समज-गैरसमज

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
12 Mar 2009 - 12:10 am

"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' असं म्हटलं जातं. (म्हणजे काय, कुणास ठाऊक!) लहानपण हा आयुष्यातला सगळ्यात मोलाचा, महत्त्वाचा टप्पा असतो, एवढंच त्यातून घेण्यासारखं. अर्थात, हे कळतं लहानपण सरल्यावर आणि जास्त अक्कल आल्यावरच. लहानपणात मात्र आपणच हुशार, असं वाटत असतं. त्या वयात मनात काही संकल्पना, व्याख्या, तत्त्वं घट्ट बसलेली असतात. मोठ्ठं झाल्यानंतरही त्या प्रतिमांचं, संकल्पनांचं भूत मानगुटीवरून उतरायला बराच वेळ द्यावा लागतो.
माझ्याही लहानपणी अशा अनेक कल्पना, गृहीतकं मनात घट्ट बसली होती. आपल्याकडे लहान मुलाला कुठल्याही गोष्टीविषयी असलेलं नैसर्गिक कुतूहल, उत्सुकता याविषयी समजावून सांगण्याऐवजी आणखी काहीतरी गूढ, अकल्पित सांगण्याची प्रथा आहे. किंवा आमच्या पिढीच्या लहानपणात तरी होती. साधी-सोपी आणि मुलांना समजू शकेल अशी गोष्टही निष्कारण अवघड करून सांगायची आणि त्या मुलाच्या मनाचा गोंधळ वाढवून ठेवायचा. मुंजीत दंडात बेडकी भरण्याचा बागुलबुवा हा यातला आदीम प्रकार. मुंजीच्या वेळी त्या लहानग्याचं वय असतं जेमतेम आठ ते दहा वर्षं. मुंजीतल्या या "अघोरी' प्रथेविषयी त्याच्या मनात भयगंडच निर्माण होईल, याची पुरेपूर खात्री मामे, काके, आई-वडील या गैरसमजाची भलावण करून सांगण्यातून करायचे. मलाही या बेडकी प्रकाराने मुंज होईपर्यंत धडकी भरली होती. शेवटी मुंजीचा दिवस संपता संपता, असलं काही नसतं, हे कळलं होतं. पण दंडात "बेडकी' येणं, म्हणजे शरीर वाढीला लागण्याचं लक्षण, शरीरात बदल घडण्याचं, तारुण्याकडे वाटचाल करण्याचं लक्षण, हे सरळ-साधं सत्य कुणी सांगण्याची तसदी घेतली नाही.

काही गैरसमज असे वडीलधाऱ्यांच्या सांगण्यातून होतात, तर काही नकळत मनात रुजत असतात. त्याविषयी कुतूहलानं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न न केल्यानं, किंवा कुणी स्वतःहून न सांगितल्यानं ते मनात पक्के होत जातात. लहानपणी महाभारतातल्या गोष्टी ऐकताना "चक्रव्यूह' प्रकरणाचं मला भारी आकर्षण आणि गूढ वाटायचं. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला, म्हणजे काय, तेच जाम कळायचं नाही! सैन्याची गोलाकार रचना, म्हणजे एखाद्या गुहेसारखी किंवा गणपतीत देखावे तयार करतात, तशी कुठेतरी अज्ञात ठिकाणी अशी सैनिकांची गोलाकार (गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना धुडकावून!) रचना केली असावी की काय, अशीच शंका यायची मला. मीही ती निरसन करून घेण्याचा प्रयत्न बरीच वर्षं केला नव्हता. साध्या जमिनीवर सैन्याला विशिष्ट रीतीनं उभी करण्याची रचना म्हणजे चक्रव्यूह, हे (मोठेपणी) समजल्यावर "एवढीही अक्कल नव्हती आपल्याला,' असं वाटून गेलं.

राजकीय तत्त्वं आणि समजाबद्दलची तर बातच वेगळी! कॉलेजात असेपर्यंतही बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी म्हणजे आपली दैवतं होती. आणि कॉंग्रेसचे तमाम पुढारी म्हणजे जवळपास राक्षस वाटायचे. ठाकरे-पवार हे मित्र आहेत आणि एकमेकांना भेटतात-बिटतात असं सांगणाऱ्या एका मित्राविषयी त्या क्षणी "तूच का तो ब्रूटस' असंच वाटलं होतं. कारण मनताल्या कोणत्याही संकल्पना, गृहीतकं यापेक्षा वेगळं काही या समाजात असू शकतं, हे लहानपणी कुणी कधी मनावर बिंबवलंच नव्हतं. एकाच विषयाला अनेक पैलू असतात, व्यक्तिमत्त्वाला अनेक रंग असू शकतात, हे समजण्याची पात्रताच नव्हती.

आता माझ्या चार वर्षांच्या लेकीलाही मी अतिउत्साहानं पोस्ट ऑफिस म्हणजे काय, तिथलं काम कसं चालतं, झाडं कशी वाढतात वगैरे गोष्टी शिकवायला जातो (आणि ती मला फाट्यावर मारून खेळायला निघून जाते,) तेव्हा मला माझ्या लहानपणाच्या या आठवणी कुठेतरी मनात असतात. आपल्या मुलीनं आपल्याइतकं तरी बावळट राहू नये, अशी माफक अपेक्षा असते.

तुमच्याही असतील ना अशाच काही आठवणी? जुन्या काळची, जुनाट गृहीतकं, भोळ्या कल्पना? सांगाल??

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

12 Mar 2009 - 12:26 am | प्राजु

अगदी भरपूर.
एक समजूत होती म्हणजे.. सिनेमात गाण्यावर नाचणारी/रा नट/ नटी हीच गात असते. मग एकदम तीला सगळं कसं अगदी नीट येतं असं वाटायचं.
दुसरी समजूत होती..अगदी लहान असताना जेव्हा जीवशास्त्र या विषयाबद्दल काहीही माहिती नव्हती तेव्हा..
कधी कधी आजी नकळतपणे बोलून जायची "तुझा भाऊ लाडका आहे.. बरोबर! तुला भाकरिच्या तुकड्यावरच (विकत)घेतली ना!!"
तेव्हा वाटायचं .... मला भाकरीच्या तुकड्यावर घेतली तर भावाला बहुतेक श्रीखंड आम्रखंडावर घेतलं असावं .. म्हणून आजीचा तो लाडका आहे.
आजी उपहासाने म्हणते आहे हे नंतर लक्षात आलं. आणि मुलं अशी कोणत्याही तुकड्यावर घेत नाहीत हे फारच नंतर लक्षात आलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

निखिल देशपांडे's picture

12 Mar 2009 - 11:54 am | निखिल देशपांडे

मला सुद्धा..... घरचे सांगायचे कि तुला बोहारणि कदुन जुने कपड्यांचा बद्ल्यात घेतले आहे.....

कुमार भिडे's picture

12 Mar 2009 - 12:26 am | कुमार भिडे

टि.व्हि. वरिल जाहिराती मुळ्ये मुलान्चे मराठी बिघडत आहे का?

टिउ's picture

12 Mar 2009 - 12:38 am | टिउ

जहिराती, मुळ्ये, मुलान्चे

इतका टिव्ही बघु नका!

आपला अभिजित's picture

12 Mar 2009 - 12:45 am | आपला अभिजित

टीव्ही, वरील, बघू!!!

आपला अभिजित's picture

12 Mar 2009 - 12:36 am | आपला अभिजित

`अवांतर' असा उल्लेख न करताही तुम्ही जी समर्पक प्रतिक्रिया टाकली आहे, त्याबद्दल धन्यवाद कुमार भिडेसाहेब!!! :?

माफ करा, हा कौल आहे का?? :S

मुक्तसुनीत's picture

12 Mar 2009 - 12:55 am | मुक्तसुनीत

लेख आवडला. थोडेसे स्मरणरंजन , थोडेसे चिंतन , थोडीशी मजा.

"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" म्हणजे काय ?
लहानपण दे गा देवा
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर
त्याच अंकुशाचा मार.

थोडक्यात थोर्थोर लोकांना अंकुश पडतो , लहान मुंगीस साखरेचा रवा मिळतो. तस्मात , देवा मला लहानच ठेव ! असा अर्थ.

बाकी लहानपणच्याच अनेक चुकीच्या संकल्पना , गैरसमज (इतरांप्रमाणे) माझ्याही होत्याच. तुमच्या लेखात लहानपणीच्या गमतीजमती सांगताना त्यामधे अचानक ठाकरे-पवार आले याची मला थोडी गंमत वाटली.

भडकमकर मास्तर's picture

12 Mar 2009 - 1:30 am | भडकमकर मास्तर

"महिना संपला की दिनदर्शिकेवरील महिन्याचे पान देव उलटून देतो का? " असे मी चार वर्षांचा असताना आईला विचारले होते....( घराघरांतील दिनदर्शिकेचे महिन्याचे पान बदलून देणे हे देवाचे महिनाअखेरीचे महत्त्वाचे काम आहे अशी माझी पक्की समजूत होती.)

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

12 Mar 2009 - 2:02 am | शितल

(घराघरांतील दिनदर्शिकेचे महिन्याचे पान बदलून देणे हे देवाचे महिनाअखेरीचे महत्त्वाचे काम आहे अशी माझी पक्की समजूत होती.)
=))

भाग्यश्री's picture

12 Mar 2009 - 1:58 am | भाग्यश्री

वाह अशा बर्‍याच गोष्टी होत्या! आत्ता दुर्दैवाने काहीच आठवत नाही आहे..
पण मजा असायची लहानपणी.. काय एकेक समज गैरसमज.. ! आणि जे मनात येईल ते बोलायची निरागसता...
मी लक्षद्वीपला जायच्या आधी अगदी दारात आईला खूप निरागसपणे विचारले होते, आपले जहाज बुडले तर?? आई हताश.. आणि मी वर म्हणतीय, कित्ती मज्जा ना! डॉल्फीन्स बरोबर येऊ आपण घरी वगैरे ! :|

http://bhagyashreee.blogspot.com/

सहज's picture

12 Mar 2009 - 5:59 am | सहज

मला देखील वाटायचे की समुद्रात मदतीची गरज असली की दरवेळी डॉल्फीन धावून (पोहून) येतोच :-)

शितल's picture

12 Mar 2009 - 2:10 am | शितल

आई माझा अभ्यास घेत होती, तिने विचारले मेणबत्ती कधी विझते मी उत्तर दिले होते लाईट आल्यावर मेणबत्ती विझते. :(
आमच्या वाड्यात पाण्याचे ड्रम भरलेले असायचे कामवाल्याबाईसाठी त्याला बाथरूम कोणता तरी सौम्य करंट बसत होता, पाण्यात हात घातला की तो सौम्य करंट जाणवे, मी आमच्या आजुबाजुच्या मुला मुलींना आणी भावाला त्या पाण्यात हात घालायला सांगे आणी मग आपल्या ड्र्म मध्ये आकाशातील वीज पडली त्यामुळे ते आपल्याला ते तसे लागते असे अनुमान मी काढले होते. :(

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 2:27 am | बिपिन कार्यकर्ते

अभिजितनी छानच विषय लावून दिला डोक्याला. मी ५-६ वर्षांचा असताना आजीला विचारलेला प्रश्न...

जेव्हा कोणालाही बाळ होते तेव्हा ते बाळ मुलगा की मुलगी हे कसे ओळखतात? :( (अर्थात उत्तर मिळायचा प्रश्नच नव्हता... "शहाणाच आहेस. हो तिकडे" असं काहीसं तिने म्हणलेलं आठवतंय.)

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

12 Mar 2009 - 6:15 am | चतुरंग

म्हणजे ही चिकित्सक बुद्धी तेव्हापासून 'कार्यकर्ते' आहे! ;)

चतुरंग

केदार_जपान's picture

12 Mar 2009 - 6:51 am | केदार_जपान

मलाही हाच प्रश्न होता...तेव्हा आई म्हणाली...सोप्पे आहे..
मुलगी असली तर तिच्या डोक्यावर केस असतात आणि मुलगा असेल तर केस खूप कमी असतात... :)
आणि माझाही तोच (गैर) समज होता बरेच दिवस... ;)

---------------------------------
केदार जोशी

चतुरंग's picture

12 Mar 2009 - 6:23 am | चतुरंग

प्रत्येक व्यक्तीचे पूर्ण नाव समजलेच पाहिजे असा काही ग्रह मी करुन घेतला होता. आजोबांनी गोष्ट सांगताना विष्णूचा उल्लेख आला, मी विचारले "आजोबा, विष्णूचे पूर्ण नाव काय?"
क्षणभर आजोबा विचारात पडले मग म्हणाले "मला माहीत नाही. विष्णूचं पूर्ण नाव विचारणारा तू पहिलाच असशील!" मग बराच वेळ मी विचार करत राहिलो की आजोबांनाही माहीत नाही अशा काही गोष्टी असतात. त्याचा धक्का बसला होता मला!

चतुरंग

मनिष's picture

12 Mar 2009 - 9:22 am | मनिष

विष्णू वसुदेव यादव - पुरा नाम, अय! ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Mar 2009 - 11:34 am | llपुण्याचे पेशवेll

ते तर श्रीकृष्णाचे नाव झाले. विष्णूचे नाव. विष्णू वैकुंठकर किंवा विष्णू शेषशायी वगैरे काहीतरी असेल. :)
जसे लक्ष्मीचे 'सौ. लक्ष्मी विष्णू वैकुंठकर' असे होऊ शकते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मनिष's picture

12 Mar 2009 - 11:38 am | मनिष

हे विसरलेच होतो! विष्णू चे नाव हवेय नाही का? :P

सँडी's picture

12 Mar 2009 - 7:05 am | सँडी

लग्न झाले की "आपोआप" मुलं होतात हा आम्चा लहानपणीचा सगळ्यात मोठा (गैर)समज, आमच्या शेजारच्या colonyतील एका कन्येने "दुर" केला!

प्राजु's picture

12 Mar 2009 - 7:45 am | प्राजु

माझी आजी मला तिच्या शाळेतल्या गमतीजमती सांगत होती. सांगता सांगता, म्हणाली "मॅट्रीक झाले आणि मग माझं लग्न झालं."
मी म्हणाले "म्हणजे तू मोठी होतीस का तेव्हा??".. आजी म्हणाली "हो ..१४-१५ वर्षांची होते." मग मी विचारलं मग तेव्हा "तुला किती मुलं होती??"
आजीने सणसणीत शिवी हासडली मला आणि "हो बाजूला तिकडं" असं म्हणाली. तेव्हा आपलं नेमकं काय चुकलं हेच समजलं नव्हतं :(

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्ता २०'s picture

12 Mar 2009 - 7:39 am | मुक्ता २०

मला सुद्धा असे बरेच गैरसमज होते. त्यातला एक म्हणजे कि माझी आई दूरदर्शनवर बातम्या देते. म्हणुन रोज आजोबांसोबत बसुन टि.व्ही बघायचे!! नंतर बरेच वर्षानी कळलं कि ते तसं नाहिच!

प्र. माझ्या बहिणीने विचारला होता बाबांना, " बाबा, माकडं कपडे का नाही घालत? " तेव्हा ती ३-४ वर्शांची असेल..

इतक्यात आमच्या कुत्रिने (डायना) ७ पिलांना जन्म दिला. पहिलं पिल्लु झालं तेव्हा लगेच, "काकू, पिल्लं कुठुन येतात?"-इति माझा चुलत भाऊ. :)

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2009 - 10:16 am | प्रकाश घाटपांडे

मलाही या बेडकी प्रकाराने मुंज होईपर्यंत धडकी भरली होती.

मलाही जाम भीती वाटायची. मग मी एक आयडिया केली होती. हळुच ब्लेडने मांडीवर छेद दिला व नंतर ती जखम भरु दिली. त्याचा वण उमटु दिला. मुंजीत मांडीत बेडूक भरायची वेळ आली कि गुरुजींना सांगायच कि अगोदरच तो दुसर्‍या गुरुजींनी भरलेला आहे. आता आवश्यकता नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मन्जिरि's picture

12 Mar 2009 - 10:25 am | मन्जिरि

आम्हि गावाला गेलो होतो . बहिण होति चार वर्शाचि बोबडि.तिने महिस (माफि दोन मात्रा आल्या नहित) पहिल्यादाच पाहिलि तिने आइला विचारले होते "अग हे ताळ ताळ काय दिसतय ग ''

चिरोटा's picture

12 Mar 2009 - 10:34 am | चिरोटा

बस कन्डक्टरला लोक सारखे पैसे देत असतात म्हणुन मी घरी 'बाबा,तुम्ही बस कन्डक्टर का नाही होत?"असा प्रश्न विचारला होता.

अमोल नागपूरकर's picture

12 Mar 2009 - 10:44 am | अमोल नागपूरकर

लहानपणी ढगान्च्या गडगडण्याचा आवाज ऐकून मला असे वाटायचे की स्वर्गमध्ये सर्व देव आपआपल्या रथातून जात असावेत. त्यामुळे इथे जसा ट्रक, बस वगैरेन्चा आवाज येतो तसा तिथला आवाज येत असावा.

पाषाणभेद's picture

12 Mar 2009 - 10:53 am | पाषाणभेद

लहाणपणी रेडिओ ऍकतांना सगळे गायक खरच रेडिओत बसून गातात असे वाटे.
-( सणकी )पाषाणभेद

योगी९००'s picture

12 Mar 2009 - 11:15 am | योगी९००

अगदी ७/८ वी पर्यंत माझा पं नेहरू फार आदरणीय वाटायचे.

मी जर झोपा काढत असलो आणि कोणी हटकलेच तर चाचा नेहरूच "आराम हराम है" असे म्हणतात असे मीच सांगायचो. जसे आपणं पैसा वैसा, अलाणा फलाणा असे जोड शब्द म्हणतो तसे मला आराम-हराम हे जोडशब्द वाटायचे. तेव्हा झोपायला जाताना बर्‍याचदा म्हणायचो की चला आराम-हराम करूया. सुदैवाने लोकांना वाटायचे की मी जोकच करतोच. म्हणून ते हसायचे.

तसेच मला लहानपणी गायी म्हशींची धार काढतात आणि दुध मिळते असे सांगितल्यावर पहिल्यांदा कळले नव्हते की शिंगाची धार काढल्यावर दुध कसे काय मिळते? (हाच गैरसमज आदरणीय पु.ल.नां सुद्धा होता. त्यांनी हसवणूक मध्ये माझे बालजीवन मध्ये सांगितले आहे. पण माझा गैरसमज तो लेख वाचायच्या आधीचा होता. ) पण बाबांनी एकदा मला कोल्हापुरला कट्ट्यावर नेले आणि धारोष्ण दुध पिऊ घातले. तेव्हाच हा समज दुर झाला.

खादाडमाऊ

जागु's picture

12 Mar 2009 - 12:19 pm | जागु

माझे नाव प्राजक्ता आहे. आमच्या घरी प्राजक्ताचे झाड आहे. रोज त्याचा सडा पडतो. घरातले लोक प्राजक्ताच्या झाडाबद्दल बोलत असतात. माझी मुलगी २.५ वर्षाची होती तेंव्हा तिची काकी सकाळी प्राजक्ताची फुले गोळा करत होती. माझ्या मुलीने ते बघितले आणी तिला म्हणाली ती फुल नको घेऊ माझ्या आईची आहेत ती.

प्राजु's picture

12 Mar 2009 - 7:12 pm | प्राजु

मी मागच्या वर्षी भारतात गेले होते तेव्हाचा हा किस्सा.
आईकडे कोल्हापूरला प्राजक्ताचं झाड आहे. माझं नावही प्राजक्ता आहे ना, तर माझा लेक मला विचारतो, "तू या झाडाच्या ट्रंकमधून (बुंध्यातून) बाहेर आलीस आणि मग आजीनं तुला पाहिलं आणि घरात आणलं का? "
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आपला अभिजित's picture

12 Mar 2009 - 7:17 pm | आपला अभिजित

आईचं पोट फाडून डॉक्टर मूल बाहेर काढतात, मग ते शिवलेलं पोट कधीच कसं दिसत नाही, या प्रश्नानं तर माझं अर्ध बालपण अस्वस्थ केलं आहे!!!

आपला अभिजित's picture

12 Mar 2009 - 6:08 pm | आपला अभिजित

सगळे बालपणाच्या बावळटपणाच्या आठवणींत न्हाताहेत नुसते!!

लेखात अन्य काही गमतीदार गैरसमज सांगायचेच राहिले.

1. पृथ्वी गोल असते, मग ती स्वतःभोवती फिरताना माणसे पडत कशी नाहीत, असा प्रश्‍न मला पडायचा. (भूगोल शिकल्यानंतरही त्याचे पूर्ण निरसन मला झाले आहे, असे वाटत नाही.)

2. पृथ्वीचं शेवटचं टोक कुठे असेल, असाही एक प्रश्‍न कायम सतावायचा. म्हणजे, कुठेतरी असं एखादं ठिकाण असेल, जिथे जमीन, पाणी संपतच! पुढे थेट दरी! म्हणजे विमानाच्या खिडकीतून खाली बघितल्यासारखं! त्याचंही समर्पक उत्तर देणारा कुणी "माई का लाल' लहानपणात तरी भेटला नाही!

3. "माकडाचं घर बांधून झालंच नाही,' असा धडा शाळेत होता. तेव्हा खरंच माकडाचं घर असतं कुठे, या कुतूहलानं पछाडलं होतं. अजूनही ते कुतूहल शमलेलं नाही. आता आमच्या इमारतीसमोरच खिडकीच्या तावदानाच्या जागेत कबूतरं उभ्या उभ्या रात्रभर राहताना, झोपा काढताना पाहूनही आश्‍चर्य वाटतं!!

बाकी, लैंगिकतेबद्दलचे (लहानपणचे) प्रश्‍न आणि शंका अनंत आणि अगाध आहेत. त्याविषयी अख्खा ग्रंथ लिहून होईल. त्यामुळे न बोललेलंच बरं!!

शक्तिमान's picture

13 Mar 2009 - 12:19 am | शक्तिमान

१.
>>पृथ्वीचं शेवटचं टोक कुठे असेल, असाही एक प्रश्‍न कायम सतावायचा. म्हणजे, कुठेतरी असं एखादं ठिकाण असेल, जिथे जमीन,
>>पाणी संपतच! पुढे थेट दरी! म्हणजे विमानाच्या खिडकीतून खाली बघितल्यासारखं!
असंच सेम-टू-सेम वाटायचे मला...
आणि आकाशात दिसणारे ग्रह-तारे खूप मोठे असतात आणि त्यांच्यावर माती (? :P ) असते हे मला पटायचेच नाही.

२. रेडिओ आणि टी.व्ही. च्या आत माणसे असतात असे मलाही वाटायचे... एकदा तर मी एका बातम्या देणार्‍या निवेदिकेला वाकुल्या दाखवून पळालो होतो... त्यानंतर काही दिवस ती माझ्यावर चिडली आहे मला वाटत असे.

३. बातम्या देणारे निवेदक अगदी तोंडपाठ असल्यासारख्या बातम्या देत असत.... तेव्हा मला प्रश्न पडे की रोज रोज हे लोक बातम्या कशा काय पाठ करत असतील..

४. इंग्रजी बातमी देणार्‍यांना एवढे भारी इंग्लिश कसे काय येते हा एक प्रश्न मला पडत असे.... त्याचे उत्तर मीच शोधून काढले होते... की बहुतेक त्यांना मराठीतूनच इंग्रजी बातम्यांचे उच्चार लिहून देत असावेत.

५. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला म्हणजे नक्की कुठे आणि ते चक्रव्यूह कसे दिसते, कशाचे असते हाही प्रश्न मला पडला होता..

६. चित्रपटांतील गाण्यांमध्ये हिरो-हिरॉईन एवढ्या पटापट कपडे कसे काय बदलतात... तसेच.. हिरो हिरॉईनला अलगद उचलतो तसे आपले पप्पा आईला का उचलत नाहीत.. हा प्रश्न पडे... यावर आईने काय उत्तर दिले होते ते मला आठवत नाहीये :P

अनामिक's picture

12 Mar 2009 - 6:19 pm | अनामिक

पैसे झाडावर लागतात असा समज असल्याने, मी, दादा आणि ताईने मिळून घरामागच्या आंगणात पैसे पुरले आणि त्याजागी दररोज पाणी घालत असू :) पण झाड काही उगवलेच नाही :( !

अनामिक

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 6:22 pm | लिखाळ

मस्त लेख..आठवणी आणि प्रतिसाद !
-- लिखाळ.

रेवती's picture

12 Mar 2009 - 6:35 pm | रेवती

मी सात आठ वर्षांची असताना नातेवाईकांकडे मुंजीला गेले होते.
मलाही दादाच्या दंडात बेडूक भरणार की कायसे सांगूनच नेले होते.
घेरा ठेवायला नकार दिल्याने रडणार्‍या मुंजामुलाला दोघा तिघांनी धरून ठेवले होते.
रडणे चालूच होते. आता हे बघायला बायका मंडळींची गर्दी झाले होती. नक्की काय चालले आहे हे न समजल्याने
मला वाटले की दादाचा दंड कापून त्यात बेडूक भरतायत.
त्या गर्दीतूनही आवाज येत होते की अरे बाबा, हलू नकोस, वस्तरा लागेल, रक्त येइल, इ.
मला समजेना की इतक्या वाईट प्रसंगी सगळ्या बायका शालू नेसून का आल्यात?

रेवती

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 6:39 pm | लिखाळ

मस्त :)
-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 6:42 pm | बिपिन कार्यकर्ते

धम्माल!!!!!!

अवांतर: शालू नेसायला काहीही निमित्त चालते...

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

12 Mar 2009 - 6:48 pm | चतुरंग

काहीही निमित्त चालते..
अगदी, अगदी! कित्येकदा तर आधी शालू नेसून मग कायसेसे निमित्त शोधलेले सुद्धा आढळेल!! ;)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते

ढिश्क्यांव!!!!!! और ये गोली निशाने पर!!!!!!

=))

बिपिन कार्यकर्ते

प्रमोद देव's picture

29 Mar 2009 - 1:33 pm | प्रमोद देव

रंगाशेठ,काय विचार आहे? ;)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्राजु's picture

12 Mar 2009 - 7:15 pm | प्राजु

डायरेक्ट ऍटक केलाय.. सांभाळ बरं. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

12 Mar 2009 - 7:21 pm | रेवती

अगं मला माहितीये कुठला सल आहे मनात ते!
आता जावळासारख्या प्रसंगी कुणी नवी साडी घेतं का? बहुतेकवेळा नाही...
पण मुकुलच्या जावळाला मी पैठणी घेतली (बजेट चुकून दुप्पट झाले, माझ्याकडून;)).
अज्जून तेच आहे मनात, असं दिसतय तरी.

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2009 - 7:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पैठणीचा राग शालूवर निघतोय तर! ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 7:34 pm | बिपिन कार्यकर्ते

बजेट चुकून दुप्पट झाले, माझ्याकडून

चुकून? आणि दुप्पट? ह्यॅह्यॅह्यॅ.... काही खरं नाही रंगाशेठ....

बिपिन कार्यकर्ते

अमोल खरे's picture

12 Mar 2009 - 7:47 pm | अमोल खरे

सर्व नारी एक होतायत ह्या विषयावर बिपिनदा.........

मदनबाण's picture

12 Mar 2009 - 6:45 pm | मदनबाण

मी तर आकाशात विमान दिसल की जोरात ओरडत असे.... चाचा नेहरु टाटा,,,इंदिरा गांधी टाटा (कारण हे दोन व्यक्तीच विमानाने प्रवास करतात ही माझी ठाम समजुत होती.)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

शक्तिमान's picture

12 Mar 2009 - 11:51 pm | शक्तिमान

अगायायाया ssssssss....
=)) =)) =)) =)) =))

शितल's picture

21 Mar 2009 - 6:02 am | शितल

हा बाणा लहानपणापासुनच असा आहे तर मला वाटले शिफ्ट करून करून असा झाला आहे. ;)
=)) =))

टिउ's picture

12 Mar 2009 - 8:20 pm | टिउ

रेडिओत लहान लहान माणसं बसुन गातात असं मलाही वाटायचं, किती वेळा मी रेडिओ चालु असतांना आत कुणी दिसतय का बघत बसायचो.

लहानपणी एक गावातल्या आजी भाजी विकायल्या यायच्या. आल्यावर नेहमी 'तुला ५ रुपयाला विकत घेतलय. तुझी आई वाट बघतेय, चल माझ्या बरोबर गावाला' म्हणायची. असला राग यायचा म्हातारीचा. पण ती येतांना दिसली रे दिसली की माझा भोंगा चालु व्हायचा. पण म्हातारी एवढी खमकी की पोरगं रडतय, कशाला त्रास द्या असंही तीला कधी वाटलं नाही. शेवटी शेवटी तर मला खरं वाटायला लागलं. मग जन्मदाखला, मी जिथे झालो तो दवाखाना आईनी दाखवला तेव्हा समाधान झालं!

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2009 - 8:53 am | प्रकाश घाटपांडे

रेडिओत लहान लहान माणसं बसुन गातात असं मलाही वाटायचं, किती वेळा मी रेडिओ चालु असतांना आत कुणी दिसतय का बघत बसायचो.

भजन, गाणी गाताना त्यांचा पखवाज पेटी किती छोटी असतील. लेदर केस वरील जाळी ही त्यांना आत हवा घेण्यासाठी असते असे वाटायचे. आणि शी शु कसे करत असतील असा प्रश्न पडायचा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

संदीप चित्रे's picture

12 Mar 2009 - 9:36 pm | संदीप चित्रे

आमच्या चिरंजीवांना (वय वर्षे -- साडेतीन !) पडलेला प्रश्न !!
माहिती हवी असल्यास हा दुवा पहावा --
http://en.wikipedia.org/wiki/Chandra

रेवती's picture

12 Mar 2009 - 9:40 pm | रेवती

हा हा हा!
फारच मजेशीर!

रेवती

विनायक पाचलग's picture

12 Mar 2009 - 10:41 pm | विनायक पाचलग

नकीच
मी जेव्हा आपल्या वयाचा होइन तेव्हा मलाही अशा आठवणी येतील
बाकी याबाबतीत रेडीओ मीरचीवर एक सुंदर जाहीरात आहे त्यांच्या पुरानी जीन्स या कार्यक्रमाची..
असो

दुर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझीमते
केव्हा केवळ भणाणारा पिसाटलेला पिवुन वारा
अनवाणी पायानी वनवणते
कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प.......................

प्राजु's picture

12 Mar 2009 - 10:44 pm | प्राजु

इयत्ता ७वी ते ८ वी पर्यंत असले समज्-गैरसमज दूर होतात. त्यासाठी खूप मोठ्या (म्हणजे अभिजीत इतक्या) वयाची गरज नसते.
लहानपणीचे किस्से तुला आता आठवत नाहीत हे खरं आहे का?
(की, आपण कसे सगळ्यांत लहान आहोत हे जाणवून देण्याचा आटापिटा??)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विनायक पाचलग's picture

12 Mar 2009 - 10:47 pm | विनायक पाचलग

आठवतात
पण आम्हे अजुनही जे पराक्रम करतो ते आठवायला त्यांछ्या वयाचे व्हायला लागेल
(प्रसंग, पराक्रमाचे प्रकार बदलले तरी आही अजुनही खुप पराक्रम क्रतो ...)
बाकी खवत बोलु इथे अवांतर नको

दुर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझीमते
केव्हा केवळ भणाणारा पिसाटलेला पिवुन वारा
अनवाणी पायानी वनवणते
कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प.......................

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2009 - 10:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इयत्ता ७वी ते ८ वी पर्यंत असले समज्-गैरसमज दूर होतात. त्यासाठी खूप मोठ्या (म्हणजे अभिजीत इतक्या) वयाची गरज नसते.
=)) लै भारीच हे!

तुझ्यासारखं मलाही लहानपणी पडद्यावर दिसणारे कलाकार गाणी गातात असं वाटायचं. आणि लता मंगेशकर ही एकच बाई गाते हे समजल्यावरतर मी फारच निराश झाले होते.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

जृंभणश्वान's picture

13 Mar 2009 - 12:36 am | जृंभणश्वान

मी कलिंगडाची बी गिळली होती तेव्हा उपस्थित आगाउ काकूंनी तुझ्या डोक्यातून आता मोठ्ठे कलिंगडाचे झाड येणार असे सांगितले होते.
असे काही होणार नाही हे आईने हजारदा सांगूनसुध्दा, नंतर बरेच दिवस मी रोज उठल्यावर डोक्याला हात लावून चाचपणी करायचो.

अनामिका's picture

13 Mar 2009 - 2:07 am | अनामिका

मला आठ्वतय मी ४थीत असताना एकदा बाबांकडे हट्ट करुन कधी नव्हे ते त्यांना कोंबडीची पिल्ले विकत घ्यायला भाग पाडली होती. पाळायला हवीत म्हणुन.............त्याच दरम्यान आजोबांनी ययातीची गोष्ट सांगताना संजिवनी मंत्राबद्दल सांगितले होते.......................एके दिवशी शाळेतुन परतले बघते तर पिल्लु मरुन पडलेले ........रडुन गोंधळ घालायचा तर ऐकायला घरात कुणीच नाही...........आजोबा देखिल मामाकडे गेले होते..........काही सुचत नव्हते आणि मला एकदम आजोबांनी संजिवनी मंत्राबद्दल सांगितलेली गोष्ट आठवली ............त्या पिल्लाला कापसाच्या गादीवर ठेवुन माझे मंत्रोच्चारण सुरु होते ..........काय म्हणत होते ते आता मला देखिल आठ्वत नाही........बराच वेळ सगळे सोपस्कार करुन त्या पिलाला पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न केले...........इतक्यात बाबा आले व त्यांनी तो सगळा गोंधळ बघितला व मला समजावले............कि असे काही घडत नसते..........इत्यादि इत्यादि..............आजोबा मामाकडुन परत आले तरी माझी त्यांच्याशी बट्टि काहि झाली नाही...........निदान काही दिवस तरी!
आता तो प्रसंग आठवला की हसू येते........
पृथ्वी गोल आहे व ती स्वतः भोवती फिरत असते हे ऐकल्यावर पहिला प्रश्न मनात आला की मग आपण पडत कसे नाही?
ज्वालामुखी बद्दल जेंव्हा शाळेत प्रथमच नव्याने अभ्यासक्रमात वाचले तेंव्हा रात्री आपण रहात आहोत तेथे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे स्वप्न पडले होते आणि झोपेतच रडुन घरच्यांना नको केल्याचे अजुनही स्मरतेय..........
"अनामिका"

नान्या's picture

13 Mar 2009 - 2:41 am | नान्या

लहानपणी ( म्हणजे मी २-३ री मध्ये असेन), तेव्हा माझ्यासह सर्व मित्राना हा प्रश्न पडला होता की लग्न झाल्यावरच बाळ का होते? (म्हणजे तेव्हातरी तसाच समज होता.). तेव्हा माझ्या एका आत्याचे नुकतेच लग्न झाले होते. आणि मी तिला दुसर्या घरी (सासरी) रहायला जाताना पाहिले होते. ते मी सर्वाना सांगीतले. आम्ही ही चर्चा शाळेपासुन घरी चालत येइपर्यन्त करत होतो. आणि शेवटी हा निष्कर्श काढला. खाणेपिणे बदलले, जागा बदलली कि पित्ताने उलटी होते हे ऐकले होते, आणि चित्रपटात बाळ होण्याच्या आधिपण उलटी होते.. मग आम्ही सर्वानी मिळुन काढलेला निष्कर्श असा - " दुसर्या घरी गेल्यावर खाणे पिणे बदलते, तसेच काही सवयीही बदलतात. याचा परिणाम म्हणुन बाळ होते". आता आठवले की जाम हसु येते..

विसोबा खेचर's picture

13 Mar 2009 - 11:16 am | विसोबा खेचर

तुमच्याही असतील ना अशाच काही आठवणी? जुन्या काळची, जुनाट गृहीतकं, भोळ्या कल्पना? सांगाल??

भरपूर आहेत...:)

परंतु सध्या बिलकूल वेळ नाही!

तात्या.

प्रिया८'s picture

21 Mar 2009 - 2:11 am | प्रिया८

लेख छान जमला आहे..आणि सगळ्यानकडून प्रतिक्रिया सुद्धा छान मिळाल्या आहेत्...
माझी पण एक समजूत होती म्हणजे.. सिनेमात गाण्यावर नाचणारी/नाचणारा नट/ नटी हीच गात असते. मग एकदम तीला /त्याला सगळं कसं अगदी नीट येतं असं वाटायचं.
गाण्यामधे नेहमीच नट आणि नटी प्रत्येक कड्व्याला वेगवेगळया कपड्यात दिसायचे आणि नेहेमी प्रश्न पडायचा की हे लोक इतक्या पटकन कसे काय कपडे बदलून येतात?
:))
अश्विनि.

समिधा's picture

21 Mar 2009 - 3:40 am | समिधा

पृथ्वी गोल आहे व ती स्वतः भोवती फिरत असते हे ऐकल्यावर पहिला प्रश्न मनात आला की मग आपण पडत कसे नाही?
असा प्रश्न मलाही पडला होता त्यावेळी माझ्या आजोबांनी सांगीतले की ,पृथ्वी फिरल्यावर रात्र होते आणि आपण झोपतो म्हणुन पडत नाही. खुप खरे वाटले मला.

माझी मुलगी वय ३ वर्ष्,मी तिला बदाम खायला देते तिने मला विचारले आई बदाम खाल्यावर काय होत?
मी म्हणाले की बुध्दी वाढते.
तिचा प्रश्न बुध्दी कुठ असते?
मी सांगितले की डोक्यात.
मग तिने विचारले, आई बुध्दी खुप वाढली की कापुन टाकायची का?
मी :S
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

शितल's picture

21 Mar 2009 - 6:07 am | शितल

>>मग तिने विचारले, आई बुध्दी खुप वाढली की कापुन टाकायची का
=))
समिधा,
कसला गोडु प्रश्न पडला आहे मिहिकाला. :)

अनिल हटेला's picture

21 Mar 2009 - 7:29 am | अनिल हटेला

माझे सारे गैरसमज साधारण असेच होते ..
झकास लेख आणी प्रतीक्रिया !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुचेल तसं's picture

21 Mar 2009 - 10:19 am | सुचेल तसं

वा!!! छान विषय चर्चिला जातोय.

आई-पप्पा सकाळीच ऑफिसला जायचे. तेव्हा मला वाटायचं की ऑफिसमधे काम म्हणजे नुस्ती पानं लिहून भरवायची आणि ती फाईलला जोडायची. ज्याचे आई/पप्पा सगळ्यात जास्त पानं भरवतात त्यांना सगळ्यात जास्तं पैसे मिळत असणार. एकदा घरी पैशाची चणचण होती तेव्हा एका दुपारी मी माझी दुरेघी वही नुस्ते गोळे गोळे काढून भरवली आणि आईला दिली. म्हणालो की जाऊन तुझ्या ऑफिसमधे दे म्हणजे जास्त पैसे मिळतील. डोळ्यात अचानक आलेलं पाणी लपवत आईनी जवळ घेतलं आणि हसून म्हणाली "वेड्या असे थोडीच पैसे मिळतात?"

माझा एक लांबचा आत्येभाऊ आहे. लहानपणी तो आम्हाला काय वाट्टेल त्या फेका मारायचा. लहानपणी मी तीन चाकी सायकलवरुन फार हिंडायचो. तो भाऊ एक दिवस म्हणाला की अरे ही चालवायला तुला पायडल मारावं लागतं. एक सायकल बनवतोय मी सध्या. तुझ्या ह्या सायकलपेक्षा मोठी. वाटेल ते सामान बसेल त्याच्यात आणि कुठे पण जाता येईल त्याच्यातून - इंग्लंड, अमेरीका. मी विचारलं, "अरे बापरे!!! येवढ्या लांब? मी नाही बाबा पायडल मारणार येवढ्या वेळ". त्यावर तो म्हणाला "अरे येड्या!!! ती पाण्यावर चालेल. तुमची टीव्हीएस फिफ्टी जशी पेट्रोलवर चालते ना तशी आपली सायकल पाण्यावर चालेल. पाणी फुकटच मिळतं. अगदी डबक्यातलं पाणी सुद्धा चालेल आपल्या सायकलला". हे ऐकून मी एवढा हरखून गेला होतो की बास!!! नुस्ती स्वप्नं रंगवायचो मी तेव्हा. तो भाऊ भेटला की मी प्रत्येकवेळी विचारायचो "बनली का रे ती सायकल? " त्यावर त्याचं एकच उत्तर "येडाये का रे तू? गम्मते होय अशी सायकल बनवणं? वेळ लागतो त्याला." कित्येक वर्ष मी त्या सायकलची वाट पहात राहलो आणि मोठं झाल्यावर तो फेकत होता हे लक्षात आलं.

Finally I will be so matured that I will react to nothing.

आपला अभिजित's picture

23 Mar 2009 - 5:04 pm | आपला अभिजित

च्या मारी!
हा विषय पुन्हा चर्चेला आलेला पाहून गंमत वाटली. शिवाय, स्वतःच्या बालपणीच्या आठवणींत रमण्यापेक्षा लोक आपल्याच पोरांची कौतुकं सांगताहेत. चालू द्या! :)

सगळ्यांचेच आत्तेभाऊ फेकू असतात का? >:P

माझा आत्तेभाऊ पण अशाच फेका मारायचा. तो मुंबईचा आणि मी गरीब बिच्चारा रत्नागिरीचा असल्यानं मला सगळंच खरं वाटायचं. तो म्हणजे, टाटा-बिर्लांच्या अंगाखांद्यावर खेळल्यासारखाच वाटायचा मला! तशीच बंडलं मारायचा. रत्नागिरीत आला, तरी जी कुठली सगळ्यात भारी गाडी दिसेल, त्या गाडीनंच आलो, असं सांगायचा. त्याची फेकूगिरी उशीरा कळली. असो.
माझ्या आजोळी धान्याचं कोठार होतं. धान्याचं म्हणजे - भाताचं. एक भलीमोठी लाकडी पेटी होती. जवळपास सहा फूट उंचीची आणि सात-आठ फूट रुंद. त्यात "भात' ठेवलं जायचं. मला खूप वर्षं वाटत होतं, एवढा "भात' (म्हणजे शिजवलेले तांदूळ) त्यात कशाला करून ठेवत असतील? एवढा भात लागतो कुणाला? आणि टिकतो तरी कसा एवढे दिवस? :SS खूप उशीरा या रहस्याचा उलगडा झाला.
आता माझ्या मुलीचं कौतुक!
कालच स्वयंपाकघरात बसवण्यासाठी एक छोटा पंखा घ्यायला गेलो होतो. (स्त्रीहट्ट! काय करणार?) पासोड्या विठोबाजवळच्या "बिजली' दुकानात मी व बायको आधी पोचलो. आमची कन्या रमत-गमत मागाहून आली. दारात पाऊल टाकल्या टाकल्या वर लटकवलेल्या पंख्यांकडे तिची नजर गेली.
""बाबा, इथे नको पंखे घ्यायला! इथे सगळे अर्धे पंखे आहेत. चला, आपण दुसरीकडे जाऊ!'' पोरीनं आल्याआल्या दुकानदारांची अब्रू काढली. @)
तिथे "डिस्प्ले'साठी लावलेल्या पंख्यांना प्रत्येकी एकेकच पाती होती. ती बघून, तिची तल्लख बुद्धी जागृत झाली होती! सुदैवाने, दुकानदारही (अभावानेच!) विनोदबुद्धीसंपन्न असल्याने आम्ही सगळे हसलो.
मी सिग्नल कधी तोडत नाहीच, पण लाल सिग्नलला थांबायचंच, असा मनस्वीचा कडक नियम! त्यामुळे कधी चुकून लाल सिग्नल असताना डावीकडेही वळलो, तरी तिच्याकडून मोठं प्रवचन ऐकायला लागतं. मग तिची समजूत घालताना नाकी नऊ येतात. तरीही, रस्त्यावर थुंकणारे लोक, गाडी जोरात चालवणारे, सिग्नल नसताना पुढे जाणारे, पांढऱ्या पट्ट्याच्या पुढे चालणारे, यांच्या "अपराधां'चं परिमार्जन आम्हालाच (वेगवेगळी कारणं सांगून) करायला लागतं! :(

योगी९००'s picture

29 Mar 2009 - 5:03 pm | योगी९००

तुमचे किस्से आवडले..

सगळ्यांचेच आत्तेभाऊ फेकू असतात का?
याचे उत्तर तुमचा मामेभाऊ देईल. माझा मामेभाऊ हेच म्हणतो.

खादाडमाऊ

क्लिंटन's picture

29 Mar 2009 - 12:40 pm | क्लिंटन

मला लहानपणी नेहमी पडणारा प्रश्न-- सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो.संध्याकाळी पश्चिमेला गेलेला सूर्य दुसर्‍या दिवशी परत पूर्वेला कसा उगवतो? त्याला रात्रीत पश्चिमेकडून पूर्वेला कोण घेऊन जात असेल?

---विल्यम जेफरसन क्लिंटन