आला आला रे आला महिना भादवा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
31 Aug 2011 - 12:35 am

आला आला रे आला महिना भादवा

आला आला रे आला महिना भादवा
वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ ||धृ||

श्रावणात घडले फार उपास,
हड्डी नळीसाठी केले नवस खास
पुर्ण जेवणाने उपास आता रे सोडवा
आला आला रे आला महिना भादवा ||१||

गल्ली गल्लीत आपण आता फिरू
टोळी टोळीने एकत्र खेळ खेळू
मोत्या, टिप्याला
कुणीतरी राणी, डॉली भेटवा
आला आला रे आला महिना भादवा ||२||

सरला आता सारा पावसाळा
सुरू झालाय गुलाबी हिवाळा
मस्त थंडीतच वाढतो गोडवा
आला आला रे आला महिना भादवा ||३||

लाज बाळगू नका दिवसा उजेडाची
सुरू व्हा रे सारे वेळ आहे रात्रीची
नव्या उमेदवारांनो डोळे तुमचे मिटवा
आला आला रे आला महिना भादवा
वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०८/२०११

प्रेमकाव्यकविताविनोद

प्रतिक्रिया

साती's picture

31 Aug 2011 - 1:13 am | साती

परकायाप्रवेश करून अशी पीटातली गाणी लिहिण्यापेक्षा मुक्त पीठातले लेख लिहा भाऊ,बरे वाटतात वाचायला.

>> गल्ली गल्लीत आपण आता फिरू
टोळी टोळीने एकत्र खेळ खेळू
मोत्या, टिप्याला
कुणीतरी राणी, डॉली भेटवा
आला आला रे आला महिना भादवा ||२|| >>

बकवास!!!!!!!!!!!!!!!!!!
अतिशय बकवास, अभिरुचीहीन कविता!!!!!!!!!!!!!!!
पिडाकाकांनी खूप चांगली सूचना केली होती काय आवडले अथवा आवडले नाही ते स्पष्ट सांगायची सवय लावा -
मला भाद्रपदात कुत्रा-कुत्रीला भेटवा वगैरे भाषा अतिशय अभिरुचीहीन वाटले. किंबहुना ही कविता उडवावी असे माझे स्पष्ट मत आहे.
कोणाला प्रश्न पडला असेल मोत्या, टिप्या कुत्रा कशावरून वगैरे तर आय कान्ट हेल्प. कोणी झोपेचे सोंग घेतले असेल तर जागे करता येत नाही.

पाषाणभेद's picture

31 Aug 2011 - 6:06 am | पाषाणभेद

स्पष्ट बोलल्याबद्दल धन्यवाद.

(रागाशिवाय असलेले स्पष्ट बोलणे प्रेमाने बोलल्यासारखेच असते - संत पाषाणभेद (मृ. शके: १६६३))

वरील कवितेला बकवास!!!!!!!!!!!!!!!!!! अतिशय बकवास, अभिरुचीहीन कविता!!!!!!!!!!!!!!! म्हणा. आणखी काही खालच्या पातळीचे असेल तसे म्हणा. मला त्याचा राग येणार नाही.

पण "किंबहुना ही कविता उडवावी असे माझे स्पष्ट मत आहे." असे कसे म्हणू शकतात? (त्यातल्या त्यात ते तुम्ही तुमचे मत आहे हे लिहून संपादकांना सुचना दिली नाहीत हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे.)

वरील कविता उडविण्यासारखे काय आहे? अर्थात कविता उडविली तरी मला कुणाचाच राग येणार नाही. कविता प्रसिद्ध केल्यानंतर (व मुल झाल्यानंतर) ते सार्वजनिक होते. (कवीची मालकी राहत नाही.)

तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'केळीचे सुकले बाग' या कवितेचाही पराचा (येथील सदस्य 'परा' नव्हे :-) ) कावळा करता येईल. असल्या 'बकवास, अभिरूचीहीन' कवितांचे जुने दाखले मिळू शकतात. (फक्त एखाद्या मनापासून मराठी एम्.ए. केलेल्या विद्यार्थ्याला/ प्राध्यापकांना विचारावे लागेल. )

माझ्याच कवितांना मी उपप्रतिसाद शक्यतो देत नाही. पण माझेही मत कळावे म्हणून येथे देत आहे.

निनाद's picture

31 Aug 2011 - 6:08 am | निनाद

उडवू नये, मला तरी कविता आवडली...

मी संपादकांना कधीच काही सूचना करत नाही याचे कारण माझा विश्वास आहे ते कारभार पहाण्यास समर्थ आहेत आणि जर समर्थ नसतील तर माझ्या रडगाण्यानेदेखील काही होणार नाही. यात मनाचा मोठेपणा काहीही नाही. असो.

राहता राहीले - या कवितेत उडविण्यासारखे काय आहे?
ही कविता उडवावी हे माझे मत झाले. मी का ते वर पुरेसे स्पष्ट केले आहे. याउप्पर मला काहीही म्हणायचे नाही.

ही कविता उडणार नसेल तर अजून अशा "भादव्यातल्या टिप्या-मोत्या आणि राणी-डॉलीवरच्या कविता" मिपावर जरूर येऊ द्या.

(रागाशिवाय असलेले स्पष्ट बोलणे प्रेमाने बोलल्यासारखेच असते - संत पाषाणभेद (मृ. शके: १६६३))

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))

शके १६६३ मध्ये मृत्यू पावलेल्या संत पाषाणभेदांना दंडवत!!!
वाक्य आवडले.
कॉपीराईट नसता तर बिनदिक्कत ढापले असते.

निनाद's picture

31 Aug 2011 - 6:09 am | निनाद

लोकगीत या विभागात काहीसे चावट वाटणारे काव्य बहुदा असते - लावलं रताळं आलय केळं सारखे! त्या मुळे हे काव्य मला तरी वाईट भासत नाही. त्यात उडवण्यासारखेही काही नाही.
या रितीने चित्रगुप्त यांनी संदर्भ दिलेले खरे अरेबियन नाईट्स तर तुम्ही हातातही धरणार नाही. म्हणून गौरी देशपांडेंनी त्याचे भाषांतरच करायचे नाही की काय? तुम्हाला आवडले नाही, म्हणजे इतरांनाही आवडले नसेल असे का?

शुचि's picture

31 Aug 2011 - 6:18 am | शुचि

>> तुम्हाला आवडले नाही, म्हणजे इतरांनाही आवडले नसेल असे का? >>
(जर उडविले तर) ते संपादकांना विचारा

नगरीनिरंजन's picture

31 Aug 2011 - 6:39 am | नगरीनिरंजन

>>मला भाद्रपदात कुत्रा-कुत्रीला भेटवा वगैरे भाषा अतिशय अभिरुचीहीन वाटले.
तुमच्या मताचा आदर आहे. पण तुम्ही पाभे आणि यच्चयावत मॅचमेकर्सवर अन्याय करत आहात हे नमूद करावेसे वाटते.

पाषाणभेद's picture

31 Aug 2011 - 7:24 am | पाषाणभेद

नगरीनिरंजन चुकलात तुम्ही. :-)

>> पण तुम्ही पाभे आणि यच्चयावत मॅचमेकर्सवर अन्याय करत आहात....

परकायाप्रवेश प्रवेश करून आम्ही कुत्रा झालो आहोत अन मग हे गाणे रात्री गल्लीत टोळी टोळीने आम्ही सारे टोळीवाले म्हणत असतो. अहो आमचाही विचार करा तुम्ही माणसांनो! आमच्या मताचाही आदर करा जरा.

भॉ भॉ भॉ

-------------------------------------------------------------------------------------------------------
आता दुसर्‍या अर्थाने विचार केला तेव्हा तुमचेच बरोबर आहे असे वाटते आहे.

वॅवू...वॅवू...वॅवू...वॅ....वू...

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2011 - 1:23 pm | परिकथेतील राजकुमार

पिडाकाकांनी खूप चांगली सूचना केली होती काय आवडले अथवा आवडले नाही ते स्पष्ट सांगायची सवय लावा -

+१ सहमत आहे.
पण हे मान्य केल्यावरती किंवा त्यांच्या शब्दाशब्दाचा आज्ञा म्हणून जरी पालन केल्यास

मला भाद्रपदात कुत्रा-कुत्रीला भेटवा वगैरे भाषा अतिशय अभिरुचीहीन वाटले.
(ह्या वाक्यानंतर स्पष्ट मत संपायला हवे. कारण पिडाकांकांनी 'काय आवडले अथवा आवडले नाही' तेच स्पष्टपणे सांगण्याची सवय लावा म्हणले आहे.)

किंबहुना ही कविता उडवावी असे माझे स्पष्ट मत आहे.

हे तुमचे मत झाले. अर्थात ही कविता समाजावर वाईट परिणाम करणारी, विशिष्ठ जाती-धर्माला टार्गेट करणारी, पुरुष अथवा स्त्री साठी अवमानकारक भाषा असणारी इ. इ.' प्रकारची असती तर तुझ्या सूचनेला काही अर्थ होता शुचिमामी. पण निव्वळ तुला भाषा अतिशय अभिरुचीहीन वाटते म्हणून कविताच उडवून लावायची ?

'बघ बघ अग सखे कसे बुगु बुगु वाजतय , तुझी घागर नळाला लाव, डाव्या हातानी साडी वर करा, बाळ्याला आतमध्ये घ्या गोट्या बाहेर राहू द्या' सारख्या गाण्यांना काय दर्जा देशील मग ?

आणि अगदी तुझे सर्व आक्षेप मान्य केल, तरी कवितेत वर्णन केल्याप्रमाणे प्रसंग भाद्रपदात आपण स्वतःच्या डोळ्यांनी घडताना पाहात असतोच की. तेच प्रसंग एका कवीच्या नजरेला कसे वाटतात ते सांगण्याचा हा प्रयत्न कशासाठी नाकारायचा?

बाळ्याला आतमध्ये घ्या गोट्या बाहेर राहू द्या
असे नाही तर
"बाबू" ला आतमध्ये घ्या भले गोट्या बाहेर राहू द्या
असे आहे
- यु ट्यूब लिंक देवू का ? ( व्हीडीओ नाही आहे )

निनाद's picture

31 Aug 2011 - 5:36 am | निनाद

लोकगीत म्हणून आवडले.

सोत्रि's picture

31 Aug 2011 - 10:25 am | सोत्रि

निनादशी सहमत.

लहानपणी गावाला भरपुर तमाशे आणि लोकगीते ऐकली आहेत.
ती चावटच असावी लागतात!
शेतीच्या आणि रोजच्या कामच्या धबाडग्यातुन विरंगुळ्यासाठी आणि करमणुकीसाठी हे आवश्यकच होते.

दादांची (कोंडक्यांचे) गाणी गाजण्याचे ते एक महत्वाचे कारण होते.

कविता आणि गाणी हा माझा प्रांत नाही, पण तरीही हा घागा वाचल्यावर माझे मत टाकावेसे वाटले.

- ( 'लोक' असलेला ) सोकाजी

निनाद's picture

31 Aug 2011 - 6:11 am | निनाद

दादा कोंडकेंच्या एका चित्रपटात
मला लागलाय खोकला हे गाणे होते. त्याची चाल याला फिट्ट बसते.
की हे त्यावरच बेतले आहे?

पाषाणभेद's picture

31 Aug 2011 - 6:22 am | पाषाणभेद

हा प्रतिसाद देवून धागा वर आणण्याचे प्रयोजन नाही. कविता लेखनाची पार्श्वभुमी आपणाला समजावी हा स्वच्छ हेतू आहे.

>>> मला लागलाय खोकला हे गाणे होते. त्याची चाल याला फिट्ट बसते. की हे त्यावरच बेतले आहे?

नाही हो नाही. काल मोटरसायकलवरून पावसात जात होतो. रस्त्यात दोन कुत्री समोरून येत होती. पुढले कुत्रे (की कुत्री माहीत नाही) तांबूस रंगाचे, झिपरे होते. जीभ बाहेर काढून पळत होते. त्यामागोमाग पांढरे व थोडेसे काळे डाग असलेले कुत्रे (हे देखील कुत्रे की कुत्री माहीत नाही) पुढच्याच्या मागे पाठलाग करत पळत होते. समोरच सार्वजनीक गणपतीच्या मंडपाचे डेकोरेशन सुरू होते. मला माझा मालमसाला मिळाला. बाकी चालीवर गाणे बसविलेले नाही ते. माझ्या तर लक्षातही आले नाही की यावर हि चाल बसू शकते ते.

आपण जर चालीत हे गीत म्हणू शकत असाल तर ते येथे टाका ना? मलाही समजेल की तुम्ही शिवलेले कपडे माझ्या मुलाला कसे बसतात ते.

सुचीताई अन तुम्ही वाद नका घालू. मै और मेरी कवितायें राजी तो क्या करेगा काजी? जांदो भाई जांदो.

निनाद's picture

31 Aug 2011 - 6:29 am | निनाद

मला गाऊन येथेच द्यायला आवाडले असते...
पण मी गायक नाही हो! :(

daredevils99's picture

31 Aug 2011 - 6:42 am | daredevils99

ही कविता शार्दूलविक्रीडीत ह्या वृत्तात कशी लिहिता येईल?

शार्दूलविक्रीडीत ह्याचे ज्ञान नाही पण श्वानक्रिडीत यात आलेले आहे.

५० फक्त's picture

31 Aug 2011 - 8:14 am | ५० फक्त

''मोत्या, टिप्याला
कुणीतरी राणी, डॉली भेटवा''

पाभे तुम्हाला ब्राउ- बेगम चे पण नाव घालायचे राहुन गेले वाटतं,

अर्रर्र..

तसा विचार केला तर माझी अख्खी ब्राउ मालिकाच उडवायला हवी. :(

त्यात तर अजूनच स्पष्ट उल्ल्केह आहेत.

अशा पद्धतीने विचार केलाच नव्हता. स्वाभाविक भाषा म्हणून लिहीत जाण्याच्या नादात काहीजणांना, विशेषतः स्त्रीवर्गाला त्यात काहीतरी अप्रिय वाटू शकेल हे लक्षात आलं नाही. मी ते बदलून लिहूच शकत नाही. पण ही मालिका काढावी अशी मी संमंला विनंती करतो. स्वसंपादनाच्या मार्गे मीच एकेक लेख ठिपका देऊन काढणे वेळखाऊ आहे आणि तरीही रिकामी चौकट शिल्लक राहील. म्हणून मुळातून डिलीट करावे अशी विनंती.

निनाद's picture

31 Aug 2011 - 10:26 am | निनाद

हे काय नचिकेत?
कै च्या कैच विनंती आहे ही - काय झेपले नाही...

आता काय गौरी देशपांडेंच्या पुस्तकाच्या प्रती पण जाळणार वैग्रे की काय?
त्या न्यायाने स्वर्गीय शैय्या पण जाळावे लागेल.... आणि बरेचसे दिवाळी अंक!

नाही.. त्यात फरक आहे.

वाचकाला नुसते नापसंत वाटणे आणि घृणास्पद किंवा लाजिरवाणे वाटणे यात फरक आहे.

मला भाद्रपदात कुत्रा-कुत्रीला भेटवा वगैरे भाषा अतिशय अभिरुचीहीन वाटले. किंबहुना ही कविता उडवावी असे माझे स्पष्ट मत आहे.

हे वाचल्यावर मी विचारपूर्वक उपरिनिर्दिष्ट विनंती केली आहे. लिहिलेलं चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही. किंवा ते वाचकांच्या रुचीनुसार बदलून लिहावं किंवा यापुढे काळजी घ्यावी हेही शक्य नाही. फक्त या स्पेसिफिक लेखमालेत कुत्र्यांच्या मेटिंगचे वगैरे स्पष्ट उल्लेख आहेत म्हणून ते लिखाण काढावे अशी जाणीव होताच तसे म्हटले इतकेच.

निनाद's picture

31 Aug 2011 - 12:15 pm | निनाद

संपादन लेखकालाच हवे असेल तर मी काय बोलणार?
पण मला त्यात वावगे वाटत नाही.
कुत्रा कुत्रीला भेटणे हे अश्लील वाटते? ते तर नैसर्गिक आहे.
कुत्रा म्हशीला भेटवायला नेण्याचे संदर्भ असते तर एक वेळ विचार करता आला असता.

पण तुम्ही त्या लेखाचे मालक तुम्ही म्हणाल त्याला सलाम. पण प्लिज प्लिज त्या ब्राउ लेखमालेत एक ताजेपण आहे. खरेखुरेपण आहे. त्याला असे सेन्सॉर बोर्ड लावून त्याचा चोथा करू नका!
दवणेपणा करायला अनेक ठिकाणे आहेत की!

आपल्याला खरड टाकली आहे.

प्रभो's picture

31 Aug 2011 - 12:41 pm | प्रभो

ओ गवि, नीट वाचा आधी

>>मला भाद्रपदात कुत्रा-कुत्रीला भेटवा वगैरे भाषा अतिशय अभिरुचीहीन वाटले.

तुमचा ब्राऊ बेगम ला भेटायला भाद्रपदात गेला होता का?? नसेल तर ते अभिरूचीहीन नाहीये ;)
मॅटर खल्लास!!!

५० फक्त's picture

31 Aug 2011 - 12:36 pm | ५० फक्त

''कुत्रा म्हशीला भेटवायला नेण्याचे संदर्भ असते तर एक वेळ विचार करता आला असत'''' हसुन हसुन मरतोय, च्यायला सगळं हापिस मला वेडं ठरवणार आज.

ओ गवि, पाहिजे असल्यास कट्ट्याचा जोक जाहिर टाकुन मी माझा आयडि उडवुन घेतो पण उगा लिखाण उडवु नका तुमचं, काय पण काय, हा असला प्रतिसाद टाकायचा असता तर शुचितै/मामी ज्या कोण असतील त्यांनी तिथंच दिला असता की,

भादव ही संकल्पना कोकणात जास्त फेमस आहे.... अर्थात त्या वरुन१ टोमणाही मारला जातो,पण वरची प्रतिक्रीयांमधली गरमागरमी बघुन उघड द्यायला ''भ्या'' वाट्टय... ;-)

तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'केळीचे सुकले बाग' या कवितेचाही पराचा (येथील सदस्य 'परा' नव्हे ) कावळा करता येईल......हे म्हणजे अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गा गा गा गा ... वाचून साफ खपल्या गोलो आहे :-))

पाभेंची परकायाप्रवेशातली लेखणी एरवीपेक्षा जास्त पॉवरबाज होते असं आपलं माझं निरीक्षण आहे.

सदर कविता कुणाला आवडो - नावडो, पण परकायाप्रवेशातील पाभेंच्या लिखाणाबाबतीतलं माझं निरीक्षणच इथे अधोरेखित होतंय, असंच मला वाटतंय.

बाकी गविभौ, उगा ते ब्राऊ वगैरे काढून टाकण्याचे प्रतिसाद लिहिण्यापेक्षा ते पूर्ण करण्यासाठी लेखणी वा टंकण्यासाठी बोटं झिजवलीत तर फार्फार बरं वाटेल. तुम्हाला तुमची बोटं झिजवायची नसतील तर आमची हजर आहेत झिजायला, हे ही जाता जाता सांगतो....

बाकी हर्षदरावांशी अगदी सहमत.

पाभे, तुम्ही कसंही लिहा आणि कुठल्याही दालनात प्रकाशित करा ;-) आम्ही आहोतच वाचायला.....

:-)

jaypal's picture

31 Aug 2011 - 9:59 pm | jaypal

त्यात फाल्गुन मास. पाशाणा आता फाल्गुन मासावर पण एक होउन जाउ द्या. कविता आणि तीच्या वरील रसभरीत चर्चा मला खुपच उत्तेजक वाटल्या वॉवॉवॉवॉवॉवॉ a
dog

५० फक्त's picture

31 Aug 2011 - 10:40 pm | ५० फक्त

जयपाला, वरचा फोटो पाहुन अभिषेक - जॉनचा नाच आठवला दोस्ताना मधला.