भक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Oct 2019 - 10:49 am

मला ग बाई वाट गावली, माझ्या नशिबानं
सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ||

हाती धरली कावड
गोदेच्या निर्मळ पाण्यानं ||१||

गड झाला हिरवा
साथ दिली पावसानं ||२||

घर माझं भरलं
धन धान्याच्या राशीनं ||३||

जगण्याची रीत दावली
देवी सप्तशॄंगीनं ||४||

नवसाला पावली आई
आशीर्वाद दिला तिनं ||५||

पुजा करून ओटी भरीन
कुंकू लावीन हातानं ||६||

सगे सोयरे झाले सोबती
पायी चालती आनंदानं ||७||

दर्शनाची आस लागली
घाईनं उचलते पाऊलं ||८||

कृपा असू द्यावी भक्तांवरी
विनवणी करी पाषाण ||९||

सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ||

१७/१०/२०१९

शांतरसधर्मकविताभक्ति गीत

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Oct 2019 - 4:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

प्रासादिक आहे.
आवडली.

जॉनविक्क's picture

17 Oct 2019 - 6:54 pm | जॉनविक्क

+१