भारताने न्युझीलंडचा दहा गडी राखून पहिल्या टेस्ट मध्ये विजय मिळवला !
जवळ जवळ ३३ वर्षानंतर भारत न्युझींलंड मध्ये टेस्ट मॅच जिंकला आहे !
सचिनच्या १६० धावांची खेळीने व हरभजनच्या फिरकी मुळे हा मोठा विजय भारतला मिळाला !
पुढील दोन्ही टेस्ट जिंकुन भारताने न्युझीलंडचा सुफडा साफ करावा ही आशा !!!
जय हो !!
प्रतिक्रिया
21 Mar 2009 - 10:28 am | भिडू
जय हो !!
21 Mar 2009 - 10:32 am | मृगनयनी
हार्दिक अभिनन्दन!
:)
आजचा "विषुव-दिन" खूप शुभंकर आहे!
:) :) :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
21 Mar 2009 - 10:44 am | मिंटी
नयनीशी सहमत :)
21 Mar 2009 - 11:01 am | टारझन
ऍक्चूअली झालं कसं .. डॅणियल विट्टोरीच्या पंचम स्थाणात मंगळ जरा जास्तंच स्ट्राँग झाला होता ... आणि पुर्वेकडून दक्षिणेकडे चंत्र येरझर्या घालत होता ... सुर्य देखिल कोपर्यातल्या अष्टम स्थाणात अस्त झाला होता ..
ह्या उलट ढोणी*चे ग्रह तारे गोल धरून "झिंगालाला-हु-हू-हुर्र-हुर्र" ह्या गाण्यावर णाचत होते ..
सबब , भारत सहज जिंकला , णो वंडर .. इट्स ऑल डण बाय ग्रह तारे !!
(भविष्यकार) टारोपंत पोपटशास्त्री
थोबाड पाहून भविष्य सांगू !
भेटा :-
बालगंधर्व पुलाखाली, बाबुलाल गोळेवाल्या शेजारी,
पुणे-४०० ०००
21 Mar 2009 - 11:03 am | छोटा डॉन
=)) =))
टारोपंत पोपटशास्त्र्यांशी सहमत ...
आम्ही असाच विचार करत होतो वास्तविक पाहता, कारण शणि मंगळ बरोबर नसले तर काय मजाल आहे जिंकण्याची ???
असो.
शणि-मंगळ युतीचे ... च्च च्च भारताचे अभिनंदन ...!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
21 Mar 2009 - 11:07 am | घाशीराम कोतवाल १.२
जय हो टारोपंत जय हो !!!=))
कॄपया आप्ले चार्जेस द्यावेत म्हणाजे आम्हास आपणास भेटता येइल..
व आपण आमच्या बद्द्ल काय भाकित कराल हे ऐकता येईल.
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
21 Mar 2009 - 11:09 am | टारझन
ढण्यवाड लोक्स !!
भविष्यकार) टारोपंत पोपटशास्त्री
थोबाड पाहून भविष्य सांगू !
भेटा :-
बालगंधर्व पुलाखाली, बाबुलाल गोळेवाल्या शेजारी,
पुणे-४०० ०००
लँडलाईन- २००१००२०/३०/४०/५०/६०/७०
मोबाईल- ९८९९० ११०२०/३०/४०/५०/६०
फॅक्स - २००१३३००
ई-मेल- टारोपंत.पोपटशास्त्री@पोपटमेल.कॉम
वेबसाईट : थोबाडपाहूनभविष्य.कॉम
टिप :- येताना ऑनलाईन रजिष्ट्रेशन करून यावे !
21 Mar 2009 - 11:26 am | घाशीराम कोतवाल १.२
~X( आपली वेब साईट बंद आहे
टेलिफोन नॉट रेचेबल येत आहे काय करावे बरे!!! ~X(
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
21 Mar 2009 - 7:17 pm | धमाल नावाचा बैल
बाबुलाल गोळेवाला कि बाबुलाल "बोळेवाला" रे टार्या? ;)
(बोळाप्रेमी) बैलोबा
21 Mar 2009 - 10:43 am | अवलिया
जय हो!
--अवलिया
21 Mar 2009 - 11:17 am | सहज
सगळ्यांनी / बर्याच जणांनी चांगले योगदान दिले म्हणुन विजय सुकर झाला. उर्वरित कसोट्या जिंकून फोद्याफोद्याने मालीका जिंकावी ही अपेक्षा.
21 Mar 2009 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार
जितम जितम !
राजे हो झहीरचे सुद्धा कौतुक करावे तेव्हडे थोडेच. सचीन पासुन स्फुर्ती घेत जहीरने साकारलेली पहिल्या डावातील नाबाद ५१ धावांची खेळी सुंदरच. सचीन आणी भज्जीचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच.
ज्या मैत्रीपुर्ण वातावरणात हा सामना खेळला गेला तय बद्दल दोन्ही संघांचे करावे तेव्हडे कौतुक थोडेच आहे. भारतीय संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
21 Mar 2009 - 12:05 pm | अनिल हटेला
ढोणी आणी कंपनीचे हार्दीक अभिनंदन !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
21 Mar 2009 - 12:50 pm | नितिन थत्ते
प्रतिसाद लिहिणार्या प.रा. चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
:D ह. घ्या.
खराटा
(रंग माझा वेगळा)