देवाचं नांव कुणी ठेवलं ?

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
16 Jun 2020 - 12:34 pm

देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !

कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.

कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.

कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.

घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !

आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________

देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !

प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !

कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्‍यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.

एका प्रष्णात काम तमाम !

_____________________________

एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.

मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्‍यांच्या आणि भींत चालवणार्‍यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्‍या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्‍यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्‍या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.

चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.

एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !

अगदी आजपासून !

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

16 Jun 2020 - 11:25 pm | नेत्रेश

देवाचं नांव कुणी ठेवलं ? => माणसाने

या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. => तो कसा काय? सुर्याचे नावही माणसानेच ठेवले आहे. पण नसते ठेवले तर तरीही तो तिथेच अस्थित्वात असता, आणि त्याच तेजाने तळपला असता. तो माणसांच्या आधीही होता, व नंतरही असेल.

पण सूर्य अस्तित्वात आहे !
काहीही नांव दिलं नाही, तरी तो तसाच तळपेल.

देवाचं नांव काढून घेतलं तर देव उरत नाही,
कारण तो नाममात्र आहे.
ती माणसाची कल्पना आहे.
माणसाच्या मेंदूपलिकडे देवाला अस्तित्व नाही.

गामा पैलवान's picture

17 Jun 2020 - 3:00 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

माणसाच्या मेंदूपलिकडे देवाला अस्तित्व नाही.

माणसाच्या मेंदूपलिकडे जिवालाही अस्तित्व नाही.

मग सुशांतसिंह राजपूतने परवा जे आत्महनन केलं ते ग्राह्य धरावं का?

आ.न.,
-गा.पै.

अर्थात !

> मग सुशांतसिंह राजपूतने परवा जे आत्महनन केलं ते ग्राह्य धरावं का?

पण जीवंत असतांना सुशांतसिंह नांवाची व्यक्ती अस्तित्वात होती !

काली हे फक्त नांव आहे आणि माणसाच्या मेंदूपलिकडे तीला कुठेही अस्तित्व नाही.

साधकानं कालीचा जप थांबवला की काली गुल !

अर्थात, एखादा साधक भ्रमिष्ठ झाला असेल आणि
मननियंत्रणाबाहेर गेल्यानं त्याचा जप थांबत नसेल तर
त्याला मानसविकार तज्ञाकडे न्यावं लागेल,
इतकाच काय तो फरक !

ढब्ब्या's picture

17 Jun 2020 - 12:42 am | ढब्ब्या

गल्ली चुकली …
जरा ऊत्तरेकडे जन्मला असतात तर चिनी कम्युनिस्ट डोक्यावर घेऊन नाचले असते :)

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2020 - 1:18 am | संजय क्षीरसागर

भारतीय नागरिक जर सुजाण, वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी झाला,
तर काय हरकते ?

रूढी परंपरा यांचा आपल्या जीवनावर इतका पगडा असतो, कि आपण त्या चाकोरीतून कधी बाहेर पडत नाही...
पडायला लागलो कि घरचे.. मित्र.. इतर आपल्याला हे तुझं कसे चूक हे समजावतात..
ह्या रूढी परंपरांचे पण एक शास्त्र असतं, असं त्यांनाच वाटत.. त्या शास्त्राचा इतर कसल्याही अनुमानाशी संबंध नसतो...

रूढी परंपरा जपल्या कि आपली माणसे मात्र खूष होतात.. आणि हेच पुढे चालत राहते...

कोणत्या खोल ज्ञानाशिवाय आपण सर्व सत्य मानतो.. कारण ही माणसेच त्या गोष्टीचा आरसा होतात.. आणि आपण काय पाहायचे हे तो आरसा ठरवतो...

हे चूक कि बरोबर माहीत नाही.. वाईट कदाचीत काही नाही.

हे बरोबरे !

पण जे मुळात नाहीच हे इतक्या साध्या प्रष्णानं जर उलगडत असेल,
तर ते लावून धरण्यात काही अर्थ नाही.

जिथे उत्तर नाही असा समज होता,
तिथे संशोधन झाल्यामुळेच तर मानव प्रगत झाला आहे.

वाघावर बसून कुणी आकाशातून येतो आणि आपण ते खरं समजत असू
तर विमानाचा शोध लागण्याची शक्यताच नव्हती !

कोहंसोहं१०'s picture

17 Jun 2020 - 1:50 am | कोहंसोहं१०

सगळा घोळ श्रद्धा आणि विज्ञान हे परस्परविरुद्धच आहेत ह्या गैरसमजुतीतून झालाय. श्रद्धा ठेवली म्हणजे विज्ञानावर विश्वास ठेवताच येत नाही हा आपला गैरसमज कधी दूर होणार? हेही उदाहरण देऊन सांगायचे झाले तर चांद्रयान उड्डाणाआधी इस्रो च्या वैज्ञानिकांनी घेतलेले देवदर्शन.

> परस्परविरुद्धच आहेत ह्या गैरसमजुतीतून झालाय ?

अजिबात नाही !

बावळटपणा आणि विज्ञान परस्परविरोधी आहेत.
इस्रोचे शास्त्रज्ञ देवदर्शन घेतात यानं देव सिद्ध होत नाही.
त्याचा अर्थ इतकाच की अनिश्चिततेत त्यांनी काही तरी मानसिक आधार शोधला !

ते देवदर्शनाला गेले नसते आणि शांत राहीले असते तर त्यातनं त्यांची वैज्ञानिक आस्था जास्त प्रखर दिसली असती.

थोडा उकलून सांगतो
परस्परविरोध- अवकाशयान बांधणीत इस्रोच्या वैज्ञानिकांना देवाचे असणे/नसणे गृहीत धरायचे काहीच काम नाही (असा अंदाज बांधतो) त्यामुळे त्यांच्या श्रद्धेचा काही conflict नाही आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनासोबत.
पण उदाहरणार्थ, इस्रोच्या एखाद्या शास्त्रज्ञांची टॉलेमी/अरिस्टोटल/फ्लोजीस्टोन भौतिकशास्त्रावर श्रद्धा असेल, तर अवकाशयान बांधणीत conflict असेल, (श्रद्धा आणि विज्ञानात) तरीपण आपण म्हणू शकतो का कि श्रद्धा आणि विज्ञान सहअस्तित्वात असू शकते ?

शा वि कु's picture

17 Jun 2020 - 11:23 am | शा वि कु

श्रद्धा हि गोष्ट जर बिना पुरावा/तर्काधार मानायची गोष्ट असेल तर ती नक्कीच वैज्ञानिक मेथडोलॉजीच्या विरुद्ध जाते.
इस्रो च्या शास्त्रज्ञांनी देवदर्शन घेतले म्हणून श्रद्धा आणि विज्ञान एकत्र राहू शकतात हे म्हणणे थोडेसे अतार्किक आहे. जिथे परस्परविरोधी मते असतात (श्रद्धा आणि विज्ञानात) तिथे खरी चाचणी असेल. उदा- समुद्रउल्लंघन करणे हे मनुष्यासाठी वाईट/हानिकारक मानणे ही श्रद्धा आहे, आणि तसं असण्याची काही कारणे न सापडणं आणि बरीच उदाहरणे (समुद्रउल्लंघन करून आलेली मंडळी) सुद्धा ठणठणीत असणं, ह्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन वेगळा असेल. या /अशा मध्ये coexistence शक्य आहे का ?

जर श्रद्धा म्हणजे bad evidence वर एखादी गोष्ट मानणे असेल तर नक्कीच, by definition, ते वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परस्परविरोधी आहे.

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2020 - 12:30 pm | संजय क्षीरसागर

> एखादी गोष्ट मानणे असेल तर नक्कीच, by definition, ते वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परस्परविरोधी आहे.

हाच तर मुद्दा आहे !

पण श्रद्धाळूंना रद्दीच्या पुस्तकात छापलेल्या स्टोर्‍या या फुल एविडंस वाटतात,
त्यामुळे त्यांना आपण श्रद्धाळू प्लस विज्ञाननिष्ठ आहोत असा भ्रम होतो !

कोहंसोहं१०'s picture

17 Jun 2020 - 1:42 am | कोहंसोहं१०

कालीला नांवापलिकडे काहीही अर्थ नाही, ते नांवही माणसानंच दिलंय आणि ती प्रतिमाही माणसाचीच कल्पना आहे ---------> पुन्हा तेच तेच लिहिताय. नावापलीकडे अस्तित्व नाही हा तुमचा गैरसमज आहे आणि ते फक्त तुमच्यापुरते खरे आहे बाकीच्यांसाठी नाही. तुमचे स्वतःचेच उदाहरण देऊन उलगडून सांगितले तरीही तुम्हाला समजत नसेल तर माझा नाईलाज आहे.

" हे तुम्ही स्वतःच्याच प्रतिसादात म्हटल्याचं तुम्हाला स्मरत नाही. वाचा : तरी एका वाक्यात देतो. डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि मेडीकल संशोधन झालंय ते तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला बरे करण्यासाठी" >>>>>> सामान्य माणूस हा एक प्रचलित शब्द आहे. स्वतःला सामान्य माणूस म्हणणे याला नम्रता म्हणतात न्यूनगंड नाही. आता हेही सांगावे लागत आहे म्हणजे कमाल झाली गैरसमजूत करून घेण्याची.

तो तुमचा घोर गैरसमजच आहे.>>>> मिपा वरून तब्बल तीन वर्षे काढून टाकण्यात आलेला आयडी स्वतःला साधा, सरळ माणूस म्हणून मीच कसा बरोबर याचे अजूनही स्पष्टीकरण देत बसतो म्हणजे मिपा मॉडेरेटरचा अपमानच म्हणायचा.

कारण आतापर्यंत सहा वेळा तुम्हाला सांगून झालंय, तरी तुम्हाला कळत नसेल तर माझा नाईलाज आहे. >>>>>>>>>> जी व्यक्ती "आयडी ब्लॉक झाला नसता तर सदस्यांना जिएसटीमुळे देशाचं किती अपरिमीत नुकसान होतंय ते कळलं असतं आणि सत्तांतर होण्याची शक्यता होती" यावरही मीच कसा बरोबर याचे स्पष्टीकरण देत बसते त्यावरून गैरसमजात कोण आहे हे सांगावे लागणार नाही.
सत्तांतर होण्याच्या शक्यतेवर मात्र अजून एक

ROTFL3

> अर्थ नाही !

कारण तुमच्यासारख्या देवभोळयांच्या मनापलिकडे काली कुठेही नाही !

आता ही उघड गोष्ट तुम्हाला कळेपर्यंत पुन्हा पुन्हा लिहावी लागणार !

मेलेले लोक जीवंत होऊ शकतात आणि वाघावर बसून आकाशातून माणूस येतो असे भाबडे विचार करणारे लोक जिएसटीची काँप्लीकेशन्स समजू शकतील ही शक्यता शून्य !

त्यामुळे तुमचे हे प्रतिसाद अर्थशून्य आहेत.
आणि स्वतःची लंगडी समर्थनं देण्यासाठी तुमच्याकडे दुसरं काहीही नाही.

कोहंसोहं१०'s picture

17 Jun 2020 - 6:08 am | कोहंसोहं१०

जिएसटीची काँप्लीकेशन्स समजू शकतील ही शक्यता शून्य ! --------> प्रश्न जीएसटीचा नाहीच आहे हे मी आधीच सांगितले आहे. माझे अपरिमित हसू तुमच्या "आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर होण्याची शक्यता होती" असल्या अविचारी विधानाकडे आहे जे अजूनही तुम्ही केविलवाण्या पद्धतीने विषय बदलून डिफेन्ड करण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून अजून हसू येतेय. किती वेळा हसू करून घेणार अजून स्वतःचे?

त्यामुळे तुमचे हे प्रतिसाद अर्थशून्य आहेत. आणि स्वतःची लंगडी समर्थनं देण्यासाठी तुमच्याकडे दुसरं काहीही नाही -------> हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला लागू आहे कारण मी उदाहरण, पुरावे देऊन माझ्या म्हणणे योग्यपणे मांडले आहे. तुमच्या मात्र एकही विधानाला ना उदाहरण आहे ना पुरावा. नुसती तीच तीच बडबड. मागच्या एका धाग्यात तुमच्याकडे एकाने पुरावा मागितला आहे त्याच्या अजूनही प्रतीक्षेत. देताय ना पुरावा?

"तुमच्या बाकीच्या भाकडकथा बंद करा
15 Jun 2020 - 6:02 pm | त्याचू वैलपान
आणि तुम्ही जो दावा केला आहे, त्यासंदर्भात या प्रश्नांची उत्तरे द्या:

मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?

उत्तरे द्या किंवा या प्रश्नांची उत्तरे नसतील तर तुम्ही एक भंपक थाप मारली हे मान्य करा"

शा वि कु's picture

17 Jun 2020 - 11:00 am | शा वि कु

देवाचे नाव कोणी ठेवले हा प्रश्न लिटरल नाही असं दिसतंय. एकूण तर्काधारीत प्रश्न विचारावेत असा लेखकाचा सल्ला प्रशंसनीय आहे.

पण काही सोप्पे प्रश्न मोठ्या उलथापालथी घडवून आणू शकतात ते खरं.
American History X नावाच्या सिनेमात एक कृष्णवंशीय प्राध्यापक तुरुंगातील white supremacist ला एक साधा प्रश्न विचारतात- Has anything you have ever done made your life better ?

पर्फेक्ट !

> एकूण तर्काधारीत प्रश्न विचारावेत असा लेखकाचा सल्ला प्रशंसनीय आहे.

धन्यवाद !

> पण काही सोप्पे प्रश्न मोठ्या उलथापालथी घडवून आणू शकतात ते खरं.

अर्थात !

हा साधा प्रष्ण देव या भाकड कल्पनेचा डोलारा पूर्णतः खाली आणतो.

पण त्याला प्रष्णकर्ता किमान समज असलेला आणि स्वतःशी प्रामाणिक हवा !

हा काय प्रश्न झाला? देवाच्या आई पपानी ठेवलं ;)

हे तुम्हाला कोणी सांगितलं ?

अभ्या..'s picture

17 Jun 2020 - 12:22 pm | अभ्या..

सिंपल आहे. त्यांच्या आईपप्पांनी सांगितले.
;)

कोण गेलं होतं त्यांना भेटायला ?

हा धागा म्हणजे नवीन बाटलीत जुनी दारू असा आहे.
कधीही न संपणारा हा वाद आहे.
चालुद्या.. सेंचुरी साठी ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा. !!!

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2020 - 1:34 pm | संजय क्षीरसागर

ज्यांना समजेल त्यांच्यासाठी हा वाद कायमचा संपेल !

Rajesh188's picture

17 Jun 2020 - 1:57 pm | Rajesh188

देव ही संकल्पना आहे.
ते शक्तीचे,ऊर्जेचे प्रतीक आहे.
त्या मुळे तुम्ही देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही.
ह्या विश्वाचे कार्य ज्या ऊर्जेवर ,शक्तीवर नियंत्रित केले जाते ती ऊर्जा म्हणजे देव,निर्माता.
मग त्या शक्तीला कोणी भगवान शंकर म्हणेल,गणेशजी म्हणेल,अल्ला म्हणेल किंवा येशू म्हणेल तो विषय वेगळा आहे.
तुम्ही समाजाला विज्ञान निष्ट व्हा असा सल्ला देता तुम्ही स्वतः विज्ञान निश्ट आहात का.
रोजच्या जीवनात तुम्ही विज्ञानाला किती महत्त्व देता.
नैसर्गिक पिकलेला अंबा आणि कृत्रिम रित्या पिकावलेला आंबा तुम्ही ओळखलं का.
अशा रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू च्या पाठच्या विज्ञान तुम्ही स्वतः तपासले आहे का.
पृथ्वी सपाट च आहे गोल नाही हे मत तपासून पाहण्यासाठी मध्ये एका व्यक्ती नी हवेच्या फुग्यतून अवकाशात गेला.
त्या मध्ये त्याचा जीव गेला पण त्या व्यक्ती सारखे स्वतः सर्व गोष्टी तपासून पाहणाऱ्या व्यक्तीला ला विज्ञान nisht म्हणतात.
संशोधक जे सांगतात ते निमूट मान्य करणारे अंध श्रद्धा लू च्या यादीत च असतात.
नक्की तुम्ही कुठे आहात.

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2020 - 2:39 pm | संजय क्षीरसागर

उर्जेबद्दल वाद नाही. ती स्वयंभू आहे,
विश्व चालवणारा असा कोणी नाही,
ती मानवाची भ्रामक कल्पना आहे.

तुम्हाला हे ऑलरेडी सांगून झालंय. पाहा :

1 Jun 2020 - 9:09 am | संजय क्षीरसागर

स्टिफन हॉकींगनी त्याच्या "द ग्रँड डिजाइन" मधे म्हटलंय :

Invoking God is not necessary to explain the origins of the universe, and that the Big Bang is a consequence of the laws of physics alone.

प्रतिसाद देण्यापूर्वी वाचलंत तर माझा वेळ वाचेल.
_______________________________________
आता धाग्याचा उद्देश > वाचा :

कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.

कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.

कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.

संगणकनंद's picture

17 Jun 2020 - 3:08 pm | संगणकनंद

त्यांनी तुम्हाला उद्देशून विचारलं आहे:

तुम्ही समाजाला विज्ञान निष्ट व्हा असा सल्ला देता तुम्ही स्वतः विज्ञान निश्ट आहात का.

अर्थातच या प्रश्नाचे उत्तर नाही असं असल्याने तुम्ही ते उत्तर द्यायचं टाळलं. बरोबर ना?

मला तर वाटतं तुमचा आक्षेप लोकांच्या देवावरील श्रद्धेला आहे, अवैज्ञानिक गोष्टींना नाही. कारण अवैज्ञानिक विचारांचं तुम्हालाही काही वावडं नाही. नुकताच तुम्ही स्वतः एक अफाट अवैज्ञानिक दावा केला होता.
लोकांची देवावर श्रद्धा असल्याने तुमच्या देव विरोधी मतांना मिपावर कोणी भाव देत नाही. तुमचं खरं दुखणे हे असावं असं वाटतंय. म्हणून मग तुम्ही ते लोकांना विज्ञाननिष्ठतेच्या आडून ऐकवत राहता. आणि हे करत असताना तुम्हाला आपण स्वतःही विज्ञाननिष्ठ नाही याचा विसर पडतो.

तुमच्या मुद्द्यांना बगल दिलेल्या आणि त्याचू नाम जप करणार्‍या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत :)

शा वि कु's picture

17 Jun 2020 - 3:02 pm | शा वि कु

"अ" ला "अ" म्हणण्यात काय वावगं आहे मग ? उर्जेला ऊर्जा म्हणावे. देव हा शब्द ऊर्जा म्हणून फारसा वापरला जात नाही. देव म्हणजे एक व्यक्ती/एन्टीटी म्हणूनच उल्लेख असतो. हा वाद सुद्धा त्यावरच आहे. देव म्हणजे ऊर्जा असल्या ambiguous वाक्यावर कशाला बरे कोणी वाद घालेल ? त्यामुळे नास्तिक देव नाकारतात म्हणजे नक्की काय नाकारतात, ते पाहावे. देव म्हणजे ऊर्जा ही सर्वमान्य व्याख्या आहे काय ?

आणखी, हि ऊर्जा म्हणजे नक्की कुठली ? औष्णिक,आण्विक का आणि कुठली ? का हे देवाचे प्रकार म्हणायचे :P

संशोधक जे सांगतात ते निमूट मान्य करणारे अंध श्रद्धा लू च्या यादीत च असतात.

संशोधकावरचा विश्वास हा त्या एका व्यक्तीवरचा विश्वास नसतो कै. संशोधनपद्धती वरचा तो विश्वास असतो. ती व्यवस्था जी सतत नवनवीन माहितीच्या शोधात असते आणि जुने आडाखे खोडण्याचे काम कायम चालू ठेवते.

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2020 - 3:33 pm | संजय क्षीरसागर

> एक व्यक्ती/एन्टीटी म्हणूनच उल्लेख असतो. हा वाद सुद्धा त्यावरच आहे.

करेक्ट !

लोकांना कळत नाही असं नाही,
पण कळल्यावर ;
देव सोडायला जे साहस लागतं, ते त्यांच्याकडे नाही.

त्यापेक्षा तर्कशून्य वाद घालून,
पुन्हा भक्तीभावात तल्लीन झालं की आयुष्य पूर्वपदावर येतं !

गामा पैलवान's picture

17 Jun 2020 - 3:35 pm | गामा पैलवान

शा वि कु,

तुमच्या या विधानाशी १०० % सहमत आहे :

संशोधकावरचा विश्वास हा त्या एका व्यक्तीवरचा विश्वास नसतो कै. संशोधनपद्धती वरचा तो विश्वास असतो. ती व्यवस्था जी सतत नवनवीन माहितीच्या शोधात असते आणि जुने आडाखे खोडण्याचे काम कायम चालू ठेवते.

आ.न.,
-गा.पै.

माहितीच्या शोधात असते आणि जुने आडाखे खोडण्याचे काम कायम चालू ठेवते !

तेच तर व्हायला हवं म्हणून हा लेख !

पण इथे काय प्रकारे ते बघा.

'मेलेल्या माणसाला उठवून त्याच्याकडून ग्रंथ लिहून घेतला' !

आणि रद्दीतला ग्रंथ उचलून त्यातल्या पानाचा फोटो इथे डकवला की सगळं सिद्ध झालं !
स्वतःला सुद्धा प्रष्ण विचारायचा नाही !

ही समाजातल्या सुशिक्षितांची परिस्थिती !
अडाण्यांच्या भ्रमांची तर कल्पनाच करता येईल.

त्यात भर म्हणजे काही सदस्य तर फक्त लोकमत बघून स्कोर सेटल करायची संधी शोधतात.
त्यांना ना मुद्दा काये त्याच्याशी घेणं, न स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेशी !

संगणकनंद's picture

17 Jun 2020 - 3:53 pm | संगणकनंद

संशोधकावरचा विश्वास हा त्या एका व्यक्तीवरचा विश्वास नसतो कै. संशोधनपद्धती वरचा तो विश्वास असतो. ती व्यवस्था जी सतत नवनवीन माहितीच्या शोधात असते आणि जुने आडाखे खोडण्याचे काम कायम चालू ठेवते.

शा वि कु, थोडक्यात आणि व्यवस्थित सांगितलंत.

मात्र धागाकर्ते स्वतः विज्ञाननिष्ठ नाहीत बरं का. विज्ञान आणि संशोधन काय असतं हे तुम्हाला नेमकं माहीती आहे म्हणून सांगतो. काही दिवसांपूर्वी धागाकर्त्यांनी अफाट अशास्त्रीय दावा केला. हा बघा तो दावा:

पुनर्जन्म असं काहीही नाही
ती लोकांना दिलासा द्यायला शोधलेली एक कल्पना आहे
जेंव्हा आपण एखाद्याचा पुनर्जन्म झाला म्हणतो तेंव्हा काय झालेलं असतं ?
तर एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. या पलिकडे पुनर्जन्म म्हणजे काही नाही.
ही स्मृती जीवंत व्यक्तीच्या मेंदूखेरीज कुठेही नसते.
पण हा प्रकार कशामुळे होतो ?
नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते.
या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात.

अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो > आणि आपण म्हणतो पुनर्जन्म झाला !

अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे

हा तो दावा. पहीलं वाक्य "पुनर्जन्म असं काहीही नाही"आणि त्यापुढील काही भाग हे विज्ञानाचं दृष्टीकोनातून बरोबर आहे. कारण तसं काही विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं नाही. मात्र त्यापुढे धागाकर्त्याने जे काही कल्पनाचित्र रंगवलंय त्याला तोड नाही. स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात काय आणि अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात काय. मी म्हटलं तुमची "स्मृती स्ट्रीन्ग्झ" थियरी हे काही शास्त्रीय सत्य नाही. तो तुमचा कल्पनाविलास आहे. शास्त्रीय सत्य असेल तर या प्रश्नांची उत्तरे द्या:

मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?

धागाकर्त्यांनी कैक भाकडकथा सांगितल्या, कैक कोलांट्याऊड्या मारल्या. अमुक तमुक करा मग मी माझा दावा सिद्ध करतो, प्रूव्ह करतो अशा पळवाटा काढल्या. पण या प्रश्नांची उत्तरे काही दिली नाही. असा काही शोध लागलेलाच नाही तर हे उत्तरं कुठून देणार.

बघा, म्हणजे धागाकर्ते स्वतः अफाट अशास्त्रीय विधाने करतात आणि लोकांसमोर विज्ञानाच्या बाता मारतात.

शा वि कु's picture

17 Jun 2020 - 4:36 pm | शा वि कु

हे दावे खरोखर अचाट आहेत. मेमरी स्ट्रिंग आणि उर्जारूपी देव लॉजिकली एकाच पातळीवरती आहेत.

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2020 - 6:41 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही दिलेला प्रतिसाद अपुर्‍या माहितीवर आधारित आहे.
माझ्या दाव्याची संपूर्ण चर्चा वेगळ्या धाग्यावर झाली होती
आणि तो मी सिद्ध करु शकतो.
पण त्याचा इथे काहीही सबंध नाही.

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2020 - 6:45 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही दिलेला प्रतिसाद संपूर्ण दिशाभूल करणार्‍या माहितीवर आधारित आहे.

संगणकनंद's picture

17 Jun 2020 - 7:01 pm | संगणकनंद

पुनर्जन्म असं काहीही नाही
ती लोकांना दिलासा द्यायला शोधलेली एक कल्पना आहे
जेंव्हा आपण एखाद्याचा पुनर्जन्म झाला म्हणतो तेंव्हा काय झालेलं असतं ?
तर एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. या पलिकडे पुनर्जन्म म्हणजे काही नाही.
ही स्मृती जीवंत व्यक्तीच्या मेंदूखेरीज कुठेही नसते.
पण हा प्रकार कशामुळे होतो ?
नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते.
या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात.

अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो > आणि आपण म्हणतो पुनर्जन्म झाला !

अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे

हे तुम्हीच टाईप केलेलं असून मी जसंच्या तसं कॉपी पेस्ट केलंय. यातलं एक अक्षरही माझं नाही. शा वि कु नी वर दिलेल्या प्रतिसाद हा या तुमच्या या प्रकटनावरच दिलेला आहे.

अहंकारामुळे "मी एक अशास्त्रीय विधान केलं" हे मान्य करता येत नसेल तर गप्प बसा पण निदान खोटं तरी बोलू नका.

कोहंसोहं१०'s picture

17 Jun 2020 - 9:05 pm | कोहंसोहं१०

बरोबर. मिपामध्ये दिलेल्या प्रतिसादात बदल करणे सहज नाही त्यामुळे असा खोटारडेपणा लगेच उघड पाडता येतो. स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणून घेणारे जेंव्हा असले अशास्त्रीय विधान करून उघडे पडतात तेंव्हा त्यांचा खोटारडेपणा आणि दुटप्पीपणा; आणि केले तरी हरकत नाही पण नंतर चूक ओळखून मान्यही करत नाही यावरून त्यांचा अहंकार दिसून येतो.

विज्ञान विषयी मासिकात,आणि बाकी प्रसार माध्यमात संशोधक सरळ खोटे दावे प्रसारित करतात.
खोटे शोध प्रसिद्ध केले जातात ,चुकीची माहीत प्रसारित केली जाते.
कसले संस्थे वर विश्वास ठेवत आहात तुम्ही.
प्रतेक व्यक्ती नी संशोधकांचे दावे सुध्धा स्वतःच्या बुध्दी नी तपासून पाहिले पाहिजे तर तो व्यक्ती हाडाचा विज्ञान वादी.
इंटरनेट शोध घेतला तर किती तरी चुकीचे दावे सायन्स च्या नावाखाली प्रसिद्ध झालेले आहेत ह्याची तुम्हाला माहिती मिळेल.
कोणावर हि डोळे झाकून विश्वास ठेवणारे अंध श्रद्धाळू च असतात.

संजय क्षीरसागर,

काली हे फक्त नांव आहे आणि माणसाच्या मेंदूपलिकडे तीला कुठेही अस्तित्व नाही.

स्वतःच्या बापाच्या अस्तित्वाबद्दल हेच म्हणता येतं, नाहीका ! स्त्रीसंग करतांना दिसलाच नाही म्हणून तो आपला बापच नव्हे ....? हे काहीतरी उलटंसुलटं झालं ना? अशा वेळेस 'आई सांगेल तो माझा बाप', असा व्यवहारी मार्ग सगळ्यांना चोखाळावा लागतो. प्रस्तुत परिस्थितीत शब्दप्रामाण्य हा एकमेव मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही.

पण तुम्ही तर शब्दास ( म्हणजे नामसाधनेस) भ्रम मानायला सांगताय. कसं जमावं?

आ.न.,
-गा.पै.

हेच म्हणता येतं, नाही का !

पण बाप समोर आहे ना !

काली कुठे आहे ?

> शब्दप्रामाण्य हा एकमेव मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही.

'आई सांगेल तो माझा बाप'

याचा फॅक्ट चेक होऊ शकेल पण कालीचा कुठे करणार ?
ती अस्तित्त्वातच नाही !

त्यामुळे काली हा निव्वळ शब्द आहे
त्याला काहीही अर्थ नाही
तस्मात, अशा शब्दाचा कितीही जप करुन
काहीएक उपयोग नाही.

अर्थात, जपसाधना दीर्घकाल झाली तर भ्रमिष्ठावस्था येऊ शकते.
उदा. परमहंसांना (कुठेही नसलेली) काली दिसायची, आणि
ते तीच्याशी बोलायचे.

तुम्ही दावा केलेल्या मेमरी स्ट्रींग्जचा फॅक्ट चेक कुठे आणि कसा करता येईल सांगता का?
मला त्या अंतराळात निसटताना आणि नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरताना पाहायच्या आहेत. =))

शा वि कु's picture

17 Jun 2020 - 3:57 pm | शा वि कु

देव म्हणजे "pure energy/ pure consciousness/ pure truth" हे आर्ग्युमेन्ट नेहमी थोड्याफार फरकाने असेच असतात.
सॅम हॅरिस वि दीपक चोप्रा

ह्या विश्वात (आपण फक्त पृथ्वी पुरतेच विश्व मर्यादित असा अर्थ)सर्व सजीव निर्जीव एक साचेबद्ध वागत असतो.
आणि ही वागणूक ठरवून दिलेल्या प्रमाणेच असते.
स्व ला आपण कसे वागावे हे ठरण्याचा अधिकार नाही.
लोखंड घेतले तर ते कडक असते त्याचे स्वतःचे असे विशिष्ट गुणधर्म असतात .
प्रतेक वस्तू ,जीव ह्यांचे विशिष्ट गुणधर्म असतात आणि ते गुणधर्म त्या व्यक्तीला ,वस्तू ला ठरवण्याचा अधिकार नाही.
ते पहिलेच ठरलेले असतात त्या मध्ये बदल करण्याची सुधा क्षमता जीव, किंवा वस्तू मध्ये नसते.
सिंह हा मांसाहार च करणार,तो शिकार करण्यात उपजतच निषांत असतो.
हरणाची पिल्ले जन्म झाली की धावू लागतात.
पण माणसाची जन्म झाली की धावत नाहीत.
आणि स्वतः प्रयत्न करून सुधा जन्म झाल्या बरोबर धावणारी माणसाची मुल पैदा करता येत नाहीत.
थोडक्यात सांगायचं उध्येश हाच आहे इथे सर्व काही जे घडत आहे ते नियम नुसार घडत आहे.
त्या मध्ये बदल करण्याची क्षमता आपल्यात नाही.
हे जे सृष्टी चे नियम आहेत ती जी शक्ती ठरवते तो निर्माता.
प्रतेक प्राण्याची ठराविक दिशेने विचार करण्याची एक विशिष्ट प्रवृत्ती असते ती त्या त्या वर्गातील प्राण्यात एकसारखीच असते.
त्या ला माणूस अपवाद नाही.
मूळ भावना राग,लोभ,स्वार्थ ,आनंद सर्व मानवात एकसारख्याच असतात.
माणूस जेव्हा म्हणतो त्याने प्रगती केली तर हे वाक्य काही सत्य नाही तशी भावना त्याच्यात निर्माण करून ते काम माणसं कडून करून घेतले जात असावे असे म्हणणे खोडून कसे काढणार.
जाणिवेचा उगम च मेंदूत होतो.
आणि मेंदूत कोणती जाणीव निर्माण व्हावी हे आपण स्वतः ठरवू शकत नाही.
ह्या विश्वाचा निर्माता आहे ही जाणीव माणसात सामान आहे.
तो माणसाचा गुणधर्म च आहे नैसर्गिक.
जगाच्या कोपऱ्यात असा एक पण भू भाग नाही जिथे देव ही संकल्पना नाही.
ती सर्व ठिकाणी आहे ती नैसर्गिक भावना आहे.
जे नास्तिक आहेत ते नैसर्गिक भावनेच्या विरूद्ध कृत्रिम पने वागत आहेत पण त्यांच्या मनातील गोंधळ ते लपवू शकत नाहीत.
कोणत्या ना कोणत्या रूपात ते अज्ञा त शक्ती वर श्रद्धा ठेवताच असतात .
आपण इथे नवीन काही ही शोधलेले नाही आपण ज्याला नवीन शोध म्हणतो ते आपल्या साठी नवीन असते पण विश्वाच्या निर्मिती पासून ते अस्तित्वात असते .
वीज आपण शोधलेली नाही ती उत्पत्ती पासूनच अस्तित्वात आहे.
प्रतेक वस्तू आपले गुणधर्म सोडत नाही म्हणून हे जग स्थिर आहे तसे घडले नाही तर विश्व नष्ट होईल.
त्या मुळेच नैसर्गिक गुणधर्म बदलण्याची क्षमता निसर्गाने कोणालाच दिलेली नाही.
अगदी माणसाला सुद्धा नाही.
जेवढी बुध्दी जास्त तेवढं विचारांचे वादळ मोठे.
ह्या विचारांच्या वादळाचे अनियंत्रित चक्री वादळाचा रूपांतर होवू नये म्हणून त्या वर नियंत्रण मिळवण्यासाठी अध्यात्म,देव,तत्व ज्ञान
ह्याची गरज असते ते आवशक्य च आहे.
देव नाकारणे हा विषय होवूच शकत नाही जी शक्ती प्रत्येकाला विशिष्ट गुणधर्म प्रधान करते ती शक्ती म्हणजेच देव आहे.
तो तुम्ही नाकरूच शकत नाही.
जन्म झाल्या झाल्या माणूस धावू शकत नाही .
आणि ते आपल्या मर्जी वर नाही.
तसेच देव असणे किंवा नसणे हे आपल्या मर्जी वर नाही.

शा वि कु's picture

17 Jun 2020 - 6:11 pm | शा वि कु

मगाशी देव म्हणजे "ऊर्जा" होता, आता देव म्हणजे साचा/ प्लेटोच्या तत्त्वज्ञानातली "फॉर्म" कल्पना आहे, आणि यानंतरही काहीतरी गूढ आणि न समजणारी गोष्ट आहे असं तुम्ही म्हणत राहणार. त्यामुळे फारसा अर्थ नाही टंकण्यात, पण शेवटचा प्रयत्न.
एखादी गोष्ट आहे तशी का आहे हेच वैज्ञानिक शोधत असतात.त्यांनी सुद्धा देवाने ठरवलेला साचा असं उत्तर द्यावे काय ? काय आधारावर साचा बनवणारी शक्ती आपल्या संपर्कात आहे म्हणावे ? जर हि शक्ती आपल्यापासून इतकी disconnected असेल, तर फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पझेस, ती नाहीच अस मानून का चालू नये ?
जी शक्ती नियम ठरवते तो निर्माता - easy way out.

ती सर्व ठिकाणी आहे ती नैसर्गिक भावना आहे.
जे नास्तिक आहेत ते नैसर्गिक भावनेच्या विरूद्ध कृत्रिम पने वागत आहेत पण त्यांच्या मनातील गोंधळ ते लपवू शकत नाहीत.

माणसाचे विचार म्हणजे नैसर्गिक ? होमो सेपियन या आपल्या स्पेशीपेक्षा जास्त काळ या पृथ्वीतलावर डायनासोर्सने व्यतीत केला आहे. जर कुणाचे विचार नैसर्गिक म्हणायचेच असतील, तर डायनासोरचे म्हटले पाहिजेत. जास्त काळ बाळगलेले विचार योग्य असतात असं तुम्हाला वाटतं का ?

प्रतेक वस्तू आपले गुणधर्म सोडत नाही म्हणून हे जग स्थिर आहे तसे घडले नाही तर विश्व नष्ट होईल.

एक शब्द- रसायनशास्त्र.

वीज आपण शोधलेली नाही ती उत्पत्ती पासूनच अस्तित्वात आहे.

निसर्गाचे/भौतिकशास्त्राचे नियम बनवण्याचा दावा कोणीही करत नाही.

प्रचेतस's picture

17 Jun 2020 - 5:20 pm | प्रचेतस

रोचक चर्चा.

माझे व्यक्तिगत मत- देव वगैरे भ्रामक संकल्पना आहेत.

पण काही लोकांची देववरील श्रद्धा ही त्यांची व्यक्तिगत असू शकते किंवा त्यांचा जगण्याचा आधारही असू शकते. ज्याला जे वाटते ते त्याने करावं. दुसऱ्याला न दुखवता एखादा आपली श्रद्धा पाळत असल्यास हरकत काय?

त्याचप्रमाणे नास्तिक मनुष्यासही देव नाही ह्या धारणाही बाळगता याव्यात. पण म्हणून त्याने इतरांच्या श्रद्धांवर हल्ला करण्यात काय हशील आहे.

सर्वेपि सुखिन संतु|

सोत्रि's picture

17 Jun 2020 - 6:00 pm | सोत्रि

_/\_

जो जे वांछील तो ते लाहो |

- (व्यक्तीगत) सोकाजी

मूकवाचक's picture

17 Jun 2020 - 6:39 pm | मूकवाचक

प्रचेतस जी, तुम्हाला ईतिहासाची गोडी असल्याने एक प्रश्न विचारतो आहे.

भारतवर्षात अन्य (आस्तिक्यवादी, भक्तीमार्गी इ.) परंपरांइतक्याच नास्तिक्यवादी, शून्यवादी, निरीश्वरवादी, इहवादी परंपरादेखील पूर्वापार चालत आलेल्या आहेत. त्यांचा फार मोठा ईतिहास आहे. त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने होते आणि आहेत. या परंपरांचे म्हणा त्या मानत असलेल्या लोकांचे विज्ञान क्षेत्रात (मूलभूत विज्ञान या अर्थाने तसेच नवीन 'पाथ ब्रेकिंग' संशोधन या स्वरूपातले - उदा. नवीन रसायनांचा किंवा संयुगांचा शोध, नवीन तंत्रज्ञानाचा किंवा उपकरणांचा शोध) किती आणि काय योगदान आहे?

आपल्याइथं मुळातच एक प्रॉब्लेम फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. इथं डॉक्युमेंटेशन होत नाही. त्यामुळे कुणी काय शोध लावले ते सांगता येत नाही.
आर्यभट, सुकृत, वराहमिहीर आदी काही शास्त्रज्ञ, वैद्य जरूर होते मात्र त्यांच्या धारणा नक्की काय होत्या ते समजत नाही. त्यांचे काही साहित्य वाचले असते तर त्यावरून थोडाफार अंदाज बांधता आला असता.

बाकी रामायणात अयोध्या कांडात जाबालीकडून नास्तिक मताचे समर्थन आणि रामाकडून आस्तिक मताची पुनर्स्थापना ह्यावरील संवाद रोचक आहे. मला मात्र जाबालीचे मत पटते.
अर्थात ह्या संवादात वैज्ञानिक शोधांचा मात्र उल्लेख नाही. आपल्या प्रतिसादाच्या मिषाने हे आठवले म्हणून.

Rajesh188's picture

22 Jun 2020 - 5:58 pm | Rajesh188

रामायण काळा पासून नास्तिक विचार मांडायचा जोरदार प्रयत्न अनेक लोकांनी केले पण समाजात ते विचार कधीच रुजले नाहीत.
बहुसंख्य लोकांनी ते नाकारले.

आताच्या काळात सुद्धा नरेंद्र Dabholkar ni सुध्धा जोरदार प्रयत्न केले पण त्यांना पण ते शक्य झाले नाही त्यांच्या you tube video 2 lakh lok सुद्धा बघत नाहीत.
आणि पुढे पण कोणी स्वीकारतील असे वाटत नाही.

संजय क्षीरसागर's picture

22 Jun 2020 - 7:10 pm | संजय क्षीरसागर

बहुसंख्य लोकांना काहीही करु दे
कारण त्यांना आपण सांगायचं काम करु शकतो.

मी किती लोकांच्या धारणा, किती हजार वर्षांच्या आहेत,
हे कधीही पाहिलं नाही.

जे मला पटलं नाही ते सोडून दिलं !

देव ही माणसाचीच कल्पना आहे म्हटल्यावर
तो हद्दपार करुन टाकला ! किती वेळ लागतो ?
विषय कायमचा संपला.

फक्त देव सिद्ध होत नाही म्हणून नाकारणे एवढे सोपे नाही.
कारण अस्तिकाता ही नास्तिक ते पेक्षा अधिक तर्कसंगत आहे.
नस्तिकाता नैतिकता धोक्यात आणू शकते अशी लोकांची तीव्र भावना आहे.
आणि ते समाजस्वास्थ्य साठी चांगले लक्षण नाही.
माणूस हा इतर प्राण्यांना पेक्षा वेगळा आहे कारण काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे तो जाणतो आणि हा विकास वादी परिणाम आहे.
एकदा व्यक्ती बुडत असेल आणि मला पोहता येत नसेल तरी त्या व्यक्ती ला वाचवलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात निर्माण होईल पण जर मी नास्तिक विज्ञान वादी असेन तर माझ्या मनात उत्क्रांती वादी विचार येतील त्याला बुडू ध्या तो कमजोर आहे दुर्बल माणसाची काळजी करू नका आपला dna japun thevha to sashakt आहे म्हणून तो टिकेल.
कारण उत्क्रांती वाद चांगले किंवा वाईट सांगत नाही.
गूढ विश्वाचे रूप बघून आपण प्रथम आश्चर्य चकित झालो त्या मुळे मी कोण आपण कोठून आलो हे प्रश्न आपल्याला पडले आणि म्हणूनच हे प्रश्न विज्ञान चे भाग झाले.
देव अस्तित्वात नाही ह्याचा नास्तिक लोकाकडे पुरावा नाही आणि तो अस्तित्वात असल्याचा पण पुरावा नाही .
ह्या वर नास्तिक व्यक्ती असे बोलेल की माझा देवा वर विश्वास नाही आणि विश्वास नाही हा शब्द विज्ञान च्या विरूद्ध आहे.
ह्याच बाबतीत विज्ञान वादी व्यक्ती विश्वास नाही असा घोषा लावणार नाही तो म्हणेल ठीक आहे आपण गृहितक बनवू,पुरावे गोळा करू.

सतिश गावडे's picture

22 Jun 2020 - 9:53 pm | सतिश गावडे

एकदा व्यक्ती बुडत असेल आणि मला पोहता येत नसेल तरी त्या व्यक्ती ला वाचवलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात निर्माण होईल पण जर मी नास्तिक विज्ञान वादी असेन तर माझ्या मनात उत्क्रांती वादी विचार येतील त्याला बुडू ध्या तो कमजोर आहे दुर्बल माणसाची काळजी करू नका आपला dna japun thevha to sashakt आहे म्हणून तो टिकेल.

फारच विनोदी लिहिलंय तुम्ही. नास्तिक लोकांना तुम्ही राक्षसांचे अवतार वगैरे तर मानत नाही ना :)

सतिश गावडे's picture

22 Jun 2020 - 10:02 pm | सतिश गावडे

नस्तिकाता नैतिकता धोक्यात आणू शकते अशी लोकांची तीव्र भावना आहे.

हा एक मोठा गैरसमज आहे, म्हणजे देवाच्या, पाप पुण्याच्या भीतीने आस्तिक माणूस नैतिकतेने वागतो आणि नास्तिक ।माणसाला अशी भीतीच नसल्याने त्याच्याकडे नैतिकता नसते.

लक्षात घ्या नितीमत्तेचा आणि आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नसतो.

सतत देवाचे नाव घेणाऱ्या, लोकांना देवाचे भजन कीर्तन सांगणाऱ्या बाबा लोकांना का बरे तुरुंगात जावे लागते विविध गुन्ह्यांची शिक्षा म्हणून?

शा वि कु's picture

22 Jun 2020 - 10:32 pm | शा वि कु

लक्षात घ्या नितीमत्तेचा आणि आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नसतो

Rajesh188's picture

22 Jun 2020 - 10:57 pm | Rajesh188

त्यांची पूर्ण मस्त तुम्ही वाचली असतील च.
पहिला देवा वरचा विश्वास डळमळीत करायचा त्या मध्ये यश मिळाले की धर्माला टार्गेट करायचे त्या मध्ये पण यश मिळाले की रिती रीवाज,परंपरा,कुटुंब व्यवस्था.
आणि शेवटी नैतिकता.
असा पूर्ण समाज रचना नष्ट करण्याची ही चढती पायरी आहे.
स्त्री आणि पुरुष ही दोनच नाती आहेत .
आई,बहीण सेक्स ला वर्ज्य नाहीत इथ पर्यंत मत मांडली आहेत नास्तिक मंडळी नी.
आणि तुम्ही म्हणताय नास्तिकता आणि नैतिकता ह्याचा काही संबंध नाही.

तुम्ही इतरांनी दिलेले प्रश्न अनुत्तरित ठेवता. तो प्रश्न मुळातच तुमच्या येणाऱ्या पुढील प्रश्नाला उत्तर असतो. (मला असे कोणी नास्तिक माहित नाहीयेत. पण मर्फीज लॉ.असा नास्तिक असू शकतो म्हणून उत्तर देत आहे.)तुम्ही चटकन कोण्या नास्तिकाचे मत मांडून नास्तिकता आणि अनैतिकतेचे नाते जोडले. धर्मातल्या अनैतिकतेचे मात्र तुम्ही नावही नाही काढत ! वर काही बाबांबद्दल सतीश गावडे यांनी एक विधान केले आहे, त्याकडे तुम्ही मस्तपैकी दुर्लक्ष केले.बरं चला ते राहु द्या. तुम्हाला धार्मिक लोकांच्या घाणेरड्या किळसवाण्या कृत्यांची यादी पाहिजे काय ? Because happy to oblige :) लक्षात घ्या तुम्हीच पुन्हापुन्हा बहुसंख्य कसे आस्तिक आहेत सांगत असता. मग बहुसंख्य गुन्हेगार पण आस्तिकच आहेत. याचा अर्थ आस्तिकता नैतिकता सोडून आहे असं अनुमान मी काढलं तर ते तुम्हाला चालेल काय ? त्यामुळे थोडा तर्काचा फिल्टर तुम्हीही लावून चर्चा करावी ही विनंती, नाहीतर ह्यात काही अर्थ राहत नाही.

अभ्या..'s picture

23 Jun 2020 - 12:25 am | अभ्या..

तुम्ही इतरांनी दिलेले प्रश्न अनुत्तरित ठेवता.
त्यात नवीन ते काय. तर्क शून्य काहीतरी गोल गोल लिहायचं. त्यात अभ्यासाचा अभाव. वर कुणी काही प्रश्न विचारले तरी सोयीस्कर दुर्लक्ष करून अजून काहीतरी गोल गोल सतत लिहित राहायचं हीच तर त्यांची खासियत आहे. सगळा संस्थळावर उच्छाद मांडून त्याबद्दल सगळ्यांकडून थपडा खाऊनही असल्या आयादिसोबत लोक चर्चा करतात हीच नवलाची गोष्ट आहे.

Rajesh188's picture

23 Jun 2020 - 12:53 am | Rajesh188

पाहिले पूर्ण वाचत जा त्याचा अर्थ समजून घेत जा आणि नंतर मत मांडत जा.
फक्त समविचारी कंपूत आयुष्य गेल्या मुळे आणि समविचारी असल्या मुळे कोणी विरोध करत नसल्या मुळे स्वतला तुम्ही सर्व ज्ञानी समजायला लागला आहात.
नस्तिक्त विचारानं मुळे नैतिकता धोक्यात येईल असे मी मत व्यक्त केले होते.
आता का ते समजवायला वेळ नाही
तरी एका वाक्यात सांगतो.
त्यांना वाईट काम आणि गैर कृत्य ह्यांची भीती,लाज वाटणार नाही
ह्या ला प्रत्युत्तर म्हणून बाबा महाराज तुरुंगात का आहेत असा त्यांनी प्रश्न केला त्याचे मी उत्तर दिले नाही.
कारण त्या बाबा चा गुन्हा वैयक्तिक लेवलचा आहे आस्तिक लोकांनी मिळून केलेला नाही.
आणि त्यांचे गुन्हेगारी वर्तन योग्य आहे असे कोणी म्हटलं पण नाही.

शा वि कु's picture

23 Jun 2020 - 8:35 am | शा वि कु

अच्छा. नास्तिक व्यक्तीने देव धर्म सोडून इतर गोष्टीवरचे व्यक्त केलेले मत हे सगळ्या नास्तिक कंपूचे असते
पण बाबा इत्यादींनी केलेले मात्र "व्यक्तिगत पातळीवरचे" गुन्हे असतात काय ?
मानलं बघा राजेशभौ :)))

शाम भागवत's picture

22 Jun 2020 - 10:42 pm | शाम भागवत

हाहाहा

सतिश गावडे's picture

22 Jun 2020 - 7:10 pm | सतिश गावडे

तुम्ही तुमची मांडणी चुकीच्या आधारावर करत आहात असे वाटते. देव मानणारे लोक मानणारे हे लोक न मानणार्‍या लोकांपेक्षा संख्येने कैक पटीने जास्त आहेत म्हणून नास्तिकांचा दावा केवळ या एका मुद्द्यावर निकालात निघू शकत नाही. बाकी तुमचा निष्कर्ष योग्य आहे, नास्तिक विचार समाजात फारसे रुजले नाहीत हे मात्र खरे.

मी जे काही डॉ दाभोलकरांचे साहित्य वाचले आहे, व्हिडीओज पाहीले आहेत त्यावरुन डॉ दाभोलकरांचा देव संकल्पनेला विरोध नव्हता असे वाटते. त्यांनी बुवाबाजी, देवतांना पशू बळी देणे इत्यादी चुकीच्या गोष्टींच्या बाबतीत समाज प्रबोधन केले. किंबहूना अशा गोष्टींसाठी त्यांनी "अंधश्रद्धा" असा शब्द वापरला आहे. तसे पाहता अंधश्रद्धा हा शब्दच चुकीचा आहे. अंध श्रद्धा किंवा डोळस श्रद्धा असे काही नसते. श्रद्धा असते किंवा नसते. पण तरीही अंधश्रद्धा शब्दामुळे त्यांना काही देवविषयक घातक नसणार्‍या श्रद्धा या इतर शोषण करणार्‍या घातक श्रद्धांपासून वेगळ्या करता आल्या.

त्यांच्या you tube video 2 lakh lok सुद्धा बघत नाहीत.

युट्युबवरील व्हिडीओला मिळणारे व्ह्युज हे काही एखाद्याच्या कार्याचं मोजमाप करण्याचं परीमाण होऊ शकत नाही.

आणि पुढे पण कोणी स्वीकारतील असे वाटत नाही.

हे असं होतंय खरं. एकंदरीतच काळ जसजसा पुढे सरकतोय, विज्ञानाने नवनविन गोष्टी कळत आहेत नविन तंत्रज्ञान उपयोगात येत आहे, तितका माणूस अधिकाधिक देव संकल्पनेकडे, बुवा, बाबा, महाराजांकडे वळतोय हे मात्र खरं. असं का होतंय हा ही आता एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. :)

तुम्हीच तर याचं प्रामाणिक उत्तर दिलंय :

> > भक्तीने प्रसन्न होणारा, नवस-उपास यांना पावणारा, दुष्टांचे निर्दाळन करणारा देव !

अशी धारणा असेल तर मग भक्तीभोळे,
लोकसंख्येबरोबर बेसुमार वाढणार नाहीत तर काय ?

शा वि कु's picture

22 Jun 2020 - 8:13 pm | शा वि कु

बहुसंख्य लोकांचे विचार बरोबरच असतीलच असं असत काय?
आणि एक गमतीशीर आकडेवारी- 2009 ते 2018 मध्ये स्वतःला नास्तिक मानणाऱ्या अमेरिकन्स च्या आकड्यात लोखंसंख्येच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे.
2009-2%
2018-4%

टक्केवारी दुपटीने वाढली आहे :))

मामाजी's picture

17 Jun 2020 - 5:30 pm | मामाजी

संक्षी साहेब आपल्या मते वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? हे जरा स्पष्ट करून सांगावे ही विनंती..

या धाग्यावरचा सर्वात विधायक प्रश्न !

सर्व विज्ञान हा कार्यकारणाचा शोध आहे.

थोडक्यात, कोणतीही घटना घडायला नक्की काय कारणीभूत झालं याचा शोध म्हणजे विज्ञान

वैज्ञानिक सत्य म्हणजे शास्त्रज्ञांनी शोधलेला नेमका कार्यकारणभाव किंवा सिद्धांत !

प्रत्येक सिद्धांत कायम ३ अटी पूर्ण करतो :

१. निर्वयैक्तिकता २. स्थल- काल निरपेक्षितता आणि ३. वारंवारिता

उदा. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत > कुणीही, कुठेही आणि केंव्हाही वस्तू सोडली तर ती नेहेमी खालीच येईल

वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कोणतीही गोष्ट मान्य करण्यापूर्वी या ३ नियमांवर तपासून घेणं
______________________________________

देवभोळयांचा कायदा नेमका उलटा आहे !
ते त्याला 'चमत्कार' म्हणतात.
तिथे पुरावा मागणं म्हणजे 'स्वतःला शहाणा समजणं' > पाहा :

भक्त : शंकराचार्य असामान्य
प्रश्न : कशापायी ?
भक्त : त्यांनी मेलेल्या व्यक्तीला जीवंत करून स्वतःचा ग्रंथ लिहून घेतला !
प्रश्न : कशावरुन ?
भक्त : त्या ग्रंथातच म्हटलंय ! (हा यांचा पुरावा. आणि त्या ग्रंथातलं ते पान इथे डकवलं की `बघा, तुम्हाला तोंडावर पाडलं !)
प्रश्न : कुठे आहे तो फॉर्म्युला ?
भक्त : (ज्याम पिसाटून) तुम्ही स्वतःला शंकराचार्यांपेक्षा भारी समजता का ?
प्रश्न : मी फक्त फॉर्म्युला विचारला.
भक्त : मीच एकटा सर्वज्ञ कसा ? मग तिथे सगळे देवभोळे एकत्र जमून टाळ कुटतात !

____________________________________

बरं हे इथेच थांबत नाही.
हे लोक स्वतःचा पंतप्रधान निवडतांना तोच भक्तीभाव वापरतात !

प्रश्न : देशात रोजगार कसा निर्माण होईल ?
मोदी : त्यात काय अवघड आहे ? तुम्हाला फक्त संधी दिसायला हवी.
मी पेपरात वाचलंय एक चहावाला गटारातल्या गॅसवर चहाचा धंदा करत होता ! नाली गॅसप्रणाली

(भक्तांचा टाळ्यांचा कडकडाट !)

प्रश्न : सर जरा डेमो दाखवाल का ?

भक्त : हा अजेंडावाला आहे. पाठवा पाकिस्तानला !

_________________________________

थोडक्यात, काय एकदा चमत्कार म्हटलं की पुढे बोलायचं नाही आणि भक्ती म्हटली की विरोध करणारा `स्वतःला शहाणा समजतो!'

तर असा हा सगळा दिव्य प्रकार यत्रतत्र सर्वत्र चालू आहे.

तस्मात, लोकात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून हा लेख.

कोहंसोहं१०'s picture

18 Jun 2020 - 1:43 am | कोहंसोहं१०

दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: "नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो "

दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: लोकात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून हा लेख
वाचक: मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?

दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: हा देवभोळा आहे. देव अस्तित्वातच नाही.
-------------------------------------
दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: जपामुळे साधक भ्रमिष्ठ होण्याची शक्यता असते
दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर होण्याची शक्यता होती
वाचक: हसून हसून जमिनीवर लोळले

संजय क्षीरसागर's picture

18 Jun 2020 - 2:04 am | संजय क्षीरसागर

देवाचं नांव कुणी ठेवलं ?

तुम्ही कितीही आवांतर करा,
काहीही उपयोग नाही.

कोहंसोहं१०'s picture

18 Jun 2020 - 2:10 am | कोहंसोहं१०

मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
----> हे अजूनही बाकीचं आहे. अवांतर तुमचे होतंय.

कोहंसोहं१०'s picture

18 Jun 2020 - 6:24 pm | कोहंसोहं१०

दुसरया पानवर उत्तर दिले आहे

मामाजी's picture

18 Jun 2020 - 9:28 am | मामाजी

धन्यवाद संक्षी सर

प्रत्येक सिद्धांत कायम ३ अटी पूर्ण करतो :
१. निर्वयैक्तिकता २. स्थल- काल निरपेक्षितता आणि ३. वारंवारिता
उदा. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत > कुणीही, कुठेही आणि केंव्हाही वस्तू सोडली तर ती नेहेमी खालीच येईल
वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कोणतीही गोष्ट मान्य करण्यापूर्वी या ३ नियमांवर तपासून घेणं

आपल्याला अभिप्रेत असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेउन मी एक उदाहरण देतो.. कोणालाही, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही आणि दररोज दिसते की आपण व सभोवतालचा परिसर आपल्या जागी स्थिर असतो व सकाळी उगवणारा सूर्य सरकत सरकत विरूद्ध दिशेला जातो.. या वरून मी हा सिद्धांत मांडतो की पृथ्वी स्थिर, अचल आहे व सूर्य पृथ्वी भोवती फिरतो. आपल्या 3 नियमांवर तपासलेला हा सिद्धांत आपल्याल मान्य आहे का?

संजय क्षीरसागर's picture

18 Jun 2020 - 10:41 am | संजय क्षीरसागर

काही काळ वैज्ञानिक सत्य वाटू शकतो.

पण एखादा कुशाग्र बुद्धिमत्तेचा अशा भ्रमांना आव्हान देतो, मग संशोधन सुरु होतं आणि अंतीमतः निर्विवाद वस्तुस्थिती समोर येते.

देवभोळयांच्या चमत्कारांना अशीच आव्हानं दिली जातात, तेंव्हा ते फेल होतात.
मग भक्तजन 'ते सामान्यांना शक्य नाही' वगैरे भाबडे युक्तीवाद कतात. > पाहा :

प्रश्र : काली पोटदुखी बरी करते तर इतकं वैद्यकीय संशोधन कशापायी ?
उत्तर : ते सामान्यांसाठी आहे !

काही काळ वैज्ञानिक सत्य वाटू शकतो.

मेमरी स्ट्रिंग्ज वैज्ञानिक सत्य आहे का?
स्वतःच्या भल्या मोठ्या वैज्ञानिक असत्यावर तोंड उघडत नाही तुम्ही आणि लोकांसमोर वैज्ञानिक सत्याच्या बाता मारताय. =))

धन्यवाद संक्षी सर,
काही काळ वैज्ञानिक सत्य वाटू शकतो.
पण एखादा कुशाग्र बुद्धिमत्तेचा अशा भ्रमांना आव्हान देतो, मग संशोधन सुरु होतं आणि अंतीमतः निर्विवाद वस्तुस्थिती समोर येते.

बरोबर मग आता सांगा एखादा कुशाग्र बुद्धिमत्तेचा अशा भ्रमांना आव्हान देतो म्हणजे नक्की काय करतो.
माझ्या मते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आवश्यक असे जे 3 नियम सांगीतले आहेत त्यांच्या मर्यादा/त्रृटी लक्षात घेउन नित्यनेमाने घडणार्या घटनांचे योग्य ते स्पष्टिकरण देणयासाठी त्या नियमांत आवश्यक ते बदल करून सुधारित नियम सांगतो..
आपले मत यापेक्षा वेगळे असल्यास सांगावे. .
त्या नंतर मी पुढचा मुद्दा मांडतो

बरोबर मग आता सांगा एखादा कुशाग्र बुद्धिमत्तेचा अशा भ्रमांना आव्हान देतो म्हणजे नक्की काय करतो.

हे त्यांना नाही सांगता येणार. कारण त्यांचा स्वतःचा "मेमरी स्ट्रिंग्ज" नावाचा भला मोठा भ्रम आहे. स्वतः भ्रम बाळगणारा काय भ्रमाना आव्हान देण्याबद्दल बोलणार =))

संजय क्षीरसागर's picture

18 Jun 2020 - 12:05 pm | संजय क्षीरसागर

> माझ्या मते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आवश्यक असे जे 3 नियम सांगीतले आहेत त्यांच्या मर्यादा/त्रृटी लक्षात घेउन नित्यनेमाने घडणार्या घटनांचे योग्य ते स्पष्टिकरण देणयासाठी त्या नियमांत आवश्यक ते बदल करून सुधारित नियम सांगतो.

एखादा सिद्धांत या ३ नियमांनी सिद्ध झाला की मर्यादा आणि त्रुटी हा प्रष्णच येत नाही.

संगणकनंद's picture

18 Jun 2020 - 12:19 pm | संगणकनंद

तुमच्या मेमरी स्ट्रिंग्ज झाल्यात का हो विज्ञानाने सिद्ध?
इतरांना पकडून पकडून विज्ञान शिकवताय तर माझ्या प्रतिसादाच्या बाबतीत वाळूत तोंड खुपसून का बसताय?

बाकी तुमच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे. स्वतः अशास्त्रीय विधाने करुन लोकांना विज्ञान काय असतं ते शिकवताय =))

तुम्ही वाळूत तोंड लपवत असलात तरी पाठीमागे तुमचं अज्ञान उघडं पडलंय हे दिसतंय लोकांना =))

कोहंसोहं१०'s picture

20 Jun 2020 - 2:34 am | कोहंसोहं१०

हे वाचून मला एका नाटकातील संवाद आठवला- मोर आनंदाने आपल्याच धुंदीत पिसारा फुलवून नाचत असतो. त्याला वाटतं आपण आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करतोय पण असे करताना मात्र त्याला हे कळतंच नाही की हे करताना आपला पार्श्वभाग उघड पडलाय :-)

संक्षी सर,
एखादा सिद्धांत या ३ नियमांनी सिद्ध झाला की मर्यादा आणि त्रुटी हा प्रष्णच येत नाही. हीच जर आपली ठाम भूमिका असेल तर मग पृथ्वी स्थिर आहे व सूर्य पृथ्वी भोवती फिरतो हा सिद्धांत पण आपल्याला स्विकारावाच लागेल कारण तो आपल्या याच 3 नियमांनी सिद्ध केलेला आहे आणि त्या नियमांत कोणत्याही मर्यादा व त्रृटी नाहीत. . .
तात्पर्य संक्षी सरांच्या कोणत्याही मर्यादा व त्रृटी नसलेल्या अशा 3 नियमांवर आधारित विज्ञाननिष्ठ भूमिकेनूसार मी हे सिद्ध केले की पृथ्वी स्थिर आहे व सूर्य पृथ्वी भोवती फिरतो..
आता यात माझी गल्लत कुठे होते ते पण जरा स्पष्ट करा .

शा वि कु's picture

18 Jun 2020 - 2:05 pm | शा वि कु

तुम्ही दिलेल्या महितीवरून तुम्ही काढलेला निष्कर्ष योग्य आहे. पण आपल्याकडे कोपर्निकसच्या काळापासून यापेक्षा खूप जास्तीची माहिती अस्तित्वात आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही काढलेला निष्कर्ष योग्य नाही, कारण तुम्ही तो अर्धवट माहितीवर काढला आहे.

सं. क्षी. यांचे वरील तीन नियम अपुरे आहेत अस दिसतंय खरं. तर्काच्या सर्व पायऱ्या शब्दात उतरवणे फारच अवघड काम. पण असे काम रॅशनलिस्टसनी केले आहे. सॉक्रेटिस,नॉर्मन लेविस हे उदाहरणे आहेत. नॉर्मन लेविस यांचे "गेम ऑफ लॉजिक" त्यासंबंधात आहे. त्यामुळे हि चर्चा जर constructive व्हायची असेल, तर तुम्हीच तुमचे उदाहरण तपासा आणि नियमांमध्ये भर घाला.

उदा- 4)अस्तित्वात असलेला सर्व विदा/ज्ञान या सिद्धांतामध्ये विचारात घेतला असावा.

रॅशनॅलिटी बद्दल उत्सुकता असल्यास - Less Wrong

संजय क्षीरसागर's picture

18 Jun 2020 - 2:26 pm | संजय क्षीरसागर

सार्वजनिक दृष्टीभ्रम म्हणजे सिद्धांत नाही.

सध्या तुमचं काय मत आहे ?

कोण कुणाभोवती फिरतंय ?
________________________

आणि इतकं गोलगोल फिरवण्यापेक्षा तुम्ही तुमचा जो काय सिद्धांत असेल तो मांडून
या तीन निकषांवर सिद्ध केलात तर बोलता येईल.

मामाजी's picture

18 Jun 2020 - 3:47 pm | मामाजी

संक्षी सर,
सार्वजनिक दृष्टीभ्रम म्हणजे सिद्धांत नाही.
आपले उदा. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत > कुणीही, कुठेही आणि केंव्हाही वस्तू सोडली तर ती नेहेमी खालीच येईल
माझे उदा..कुणीही, कुठेही आणि केव्हाही बघीतले तरी सूर्यच सरकताना दिसतो
.
या दोन उदाहरणात माझ्या दृष्टीने काहीच फरक नाही पण आपल्या मते मात्र माझे उदाहरण म्हणजे सार्वजनिक दृष्टीभ्रम आहे. . ठीक आहे जर तसे असेल तर माझे उदाहरण हा सार्वजनिक दृष्टीभ्रम कसाआहे हे आपणच समजाउन सांगावे अन्यथा पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही वस्तुस्थिती सिद्ध करायला आपले 3 विज्ञाननिष्ठ नियम तोकडे पडतात हे मान्य करावे.

वाटत असेल तर जमेल तितक्या उंचीवरुन उडी मारुन पाहा.

आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं (अजूनही वाटत) असेल तर अवकाशयानातून घेतलेले विडिओज पाहा

मामाजी's picture

18 Jun 2020 - 6:34 pm | मामाजी

संक्षी सर,
मी गुरुत्वाकर्षण हा दृष्टीभ्रम आहे असे कुठेही म्हणालो नाही उलट ते उदाहरण स्वीकारून त्याला लावलेल्या विज्ञाननिष्ठ निकषांवरच समांतर असे माझे वेगळे उदाहरण दिले. मात्र त्याचे स्पष्टीकरण न देता त्याला सार्वजनिक दृष्टीभ्रम म्हणून आपण पळवाट काढलीत. त्यावर कडी म्हणजे मला जास्तीत जास्त उंचीवरून उडी मारायचा तसेच अवकाशयानातून काढलेले व्हीडीओ बघायचा सल्ला दिलात. परंतू ही माझया प्रश्नांची उत्तरे नाहीत. असो या वरून मी हा निष्कर्ष काढला की 3 नियमांवर आधारीत आपण मांडलेला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हा अपूर्ण आहे..

सो कॉल्ड ३ नियमांवर आधारीत अशी कुठलिही अट विज्ञानात नाहि.. कारण त्या ३ कंडीशन इंपॉसीबल आहेत.
कुठल्याही प्रयोगात एक भलंमोठं '*' मार्क असतं जे 'इन गिव्ह्न कंडीशन्स' डिफाइन करतं. साधं गुरुत्वाकर्ष्ण प्रत्येक ठिकाणि सारखं नाहि, नॉर्थ-साउथ पोल्स बदलत असतात, अशा वेळी कुठला प्रयोग त्या ३ कंडीशन पूर्ण करणार ?

या विश्वात वारंवरीता अशक्य आहे.
कुठल्याही प्रयोगाची वारंवारीता तपासताना एक्सपेक्टेड एरर मार्जीन दिफाईन केलीच असते. किंवा तेव्हढी एरर मार्जीन पकडायला आपले प्रयोग सक्षम नसतात.
संक्षी साहेबांना एव्हढं सगळं झेपणार नाहि. त्यांना तसंही विज्ञानाशे काहि घेणं देणं नाहि. त्यांचा मुद्दा विज्ञानात बसत नसेल तर ते विज्ञानाला देखील केराची टोपली दाखवतील.

सर्व विज्ञान हा कार्यकारणाचा शोध आहे.

थोडक्यात, कोणतीही घटना घडायला नक्की काय कारणीभूत झालं याचा शोध म्हणजे विज्ञान

वैज्ञानिक सत्य म्हणजे शास्त्रज्ञांनी शोधलेला नेमका कार्यकारणभाव किंवा सिद्धांत !

प्रत्येक सिद्धांत कायम ३ अटी पूर्ण करतो :

१. निर्वयैक्तिकता २. स्थल- काल निरपेक्षितता आणि ३. वारंवारिता

तुम्ही लिहीताना काही थोडा फार विचार करता की जे आलं मनात ते टाईप करता?

हे सारं तुम्ही फार मोठा विज्ञाननिष्ठ असल्याचा आव आणून लोकांना शिकवत आहात. मात्र स्वतः एक अचाट अशास्त्रीय दावा केला आहे तो कुठल्या शास्त्रज्ञाने शोध लावला हे सांगत नाही.

आता तुम्हीच लिहीलेल्या प्रतिसादाला आणि तुम्ही केलेल्या अचाट अशास्त्रीय दाव्याला अनुसरुन द्या बरं या प्रश्नांची उत्तरे:

मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?

Rajesh188's picture

17 Jun 2020 - 6:42 pm | Rajesh188

देवळात जावून लोकांना मानसिक समाधान मिळत असेल तर त्या मध्ये आक्षेप घेण्यासारखे काय आहे.
रस्त्यात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यास आक्षेप घेणे समजू शकतो
पण स्वतःच्या घरात गणेश उत्सव साजरा करण्याला आक्षेप का असावा.
ग्रंथाचे वाचन करून जर एकाध्या व्यक्तीचे नैराश्य नष्ट होत असेल आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होत असेल तर त्या वर आक्षेप का असावा.
अंत विधी च्या आडून योग्य रित्या मृत शरीराची विल्हेवाट लावली जात असेल तर आक्षेप का असावा.
विविध अंत विधी च्या नावाखाली सर्व नातेवाईकंकडून मृत व्यक्तीच्या जवळच्या लोकांचे सांत्वन केले जात असेल काही दिवस अन्न पुरवले जात असेल तर त्या मध्ये आक्षेप का असावा.
विविध सण च्या निमित्ताने लोक एकत्र येत असतील ,एकमेकात मिसळून जात असतील तर आक्षेप का असावा(नवरात्री उत्सव)
कोणाचा द्वेष करू नका, हत्या करू नका,कोणाला त्रास देवू नका,कोणाला फसवू नका नाही तर पाप लागेल देव शिक्षा देईल ह्या मध्ये आक्षेप घेण्यासारखे काय आहे

प्रथा आनंद देत असतील आणि हानिकारक नसतील तर बेलाशक पाळाव्यात. कोणत्याही देवाच्या अस्तित्वाची फोडणी देण्याची गरज नाही.

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2020 - 6:52 pm | संजय क्षीरसागर

' कोणत्याही देवाच्या अस्तित्वाची फोडणी देण्याची गरज नाही '

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2020 - 6:50 pm | संजय क्षीरसागर

त्यापेक्षा एकच प्रष्ण स्वतःला विचारा :

देवाचं नांव कुणी ठेवलं ?

आणि सगळी उत्तरं तुमची तुम्हाला मिळतील !

देव ,सृष्टी निर्माता,सृष्टी चे नियम हे समजणे कोणत्या ऐर्या गैर्या चे काम नाही..
खूप गहन विषय आहे.
जगातील सर्वात हुशार माणसे थकली शोध घेवून काही धांगपत्ता नाही लागला.
रोज नवीन प्रश्न पडत आहेत एक प्रश्न पण सुटला नाही