी बनली.
आता तुम्ही उत्क्रांती कशी भंपक आहे हे सांगा. वाट बघीन हो :)
24 Jun 2020 - 10:58 pm | Rajesh188
निर्जीव मधून सजीव निर्माण झाले हा दावा केला गेला.
हे सत्य आहे का हे शोधून काढण्या साठी विविध प्रयोग संशोधक मंडळी नी केले आणि विविध रसायने मिळून एक जैविक घटक बनत आहे तो सजिवाची लक्षणे दाखवतो हे दिसून आले .
पण त्या स्थिती पासून जटील रचना असलेले जीव कसे बनले.
जटिल जीव निर्माण होण्यासाठी गुणसूत्र आवश्यक असतात .
ती कशी निर्माण झाली हे आज पर्यंत प्रयोगातून सिद्ध झालेले नाही.
तुम्ही जे उत्क्रांती चे उदाहरण देत आहात ती खूप पुढची स्टेप आहे सजीव निर्मिती पूर्ण झाल्या नंतरची.
डार्विन नी मुळात उत्पती विषयी दावा केलाच नाही.
वनस्पती विषयी एक चक्कार शब्द त्यांनी काढला नाही.
थोडक्यात उत्क्रांती वाद उत्पती विषयी काहीच भाष्य करत नाही.
तुम्ही उत्क्रांती चा सिद्धांत चा संबंध कोठे ही जोडू नका.
धूमकेतू द्वारे जीवन पृथ्वी वर उत्पन्न झाले असे अनेक गृहितक आहेत.
वातावरण बदलत गेले तसे जीवन फुलत गेले हे गृहितक आहे ते काही सिद्ध झलेला सिद्धांत नाही.
ऑक्सिजन असेल तरच सजीव निर्मिती होईल हे खरे नाही.
पृथ्वी वर असे काही अप्रगत जीव आहेत त्यांना ऑक्सिजन ची गरज नाही.
अती उच्च तापमानात जिवंत राहणारे पण जीव आहेत.
त्यामुळे सजीव निर्मिती साठी अमकेच तापमान हवे असे काही नाही.
अजुन पर्यंत बाकी ठिकाणी सजीव सृष्टी चा शोध न लागण्याचे हेच तर कारण आहे.
आपण ऑक्सिजन,पाणी,तापमान च शोधत बसलोय .
असे माझे नाही संशोधकांचे मत आहे.
24 Jun 2020 - 10:05 pm | शा वि कु
हे तुमचे आर्ग्युमेन्ट भयंकर जुने आणि तितकेच हाणून पाडलेले आहे. पाश्चात्य थिओलॉजिस्ट याला वॉचमेकर आर्ग्युमेन्ट म्हणतात. खरोखर चर्चा करायची असल्यास हे वाचा- A Failed Metaphor for Intelligent Design
24 Jun 2020 - 10:22 pm | Rajesh188
प्रतिवाद जुनाच असेल पण अजुन अनुत्तरीत आहे.
तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये हवेतच तिर मारले आहेत .
तुम्ही दिलेल्या लिंक मधले विचार का पटवून ghavet असा उलट प्रश्न ते वाचणाऱ्या व्यक्ती ल नक्कीच पडतील.
Baseless orgument आहे.
स्टिफन हॅकिंग आणि बाकी संशोधक मंडळी नी स्ट्रिंग theory ni विश्वाचे रहस्य उलगडले आहे असे दावे केले ते कसे हास्यास्पद होते हे किती तरी लोकांनी योग्य उदाहरणे देवून सिद्ध केले आहे.
वाद प्रतिवाद आमच्या पण वाचनात असतात.
आपल्या बुध्दी ला जोपर्यंत पटत नाही तो पर्यंत कोणी सांगतोय म्हणुन ते खरे असेल हे मी समजत नाही.
24 Jun 2020 - 10:30 pm | शा वि कु
स्ट्रिंग थियरी समजल्याचे आणि हाणून पाडल्याचे दावे. इथे स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणणारा माणूस पण त्यावर काही कमेंट करणार नाही मात्र तुमचं चालू आहेच. ते स्ट्रिंग थियरी चा प्रतिवाद करणारे लोक काय तर्काला फाटा मारत नाहीत.
वा रे वा. अस चालत नाही भौ. काय पटलं नाही ते सांगायचं असतंय. मुळात निर्मात्याने जग निर्मिले हाच हवेतला दावा आहे. प्रतिवाद कसा जमिनीवर होणार ? ठीक आहे. पुन्हा तेच. हवेत तिर मारणे हे पण जरा मनात घोळवावे हि ईनंती :))
24 Jun 2020 - 8:31 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
आपला इथला प्रतिसाद वाचला. माझं मत सांगतो.
१.
काहीच नाही. सत्याचा उद्घोष व नामस्मरण एकसारखे आहेत, इतकंच सांगायचं होतं.
२.
ते स्वसंवेद्य असल्याने त्याला स्वत:ला वाटेल ते कार्य करू शकते.
३.
बरोबर.
४.
का म्हणून? ते जे काही सत्य आहे, त्याला काही करावंसं वाटलं तर अडवणारं कोणीच नाही. त्याने स्वत:च्या अस्तित्वाचा आवाज काढला तर तो निरर्थक कसा काय?
५.
बालक त्याच्या आईच्या सांगण्यावरनं एखाद्या पुरुषाला बाप म्हणू लागतं. तसाच तो पहिला जीव हा आपल्या सगळ्यांचा आदिपिता आहे. त्याचं नाव ब्रह्मदेव असो वा अब्राहम वा अजून काही.
आ.न.,
-गा.पै.
24 Jun 2020 - 8:54 pm | संजय क्षीरसागर
१. > सत्याचा उद्घोष व नामस्मरण एकसारखे आहेत ?
सत्याचा उद्घोष म्हणजे आपण सत्य आहोत याचा उद्घोष, आणि
नामस्मरण म्हणजे काल्पनिक देवाच्या नांवाचा पुकारा.
२. > ते स्वसंवेद्य असल्याने त्याला स्वत:ला वाटेल ते कार्य करू शकते.
काय बोल्ता ?
सत्य ही स्थिती आहे आणि ती कायम अकर्ता आहे.
३. > जे काही सत्य आहे, त्याला काही करावंसं वाटलं तर अडवणारं कोणीच नाही. त्याने स्वत:च्या अस्तित्वाचा आवाज काढला तर तो निरर्थक कसा काय?
वर २. वाचा
४. > बालक त्याच्या आईच्या सांगण्यावरनं एखाद्या पुरुषाला बाप म्हणू लागतं. तसाच तो पहिला जीव हा आपल्या सगळ्यांचा आदिपिता आहे. त्याचं नाव ब्रह्मदेव असो वा अब्राहम वा अजून काही.
आता हा पहिला जीव कुठून काढला ?
तो सगळ्यांचा आदिपिता आहे हे तुम्हाला कसं कळलं ?
ही आदीपिता थिअरी प्रस्थापित बायॉलॉजीला कसा हरताळ फासते ?
थोडक्यात, या आदीपित्याचे पेरेंटस कुठे असतात ?
त्यांची नांव काय आणि ती कुणी ठेवली ?
24 Jun 2020 - 9:56 pm | Rajesh188
हा प्रश्न तर विचारून झाला .
पण भाषा कशी निर्माण तिचा निर्माता कोण है पुराव्या नी सिध्द करा असे सांगितले तर त्याला फाटे फोडण्यात आले आणि हा गैर सोयीच्या प्रश्न कडे दुर्लक्ष केले गेले.
भाषा च नसेल तर नाव कसे देणार.
त्या साठी भाषा मानव निर्मित आहे हे तर सिद्ध करा.
हे सिद्ध झाले की देव माणसाने निर्माण केले असे कबुल करण्यात आम्हाला काही कमी पना नाही.
24 Jun 2020 - 10:56 pm | गणेशा
बाकी चर्चेत जास्त भाग घेतला नाही.. भाषे बद्दल थोडेसे बोलतो..
हे असे पण सिद्ध करता येईल :
जर सिद्ध करायचे असल्यास.. दोन लहान मुलगा मुलगी जे जन्मले आहेत नुकतेच ज्यांना भाषा येत नाही त्यांना एकत्र ठेवा खुप वर्षे.. कोणाशी न बोलता.. त्यांना भाषा येणार नाही.. मग नंतर कायम एकत्र असल्यावर त्यांचे हावभाव.. बोलणे.. वगैरे सगळे टिपा..
आणि ते जर कसल्याही सांकेतिक भाषेत बोलले.. किंवा कसे तर ती त्यांची भाषा.. आणि नाहीच बोलले.. कसलेच एकमेकां प्रती हावभाव, सांकेतिक चिन्ह.. तर मान्य करू
भाषा ही अशीच develop झाली आहे.. एका रात्रीत मराठी, इंग्लिश भाषा develop झाली नाहीच.. नाईल नदी किनारी सांकेतिक संदेश सापडलेले आहेच..
बाकी मूळ धागा खूपच विनाकारण लांबला गेला आहे.. असे वाटते..
मला इतकेच म्हणायचे आहे.. देव असेलही असे तुमच्या म्हणण्याने मी मान्य करेल..कोणाला का दुखवावे.. आपले आपल्या पाशी पण
पण पृथ्वी समुद्रात बुडाली म्हणुन विष्णूने वराह अवतार घेऊन तिला उचलून आणले.. तर ती कुठल्या समुद्रात बुडाली होती..? का तो समुद्र आटला..
म्हणजे निदान देव आहे हे मनातले सोडू नका.. पण ह्या असल्या कथा मानवाने निर्माण केल्यात हे तरी मान्य करावेच लागेल..
बाकी काय बोलू..
24 Jun 2020 - 11:39 pm | Rajesh188
संस्कृत ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे हे अनेकांनी मान्य केले आहे .
पण इथे देव नाही असे ठाम पने सांगणारे संस्कृत ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे हे सिद्ध झालेले असून सुद्धा मान्य करणार नाहीत.
आणि संस्कृत ला देवाची भाषा असे सुद्धा म्हंटले जाते.
25 Jun 2020 - 12:42 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचा वरचा संदेश वाचला. माझं मत सांगतो.
१.
आपण सत्य आहोत याचा सतत उद्घोष करावा तर लागतोच ना? तसंच नामस्मरण सतत करावं लागतं.
२.
सत्य ही स्थिती होऊच शकंत नाही. स्थिती बदलते. सत्य बदलंत नाही.
३.
ज्याअर्थी सजीवापासनं सजीव उत्पन्न होतांना दिसतो, त्याअर्थी प्रत्येक सजीवास बाप आहे. ही साखळी मागे नेली की कोणतरी एक आदिपिता असणार हे तर्कानं ताडता येतं.
४.
बालक आईला विचारतं की माझा बाप कोण. तसंच आपण सिद्धपुरुषांन विचारायचं आदिपिता कोण.
५.
प्रस्थापित जीवशास्त्राला तर उत्क्रांती म्हणजे काय हे ही नीटसं कळलेलं नाही. फार काय आधुनिक जीवशास्त्रात सजीवाची अधिकृत व्याख्याही उपलब्ध नाही.
६.
आदिपिता स्वयंभू आहे.
आ.न.,
-गा.पै.