मसाजिस्ट

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
12 May 2019 - 10:58 pm

मौजमजाआरोग्यविरंगुळा

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

13 May 2019 - 11:38 am | दुर्गविहारी

;-)))) मि.पा.वर बर्याच दिवसांनी काही हलकेफुलके वाचायला मिळाले. मजा आली. एकतर स्वामिंची अखंड क्रुपा, नाही तर नेहमीची राजकीय धुळवड याने मि.पा.वर धागे उघडून वाचण्याची ईच्छा मेली होती.
मस्त ! पु.ले.शु.

शशिकांत ओक's picture

14 May 2019 - 12:26 am | शशिकांत ओक

अन्यथा नंतर राजकीय धुळवडीत इतर धाग्यांवर धूळ बसली जाईल....!!
विहारींची सुचना आवडली....

शशिकांत ओक's picture

14 May 2019 - 8:18 am | शशिकांत ओक

दुर्गविहारी आपले सुरवातीला टाकलेले इमोजी नुसते सेमी कोलन, डॅश, हाफ ब्रॅकेट दिसते आहे. नीट दिसायला काय करावे?

उगा काहितरीच's picture

13 May 2019 - 1:32 pm | उगा काहितरीच

मोबाईलवर लेख वाचता येत नाहीये . बराचसा उजवा भाग झाकल्या गेला आहे.

शशिकांत ओक's picture

13 May 2019 - 3:16 pm | शशिकांत ओक

नमस्कार मित्रांनो मला तर लॅपटॉप वर सर्व ओळी संपूर्ण दिसत आहेत.

उगा काहितरीच's picture

13 May 2019 - 4:08 pm | उगा काहितरीच

PC वर मलाही दिसत आहे. पण मोबाईलवर नाही दिसत आहे.

लेखाचा नाव आणी दुसरे चित्र बघून वाटलं कायतरी तंदुरी वाचाला मिळंल. पण हे तर अळूचं फदफदं निघाल्याव.

आणि मला झब्बू द्यायला निघालाय...
तू लिही मग बोल ना...

गड्डा झब्बू's picture

13 May 2019 - 6:43 pm | गड्डा झब्बू

लिव्हतो मालक लिव्हतो. थोड बाळसं तर धरू द्या.

शशिकांत ओक's picture

13 May 2019 - 7:18 pm | शशिकांत ओक

वरील धागा मोबाईल वरून पूर्ण दिसत नव्हता. आता तो सर्वांना दिसेल असे वाटते.

सादर करून जरा नाविन्य आणायची प्रयत्न केला आहे...
पुर्वी मला विविध रंग वापरून लिहायला आवडत होते. आता ते मागे पडले...
गूगल माय ड्राईव्ह वर ड्राफ्ट लिहून पब्लिश टू वेब च्या एमबेड ची लिंक मिसळपाव वरील कोडचा वापर करून हे साध्य झाले आहे. नव्या धाग्यात ही वापर करून मोबाईलवरून वाचकांना सोईचे व्हावे म्हणून आकार लहान ठेवला आहे.
आपली प्रतिक्रिया समजून घ्यायला आवडेल... आणखी सुबकता यावी म्हणून काय करता येईल यावर सूचना केलेल्या आवडतील.

सोन्या बागलाणकर's picture

14 May 2019 - 5:11 am | सोन्या बागलाणकर

प्रयत्न चांगला आहे पण खरं सांगायचं तर iframe (पेजच्या आत पेज) हा प्रकार मला अजिबात आवडत नाही. दोन स्क्रोलबारमुळे वाचायला अतिशय त्रासदायक वाटतो.
त्यापेक्षा लेख प्रकाशित करण्यासाठी मिपाचा सरधोपट मार्ग उत्तम.

बाकी तुमची मर्जी.

शशिकांत ओक's picture

14 May 2019 - 8:13 am | शशिकांत ओक

मिपावर एका फाँटचे राज्य चालते. त्यात विविध पर्याय देण्यात आले तर बरे होईल.
तसेच पॅराग्राफ सेंटर, जस्टिफाईड असे पर्याय दिले तर?
मिपा चालकांनी म्हटले की मेरी मर्जी तर तुम्ही आम्ही काय करणार?

अभ्या..'s picture

14 May 2019 - 2:08 pm | अभ्या..

ओककाका, सजावट करायचा प्रयत्न स्तुत्य आहे पण काय आहे की एकच फॉन्ट वापरण्यामागे काही लॉजिक असते, वेगवेगळी पुस्तके वेगवेगळ्या फॉन्ट मध्ये असली तरी कुठला फॉन्ट कुठे वापरायचा, फॉन्टचे मुख्य काम काय असते? धावत्या मजकुरात कोणता फॉन्ट किती साईजमध्ये कशा अलाइनमेंटमध्ये वापरायचा ह्याचेही तंत्र असते. शीर्षकांना वेगळा फॉन्ट असतो, उपशीर्षकांना वेगळा असतो. उगी मराठीत १५०० फॉन्ट उपलब्ध आहेत म्हनून रॅन्डमली ते वापरले की सजावट होत नाही. त्याचेपण एक शास्त्र असते. अजुन लेखात चित्रे टाकणे, त्यांची अलाईनमेंट, साईज, रेशिओ, कलर्स ह्याचेही एक शास्त्र असते. न्युजपेपर, पुस्तके हे याचे पालन काटेकोरपणे करतात अन्यथा डेकोरेटिव्ह फॉन्टमधला सकाळ किंवा लोकसत्ता छापला गेला असता. असले काही आंतरजालावरील मजकुर किंवा पब्लिकेशनात केले की त्याला पंक्चरवाल्याच्या किंवा गावठी कॅन्टीनवाल्याच्या बोर्डाची कळा येते. सोप्या आंतरजालाच्या भाषेत बोलले तर होऊ दे खर्च चे पोस्टरची कळा येते.मिपामालक असोत की कुणी प्रकाशक, उगीच एका फॉन्टवर साईटस चालवत नसतात की पुस्तके छापत नसतात. त्यामागे सर्व प्रकारच्या वाचकांना वाचायला सोयीचे जावे, फॉन्ट रेडरिंग इझी व्हावे, स्क्रोल नीट व्हावे, सर्व प्रकारच्या डिव्हाईसवर दिसावे असे बरेच अस्पेक्ट असतात. शाळेत युनिफॉर्म असताना मला शेरवानीची सजावट आवडते म्हणून रोज रंगीबेरंगी कपडे घालण्यात अर्थ नसतो. हे शिस्त म्हनून असते पण त्याचे इतरही काही स्तुत्य उद्देश असतात.
.
वरील पोस्ट जितकी वाचायला अवघड जाते तितकीच ती काही सूचक अश्लील उल्लेखाने व चित्रांनीही भरलेली आहे, मिपावर जसे आपणासारखे जुने जाणते पुरुष आयडी आहेत तसे काही आपल्या भगिनीही आहेत. चेष्टा किंवा विनोदी लेखन म्हनून ठेक आहे पण महिलावर्गांना वाचायला/बघायला अवघडल्यासारखे लेखन मिपावर होऊ नये असे फार वाटते.
ह्याउप्पर आपली आणि संपादक मंडळाची मर्जी.
धन्यवाद.

शशिकांत ओक's picture

15 May 2019 - 1:34 am | शशिकांत ओक

कदाचित आपले नाव अभिजित असावे पण इथल्या नावाने ... मित्रा अभ्या...

शिस्त म्हनून असते... उगी मराठीत १५०० फॉन्ट उपलब्ध आहेत म्हनून रॅन्डमली ते वापरले की सजावट होत नाही. त्याचेपण एक शास्त्र असते.

आपण म्हणता ते बरोबर आहे. विशेषतः हवाईदलातील सदस्याला तिचे महत्व काय याचा परिचय असावा लागतो.

लेखनतंत्राचा विकास होत गेला तसा त्यावर विविधांगांनी विचार करून ते वापराच्या काही रुढी, परंपरा, नियम किंवा परिपाठ रुजले. मान्यता पावले. पेपर, नियतकालिके, पुस्तक छपाई यात एक सूत्रता आली वगैरै कोणालाही मान्य होण्यासारखे आहे....
लेखकांनी आपले कथन हस्तलिखित कागदावर प्रकाशकाला, पेपर, नियतकालिकाच्या हाती दिले की त्यांचा छपाई, जाहिरात, वितरण, आणि विक्री अशा प्रत्येक पुढील पायरीवरील कारवाईवर ताबा नसल्याने मानधन मिळालेच तर ते स्वीकारून नव्या जोमाने लेखनात गुंतवून घ्यायला मोकळा, असे घडत असावे.
ही पद्धत आता हळूहळू बदलत आहे हे आपण जाणताच. पुर्वीच्या काळातील व्याकरणाचे नियम ढिले होत गेले. ह्रस्व-दीर्घाची अनिवार्यता विस्कळीत झाली. अनुस्वारांचा अति वापर कमी होत संपुष्टात आला. (9वारी) सकच्छ का (5वारी) विकच्छ साडी? असे वाद नाटकांचा विषय होत होते ते संपुन आज साडी ही समारंभात वापरायपुरती शोभेची उरली. वाहनावरून लीलया संचार करायला सोईचा ड्रेस गाजावाजा न होता रुळला. 4 ओळी चारोळ्या झाल्या. त्यांना राजकीय प्रतिष्ठा आली. बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. हे सर्व व्यवसायात दिसत आहे.
आज ब्लॉग वरून मला काही लिहायची सुरसुरी आली की मिसळपाव सारख्या नवीन दालनातून माझ्या विचारांना वाचकापर्यंत मांडायला फोरम, वाचक वर्ग मिळत आहे. त्याला आकर्षक वाटेल असे विषय थोडक्यात पण प्रभावीपणे धाग्यांच्या जंजाळात मांडले जात आहेत. वाचकांनी आपले मत सादर करून विषयवस्तूला साजेल असा प्रतिसाद मिळवता येत आहे. ट्रोलिंगचा मान वाढला आहे. जरा वावगे म्हटले, फोटोची सरमिसळ केली तर सुप्रिम कोर्टातून बोलावणे यायची संधी उपलब्ध आहे. इतके या सर्व गोष्टींचे भान ठेवून लेखन केले असेल तर तो माल मार्केटिंगची तंत्रे अवगत करून सादर करायला यायला हवा. हे जे मी लिहित आहे ते नवे नाही पण एकत्रितपणे विचार व्यक्त करायला संधी मिळते आहे म्हणून बोटांच्या दाबाने लेखन करत आहे. असो.
माझी मुलाखत नुकतीच छापून आली म.टा.त. त्याचा फाँट काय असावा, कितव्या पानावर, कोणच्या दिवशी, कोणच्या सदरात, ते योग्य दिसेल याची काळजी मी करू शकत नव्हतो. ना गरज होती... आपण म्हणता तसे पेपरवाल्यांच्या नीती-नियमांचा, शिस्तीचा तो भाग होता.
मात्र इथे माझे लिखाण मलाच टाईप करावे लागते आहे. फोटो टाकायला करावी लागणारी उसाभर, त्याच्या सादरीकरणात नेटकेपणा आणणे मलाच शक्य आहे. म्हणून त्या साठी मी असे काही प्रयोग माझ्या कुवतीनुसार केले तर ते वावगे ठरू नयेत. आपल्या ते फारसे रुचले नाहीत असे आपण नोंदता तेही योग्य आहे.

.

चेष्टा किंवा विनोदी लेखन म्हनून ठेक आहे पण महिलावर्गांना वाचायला/बघायला अवघडल्यासारखे लेखन मिपावर होऊ नये असे फार वाटते.

अश्लील मार्तंड म्हणून नावाजलेले काही महाभाग होते पुण्यनगरीत. आचार्य अत्र्यांनी मराठातून त्यांच्यावर बरेच वेळा शर संधान केले होते. त्याच आचार्य अत्र्यांनी नंतरच्या काळात चिं. त्र्य. खानोलकरांच्या एका कादंबरीवर झोड उठवून त्यातील ओंगळ व त्यांच्या नजेरेत अश्लील म्हणून जे काही होते त्याचे परिच्छेद सादर करून सध्याच्या भाषेतील आपला टी आर पी वाढवला होता. ते अग्रलेख आम्ही मित्र मुद्दाम सार्वजनिक वाचनालयातील मराठा प्रत आवर्जून वाचायला गर्दी करत असू. असो.
वरील लेखन मी माझ्या कॉलेजच्या मित्रांसाठी लिहिले होते. त्याचा बाज आणि त्यातील घटनांना साजेल अशी सजावट गरजेची होती म्हणून एका दिवसात धागा असा पळाला की हजारी झाला एक दोन दिवसात... माझ्या मित्रांनी हा धागा वाचून त्या मसाजिस्टचे नाव मला ताबडतोब कळवले. शिवाय आणखी काही सुंदर चेहऱ्यांची त्या निमित्ताने उजळणी झाल्याचे आवर्जून लिहिले आहे. इथे असे काही वाचक असतील त्यांना सांगलीतील जयश्री टॉकीज, कॉलेजचा परिसर वगैरे आठवावा असे वाटून इथे सादर केले होते.
असो...
काही काळापुर्वी एका सिनेमात नाडी भविष्याच्या संदर्भातील चुका दाखवणारे चटपटीत लिखाण असे काही तडाखेबंद वेगाने सरकत गेले कि त्या वेगावर आश्चर्य वाटते आहे... अशी चिंतायुक्त एक प्रतिक्रिया देखील आल्याचे स्मरते... कारण सौ. सनी लिओनींच्या सर्वांग सुंदर नामाचा तो प्रभाव!
आपल्या मताशी सहमतीची प्रतिक्रिया अजूनही स्त्री वर्गाकडून आली नाही याची नोंद घेण्यासारखी आहे. कदाचित आता कोणी पुढे येतील...
...

यशोधरा's picture

18 May 2019 - 12:42 pm | यशोधरा

आपल्या मताशी सहमतीची प्रतिक्रिया अजूनही स्त्री वर्गाकडून आली नाही याची नोंद घेण्यासारखी आहे

जिथे उपयोग नसतो, तिथे गीता वाचण्यात अर्थ नाही हे महिला वर्गाला ठाऊक आहे, म्हणून प्रतिक्रिया आल्या नाहीत, ही सुद्धा एक शक्यता असावी. असो.

शशिकांत ओक's picture

21 May 2019 - 11:38 pm | शशिकांत ओक

.

श्वेता२४'s picture

28 May 2019 - 2:26 pm | श्वेता२४

जिथे उपयोग नसतो, तिथे गीता वाचण्यात अर्थ नाही हे महिला वर्गाला ठाऊक आहे, म्हणून प्रतिक्रिया आल्या नाहीत, ही सुद्धा एक शक्यता असावी. असो.
+1

शशिकांत ओक's picture

17 May 2019 - 11:52 pm | शशिकांत ओक

पळतायत कि काय धागे!
विमान नगर वाला धागा १४३७ नमस्कार तर मसाजिस्ट १४६१ टिचक्या! तेही तात्या अभ्यंकर यांच्या दुखवट्याच्या काळात!

अभ्या..'s picture

18 May 2019 - 2:41 pm | अभ्या..

हा डॉयलॉग तर "तेराव्याचे वाढताना सगळ्याजणी माझे बांगड्या अन गंठणच टकामका बघत होत्या बाई" इतका बालिश आहे.
स्वतःचे कौतुक करा की पण इतके? इतके बालिश असताल असे वाटले नव्हते.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

18 May 2019 - 4:24 pm | जेम्स बॉन्ड ००७

ठराविक पद, वय इथपर्यंत पोचलं की माणसाला समज येते असं मला वाटायचं..

चर्चा वर काढायची होतीच तर नुसता प्रतिसाद लिहून भागलं असतं, तात्याचा उल्लेख असंवेदनशीलपणा दाखवतोय.

शशिकांत ओक's picture

21 May 2019 - 11:37 pm | शशिकांत ओक

.

शशिकांत ओक's picture

28 May 2019 - 1:03 pm | शशिकांत ओक

जेम्स बाँड आहो... नाव सोनूबाई अन् ... तुम्ही नावाला तरी जागाल असे वाटले होते...
बऱ्याचदा अशा बिरुदावल्या न मिरवता कॉलेजच्या मित्रांशी लिहिलेला किस्सा शेयर केला...

शशिकांत ओक's picture

21 May 2019 - 11:36 pm | शशिकांत ओक

.

चित्रगुप्त's picture

22 May 2019 - 3:02 am | चित्रगुप्त

ओक काका, (आमचे स्वतःचे केस पांढरे झालेले असले तरी धागाकर्ता आमच्यापेक्षा मिपावर दीड वर्षाने शिनेर असल्याने त्यांना 'काका' म्हणणे इष्ट, असे आमच्या हिचे म्हणणे) तुमचे नवीन दोन्ही धागे फाँट वगैरे बदलल्यामुळे वाचायला फारच त्रास होतो आहे.

तेवढ्यात एक केरळी चेहर्‍याची नर्स आत डोकावून गेली.

... या वाक्याखाली एकाद्या सौथिंडियन नर्शीचा फोटो देण्याऐवजी आंग्ल नर्शीण का दाखवलीत हे समजले नाही.
एकंदरित आम्ही तुमच्या नाडीसकट सर्व प्रकारच्या लिखाणाचे चहाते असूनही आम्हाला हा लेख तुमच्या आजवरच्या इभ्रतीस साजेसा वाटला नाही.

शशिकांत ओक's picture

22 May 2019 - 10:54 am | शशिकांत ओक

फाँट, उत्तान फोटो..
आपणास माहित आहे की मी वैयक्तिक जीवनात कसा बहु आयामी प्राणी आहे. आपल्या दोघांचा परम मित्र हा या लेखनाचा मुख्य वाचक होता. त्याने ते वाचून आनंद मिळवला. तो इतरांना मिळावा म्हणून इथे उतारी केली. काहींना नाराजी आली. पूर्वी लोकांना नाडी ग्रंथ चेष्टेला कारण व्हायचा.. व्यक्ती तितक्या प्रकृती.
आज नाडीग्रंथ भविष्य विषयावर निर्माण केलेल्या १८०० स्कॅन्सची डेटाबँक, ८ अँड्रॉइड अॅप्स, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेत ब्लॉगच्या माध्यमातून कोणालाही पत्ते, फी, पण वगैरे माहिती मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न उत्सुक लोकांना मार्ग दर्शन करत आहेत, ५शेच्या वर यू ट्यूब वर व्हिडिओ क्लिप्स मधून मुलाखती, चर्चा यातून नाडी ग्रंथ ताडपत्रावर व्यक्तीचे नाव कसे कोरून लिहिलेले असते ते पहायला मिळते, काहींचे अनुभव सादर करणे, वार्षिक कार्यशाळा आयोजित करून भारतीय प्राचीन ज्ञान परंपरा म्हणून या विषयाकडे लक्ष दिले जावे, फक्त भविष्य कथन म्हणून न पाहता त्यातील काव्यावर, लिपीवर इंडॉलॉजिकल स्टडीज वर काम करणाऱ्या तंजावूर, चेन्नईच्या संस्थांना यावर विचार करायला प्रवृत्त केले जाते आहे. असो.
मध्यंतरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृतावर आधारित पोथ्यांचा कथाभाग आणि कथन यावर अभ्यासात्मक शोध लेखनातून अध्याय निहाय नकाशा, फोटो मधून ५३ अध्यायांचे संकलन ज्यांना या विषयात रस आहे त्यांना सादर केले आहे.

आपल्या देशातील हजारो वास्तू दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. त्यांना प्रकाशात आणण्यासाठी मिलिट्री कमांडर्स कंबाईन्ड या बॅनर खाली निवृत्त सेनाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून तरुण पिढीला अॅप किंवा तत्सम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या वास्तूंना कॉम्प्युटर एडेड डिझाईन्स माध्यमातून अडगळीत पडलेल्या वास्तू आपल्या गौरवशाली काळात कशा प्रकारे दिसत व वापरल्या जात असाव्यात हे दाखवायला प्रेरित व्हायला कशी मदत होईल अशी अपेक्षा बाळगून मिलिट्री जनरल्स, हवाईदलातील मार्शल्स ना एकत्र आणायची धडपड सुरू आहे. या कामासाठी कोणी मदतीचा हात पुढे केला तर कमी वेळात हे साध्य होईल. तथापि अशी कामे संथगतीने होणार आहे याची जाणीव ठेवली आहे.
आता या सर्वातून विरंगुळ्यासाठी काही लिखाण सादर केले. काहींना नाराजी वाटली...
चालायचेच मी मनाला लावून घेऊ बसत नाही.
आपल्या प्रतिसादाच्या माध्यमातून हे लिहायला एरव्ही संकोच वाटला असता पण ते व्यक्त करायला संधी मिळाली म्हणून आपले धन्यवाद...