पाऊस! पाऊस!!
पाऊस! पाऊस!! झाला सारा
भणाणलेला त्यासवे आला वारा
वारा उडवीतो माझे मन
मनामध्ये तू आहेस खरा
चिंब मी भिजलेली
माझ्यासवे तुझे भिजले तन
हिरव्या रानात घेवूनी कवेत
मीच हरवले माझे मन
पाणी आले पानोपानी
झाडे भिजली रानोरानी
मिठीत तुझ्या मी आलंगूनी
विसरले मी, गेले हरवूनी
- बी ऑलवेज लाईक मी
- ऑलवेज युवर्स पाभे
०३/०८/२०१९
प्रतिक्रिया
3 Aug 2019 - 10:40 am | महासंग्राम
भणाणलेलाच्या जागी दुसरा शब्द बसतो का ? मीटर ची ऐशीतैशी करतोय तो शब्द
3 Aug 2019 - 10:40 am | महासंग्राम
भणाणलेलाच्या जागी दुसरा शब्द बसतो का ? मीटर ची ऐशीतैशी करतोय तो शब्द
3 Aug 2019 - 10:56 am | जॉनविक्क
पाभे टच सुरेखच
3 Aug 2019 - 5:43 pm | जानु
आज सकाळीच पाभे, मी, डॉ. आणि शिरीष सर यांचा छान मिसळपाव चा कट्टा झाला. छान गप्पा झाल्या.
4 Aug 2019 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2019 - 11:54 am | नाखु
कविता पण अस्सल पाभे नाही,काही शब्द अगदी मीटरच्या बंधनात अडकत आहेत.
पाभे यापेक्षाही सरस काव्य करु शकतात याची खात्री असलेला वाचकांची पत्रेवाला नाखु