ओळखीतल्या सगळ्या मुलांना राखी बांधणारी छोट्टीशी बाला,
काॅलेजमध्ये ज्याला टाळायचं त्यांनाच राखी बांधणारी मुग्धा.
रक्षाबंधनाचे मेसेज फक्त कझिन्स ग्रुपमध्ये टाकणारी प्रगल्भा..
आणि तो सरसकट सगळ्यांनाच फाॅरवर्ड करणारी प्रौढा..
"तिच्या" या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी,
ती राखी!
प्रतिक्रिया
16 Aug 2019 - 9:34 am | ज्ञानोबाचे पैजार
आधी राहुल गांधी आणि मग रामदेव बाबां बरोबर विवाह करायला उत्सुक असलेली बाला
तनु आणि नानुच्या वादात नानुड्याची बाजू घेणारी निर्भिड कलीका,
आपल्याच स्वयंवराचा टिव्ही वर बाजार मांडणारी विवाहोत्सुक स्त्री
चूंबनाचे उत्तर कानाखाली आवाज काढत देणारी विद्युल्लता
या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी,
ती राखी!
"खिलते है गुल यहा" म्हणत "मदहोश" होणारी प्रेमिका
"झिल मील सितारोंका आंगन होगा" अशा स्वप्नात रंगलेली दिपशिखा
"नाली का पानी कभी गंगाजल नही बन सकता" असे कडाडणारी सौदामिनी
"मेरे बेटे आयेंगे, जमीन की छाती फाडके आयेंगे" असा दुर्दम्य आत्मविश्वास असलेली माता
या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी,
ती राखी!
पैजारबुवा,
16 Aug 2019 - 1:34 pm | जॉनविक्क
साष्टांग दण्डवत.
16 Aug 2019 - 5:07 pm | चांदणे संदीप
येक्झ्याटली पर्फेक्ट!!
______/\______
स्यान्डी
16 Aug 2019 - 10:25 am | राघव
अजून काही रूपांची वर्णनं आलीत तर "अष्टसात्विक भाव" जागृत व्हायचे!
अवांतरः
छ्या.. बहिणींवरून एवढी वर्णनं आलीत.. त्यामानाने भाऊ म्हणजे सगळे एकाच साच्यात घडवलेलेत का काय, असं वाटायला लागलंय..!
16 Aug 2019 - 5:56 pm | पद्मावति
मूळ कविता आणि पैजार बुवांची भर सगळेच मस्तं :)
17 Aug 2019 - 12:10 am | जालिम लोशन
छान जुगलबंदी.