आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.
याचंच निमित्य म्हणून आपल्या मिपावर कुणाकुणाला कोणकोणत्या भाषा येतात त्याचीही माहिती शेअर व्हावी.म्हणजे मराठी,हिंदी,इंग्रजी या तीन भाषा सर्रास शिकवतातच शाळेत.त्यांचं काही विशेष नाही पण त्या सोडून अजून कोणत्या भाषा येतात का तुम्हाला?
माणसांची भाषा बरं का? नाहीतर मशिन लँग्वेजेस समजाल चुकून! :)
कितपत येते?
वाचता येते की बोलता येते?
कि फक्त समजते?
कुठे शिकलात?
उद्देश काय होता शिकण्याचा?
कधीपासून शिकताय?
पूर्वी शिकलेली भाषा अजूनही येते की बर्यापैकी विसरलात?
पुन्हा त्या भाषेचा अभ्यास सुरु करावासा वाटतोय का?
शिकताना काही गंमत/फजिती झाली का?कसा होता अनुभव?
बापरे! किती ते प्रश्न? ;)
आता नमनाला घडाभर तेल न वाहता करा बरं सुरुवात सांगायला तुम्ही किती बहुभाषिक आहात ते? :)
प्रतिक्रिया
15 Aug 2019 - 6:22 pm | कंजूस
एक गुजराती येते बोलता वाचता।
15 Aug 2019 - 7:03 pm | उपयोजक
देवनागरीशी मिळतीजुळती लिपी आहे गुजरातीची,काहीशी हिंदीसारखी.त्यामुळे पटकन समजते.
15 Aug 2019 - 6:28 pm | पद्मावति
नवीन भाषा आत्मसात करण्यासाठी जी एक खास नैसर्गीक क्षमता असते, ऍप्टिट्यूड असते ती माझ्याकडे नाही :(
जपानी शिकण्याचा प्रयत्न मी केला होता बऱ्यापैकी. थोडेफार जुजबी बोलायला लागले होते पण बोलायचा सराव सुटला आणि आता ती भाषा पूर्ण विस्मरणात गेली.
15 Aug 2019 - 7:05 pm | उपयोजक
पुन्हा सुरुवात करा.भाषा येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट 'पुरेसा वेळ देणे.'
15 Aug 2019 - 6:34 pm | Rajesh188
मराठी,हिंदी ,इंग्रजी ह्या भाषा लीहता,वाचता,बोलता येतात .
गुजराती,भोजपुरी,बंगाली थोडीफार समजून येतात
15 Aug 2019 - 6:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुणे विद्यापिठाचा जर्मन भाषेचा डिप्लोमा केलेला आहे. परिक्षेत तिसरा क्रमांक मिळाला होता. त्या वेळेस जर्मन चांगली बोलता-लिहिता येत होती.
पुणे विद्यापिठाचे जपानी आणि फ्रेंचचे कोर्स आवडीने चालू केले होते. एमडीच्या अभ्यासाआड येत असल्याने दोन्ही कोर्सेस पूर्ण होण्याआधी सोडावे लागले. जपानी आवडली होती आणि कामचलाऊ बोलता-लिहिता येत होती. फ्रेंच फारशी आवडली नव्हती.
दुभाष्याविना वैद्यक व्यवसाय आणि व्यवस्थापन करण्याइतपत अरेबिक चांगली बोलता येत होती. माफक प्रमाणात वाचता-लिहिता येत होती.
आता, बराच काळ वाचन, लेखन, बोलणे होत नसल्याने वरच्या सगळ्याच भाषांचा संबंध तुटला आहे. :(
15 Aug 2019 - 7:00 pm | उपयोजक
डॉक्टर साहेब!
खरंच कौतुकास्पद!आपल्याला भाषाज्ञान पुन्हा रिफ्रेश करण्यास वेळ मिळो! :-)
15 Aug 2019 - 9:07 pm | कंजूस
डॉ पुढच्या कट्ट्याला अरब वेषात?
16 Aug 2019 - 10:13 am | डॉ सुहास म्हात्रे
अरे हो, हे विसरलो होतो !
आठवी ते अकरावी संस्कृत शिकलो. व्याकराणाचा वीट होता पण भाषा खूप आवडाची. त्यामुळे भरपूर वाचन केले होते. त्यामुळे, भाषा योग्य अर्थासह वाचणे आणि लिहिणे जमत होते. मराठीचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्याच्या प्रश्नात बहुतेक वेळेस पूर्ण गुण मिळत असत. ११वीला (आमच्या वेळेस हा हायस्कूलचा शेवटचा वर्ग होता, त्यानंतर पदवीसाठी वैद्यकिय, अभियांत्रिकी अथवा इतर अभ्यास करायचा ते ठरत असे) संस्कृत घेतले होते... टक्केवारी वाढविण्यासाठी.
११वी नंतर मात्र शिक्षण आणि व्यवसाय-नोकरीत संस्कृतचा संबंध संपल्याने आता फार कठीन नसलेल्या संस्कृत मजकूराचा अर्थ समज्तो, पण बोलणे-लिहिणे भूतकालात जमा झाले आहे. :(
15 Aug 2019 - 6:45 pm | सुधीर कांदळकर
तोडीने तबला अने फोडीने पेटी अशी गुजराती बोलता येते, वाचताही येते. शिव्या शिकल्याशिवाय कोणतीही भाषा येत नाही अस म्हणतात. त्यामुळे गुजराती शिव्या देखील येतात. परंतु काही गुजराती शब्दांचे मराठी अर्थ विपरीत आहेत.
गुजरातीत माकड = मराठीत ढेकूण.
मराठी शेंडी = गुजरातीत %$#(मराठी अपशब्द)
मराठीत धावणे = गुजराती अपशाब्दिक क्रियापद.
15 Aug 2019 - 7:01 pm | उपयोजक
मस्त! ;)
17 Aug 2019 - 2:29 am | सौन्दर्य
गुजरातीत गांडो म्हणजे वेडा - मराठीत सांगायलाच हवं का ?
गुजराती नवरा म्हणजे रिकामा (काहीही काम नसलेला ह्या अर्थी) - मराठीत नवरा म्हणजे पती
असे अजून बरेच आहेत.
15 Aug 2019 - 7:28 pm | शंकासुर
जपानी भाषा येते. साधारणपणे 6 वर्षांपूर्वी म्हणजे 2013ला शिकायला सुरवात केली. टिमवीच्या सदाशिव पेठेतल्या शाखेत जपानी भाषेचा सर्टिफिकेट कोर्स आहे तो केला मी...पहिला कोर्स चांगल्या मार्कानी पास झालो. नंतर पुढे भाषेची आवड असल्याने पुढच्या पायऱ्या चढत राहिलो. जपान सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पण दिल्या. 5 टप्पे असतात त्यापैकी मी 3 पास झालो.
हे सर्व मी माझा इंजिनियरिंगचा अभ्यास सांभाळून करत होतो. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षी काही जपानी भाषेच्या परीक्षा देणं जमलं नाही. आणि तिथेच अभ्यास संपला. जवळपास 3 वर्षे भाषा शिकत होतो.
आता तुम्ही म्हणाल 3 वर्षे झाली म्हणजे तुम्ही धडाधड जपानी बोलत असाल...पण तसं नाहीये. बोलता येते ह्याबद्दल वाद नाहीये. पण जे टेक्निकल शब्द आहेत तसेच उच्च जपानी अजूनही येत नाही.
आता मी 2 आठवड्यापूर्वी जपानला आलोय. जपानी कंपनीत जपानी लोकांबरोबर काम करणार आहे. मला भाषा येत असल्याने दैनंदिन व्यवहारात काही अडचणी नाही येत. पण शेवटी पुस्तकी भाषा आणि इथली बोली भाषा हा फरक जाणवतो आहे. पण मला रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं आहे ह्यातच खुश आहे मी !
15 Aug 2019 - 8:40 pm | उपयोजक
अनुभव रोचक आहे. :)
15 Aug 2019 - 8:59 pm | जेम्स वांड
हिंदी, इंग्रजी, मराठी सोडून काहीच येत नाही ह्याची लाज वाटते. चान्स मिळाला तर बंगाली, तामिळ, पंजाबी, तेलगू ह्यापैकी एक देशी अन अरेबिक, पर्शियन, पुष्तु ह्यांच्यापैकी एक परदेशी भाषा शिकायला आवडेल (नस्तलिक मधली सुंदर कॅलिग्राफी वेड लावते राव)
15 Aug 2019 - 9:04 pm | कंजूस
सहावी-सातवीत असताना खेळाच्या मैदानाजवळच एक फ्री वाचनालय होते. तिथे संध्याकाळी वाचायचो चांदोबा वगैरे. तिथेच गुजराती चंदामामा आणि चित्रलेखा साप्ताहिक ट ला ट लावून वाचून शिकलो.
15 Aug 2019 - 9:11 pm | कंजूस
रापिडेक्सचे कन्नड - हिंदी वाचून कर्नाटक ट्रिपमध्ये ( बदामी - ऐहोळे) उपयोग झाला.
15 Aug 2019 - 9:12 pm | मराठी कथालेखक
मला बंगाली शिकायला आवडेल.. बंगाली चित्रपट विना सबटायटल्सचे समजायला हवेत इतकी तरी शिकायचीये.. कधी शिकेन ते माहीत नाही.
15 Aug 2019 - 9:44 pm | जॉनविक्क
बंगाली बनते असे म्हणतात :)
मला जापानी जुजबी समजत होती आता सराव गेला.
कानड़ीची आणि बंगलीचिहि तीच गत. बून्देलखंडी समजते (हिंदी न्हवे जरा फरक आहे) पन बोलता येत नाही. गुजराती फक्त अक्षरओळख व्यवस्थित झाली आहे. कारण बोलायला फार वेळ नाही मिळाला.
पण आता व्याकरणाऐवजी शब्दांचे उच्चार व आपल्या मनातील भावनांच्या ज्या कॉन्टेक्स्ट मधे ते वापरले जातात याच्या निरीक्षणातुन कोणतीही बोली भाषा (अनुवादित न करता) समजण्या इतपत त्वरित आत्मसात करू शकतो असा आत्मविश्वास नक्की आला आहे त्यामुळे विविध भाषिक लोकांशी बोलायला खुप आवडते.
सराव सुरु झाला की जमु लागते, सराव सुटला की पहिले पाढे 55 :)
पण आता कोणतीही भाषा जर त्या परिसरातील बोली भाषा असेल
15 Aug 2019 - 10:45 pm | पिवळा डांबिस
कोकणी घरात जन्म घेतल्याने कोकणी (मालवणी आणि गोव्याची दोन्ही) येते.
मुंबईत लहानपण गेल्यामुळे मराठी आणि हिन्दी अर्थातच येतात.
संस्कृत लिहितावाचता येते, बोलता येत नाही.
इंग्रजीचं म्हणाल तर शाळेत असतांना तर्खड्करी इंग्रजी शिकलो. पुढे सेंट झेवियरात गेल्यावर ऑक्सफर्डी इंग्रजी शिकलो. नंतर आम्रविकेत आल्यावर अमेरिकन इंग्रजी (तीच ती, शेक्सपियरचा आत्मा तळमळवणारी!) शिकलो. प्रवास चालू आहे....
पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना डॉईश शिकलो होतो. त्या वेळेस आमच्या विषयांतलं जर्मनीमधलं रीसर्च त्या भाषेत असायचं. पुढे त्याचंही इंग्रजी भाषांतर उपलब्ध व्हायला लागल्यापासून सोय झाली पण ती भाषा विसरून गेलो...
कॅलिफोर्नियात रहायला आल्यापासून कामचलावू (कामगारांकडून काम करून घेता येईल इतपत) स्पॅनिश शिकायचा प्रयत्न करतो आहे...
15 Aug 2019 - 10:53 pm | मित्रहो
शिकलो होतो विसरलो. तेलगु शिकायचा प्रयत्न केला
15 Aug 2019 - 11:09 pm | अभ्या..
मराठी , हिंदी, इंग्रजी येते. इंग्रजी बोलण्याची सवय नसलेने फारशी बोलन्यात नाही.
कन्नड समजते घरात असलेने. बोलणे जास्त नाही, वाचता येत नाही पण टाइपिंग करता येते. ;) व्यवसायामुळे.
तेलगू समजते कारण सोलापुरात वापरली जाणारी तिसरी भाषा आहे कन्नड पाठोपाठ.
बोली भाषांत सासुरवाडीची भाषा समजते, बोलता येत नाही पण जमेल काही काळाने.
बंजारा आणि सावजी समाजाच्या बोली भाषाही थोड्याफार समजतात. बोलत नाही.
काही मित्रामुळें तुळू, मालवणी आणि कोकणी भाषांचा परिचय आहे. समजते थोडेफार.
15 Aug 2019 - 11:24 pm | रीडर
फ्रेंच आणि डच समजण्या इतपत येतात. पुढे शिकायचं आहे.
उपययोजक, धागा विषयावरून वाटले आपण ही बहुभाषिक असावेत.
16 Aug 2019 - 12:26 am | मराठी कथालेखक
सांगावेसे वाटते.
माझ्या माहितीतले ४ तेलगू लोक आहेत जे छान मराठी बोलू शकतात आणि ते ही नोकरीकरिता महाराष्ट्रात आल्यावरच शिकलेत. इतर दुसर्या कोणत्या अमराठी लोकांपेक्षा (हिंदी किंवा इतर कोणती भाषा बोलणारे) तेलगू लोक जास्त सहजपणे आणि जास्त प्रमाणात मराठी शिकतात (अर्थात महाराष्ट्रात वास्तव्यास आल्यावर) असे मला वाटू लागले आहे. आपला याबाबत काय अनुभव ?
19 Aug 2019 - 10:47 am | नि३सोलपुरकर
अभ्याने त्याच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे तेलुगु हि सोलापुरात मोठयाप्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे . म क आपल्या निरिक्षणाला अनुमोदन म्हणुन खालील
उदाहरण देतो आहे ,
शे-दिडशे वर्शापुर्वी तेलुगु समा़ज हा उपजिविकेसाठी महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात स्थाईक झाला ( सोलापुर ,पुणे, नगर्,जालना, ठाणे, मुंबई इ.) सोलापुरातील समा़ज धुरीणींनी काळाची पाऊले ओळ्खुन ,समा़जातील मुला - मुलींसाठी मराठी माध्यमाची शाळा (१९१२) कनिष्ठ महाविद्यालय (१९४३) आणि वरिष्ठ महाविद्यालय (१९९०) स्थापन केली . महाराष्ट्रातील तेलुगु समाज हा महाराष्ट्र आणि विशेषत: मराठीशी मातीशी पुरता एकरुप झालेला आहे .विविध जिल्ह्यातील तेलुगु समा़ज बांधव आपपल्या परिने मराठी सारस्वताची पुजा करीत आहेत त्याच बरोबर उदयोग व्यवसाय ,राजकारण ,समाजकारण, क्रिडा इ विविध क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरत आहेत .
16 Aug 2019 - 7:28 am | चामुंडराय
पृथ्वी वरच्या सगळ्या मानवाची कानापासून ते मेंदू पर्यंतची मशीन लँग्वेज एकच आहे म्हणे.
ती भाषा जर डि कोड करता आली तर लँग्वेज बॅरिअर इतिहास जमा होईल काय?
16 Aug 2019 - 8:10 am | शंकासुर
संशोधन चालू आहे असे एकदा वाचण्यात आले होते. पण हल्लीच्या AI च्या साहाय्याने आणि जर AI साठी तेवढा प्रचंड डेटा गोळा करता आला तर Language Barrier हटणे शक्य आहे.
16 Aug 2019 - 9:20 am | धर्मराजमुटके
मराठी, हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त गुजराती भाषा (वाचणे, बोलणे, लिहिणे) येते. संस्कृत आणि तमिळ शिकायची खुप इच्छा आहे. बघू या कसे जमते ते.
16 Aug 2019 - 10:23 am | उपयोजक
तमिळ शिकतोय.लहानपणी दिवाळीत लक्ष्मीतोटा नावाचा फटाका मिळायचा.तो फुटल्यानंतर आत वापरलेली तमिळ वर्तमानपत्राची रद्दी कुतूहल चाळवून गेली.हे फटाके तमिळनाडूतल्या शिवकाशीहून येतात त्याअर्थी हा पेपर तमिळ भाषेत असावा हा अंदाज होताच.मग एकदा त्यातला एक फटाका न उडवता त्याची बांधणी सोडवली.त्यावरची तारीख इंग्रजीत होती.साधारण आठवड्याभरापूर्वीचं वर्तमानपत्र होतं.त्याच तारखेचं मराठी वर्तमानपत्र मिळवलं.मग ती तमिळ आणि मराठी वर्तमानपत्र दोन्ही शेजारीशेजारी ठेवून समान बातम्या कुठल्या ते शोधलं.तमिळ अक्षरे ही वाचायला अतिशय सोपी आहेत.दक्षिणेतल्या कन्नड,तेलुगू ,मल्याळम यांच्या लिप्यांपेक्षाही सोपी.अशाप्रकारे तमिळ लिपी वाचायला थोडी थोडी जमायला लागल्यामुळे हुरुप वाढला.मग नंतर नितीन प्रकाशनाचं श्री ल कर्वे यांचं तमिळ शिका हे पुस्तक बाजारात आलं.त्यातून शिकू लागलो.मग गती येऊ लागली.नंतर पुण्यातून रैपिडेैक्सचं हिंदी-तमिल लर्निंग कोर्स आणलं.आधी एका दुकानात विचारलं तर त्याच्याकडे हे पुस्तक नव्हतंच वर "छान! आता हिंदीतून तमिळ शिकणार का तुम्ही?" असं ज्ञानही मिळालं.(आता रैपिडैक्स मराठी-तमिळ स्वरुपात छापत नाही यात माझा काय दोष? असो.) शेवटी वर्मा बुकस्टॉलमधे एकदाचं मिळालं.त्यातून शिकणं सुरु झालं.पण नंतर अन्य व्यापामुळे जरा खीळ बसली.मग २०१४ ला पहिला स्मार्टफोन घेतल्यावर व्हॉटसअॅपवर,फेबुवर काही तमिळ मित्र मिळाले.अजून काही पुस्तके PDF स्वरुपात मिळाली.त्या मित्ररुपी गुरु आणि पुस्तके,टिव्ही,इंटरनेट यांच्यामार्फत तमिळ शिकणे सुरु आहे.सध्या तमिळ वाचता येते.थोडे बोलताही येते.अजून काही महिन्यात बर्यापैकी प्रगती होईल अशी आशा आहे.
गुजराती लिपी वाचता येते,वाचून थोडी समजते.बोलता मात्र येत नाही. सिंहली लिपी फार छान आहे दिसायला.ती एकदा नक्की शिकणार आहे.तमिळमुळे मल्याळमही शिकता येईल.बघू कसे कसे जमते ते! :)
सध्या तमिळनाडूत बर्याचजणांमधे 'राष्ट्रीय एकात्मतेचे' वारे पसरले आहे.हिंदी जरी राष्ट्रभाषा नसली तरी देशातली सर्वात मोठी भाषा आहे शिवाय अॉफिसातला उत्तरभारतीय+हिंदी येणारा गट गप्पा मारु लागला की आपल्याला फक्त बघत बसावे लागते.ते काय बोलतात ते कळत नाहीत ही खंत. या दोन गोष्टींमुळे हिंदी शिकू इच्छिणार्या तमिळ लोकांमधे वाढ होतेय.त्यांना मी एका ग्रुपात हिंदी शिकायला मदत करतो.
तंजावर आणि आजूबाजूच्या प्रदेशात दक्षिणी मराठी बोलणारे बरेच मुळचे मराठी लोक आहेत.त्यांना महाराष्ट्रातली मराठी शिकायला मदत करतो आहे.
या निमित्याने अजून एक आठवण सांगाविशी वाटते.माझे एक केरळी मित्र १९९० पासून मराठी शिकतायत.९० साली त्यांनी टिव्हीवर 'आता उठवू सारे रान' हे गाणं पाहिलं होतं.त्यातून त्यांना मराठीची गोडी लागली.एकदाही महाराष्ट्रात न येता सुद्धा फक्त टिव्ही आणि नेटकरवी मराठी शिकले.बर्यापैकी चांगलं मराठी बोलतात,लिहितात.मी सुद्धा त्यांना मदत करतो मराठी शिकायला.
पण तरीही हिंदी,बंगाली,तेलुगू,मल्याळम शिकणार्यांच्या तुलनेत मराठी शिकू इच्छिणारे परप्रांतीय फार कमी आहेत याची खंत वाटते.निदान महाराष्ट्रातल्या सर्व अमराठी भाषिकांनी कामापुरती तरी मराठी शिकावी असे वाटते.
हैद्राबादमधले मराठी आयटी कर्मचारी तेलुगू शिकण्यात उत्साह दाखवतात हे ही निरीक्षण आहे.
16 Aug 2019 - 11:23 am | विजुभाऊ
मला मराठी गुजराथी , इंग्रजी , हिंदी या भाषा व्यवस्थीत लिहीता वाचता बोलता येतात..( उर्दू चांगली बोलता येते. समजते. )
बंगाली , उडीया, पम्जाबी , हरीयाणवी, मारवाडी या भाषा समजतात
एकदा दोनमहिने मद्रास मधे रहायला होतो. तेंव्हा तमीळ समजायला लागली होती. काही वाक्ये बोलता ही येत होती. इतकी की कमल हसनचे बहुतेक सिनेमे तमीळमधे पाहिलेत.
जर्मन चा एक कोर्स मॅक्स मुल्लर मधे केला होता. त्यावेळेस कामचलाऊ जर्मन बोलू शकत होतो. आता पुन्हा प्रॅक्टीस केली तर निदान तेवढे तरी बोलू शकेन
16 Aug 2019 - 11:49 am | अनिंद्य
आपण भारतीय भाषेबाबत भाग्यवान आहोतच, तीन-चार भाषा येणे आपल्या देशात सामान्य असावे.
संस्कृत, फ्रेंच हौस म्हणून शिकलो, आता संपर्क राहिला नाही. उर्दू थोडेफार समजते, लिपी लिहिण्या-वाचण्याचा प्रयत्न अलिफ-बे-पे -ते घोकण्याच्या पुढे फारसा गेला नाही. पुस्तकांच्या मदतीने रशियन शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केलाय.
मातोश्रींचे आजोळ आंध्रातले, पण त्यांचा सहवास नशिबात कमी होता. आता हैदराबादला कामानिमित्त अनेक भेटी होतात. लहानपणी कानी पडलेले शब्द आठवतात - 'कोंचम कोंचम' तेलगू समजले की मनापासून आनंद होतो.
गुजराती आणि राजस्थानी समजते, थोडीफार बोलता-वाचता येते. पंजाबी,बंगाली, माळवी आणि हिंदीच्या जवळपास सर्वच बोलीभाषा समजू शकतो.
आता चिनी आणि तमिळ भाषा शिकायची इच्छा आहे. एका आयुष्यात काय काय आणि किती कोंबायचे? :-)
तुम्ही अमराठी लोकांना मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेता त्याबद्दल अभिनंदन. उत्तम विषयावर अनेकांना बोलते केल्याबद्दल तुमचे आभार उपयोजक _/\_
अनिंद्य
16 Aug 2019 - 12:12 pm | शुभां म.
ऐक वर्ष जपानी शिकण्याचा प्रयत्न केला होता पुणे विद्यापीठ मधील रानडे मधून , पण वेळे अभावी नाही जमलं पुढे शिकायला.
खरं तर कोरियन शिकण्याची होती पण २००९ मध्ये पुण्यात कुठेच कोरियन शिकवत नव्हते.
म्हणून जपानी शिकावी असं वाटलं कारण कोरियन चिनी आणि जपानी भाषेपासूनच बनवली आहे असा गैरसमज होता माझा .
३ वर्षा पूर्वी सिम्बायोसिस (SIFIL ) मध्ये कोरियन भाषेसाठी प्रवेश घेतला.
तिथे शिकवणाऱ्या आमच्या शिक्षिका कोरियन असल्याने खूप मजेत ४ पायऱ्या संपवल्या.
कोरियन मालिका आणि कोरियन संगीताची (KPOP ) आवड असल्यामुळे कोरियन खूप सोपी वाटली जपानी पेक्षा.
कोरियन बरीच मराठी /हिंदी सारखी आहे . सध्या या भाषेला खूप विध्यार्थी प्रवेश घेत आहेत.
आमचा कोरियन कल्चरल ग्रुप आहे (IKCG पुणे -INDO Korean Cultural Group पुणे) खूप सारे प्रोग्रॅम पण करतो आम्ही.
JLPT सारखी कोरियन मध्ये TOPIK परीक्षा असते , कोरिया बाहेरील कोरियन भाषिक लोकांसाठी हि परीक्षा कोरिया मध्ये शिकण्यासाठी, कामासाठी उपयोगी पडते .
TOPIK परीक्षा सध्या भारतात दिल्ली,हैद्राबाद ,चेन्नई ,मणिपूर,रांची या ठिकाणी ऑक्टोबर आणि एप्रिल मध्ये दरवर्षी होतात .
TOPIK चे सर्टिफिकेट फक्त २ वर्ष वैध असते.
22 Aug 2019 - 7:14 pm | वर्षा
अरे वा कोरीयन शिकलेले कुणी ऐकण्यात नव्हते. छान माहिती दिलीत. मीही ऐकले आहे की कोरीयन व जपानी सारखी आहे.
16 Aug 2019 - 12:59 pm | नूतन
विविध भाषांतील साहित्य वाचण्याची मला आवड आहे. (अर्थात बहुतेक भाषांतरीत). बंगाली भाषेतील विपुल साहित्य आणि बहुसंख्य बंगाली कथा कादंब-यांवर आधारीत ऊत्तम हिंदी चित्रपट यांच्या लोभाने मी स्वप्रयत्नाने बंगाली वाचायला शिकले. बोलण्याचा ,लिहिण्याचा सराव नाही पण वाचणं,समजणं,सिनेमा बघणं याला काहीच अडचण नाही. बंगाली पुस्तक मराठीत अनुवादीत करून प्रसिद्ध करण्याइतपत प्रगती केली आहे.
यासाठी अगदी बिगरीत गेल्यासारखी पाटीवर मूळाक्षरं गिरवली. लहान.मुलांची गोष्टीची पुस्तकं शब्दकोष बाजूला ठेऊन वाचली.मराठीत लिहून काढली.असं वाचता वाचता आता शब्दकोष फारच कमी.वापरावा लागतो.
बंगालीखेरीज गुजराती समजू शकते,पुस्तकं वाचू शकते,टीव्हीवरील कार्यक्रम,व्हिडीओ,चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकते.
किंचीत किंचीत कन्नड,गुरूमुखी वाचण्याचा प्रयत्न चालू आहे.
16 Aug 2019 - 1:24 pm | सर्वसाक्षी
काही फार नाही. मराठी चांगली येते, हिंदी व इंग्रजी बर्यापैकी.
गुजराथी चांगली येते. गुजराथी वर्तमानपत्रही वाचता येते. ही भाषा ज्याला आली तो व्यापारी आणि व्यापार यांचा मित्र झालाच. कुठल्याही भाषिकाशी त्याच्या भाषेत चार शब्द बोलले की अंतर कमी होते.
कोलकात्याला कामानिमित्त जाणं झाल्यावर भेटायला गेलेल्या व्यक्तिला 'दादा आमि बांग्ला जानी ना किंतु आपनी की कोथा बोली आमी मोटामोटीजानी, आमी चेष्टा कोरची'असं म्हटलं की समोरुन हास्याचा गड्गडाट आणि वर 'की बोलेन की आपनी, आपनी दारुण शुंदर बांग्ला बोली'असं कौतुक होतं. मग पुढचं काम सोपं होतं. तिथल्या उमेदवारांच्या मुलखती घेताना जर उमेदवार इंग्रजी वा हिंदी वर अडखळला तर 'बोलुन दादा बोलुन, आपनी बांग्ला बोलुन किछु आपत्ती नॉय' असं सांगयचं. तर सांगायची गोष्ट विशेष बोलता येत नसलं तरी बंगाली बर्यापैकी समजतं.
२००४-२००९ दरम्यान कामानिमित्त चीनला २०-२५ खेपा झाल्या तेव्हा दैनंदिन व्यवहारा पुरतं चीनी शिकलो होतो. तिथे बरोबर स्थानिक नसेल तर हॉटेलात काही मागवणं महा मुश्कील. मग सराईतपणे वो सुदा, मेई यो ची, चीतान, रो, य्यूउ, वेयईदे फान यु शुत्साय असं सांगायला शिकलो (मी बापडा तृणभक्षी मला अंडं, कोंबडी, मटण, मासे यातलं काही नको मला फक्त भात आणि उकडलेल्या भाज्या हव्या). जेवण मिळमिळीत वाटलं तर 'लाज्याव' ची फर्माइश करायची, टॅबेस्को किंवा तेलात खललेली मिरची यायची. काड्यांनी खायला कंटाळा आला तर 'शाओचे, ताओ छा' असं सांगितलं की मुलगी काटे चमचे घेऊन यायची.
तिथे एक गोष्ट लक्षात आली की भाषा आणि सिगारेट हे दोन पूल अंतर खतम करतात. एखाद्या कारखान्यात तिथल्या कामगाराबरोबर नि हाव करत 'नी शी इंदो यान' (भाऊ, आमची भारतीय सिगारेट घे) असं म्हणत गोल्ड्फ्लेक लाइट देउ करायची, वर शी यान ( घेउन अतर बघ) असा आग्रह करायचा. परतीच्या आहेरात आपल्याला त्याची श्वांग शी यायची. चार झुरके एकत्र मारले की कारखान्यात मुक्त संचार. अगदी कच्च्या मालाच्या गोदामातही फेर फटका मारता यायचा.
वो इझुचाल रुस्कवो इजिका, नो वो झबिवाल. १९८०-८१ मध्ये दोन वर्षांचा रशियन भाषेचा पदविका अभ्यासक्रम पहिल्या वर्गात पूर्ण केला. मात्र बोलायची वेळच येत नसल्याने कालांतराने भाषा विस्मरणात गेली
यापुढे काही माझी मजल गेली नाही. अनेकांना अनेक भाषा उत्तम येतात, ते पटकन नवी भाषा शिकतात. त्यांचा हेवा वाटतो. मात्र भाषा येत नसली समोरच्या व्यक्तिच्या भाषेतले चार दोन शब्द वापरुन संभाषणाला सुरूवात केली की औपचारीकता कमी होते. कुणा तेलुगु सहकार्याचा फोन आला तर चेप्पू सर किंवा मद्राशी सहकार्याचा फोन आला तर सोलुंगा सामी म्हणत सुरूवात करायची.
16 Aug 2019 - 4:10 pm | खिलजि
मला र ला फ लावून मराठी बोलता येते .. एकदम सुस्साट बोलतो पण जास्त मजा येते ते का ला ब लावून बोलण्यात .. फारच कठीण आहे हो .. पण मराठी एके मराठी आणि दुसरी इंग्लिश आणि हिंदी आणि फार फार तर पूर्वी संस्कृत थोडे फार येत होते आणि वाचूनही समजत होते पण आता भोपळा आहे सर्व ..
16 Aug 2019 - 4:57 pm | जॉनविक्क
16 Aug 2019 - 8:15 pm | हुप्प्या
कन्नड लिपी शिकणे सोपे आहे.
उर्दूची लिपी ही अरबीत थोडी भर घालून बनवलेली आहे. ती शिकलो आहे. त्याचा फायदा हा की लेखी पुश्तु, फारसी व अरबी वाचता येते (कळेलच असे मात्र नाही!)
उर्दू आणि हिंदी ह्या भाषा कृत्रीमरित्या वेगळ्या केल्या आहेत. खरे तर त्या एकच भाषांची वेगळी नावे आहेत असे माझे मत.
तर आपल्याला भाषा समजत असल्यामुळे उर्दू लिपी शिकणे सोपे जाते. काही गोष्टी देवनागरीपेक्षा अगदी वेगळ्या आहेत त्यामुळे शिकायला जास्त मजा येते.
अर्थात लेखी भाषा, जसे बातम्यांची शीर्षके वगैरे ह्यात बोलीभाषेपेक्षा वेगळे, जास्त पुस्तकी शब्द वापरले जातात त्यामुळे सुरवातीला थोडे जड जाऊ शकते. पण नंतर कळू लागते.
17 Aug 2019 - 1:52 am | उपयोजक
भारतीय भाषा शिकण्यासंबंधीच्या epub/pdf प्रकारातल्या काही पुस्तकांची उपयुक्त माहिती आणि दुवे. नितीन प्रकाशनाची प्रत्येक भाषेवरची पुस्तके आहेत.पण ती फार सखोल नाहीत.
50 Languages यांच्या प्रत्येक भाषेवरच्या स्वतंत्र अॅप्स आहेत.अतिशय सुंदर आहेत.जरुर वापराव्यात.
तरीही विशिष्ट भाषा जिथे जन्मली तिथल्या स्थानिक लोकांकडूनच ती शिकणे हा सर्वोत्तम मार्ग!
विविध भाषा शिकण्यासाठी प्रत्येक भाषेचे बरेच ग्रुप्स फेसबुक,टेलिग्रामवर आहेत.मिपावरही शिकवता येईल.पण भाषा शिकण्यासाठी सर्वात चांगला सोशल मिडिया म्हणजे व्हॉटसअॅप!
कोणाला भाषा शिकवणार्या WhatsApp वरील मोफत समूहांबद्दल माहिती हवी असेल तर व्यनिमधे विचारु शकता.(इथे लिंक दिल्यास मला निरोप मिळायचा! ;))
----------------------------------------------------------
तमिळ शिका - नितीन प्रकाशन
तमिळ भाषा प्रवेश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%...
तमिळ-मराठी शब्दकोश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%...
हा शब्दकोश सर्व शासकीय मुद्रणालयांमधे छापील स्वरुपातही विकत मिळतो.
https://www.youtube.com/playlist?list=PL41DA461A06758121
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.pdfdriv...
जोशी यांचा तमिळ-मराठी लघु शब्दकोश
https://www.scribd.com/document/367449690/मराठी-तमिळ-लघु-शब-दकोष-लेखिका-रमाबाई-जोशी-pdf
-------------------------------------------------------------
कोंकणीच्या बोली
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/COCHIN%20.epub
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Gawadi%20of%20Goa.epub
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Konkani%20of%20Kankon.epub
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Konkani%20of%20South%20kanara.epub
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Kundali.epub
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Marathi%20of%20Kasargod.epub
---------------------------------------------------------------
तेलुगू शिका - नितीन प्रकाशन
तेलंगणातील आरे मराठा समाज/भाषा/संस्कृती
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%...
---------------------------------------------------------------
माडिया गोंडांची बोली
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%...
-----------------------------------------------------------------
बंगाली भाषा प्रवेश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%...(%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87)%20%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%20%E0%A5%A7.epub
बंगाली साहित्य परिचय
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%...
----------------------------------------------------------
उर्दू-मराठी शब्दकोश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%...
----------------------------------------------------------
कन्नड शिका - नितीन प्रकाशन
कन्नड भाषा प्रवेश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%...(%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87).pdf
कन्नड -मराठी शब्दकोश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%...
कानडी साहित्य परिचय
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%...
मराठी-कन्नड शब्दकोश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%...
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=http://www.kannada-...
https://www.youtube.com/user/aresumes
-------------------------------------------------------------------
गुजराती भाषा प्रवेश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%...
गुजराती-मराठी शब्दकोश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%...
-------------------------------------------------------------------
पाली-मराठी शब्दकोश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%...
--------------------------------------------------------------
फार्सी मराठी अनुबंध
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%...
------------------------------------------------------------
मराठी-सिंधी शब्दकोश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%...
----------------------------------------------------------
मल्याळम भाषा प्रवेश
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%...
---------------------------------------------------------------
17 Aug 2019 - 8:41 am | उपयोजक
errorअसल्याने pdf ची लिंक
https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%...
17 Aug 2019 - 9:07 am | कंजूस
भाषा शिकलात तर म्हातारपणी एक चांगला छंद आणि उद्योग होतो.
17 Aug 2019 - 10:08 am | महासंग्राम
अजून मराठीच धड जमत नाही पहिले ती शिकायची नीट, सोबत मोडी शिकतोय.
17 Aug 2019 - 1:18 pm | वामन देशमुख
उपयोजक, खरंच माझ्या आवडीच्या विषयावर चर्चा सुरू केलीत हं, धन्यवाद!
मराठी इंग्लिश हिंदी चांगल्या प्रकारे येतात.
उर्दू आणि तेलुगु बऱ्याच चांगल्या प्रकारे बोलता येतात पण लिहिता वाचता फार चांगल्या प्रकारे येत नाहीत. लिपी शिकण्याचा कंटाळा, दुसरं काय!
बांगला अगदी बेसिक येते पण बोलायला आणि ऐकायला खूप आवडते.
(बांगला भाषिक लोकांचे बोलणे ऐकताना; विशेषतः बांगला मुलींचे बोलणे ऐकताना त्यातल्या शब्दां-आशयापेक्षा, लय आणि नादमधुरता यातच विरघळून जायला होतं आणि मग त्यातला आशय कुठेतरी हरवून जातो हा माझा सुप्रसिद्ध अनुभव इथे नोंदवून ठेवतो.)
राजस्थानी मारवाडी भाषा लहानपणी बऱ्यापैकी यायची, पण अशात सराव नसल्यामुळे नाही येत.
(बोलणे-ऐकण्याचा सराव नसेल तर कदाचित माणूस भाषा विसरत असावा).
एकेकाळी बेसिक पहाडी भाषा शिकलो होतो, त्या भाषांमधली काही लोकगीते ही पाठ केली होती पण आता तो इतिहास आहे.
सर्वसाधारणपणे भारतातल्या अनेक प्रांतांमध्ये मी स्थानिक भाषांमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा काम भागतं.
सध्या माझ्या मुलींना स्पॅनिश शिकण्यासाठी आणि बोलण्यासाठी प्रेरित करतोय सोबतच मीही कदाचित शिकेन. माझ्या मुली बेसिक कन्नड शिकल्या आहेत.
मराठवाड्यात शिक्षण झालं आणि इतर शहरांमध्ये काम केलं, म्हणून त्या त्या ठिकाणच्या भाषा शिकायचा प्रयत्न केला.
भाषा शिकण्याचा उद्देश म्हणाल तर मुळातच माझं भाषांवर खूप प्रेम आहे. मला अनेक भाषा शिकायला आणि बोलायला आवडतात. भाषालंकार व इतर सौंदर्यस्थळे शोधणे, शब्द आणि त्यांच्या अर्थछटा जाणून घेणे, भाषांचा तुलनात्मक अभ्यास करणे हे आवडतं
मरण्याआधी किमान डझनभर तरी मानवी भाषा चांगल्या प्रकारे बोलता याव्यात अशी इच्छा आणि प्रयत्न आहेत.
18 Aug 2019 - 8:36 am | सौन्दर्य
मला भाषा ह्या विषयावर प्रेम आहे, विविध भाषा शिकायला फार आवडते.
मुंबईत जन्म आणि राहणे झाल्यामुळे मराठी (मातृभाषा), हिंदी व इंग्रजी, इतर अनेक मुंबईकरां प्रमाणे बोलता, वाचता, लिहिता येऊ लागले. बालपणी अनेक मित्र गुजराती असल्यामुळे गुजराती बोलता, वाचता येऊ लागली. आमच्या बिल्डिंगमध्ये कारवारी व गोअन ख्रिश्चन शेजारी असल्यामुळे ती भाषा बोलता येऊ लागली. पुढे नोकरीनिमित्ते गुजरातमध्ये १८ वर्षे राहिलों त्यामुळे गुजराती लिहिता पण येऊ लागली.
सध्या अमेरिकेतील ह्युस्टन शहरात असल्यामुळे स्पॅनिश भाषेशी संपर्क येतो त्यामुळे ती शिकायला घेतली आहे. स्पॅनिश व मराठीतील काही शब्द इतके जवळचे आहेत कि त्या शब्दांचा उगम नक्की कोणत्या भाषेत झाला असावा असा प्रश्न पडतो.
कित्येक भाषेत मराठीतील शब्दांचे समानार्थी शब्द सापडतात तर कित्येक वेळा अगदी वेगळेच किंवा अगदीच विरुद्ध. उदाहरणच द्यायचे झाल्यास मराठीत चोर किंवा दरोडेखोर दरोडा घालतात तर गुजराती भाषेत पोलीस दरोडा घालतात.
19 Aug 2019 - 9:48 pm | जॉनविक्क
मातृ चा अपभ्रंश मदर
पितृ चा "" फादर आणि
भ्रातृ चा "" ब्रदर सारखे झाले की.
असो, दोनचार मराठी स्पेनिश शब्द इथेच लिहले तर अजुन आंनद वाटेल.
19 Aug 2019 - 2:47 pm | नाखु
मराठी भाषा लिहिता वाचता येते असा माझाच गैरसमज आहे.
हा चार बुके शिकलाय म्हणजे याला फाडफाड इंग्रजी येत असावे असा (गोड गैरसमज) आप्तेष्ट आणि मित्रमंडळी यांचा आहे.
आणि हिंदी सिनेमे व्यवस्थित समजतात आणि दहावीला अर्ध(वट) हिंदी असल्याने तीही भाषा आपल्याला येत असावी अशी मनाची समजूत घातली आहे.
सध्या कार्यालय ते मालिका ( व्हाया माध्यमे) हिंग्लिश,हिंमराठी,आंग्लमराठी सहन करीत संवाद चालू आहे.
परदेशी, परराज्यातील भाषा न शिकण्यामागे कट्टर राष्ट्राभिमान,आणि मातृभाषा प्रेम हे कारण अजिबात नाही.
स्वत: होऊन स्वारस्य घेतले नाही आणि प्रयत्न केला नाही हेच प्रगट सत्य आहे.
मुलाला आजोळ (आईकडून) कन्नड समजते,लिहीता वाचता येत नाही,मीही दोन टक्के समजू शकतो.
पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु
19 Aug 2019 - 6:30 pm | उपयोजक
https://en.m.wikipedia.org/wiki/Ioannis_Ikonomou
3 Sep 2019 - 10:03 pm | कुलदादा
मला मराठी ,इंग्रजी, हिंदी याव्यतिरिक्त
गुजराती, बांगला - बोलता वाचता आणि उर्दू बोलता येते ....उर्दू शायरी व गझलांची आणि सुलेखनाची आवड असल्याने एक छोटासा 3 महिन्यांच्या कोर्स केला तेव्हा लिहितवाचता येत होते धडपडत ....पण आता कालपरत्वे विस्मरणात जातंय....
नवीन भाषा शिकलेली जर नित्य उपयोगात नसेल तर तांब्यापितलेच्या भांड्यासारखी काळपट पडते आणि मागे धाकल्या जाते ...
3 Sep 2019 - 11:40 pm | मायमराठी
थाई भाषा लिहिता वाचता बोलता येते. दहावीपर्यंत संस्कृत शिकवतो त्यामुळे ती पण थोडी फार जमते.
23 Sep 2019 - 9:28 am | मृणमय
चेन्नई ला चार वर्ष होते तिथे तामिळ वाचायला आणि बोलायला शिकले. तसेच खूप मैत्रिणी बंगाल आणि आसाम च्या होत्या त्यांच्या सारखे बोलता नाही आले तरी तोडके मोडके सहज जमावते. फ्रेंच ची जुळणारी क्रेऑल जी फ़्रेंच वेस्टइंडीज बेटांवर बोलली जाते ती शिकायला मिळाली. क्रेऑल मध्ये पाणी प्रॉब्लेम येत जात ऐकायला मिळायचे, तिथे पाण्याचा काहीं प्रोब्लेम नाही आहे, पाणी प्रॉब्लेम म्हणजे नो प्रॉब्लेम.