पृथ्वी उवाच

श्रेयासन्जय's picture
श्रेयासन्जय in जे न देखे रवी...
4 Jul 2019 - 10:06 am

पृथ्वी उवाच....
तलखी ने कासावीस हा जीव,
दाह घेई सर्वांगाचा ठाव,
उदरात घुसमटे बीजांचा जीव,
निलाकाशीच्या देवा घे तूच आता धाव.

आक्रमू दे आकाश हे जलदांनी,
येऊ दे रे आभाळ हे भरूनी,
लखलखत्या विद्युल्लतानी,
रणसंगर होऊ दे ह्या गगनी.

घननीळ बरसता बेधुंद,
मेदिनीस कस्तुरी सुगंध,
जीवनामृत शोषितील ही रंध्र,
भारून टाकेल पावसाचा संतृप्त गंध

डोळ्यात आणोनि प्राण,
विनविती माझे पंचप्राण,
मेघराजा तुजला माझी आण,
दे ह्या वसुधेला सृजनाचे वाण.

© श्रेया राजवाडे, जुन 2019

कलाकविता

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

4 Jul 2019 - 11:18 am | श्वेता२४

आवडली कविता.

गवि's picture

4 Jul 2019 - 12:11 pm | गवि

छान आहे.

प्रचेतस's picture

4 Jul 2019 - 12:24 pm | प्रचेतस

सुंदर

नाखु's picture

4 Jul 2019 - 6:24 pm | नाखु

अर्थवाही

पुलेशु

चांदणे संदीप's picture

5 Jul 2019 - 12:15 am | चांदणे संदीप

पृथ्वी शॉ उगाच काहीतरी बोलतोय पण ये तो कविताच निकली. ;)

असो, चांगला प्रयत्न. पुलेशु!

Sandy

इरामयी's picture

7 Jul 2019 - 12:28 pm | इरामयी

छान आहे.

तलखी - खासच!

फारच छान कविता आहे. कशी सुचते तुम्हाला काय माहित. दैवी देणगीच आहे ही..

यशोधरा's picture

9 Jul 2019 - 7:01 pm | यशोधरा

आवडली.

जॉनविक्क's picture

10 Jul 2019 - 1:57 am | जॉनविक्क

एक एक ओळ म्हणजे दागिना आहे नुसता दागिना.