महिलांची T20 जागतिक स्पर्धा 2020

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
21 Feb 2020 - 10:27 am

नमस्कार,

आज पासून "महिलांची T20 जागतिक स्पर्धा 2020" चालू होत आहे.

ह्याच महिन्यात, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड, ह्यांच्यात तिरंगी T20, सामने झाले. त्या सामन्यांचा अनुभव, भारतीय क्रिकेट संघाला कामाला येईल.

गृप A मधील संघ खालील प्रमाणे. ...

ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंड

गृप B मधील संघ खालील प्रमाणे. ....

पाकिस्तान, इंग्लंड, साउथ आफ्रिका, थायलंड आणि वेस्ट इंडिज.

गृप A मध्ये, ऑस्ट्रेलिया तर गृप B मध्ये इंग्लंड अव्वल स्थानावर असण्याची शक्यता जास्त आहे.

भारत आणि बांगलादेश ही मॅच जास्त रंगतदार होणार...किंबहुना भारताचा सेमी फायनल मधला प्रवेश ही मॅच ठरवेल, असा माझा अंदाज आहे. पण जर आज आपण ऑस्ट्रेलिया बरोबर जिंकलो तर, पुढचा प्रवास नक्कीच सुखावह ठरेल...

भारतीय संघाने हा कप जिंकावा, ही मनापासून इच्छा आहे.

मौजमजामाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

21 Feb 2020 - 7:02 pm | टवाळ कार्टा

मी पयला :)

मुक्त विहारि's picture

21 Feb 2020 - 7:14 pm | मुक्त विहारि

स्वागत आहे. ..

सुरूवात तरी उत्तम झाली.

दुर्गविहारी's picture

21 Feb 2020 - 11:10 pm | दुर्गविहारी

पूनम राऊत आणि शिखा पांडे यांनी जवळपास हरलेली मॅच खेचून आणली. थरारक सामना.
असाच परफॉर्मन्स आपली टीम कायम राखेल आणि विश्व्चषक पुन्हा मिळेल अशी आशा करूया.

सस्नेह's picture

22 Feb 2020 - 11:39 am | सस्नेह

शेवटच्या ५ ओव्हर्स तर जबरी प्रेक्षणीय !!

कुमार१'s picture

22 Feb 2020 - 11:56 am | कुमार१

शुभेच्छा !

नूतन सावंत's picture

22 Feb 2020 - 5:49 pm | नूतन सावंत

झकास झाली ऑस्ट्रेलियन संघाबरोनरची मॅच!

मुक्त विहारि's picture

24 Feb 2020 - 4:00 pm | मुक्त विहारि

आज दुपारी 04:30 वाजता

मुक्त विहारि's picture

27 Feb 2020 - 8:25 am | मुक्त विहारि

भारत विरुद्ध न्यूझीलंड

मुक्त विहारि's picture

27 Feb 2020 - 1:13 pm | मुक्त विहारि

गोलंदाजांनी परत एकदा मॅच जिंकून दिली.

शेफाली वर्मा (नेहमी प्रमाणे) अप्रतिम खेळली.

भारतीय संघ, जरी सेमी फायनल पर्यंत पोहोचला तरी, चांगल्या सुरूवाती नंतर मधली फळी ढेपाळत आहे. सलग 3 मॅचेस मध्ये हीच बोंब आहे.

सेमी फायनल मध्ये आपला सामना एक तर इंग्लंड बरोबर तरी होईल किंवा साउथ आफ्रिके बरोबर तरी होईल. आणि हे दोन्ही संघ एकदम व्यावसायिक आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांना आता जबाबदारी ओळखूनच खेळणे भाग आहे. एकटी शेफाली किंवा पूनम किती वेळा उपयोगी पडणार?

हरमनप्रीत कौरचे फलंदाजीतले अपयश संघाला खड्ड्यात घालू शकते.

मुक्त विहारि's picture

5 Mar 2020 - 9:17 am | मुक्त विहारि

पहिली सेमी फायनल. ..

इंग्लंड विरुद्ध भारत

आणि दुसरी सेमी फायनल. ..

ऑसीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका

नि३सोलपुरकर's picture

5 Mar 2020 - 12:01 pm | नि३सोलपुरकर

भारतीय संघ फायनल साठी पात्र ठरला . ( सेमी फायनल न होता )
पावसामुळे सामना रद्द झाला आणी गुण तालीकेत भारतीय संघ अव्वल स्थानी होता .

इनिवे ,
भारतीय संघास खुप खुप शुभेच्छा.

मुक्त विहारि's picture

8 Mar 2020 - 8:01 am | मुक्त विहारि

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुपारी साडेबारा वाजता.

मुक्त विहारि's picture

8 Mar 2020 - 4:05 pm | मुक्त विहारि

ऑसीजने पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले.

सांघिक कामगिरी म्हणजे नक्की काय असतं? हे समजले तरी खूप झाले.