सांज-राधा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
19 Mar 2009 - 11:02 pm

त्या सांजकोवळ्या उन्हात सजल्या वाटा
गुणगुणती गीते तुझी निरागस लाटा

मावळतीवरती रंग नवे क्षितिजाचे
पाऊल वाजते हलके बकुळफुलांचे

माडांच्या छाया झुलती वार्‍यासंगे
जणु कृष्णसख्याचा रास आगळा रंगे

आसमंत भारित सूर मुरलीचे आले
कालिंदीचे जल थबके, कदम्ब डोले

तो मऊ मुलायम स्पर्श मयुरपंखांचा
दरवळतो हलका भास मधुर गंधाचा

या चराचराला जडली त्याची बाधा
श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

19 Mar 2009 - 11:09 pm | बेसनलाडू

कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू
आज मिपावर गोपाळकाला कसा काय रंगलाय?
(गोप)बेसनलाडू

अवलिया's picture

19 Mar 2009 - 11:10 pm | अवलिया

वा !

आज कृष्ण डे आहे काय ? :?

--अवलिया

शितल's picture

20 Mar 2009 - 7:19 pm | शितल

=))

प्राजु's picture

19 Mar 2009 - 11:10 pm | प्राजु

क्य बात है! शब्दा शब्दाला दाद द्यावी अशी आहे कविता.
:)

मावळतीवरती रंग नवे क्षितिजाचे
पाऊल वाजते हलके बकुळफुलांचे

खूप गोड आहे ओळ ही.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मृगनयनी's picture

20 Mar 2009 - 10:48 am | मृगनयनी

या चराचराला जडली त्याची बाधा
श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा

अ प्र ति म ! ! !

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

स्मिता श्रीपाद's picture

20 Mar 2009 - 11:14 am | स्मिता श्रीपाद

या चराचराला जडली त्याची बाधा
श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा

सोनुली राधा...कित्ती गोड शब्द...

आणि तितकीच गोड गोडुली तुझी कविता ....

सुन्दर ..!!!

अवांतरः आज राधा-कृष्णा च्या कविताच कविता येत आहेत...:-)
मिपाचं गोकुळ झालयं :-) ( हॉटेलाचं गोकुळ.. :-) )

शितल's picture

20 Mar 2009 - 7:20 pm | शितल

क्रांतीताई,
तुमच्या सर्व कविता सुरेख असतात. :)

जागु's picture

20 Mar 2009 - 10:53 am | जागु

वा खुप छान क्रांती.

दत्ता काळे's picture

20 Mar 2009 - 1:45 pm | दत्ता काळे

क्रान्तिताई कविता फार सुंदर जमलीये.

"आज शतजन्माच्या मीरेने राधेविषयी लिहील" क्या बात हे !!!

लयबध्द आणी सुरमय कविता

तो मऊ मुलायम स्पर्श मयुरपंखांचा
वाचुन गुदगुल्या झाल्या.

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

क्रान्ति's picture

20 Mar 2009 - 7:16 pm | क्रान्ति

धन्यवाद मित्रांनो! अशा प्रेरणादायक प्रतिसादांमुळे नव काहीतरी सुचत जात आणि लिहावस वाटत!
मीरा काय आणि राधा काय? दोघींच आराध्यदैवत कान्हाच ना!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

सूहास's picture

20 Mar 2009 - 7:19 pm | सूहास (not verified)

मीरा काय आणि राधा काय? दोघींच आराध्यदैवत कान्हाच ना!

सही....

सुहास..
(द गुड)

चंद्रशेखर महामुनी's picture

20 Mar 2009 - 7:16 pm | चंद्रशेखर महामुनी

सुंदर ! क्रांति !

लिखाळ's picture

20 Mar 2009 - 7:19 pm | लिखाळ

वा ! सुंदर कविता.
माडांच्या सावल्यांच्या रासलीला तर फार छान !
-- लिखाळ.

पुष्कराज's picture

20 Mar 2009 - 7:49 pm | पुष्कराज

क्रांति
सुंदर आहे तुमची कविता, तालही छान साधलाय

लवंगी's picture

21 Mar 2009 - 5:29 am | लवंगी

सुंदर कविता. प्रत्येक कडवं दाद देण्यासारख आहे.