विळखा -५
आज आमच्या आईला अति दक्षता विभागातून तिच्यासाठी खास खोलीत (स्पेशल रुम) आणण्यात आले. तिच्या शल्यक्रियेत आणि शल्यक्रियेच्या नंतर काय काय गुंतागुंती होऊ शकतील याची मला पूर्ण कल्पना होती. यामुळे काल रात्री सुद्धा मी शांतपणे झोपू शकलो नव्हतो. गेले काही दिवस चिंतेमुळे झोप सुद्धा पहाटे लवकर मोडत असे.आज पहाटे सुद्धा पाच वीस ला जाग आली आणि नंतर झोप लागली नाही ( अन्यथा मी सकाळी साडे सातला फार कष्टाने उठणारा माणूस आहे)
सुदैवाने यातील कोणतीही गंभीर गुंतागुंत होता शल्यक्रिया सुरळीत झाली आणि तिची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे हे पाहून आज मी जास्त शांत पणे हे लिहू शकतो आहे.
याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आमच्या आईची निर्धास्त आणि सकारात्मक वृत्ती.
अर्थात शल्यचिकित्सक आणि त्यांचे सहाय्यक आणि एकंदर टाटा रुग्णालयाचे कर्मचारी यांचे फार मोलाचं साहाय्य आहे यात शंकाच नाही.
या प्रकरणातून घेण्याजोग्या काही गोष्टी.
१) कोणताही रोग असाध्य नाही आणि कर्करोग झाला म्हणजे सगळं संपलं असा तर मुळीच नाही.
२) कोणतेही संकट आले तर त्यावर शांत चित्ताने उपाय शोधणे आवश्यक आहे. आमच्या घरातील कोणीही कुठे नवस केला किंवा देव पाण्यात ठेवले किंवा महा मृत्युंजयाचा लक्ष जप केला असे अजिबात झाले नाही. सद्सदबुद्धी आणि तारतम्य ठेवणे आवश्यक आहे. कर्करोग आहे तर त्यावरील सर्वोत्तम उपाय कुठे मिळतील याचा शोध घेत शेवटी टाटा हीच संस्था आम्हाला योग्य वाटली. ( याचा अर्थ असा अजिबात नव्हे कि इतर संस्था किंवा रुग्णालये आणि तेथील तज्ज्ञ हे कुठेही कमी आहेत)
३) आम्ही कोणतेही कर्मकांड केले नाही याचा अर्थ असा अजिबात नव्हे कि ज्याचा विश्वास आहे त्याने तसे करूच नये. कारण अशा गोष्टींनी एखाद्या माणसाला मानसिक समाधान किंवा आत्मिक बळ मिळत असेल तर त्याने जरूर करावे ( आमच्या आईच्याच भाषेत - कुणाच्या कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण)
४) डॉक्टर आहे म्हणून त्याला ताण तणाव येत नाही असे नाही. मी स्वत: किती धीर धरला असला तरी प्रत्यक्षात जेंव्हा हा कर्करोग ANAPLASTIC CARCINOMA OF THYROID (ATC) नसून MEDULLARY CARCINOMA OF THYROID (MTC) असा आला तेंव्हा माझ्या बायकोच्या दवाखान्यात माझा बांध फुटला आणि मी अक्षरशः तिच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून रडलो. कारण जर तो ANAPLASTIC CARCINOMA OF THYROID (ATC) असला पुढच्या वर्षी २०२० साली आपली आई आपल्याला दिसेल कि नाही याची मला खात्री नव्हती.
२००४ साली बायकोचा दवाखाना चालू केला तेंव्हा पासून आईचे घर वरच्याच मजल्यावर आहे त्यामुळे केंव्हाही तेथे जाणे सहज होत असे आणि आपले आईवडील तेथे आहेतच या अस्तित्वाची जाणीव आता जास्त प्रकर्षाने झाली.
एखाद्या माणसाची किंवा गोष्टीची किंमत आपल्याला केंव्हा होते तर ती वस्तू आपल्याकडे नसते तेंव्हा किंवा ती आपल्यापासून दूर गेली तर
शेवटी डॉक्टर हा सुद्धा माणूसच असतो आणि आपल्या भावनां वर किती संयम ठेवला तरी आतून वस्तुस्थिती माहिती असते.
मला जसे सुचत गेले तसे लिहीत गेलो. यात किती लेख येतील, काय असेल याची कोणतीही रूपरेषा माझ्या मनात नव्हती. त्यामुळे हे लेख विस्कळीत किंवा तुटक तुटक वाटण्याची शक्यता आहे.
शेवटी मिपा वरील इतक्या लोकांच्या मनातील प्रेम आणि सदिच्छा पाहून मी आपल्या सर्वांपुढे नतमस्तक आहे आणि आपल्या सर्वांचे आमच्या कुटुंबाकडून मन:पूर्वक आभार.
वाचने
10816
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
किमो रेडिएशन वगैरे लागणार नाही ?
हा कर्करोग (MTC) केमोथेरपी
In reply to किमो रेडिएशन वगैरे लागणार नाही ? by जॉनविक्क
शस्त्रक्रिया कोणत्याही
तुमचे प्रयत्न आणि आम्हा
फार लिहत नाही, पण वाचून बरे
डॉक्टरसाहेब,
+१११
In reply to डॉक्टरसाहेब, by उगा काहितरीच
+1
In reply to डॉक्टरसाहेब, by उगा काहितरीच
चांगली बातमी
तुम्हा सर्वांच्या सकारात्मक
सकारात्मक वृत्तीचे खूप कौतुक
In reply to तुम्हा सर्वांच्या सकारात्मक by प्रचेतस
+१
In reply to तुम्हा सर्वांच्या सकारात्मक by प्रचेतस
.
एकदम मनातलं बोललात
In reply to . by वकील साहेब
ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड.
एखाद्या माणसाची किंवा
+२
In reply to एखाद्या माणसाची किंवा by गड्डा झब्बू
आम्हा मिपाकरांचं एक टेन्शन कमि झालं :)
.
मातृऋण ....
मातृऋण ....
_/\_
एक चाम्गली लेखमाला
आईंना शुभेच्छा!
त्या लवकर हिंडूफिरु लागोत ही
मातोश्रीना शुभेच्छा !!!