नभातून पडावा पाऊस
मनात उतरावा पाऊस
धरतीमध्ये थेंब थेंब
रुजवावा पाऊस
झाडांवरल्या थेंबातूनी
झरावा पाऊस
कौलांच्या पागोळ्यांतूनी
ओघळावा पाऊस
हातातल्या ओंजळीत
पकडूनी प्यावा पाऊस
अधिर ओठांचा स्पर्शाने
हलकेच चुंबावा पाऊस
ललनेच्या केसांतूनी
झटकावा पाऊस
गावा पाऊस घ्यावा पाऊस
पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस
- पाभे
३०/०६/२०१९
प्रतिक्रिया
1 Jul 2019 - 6:07 am | अमरेंद्र बाहुबली
खूप छान. आवडली.
1 Jul 2019 - 1:20 pm | प्रशांत
मस्त
1 Jul 2019 - 5:57 pm | Rajesh188
खूप छान कविता
2 Jul 2019 - 1:25 am | अत्रुप्त आत्मा
व्वाह वा!
2 Jul 2019 - 2:46 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
2 Jul 2019 - 7:20 am | नाखु
अगदी शिडकावा सरींचा.
एक विडंबन खदखदत आहे पण फक्त चाल येथून घेणार आणि लै लै वेगळ्या विषयाची हजामत आहे परवानगी देण्यात यावी अशी नम्र विनंती.
भिजपावसातला वाचकांची पत्रेवाला नाखु
3 Jul 2019 - 3:44 am | पाषाणभेद
जाहीर परवानगी आहे.
मुल अन कविता होईपर्यंत खाजगी राहते. एकदा झाल्यानंतर ते सार्वजनीक होते. ( अशी आमची येथेच जुन्या काळी स्वाक्षरी होती.)
ए आण रे ते जुने मिपावरील सह्यांचे मॉड्यूल.
2 Jul 2019 - 10:43 am | ज्ञानोबाचे पैजार
आवडली
पैजारबुवा,
3 Jul 2019 - 11:02 am | प्राची अश्विनी
कविता आवडली.