बॉलिवूडचे बाप

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
3 Aug 2019 - 12:07 pm

बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेक नाती दाखवतात. मुलगा-आई यांच्या नात्यावर भरमसाठ चित्रपटात भाष्य केलंय, पण वडील -मुलगा/मुलगी यांचे नातं हळुवारपणे उलगडणारं चित्रपट फार कमी आहेत पण ज्या काही चित्रपटात हे नातं दाखवलं आहे ते अत्यंत तरल असं आहे. त्यापैकीच बाप-लेकाचं नातं उलगडणारे काही चित्रपट इथे देतोय मिपाकर अजून भर घालतीलच.

१. गर्दीश (अमरीश पुरी- जॅकी श्रॉफ)

प्रसिद्ध सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर गर्दीश ला हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट म्हणतो, अगदी खरय ते. गर्दीश माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे, ते यात दाखवलेल्या वडील आणि मुलाच्या हळुवार नात्यामुळे. कर्तव्य, इमानदार हवालदार पुरषोत्तम साठे चंआपल्या मुलाला शिवाला पोलीस ऑफिसर बनलेलं पाहण्याचं स्वप्न असतं. पण परिस्थिती अशी येते तो शिवा अंडरवर्ल्ड मध्ये जातो आणि एका बापाचं स्वप्न भंग होतं. आपली स्वप्न भंग होतांना, आपल्यापासून दूर जाणारा पोरगा पाहतांना बापाची होणारी तडफड निव्वळ पाहतांना आपल्यालाही ते असह्य होत जाते. या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे प्रियदर्शन. आज जरी तो हेराफेरी साठी ओळखला जात असता तरी, त्याचा तो मूळ पिंड नाही. त्याने गर्दीश सोबत विरासत सारखे सुंदर चित्रपट दिले आहे. त्यात पण जी नात्यांची विण दाखवली आहे ती मस्तच आहे.

गर्दीश

२. मसान : (विनीत कुमार- विकी कौशल)

नीरज घायवान चा मसान माहिती नाही असं म्हणणं आज तरी कोणाला शक्य नाही. सध्याच्या काळातला क्लासिक चित्रपट प्रचंड वेगळं जग दाखवतो. तसं पाहिलं तर हि प्रेमकहाणी पण यात जो विनीत कुमार- विकी कौशल चा अगदी छोटासा ट्रॅक दिलाय तो व्यक्तिशः मला तरी आवडलाय. त्यात घरी जेवतांना बापलेकांचा संवाद होतो.

“पैसवा कितना दीहें सब?”
“अब ऊ इंटरव्यू के बाद बताइल.”
“निकल जाओ अच्छा है. जित्ता जल्दी निकल जाओ अच्छा है. नहीं तो तोहरौ जिंदगी मुर्दा फूंकत फूंकत यहीं खतम हो जाई.”

या एका डायलॉग मध्ये बापाची काळजी दिसते, आपलं सारं आयुष्य बनारसच्या हरिश्चंद्र घाटावर मुडदे जाळण्यात गेलंय, आपण जे भोगलंय ते पोराच्या वाट्याला येऊ नये हि तडफड दिसून येते. खरंतर अगदी दोन मिनिटांचा सिन आहे हा आणि चित्रपटात रिचा चड्ढा (देवी) आणि संजय मिश्रा (विद्याधर पाठक) यांचा रोल फार मोठा आहे, त्यात बापलेकीच्या नात्यात आलेली अनपेक्षित गुंतागुंत त्यातून येणारी बापाची हतबलता सुंदररितीने दाखवली आहे.
पण हा वरचा दोन मिनिटांचा सिन या सगळ्यांपेक्षा खासच.

मसान

३.डीडीएलजे ( धर्मवीर-राज मल्होत्रा)

डीडीएलजे म्हणजे बॉलिवूड चा मैलाचा दगड आहे. गेले कित्येक वर्ष "जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी" म्हणणारे बाबूजी लोकांना भुरळ घालतयेत पण राज च्या वडिलांचा डॅडी कुल चा ट्रॅक पण भारी आहे. बाप मुलाचा मित्र सुद्धा असू शकतो हे अत्यंत सुंदर रीतीने दाखवलंय यात.
ddlj

वावरइतिहासआस्वाद

प्रतिक्रिया

कादर खान आणि शक्ती कपुर
बाप नंबरी बेटा दस नंबरी मधे यांनी बापलेकांचे एक आगळे वेगळे नाते दाखवले होते.
हा चित्रपट बघताना प्रत्येक वेळी मन भरुन येते.
पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

3 Aug 2019 - 3:18 pm | चांदणे संदीप

बेक्कार पर ति साद =))

Sandy

रेडी चित्रपटातील महेश मांजरेकर आणि सलमान खान यांचे बाप-बेट्याचे संबंधही छान वाटले.
ready

रच्याक: मुळच्या तेलगु चित्रपटाचा युद्धम शरणं ह्या हिंदी अवतारातील राव रमेश आणि नागचैतन्याचे असेच संबंधही खूप छान दाखवले आहेत.
yudhham

जॉनविक्क's picture

3 Aug 2019 - 1:19 pm | जॉनविक्क

आणि तारे जमीपर विसरून कसे चालेल ?

उपेक्षित's picture

3 Aug 2019 - 1:43 pm | उपेक्षित

Daddy इसारलाव काय दादा ?

आणि आमचा आवडता गोविंदा - कादरखान बाप-लेकाची जोडी आल टाईम हिट. (आंखे मध्ये त्यांच्या जोडीला पहिल्या हाल्फ मध्ये आपल्या चंकी पांडे ने पण धमाल आणली आहे.)

विनिता००२'s picture

3 Aug 2019 - 1:55 pm | विनिता००२

मसान मधे विकी नंतर येवून बापाला घट्ट मिठी मारुन रडतो, तो सीन पाहतांना डोळे भरुन आलेले :(

सर टोबी's picture

3 Aug 2019 - 2:48 pm | सर टोबी
  1. ए. के. हंगल आणि सचिन शोले मध्ये
  2. सनी देओल आणि ए. के. हंगल यांचा अर्जुन
  3. अमरीश पुरी आणि रेवती यांचा मुस्कुराह्त (प्रियदर्शनचा बहुदा पहिला हिंदी सिनेमा)
  4. आणि सगळ्यांवर ताण म्हणजे अशोक कुमार आणि सुमित सन्याल यांचा आशीर्वाद
महासंग्राम's picture

3 Aug 2019 - 2:56 pm | महासंग्राम

मुस्कुराहट मध्ये बाप-लेकीचं नातं अगदी एखादी चिट्ठी हळुवार उलगडावी तसं दाखवलंय

प्रियदर्शन चे गर्दीश, मुस्कुराहट आणि विरासत माझे फेव्हरिट आहेत.
त्याने हिंदीत असेच अजून प्रयोग करायला हवे.

नाखु's picture

3 Aug 2019 - 7:24 pm | नाखु

मध्ये रंगविलेले आमिर खान आणि सलमान खान यांचे बाप अनुक्रमे देवेन वर्मा आणि जगदीप यांचें नाते अफलातून आहे