रंग रंग तू, रंगिलासी
दंग दंग तू, दंगलासी
भंग भंग तू, भंगलासी
वेड्यापिश्या रे जिवा
जाशी उगा जीवाशी
अव्यक्त बोल रे तुझे
शब्दांचे झाले तुला ओझे
का धावीशी उगा तू रे
कुणी नाही वेड्या रे तुझे
तो सूर्य देई एकला शक्ती
समिंदराची ओहोटीभरती
आकाश झेलते तारे
मग का हवे रे , तुला सारे ?
का जन्म घेतलासी ?
हा डाव साधलासी
रंगात रंगुनिया साऱ्या
संसार मांडलासी
गती मंद होत तुझी जाईल
मग हार गळ्याशी येईल
अग्नीत दग्ध होई सारे
आला तसाच रिता जाशील
ऐक साद अंतरात्म्याची
शमेल खाज त्या बुडाची
घे नाम त्या शिवाचे
लाभेल गती तुला मोक्षाची
========================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
12 May 2020 - 7:12 pm | गणेशा
छान आहे कविता
13 May 2020 - 5:11 pm | खिलजि
गणेशा साहेब ,,, धन्यवाद
20 May 2020 - 3:01 pm | आयर्नमॅन
ओहो ओहो ओहो... भलेच तीव्र