पावसाविषयी असूया

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
7 Jul 2019 - 6:24 am

पावसाविषयी असूया

पाहून माझे खुप हाल झाले
पावसाने केले तुझे केस ओले

गवतावर पडताच पाऊल शहारले अंग
भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग

पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली
तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली

ओली करून साडी पाऊस मातलेला
बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला

गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले
विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले

पाषाणभेद
०७/०७/२०१९

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

8 Jul 2019 - 5:16 am | जॉनविक्क

जालिम लोशन's picture

9 Jul 2019 - 9:20 pm | जालिम लोशन

बेस्ट

जालिम लोशन's picture

9 Jul 2019 - 9:20 pm | जालिम लोशन

बेस्ट

चित्रगुप्त's picture

10 Jul 2019 - 2:34 am | चित्रगुप्त

कविता बोले तो एकदम झकास, पण ...
...गिरकी घेतली, उड्या मारल्या ....

.
यावरून आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की या कवितेतली 'ती' म्हणजे एकादी श्वानीण आहे, की बया ? (आमचे डोके जरा तिरपे चालते )

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2019 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह!