नारायण धारपांच्या " नेनचिम " ही विज्ञान काल्पनिका कादंबरीत अतिप्राचीन काळात चंद्रावर मनुष्यसदृश्य जातीची वसाहत होती अशा विषयावर आधारित आहे ... त्या जातीची खूप वैज्ञानिक प्रगतीही झाली होती .. त्यातच त्यांचा ग्रह कालांतराने जीवनासाठी अयोग्य होणार , सर्व जीवित नष्ट होणार असा शोध तिथल्या शास्त्रज्ञांना लागतो आणि तिथे हलकल्लोळ माजतो ... हळूहळू परिस्थिती नियंत्रणाखाली येते आणि या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी एक मोठी शास्त्रज्ञांची संघटना उभारली जाते ... वसतीयोग्य असा दुसरा ग्रह शोधणं त्यांना शक्य होत नाही ... शेवटी आपली पृथ्वी जिला ते दुसरा छोटा सूर्य मानत असतात ती काही हजार वर्षं / शतकांनी वसती योग्य होणार असल्याचा शोध लागतो पण तोपर्यंत ह्या ग्रहावरचं जीवन शिल्लक राहणार नसतं .. तेव्हा सगळी संसाधनं पणाला लावून शक्ती निर्माण करून इथल्या जातीचं बीज काहीही करून पृथ्वीवर पोहोचवायचं , ज्या कुप्या जीवनयोग्य वातावरणनिर्मिती होईपर्यंत तग धरतील आणि योग्य वेळ आली की उघडतील ... अशी योजना आखण्यात येते , जेणेकरून पुढील पिढ्यांच्या रूपातून जातीचं अस्तित्व टिकुन राहील .. पुढच्या 2 -4 पिढ्यातले शास्त्रज्ञ ह्या कामाला स्वतःला वाहून घेतात .... त्यानंतर हळूहळू ग्रहावरची शासनव्यवस्था ढासळत जाते , अराजक माजतं .. कालांतराने ग्रहावरचं संपूर्ण जीवन नष्ट होतं ... फक्त शास्त्रज्ञांनी निर्माण केलेला सुपर कॉम्प्युटर जमिनीखाली बांधलेल्या कक्षांमध्ये कार्यरत राहतो ... योग्य वेळेची वाट पाहत , उरली सुरली शक्ती त्या वेळेसाठी वाचवून ठेवत ...
पृथ्वीवरून गेलेले 4 अंतराळवीर चंद्रावर पोहचतात तेव्हा हा सुपर कॉम्प्युटर त्यांना सगळा इतिहास सांगतो आणि आमचं ध्येय जर यशस्वी झालं असलं तर कधी ना कधी आमचे वंशज इथे येणार अशी अटकळ होती , त्यासाठी मी अजून तग धरून आहे .. मग एक फार महत्वाचा शोध त्यांना भेट म्हणून देतो ज्याच्यामुळे त्या ग्रहावरच्या जातीची खूप प्रगती झाली होती .. तशीच आता या वंशज जातीची व्हावी म्हणून ... प्रत्येकाच्या मनातले विचार कळतील असं ते यंत्र असतं , इतरही उपयोग असतात ... हा शोध पृथ्वीवर पोहोचण्याने फायद्यापेक्षा मानवजातीचं नुकसान आहे कारण हे तंत्रज्ञान मिळावं अशा लेव्हलला अजून मानवजात पोहोचलेली नाही , हे मानवाच्या हातात पडणं मानवाच्या विनाशाला निमंत्रण देईल असा विचार करून भारताचा प्रतिनिधी असलेला अंतराळवीर ते नाजूक यंत्र तात्काळ नष्ट करतो ... पुढे पृथ्वीवर परतल्यावर त्याला अमूल्य वारसा नष्ट केल्याबद्दल गंभीर शिक्षाही होते पण तो आपल्या निर्णयाचं समर्थन करत ती शिक्षा शांतपणे स्वीकारतो .
कादंबरीच्या शेवटी ज्या ग्रहाबद्दल कथा आहे तो चंद्र आणि ते ज्या दुसऱ्या सूर्यावर बीज पाठवतात ती म्हणजे आपली पृथ्वी हे समजतं ....
इथून खरेदी करू शकता , - पेपर कॉपीची किंमत 255 रु आहे . किंडल बुक 99 रु आहे .
https://www.amazon.in/gp/aw/d/9352202139/ref=tmm_pap_title_0?ie=UTF8&qid...
प्रतिक्रिया
24 Aug 2019 - 2:17 pm | जॉनविक्क
मुख्य सामना आता कोण पाहणार ? की अजून बरंच काही रंगतदार बाकी आहे (धारपांची लेखनशैली ही बाब सोडून) ?
24 Aug 2019 - 3:19 pm | विजुभाऊ
ही धारपांची जुनी कादंबरी आहे. यातल्या हीरोला अचानक सिंतारीचा शोध लागतो. तसेच सजीवांच्या आस्तित्व शक्तीचा शोध लागतो.
मात्र शेवटी सिंतारीचा विनाश का केला जातो तेच समजत नाही.
मात्र कादंबरी शेवटपर्यंत रोचक आहे. तरीही ती कोणताचा वैज्ञानीक विचार/ सिद्धान्त मांडत नाही. त्यामुळे ती कोणत्या अर्थाने विज्ञानकाल्पनीका आहे ते समजत नाही.
केवळ स्वप्नरंजन भविष्यरम्जन म्हणजे विज्ञान नव्हे. अर्थात धारप हे काही विज्ञान लेखक नव्हेत . त्यांची गोग्रामचा चित्रार ही अपवाद म्हणून घेऊनसुद्धा . असेच म्हणावेसे वाटते.
यापेक्षा डॅन ब्राऊनच्या डिसेप्शन पोईंट , किंवा ओरीजीन फारच उजवी वाटतात
24 Aug 2019 - 3:20 pm | विजुभाऊ
सिंतारीचा विनाश हा जस्टीफायेबल वाटत नाही