((देवानं विडंबकांना असं का बनवलं?))

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जे न देखे रवी...
29 Mar 2009 - 4:06 pm

(मूळ प्रेरणा : मिपा वरील समस्त विडंबने)

देवानं विडंबकांना असं का बनवलं?
दिसली कविता की तिला झोडावं
सगळ्याच विडंबनायोग्य वाटतात
पण मिपाकरांना उठसूट वेठीला का धरावं?

कधी गळे दाबावे, कधी छाताडावर नाचावे
प्रत्येक विडंबन का इतके अवगुणी?
दळभद्री मेली प्रतिभा, एकीवर बसत नाही
दर पाच धाग्यांनंतर यांचीच तुणतुणी!

कुणी हसून प्रतिक्रिया देतं
कुणी नाइलाजानं कौतुक करतं
कुणी शालजोडीतले हाणत असते
पण "जनाची ना मनाची' तरी यांना कुठे असते?

कुणी "लिहू नका' सुचवू पाहतं
क्वचित कुणी थेट हल्ला करतं
किती प्रकारे त्रास दिला, तरी
विडंबनाच्या व्यसनात मन फसतं

सगळ्याच कविता विडंबनयोग्य असतात?
"नको नको' म्हणूनही विडंबने का होतात?
कोणाकोणाचे हात धरावेत?
"दुर्गुणा'लाही अलीकडे "प्रतिभा' म्हणतात!

(टीप : प्रस्तुत (कथित) कवितेतील मते, टिप्पण्या, टोले काल्पनिक नसून, त्यांचा वास्तवाशी संबंध आढळल्यास तो योगायोग अजिबात समजू नये!)

(आणखी एक टीप : वरील (कथित) कवितेत मात्रा, यमक, रचना, गेयता, अलंकार वगैरे काव्यशास्त्राचे नियम धाब्यावर बसविण्यात आले असून, ते शिकवू पाहणार्‍यांचे ज्ञानही आम्ही धाब्यावर बसवतो!)

विडंबनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

29 Mar 2009 - 4:17 pm | टारझन

काही मनातल्या लाईन्स .. झकास .. लैच आवडल्या

कुणी हसून प्रतिक्रिया देतं
कुणी नाइलाजानं कौतुक करतं
कुणी शालजोडीतले हाणत असते

=)) =)) बेष्ट

आपला टारझन

अभिज्ञ's picture

29 Mar 2009 - 4:19 pm | अभिज्ञ

सर्क्युलर रेफरन्स असलेले विडंबन वाचायाला मजा आली.

अभिज्ञ.

अनामिक's picture

29 Mar 2009 - 5:24 pm | अनामिक

अभिजित दा... लै भारी... मस्तं जमलंय!

-अनामिक

लवंगी's picture

29 Mar 2009 - 6:19 pm | लवंगी

एक चांगल विडंबन आलय. आवडल.

प्राजु's picture

29 Mar 2009 - 8:01 pm | प्राजु

जोरदार ...षट्कारच एकदम!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/