मराठी माणसे स्वताची प्रगती स्वःताच करू शकतात

स्वामि १'s picture
स्वामि १ in जनातलं, मनातलं
10 May 2019 - 10:13 am

आपण ही आपली प्रगती करुन घ्याच.
मराठी माणूस धंद्यात का माघे?

परप्रातीयाचे गणित समजून घ्या.

धंद्यामधे सिंडीकेटस असतात, रॅकेट्स असतात तसेच जातीय ग्रुप्ससुद्धा असतात फक्त त्याला चेंबर ऑफ कॉमर्स असे नाव नसते. ते पृष्ठभागावर देखील नसते. ही सिस्टीम इतकी स्मूथ बसली आहे कि आपल्याला रोज पाहून सुद्धा त्यातला जातीय कोन लक्षात येत नाही. ते वाईटच आहे असे म्हणता येईल का याबद्दल वेगवेगळी मतं येतील.
असा व्यवसाय केला जातो हे कोणताही अभ्यासक्रमात किव्वा कार्यक्रमात शिकवले जात नाही . हे कुठे पुस्तकातही वाचायला मिळणार नाही .

यांचे काम कसे चालते ? ते त्यांच्याकडूनच शिका .

माझे अनेक पटेल मित्र आहेत. गुजरातेत तर त्यांचे वर्चस्व आहेच. मी काही दिवस इन्श्युरन्स एजंट म्हणून काम केलं. इन्शुरन्स एजंटला अनेक गोष्टी माहीत होतात. मी फर्ग्युसन रस्त्यावरच्या एका पटेलाकडून नियमित स्टेशनरी विकत घ्यायचो. माझ्या व्यवसायासाठी लागणारी काही रजिस्टर्स मी डिझाईन केली होती. ती हा बनवून द्यायचा. पुण्यात सर्वात पहिल्यांदा त्याच्याकडे जंबो कलर झेरॉक्स मशीन आले होते. छोट्या जागेतून त्याने व्यवसाय वाढवला. त्या कष्टाचे कौतुक आणि अभिमान दोन्ही आहेच. माझ्या ब्रॅंचचा धंदा सुद्धा त्याला दिल्याने मला तो चांगला मानायचा. या विश्वासावर त्याला माझ्याकडून पॉलिसी घेण्याबद्दल विचारले. ही पॉलिसी घेतली तर भांडवलवृद्धी होणार होती आणि ती हिट जाणार याबद्दल तज्ञांना विश्वास होता. एलआयसीच्या निवडक चांगल्या पॉलिसीमधली एक होती ती. त्यालाही ते मान्य होते. मैत्रीसुद्धा मान्य होती. पण त्याने जे सांगितले ते चक्रावून टाकणारे होते.

या पटेलांचे एक मासिक (काय म्हणायचं त्याला ?) निघते. त्या मासिकात कुठला पटेल काय धंदा करतो याची माहिती, फोन नंबर वगैरे तपशील दिलेला असतो. एक पटेल औरंगाबादला आहे. त्याच्याकडे कसल्या तरी स्टील प्लेट्स बनतात. तर मग ठाण्यातल्या पटेलाला त्या प्लेट्स त्याच्याकडून घ्याव्या लागतात. मुंबईतल्या पटेलाकडे जर त्या प्लेट्स मिळत असतील तर मग तो घेऊ शकतो. पण पटेलाव्यतिरिक्त दुस-याकडून चुकूनही घ्यायचे नाही असा दंडक आहे.

इन्श्युरन्स साठी राजस्थानातून तीन पटेल पुण्यात येतात. पॉलिसी त्यांच्याकडून काढून घ्यायची हा नियम आहे. शेजारी इन्श्युरन्स एजंट राहत असेल आणि तो पटेल नसेल तर त्याच्याकडून पॉलिसी घेता येत नाही. मुंबईत सुद्धा बरेच पटेल इन्श्युरन्स एजंट्स आहेत. त्यांचे ग्राहक ठरले आहेत. थोडक्यात पटेल व्यावसायिकांनी आपसातच स्पर्धा करायची. एकाचा ग्राहक दुस-याने पळवायचा नाही. जर तो ग्राहक स्वत:हून वळाला तरच.

हे अलिखित नियम जर तोडले गेले तर समुदायाकडून त्या पटेलाला अगदी छोटासा दंड लावला जातो. त्या काळी २१ रू होता. आताचे माहीत नाही. पण अमक्या तमक्या पटेलाने २१ रू. दंडापोटी भरले हे त्यांच्या त्या पुस्तिकेत प्रकाशित झाले रे झाले की तो पटेल आयुष्यातून उठतो. त्याच्याशी सर्व प्रकारचा धंदा समुदायाकडून बंद केला जातो. त्याला समाजाच्या ब्यांका देखील कर्ज देत नाहीत. भिशीतून त्याला बाहेर काढले जाते.

कानात बाळी घालणारे मिठाईची, हार्डवेअरची, सायकल्सची, मेडीकलची, गिफ्ट आर्टिकलची दुकाने चालवणारे अस्वच्छ राजस्थानी लोक ही त्यांची ओळख आहे. पुण्यात, मुंबईत सर्वत्रच यांची दुकाने लक्षणीय आहेत. गुजराथी समाज पूर्वी जो किरकोळीचा व्यवसाय करायचा तो आता यांच्याकडे आहे. गुजराथी समाज होलसेल मधे गेला आहे.

राजस्थानी दुकानदार गावाकडून एक मुलगा आणतो. त्याला राबवून घेतो. त्याचा पगार समाजाच्या ऑफीसकडे जमा करतो. मुलगा मोठा झाल्यावर जेव्हढे पैसे पगाराचे जमा झाले असतील तेव्हढेच दुकानदार भर घालून देतो. या मुलाला मग समाज दोन लाख रूपये उचल देतो (आकडे जुने आहेत). त्यातून त्याचा मालक त्याने हेरून ठेवलेले दुकान भाड्याने मिळवून देतो. दोन लाखात पागडी आणि दोन वर्षाचे भाडे असते. पगार जमा झालेला असतो. त्यातून तो वस्तू आणतो. कमी पडलेले पैसे समाजाकडून कर्ज म्हणून मिळतात. मग त्याचं दुकान चालू लागते. (दुकान चालेल का हा प्रश्नच नसतो). मग तो गावाकडून एक मुलगा आणतो. पुढे हे सायकल रिपीट होते. अशा पद्धतीने एकाची दोन, दोनाची तीन दुकाने होत जातात. हळू हळू सगळीकडे राजस्थानीच दिसू लागले आहेत. आता या दुकानांना लागणारा माल सुद्धा राजस्थानीच पुरवणार. यांचेही विमे त्यांचा समाजातला प्रतिनिधीच उतरवणार.

आजपर्यंत समाजाकडून मिळालेल्या उचल आणि कर्जाला कुणी बुडवलेले नाही. धंदा चालला नाही असे झालेले नाही. यांना ब्यांकेची आवश्यकता नाही. कायदेशीर बाबींसाठी एखादे अकाउंट असते फक्त. यांच्यातही दंड लागतो.

तिसरे उदाहरण अग्रवाल समाजाचे. हा वेगळा समाज आहे. यांचे जैन, शहांशी सख्य असते. यांची किराणा मालाची दुकाने असतात. मार्केट यार्डातल्या अग्रवालाकडे ते माल भरतात. अग्रवाल नसेल तर मग शहा, जैन. साधारण २०, २१ तारखेला हे महिन्याचा माल भरायला येतात. त्या वेळी त्यांना पैसे द्यायचे नसतात. पैसे कधी हे शेठ विचारत नाहीत. हेच सांगतात ३ तारखेला हिसाब चुकता करेंगे. बाजूचा मराठी दुकानदारही त्य़ाच शेठकडे माल भरायला आलेला असतो. पण त्याच्या आणि अग्रवालच्या दुकानात हटकून पाच पैशाचा फरक असतो. कारण हे शेठकडे रडतात. बाजूमे पाटील का दुकान है. साब मराठी माणूस उधरच जायेंगे. मग तो याला वेगळा दर लावतो. शिवाय खरेदी रोख नाही.

याच्याकडे एखाद रूपयाचा फरक असला की सगळी गर्दी त्याच्याकडे लोटते. एक तारखेला जास्तीत जास्त जोर असतो. जवळपास सगळा माल संपलेला असतो. दोन तारखेला माणूस पाठवला जातो. शेठचा हिशेब क्लोज.

अजून बरीच उदाहरणे आहेत. इथे फक्त तीनच नमुने दिले आहेत.
भारतातली बाजारपेठ अशीही चालते आणि खुलीही चालते. पण ही बारीक कलाकुसर माहीत नसलेले जेव्हां वाद घालायला येतात तेव्हां त्यांच्याशी काय बोलायचे ?
आतातरी शहाणे व्हा .

हल्ली बिल्डरांच्या पण संघटना आहेत. त्यांच्यातही सिंडीकेट्स निर्माण झालेत. जातीच्याच बिल्डराला जमिनी द्यायचे करार होताहेत. कुठल्याही रिअल इस्टेट एजंटला नवे ट्रेण्ड्स विचारा.
खाण्यापिंयाच्या बाबतीत आजही अंधश्रद्धा, रुढी आहेत. त्या नाहीतच असे म्हणणा-यांना कोपरापासून नमस्कार. असे महानुभाव मला देवासमान आहेत. त्यामुळे त्यांचेच मत प्रमाण.

मग आपण कुठे आहोत?-
मराठी भाषिक समाज कधी असा विचार करणार.
व्यवसायात एकमेकांना मदत कधी करणार.
आता तरी आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी यावर विचार मंथन करावे.
Business Help Group करून तालुकावर मदत केंद्रे स्थापन करावीत.
आपला समाज मागास राहिला याला दुसरे कोणीही जबाबदार नाही तर आपणच जबाबदार आहोत.
समाजाला मदत होईल असे उपक्रम न राबविता आपण फक्त राजकारण करीत राहिलो.
राजकारण कराच पण राजकारणाचा फायदा समाजाला होईल असे उपक्रम सर्वांनी सुरु करावेत.
धन्यवाद
एक हितचिंतक .

कधी शिकणार आपण मराठी लोक ? का नुसतेच एकमेकांची उणीदुणी काढत बसणार ?
*नोट-जसा आला तसा मजकूर पाठवला त्यामध्ये दुमत असू शकते* *business support group*

"मांसाहार करणाऱ्या मराठी माणसाला बिल्डरने घर नाकारले..."

अशा बातम्या आपण हल्ली सर्रास ऐकतो... तेव्हा लगेच आपल्या डोक्यात विचार येतो, हा एवढा माज यांच्यात येतो कुठून...? मित्रांनो हा माज येतो आर्थिक सुबत्तेतुन... हि सुबत्ता जैन-मारवाडी समाजात प्रचंड आहे म्हणुनच अशा प्रकारे घर नाकारणारे बहुतांशी जैन-मारवाडीच असतात...

मित्रांनो साधी गोष्ट सांगतो... यांच्या आर्थिक सुबत्तेच सगळ्यात महत्वाच कारण यांनी खर्च केलेल्या १०० रूपयातले ७० रूपये जैन-मारवाडी समाजातच परत येतात... कारण कोणतीही खरेदी ते स्वत:च्या समाजबांधवा कडुनच करतात म्हणुन पैसा त्यांच्या समाजातच फिरत राहतो... अगदीच नाईलाज झाला तरच ते बाहेरच्या माणसाकडून खरेदी करतात...

हे आपल्यालाही शक्य आहे... आज मराठी माणसाने खर्च केलेल्या १०० रूपयातले जवळजवळ ९० रूपये बाहेर जात आहेत... मराठी समाजात फक्त १० रूपयेच परत येत आहेत... हेच कारण आहे कि आपल्यातले काहीच आर्थिक सबळ होत आहेत... परंतु समाज म्हणुन आपण सबळ होत नाही...

म्हणुनच माझी सर्वांना विनंती आहे... मी जे सांगतोय त्याची सुरूवात करा... कठीण आहे पण अशक्य नाही... आपल्याकडे धंद्यात उतरणारी मुल कमी आहेत... पण मी जे सांगतोय ते केल तर त्यांना धंद्यात यश मिळण्याची शक्यता वाढेल आणि जास्तीत जास्त मराठी मुले धंद्यात उतरतील... आपली एक साधी कृती त्यांना प्रोत्साहन देईल....

हे नक्कीच करा

1) डॉक्टर मराठी निवडा
2) वकील मराठी निवडा
3) इंजीनियर मराठी निवडा
4) सी.ए मराठी निवडा
5) भाजी वाला मराठी निवडा
6) मोबाइल रिचार्ज स्टोअर्स मराठी निवडा
7) मेडिकल स्टोअर्स मराठी निवडा
8) दूध डेअरी मराठी निवडा
9) प्रिटींग प्रेस मराठी निवडा
10) पेपर मराठी निवडा
11) स्टेशनरी स्टोअर्स मराठी निवडा
12) कपडयाचे दुकान मराठी निवडा
13) इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल स्टोअर्स मराठी निवडा
14) शेती कृषि सेवा केंद्र मराठी निवडा
15) ट्रॅव्हल बुकींग मराठी निवडा
16) फ्लोअर मिल मराठी निवडा
17) किराणा स्टोअर्स मराठी निवडा
18) हार्डवेअर दुकान मराठी निवडा
19) झेरॉक्स सेंटर मराठी निवडा
20) हॉटेल मराठी निवडा
21) इतर उपयोगी वस्तुसाठी मराठी व्यापारी निवडा

समाजाच्या माणसाला मोठे करणे म्हणजेच समाज आर्थिक दृष्टया सुदृढ़ करणे होय।
मग बघा 10 वर्षात मराठी समाजाची आर्थिक सुधारणा कशी होते ती....
जेव्हा घेणारे , विकणारे आणि निर्माता आपणच राहु तेव्हा नक्की मराठी समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल..!!

मग ह्या नवीन वर्षाला संकल्प करताय ना ?
आपल्याच माणसांकडून जास्तीत जास्त खरेदी करण्याचा

आपण जास्तीत जास्त मराठी व्यवसायिक निवड करावी.

वरील लेख एका संघटनेने लिहला असून तो त्यांनी जास्तीत जास्त मराठी माणसांन कडे पोहचण्याची विनंती केली आहे
धन्यवाद.

धोरणविचार

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

10 May 2019 - 10:43 am | प्रदीप

माफ करा, हे थोडं अवांतर होतंय. पण अनेकानेक धागे - व तेही एकाच विषयाभोवतीचे, ज्याला अनेकांनी समर्पक उत्तरे दिलेली आहेत-- काढत बसण्याचे तुमचे कसब 'वाखाणावे' असे आहे.

ह्यावरून काही वर्षांपूर्वी, दुसर्‍या एका ससंस्थळावर, तेथील एका धागाबहाद्दरांनी काढलेला धागा मला आठवला. 'पिलीयन रायडर स्त्रीयांनी आखूड टी- शर्ट्स घालावेत का?' :)

Rajesh188's picture

10 May 2019 - 12:51 pm | Rajesh188

आता पाहिल्याससरखी परिस्थिती नाहीं, व्यापाराच्या देशाच्या सीमा सैल झाल्या आहेत ,
इथे टिकायचे असेल तर गुणवत्ते शिवाय पर्याय नाही
साधी नोकरी जरी करत असाल आणि तुमचे काम गुणवत्ता पूर्ण असले पाहिजे,
ओळखीवर किंवा गाव वाला म्हणून नोकरी मिळू शकते पण फक्त तुमच्या कामातील गुणवत्ता ती नोकरी टिकवू शकते,
दुसरे महत्वाचे म्हणजे आपल्यात मतभेद नाहीत हे बाहेरच्या समाजाला दिसलं पाहिजे
रस्त्यावर, bus मध्ये आशा सर्व ठिकाणी आपल्या संघटित पानाची जाणीव करून देणे खूप गरजेचं आहे
त्याच प्रमाणे social मीडियावर सुद्धा ते संघटन दिसले पाहिजे
मतभेद टाळले पाहिजेत

राजेश१८८ आपण बरोबर बोललात. दिवस आता व्यापारीकरणाचे आले आहेत. पैशाच्या बाबतीत आपण मजबूत झाल्याशिवाय आपला टिकाव लागणार नाही.

अभिजित - १'s picture

10 May 2019 - 1:23 pm | अभिजित - १

रद्दीवाले .. राजस्थानी असतात. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनेच त्यांचा व्यापार चालत असतो. एक सेट झाला कि गावाहून दुसरा पोरगा आणतो. त्याला नवीन ठिकाणी धंदा सुरु करून देतो. फक्त रद्दीवर , चांगल्या ठिकाणी २ BHK घेतलाय आमच्या बिल्डींग मध्ये. आणि एक गाळा पण, जो भाड्याने दिलाय. मी तरी रद्दी देताना स्वतःच्या काटा वापरतो. कारण हे लोक रद्दीत ३० / ४० टक्के खातात. १२ किलो ऐवजी , ७ किलो. त्यांचा पितळी काटा वापरला कि. भरपूर कमाई .
शिवसेना शाखा - बोर्ड - उत्तम कंपनीत कुरियर ची नोकरी. पगार + पेट्रोल खर्च देणार. वाईट वाटते.

अभिजित १आपण चांगलेच उदाहरण दिले. अशी अनेक परप्रातीय व्यापाराची उदाहरणे देता येतील.
मला मध्ये भेसळ करणे
चोरीचा माल आणून विकणे
मुळ लेबल काढून दुसरे लेबल लावणे
अशी अनेक गुप्त कारस्थान मराठी व्यवसाईक करत नाही म्हणून तो धद्यामधे माघे पडतो. म्हणून मराठी माणसांनी लबाडी करावी असे मुळीच नाही. पण खरी परिस्थिती काय आहे हे मराठी माणसाला समजलेच पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

10 May 2019 - 1:28 pm | चौथा कोनाडा

आदरणीय मिपा संमं,

कायप्पा वरील ढकलपत्र चिटकावून इथं धागा म्हणून काढू शकतो ?
असं असेल तर आम्ही पण अगणित जिलेब्या इथं टाकू.

- चौथा कोनाडा, जिलेबी केंद्र,
पत्ता: मिपाकर कॉम्पल्स, स्व. स्वामि२ मार्ग, मिपावाडी, मराठीसंस्थळनगर.

किर्लोस्कर, गरवारे सारखे किती तरी मराठी माणसांनी उद्योगात नाव कमावले आहे
किती तरी लहान मोठे व्यवसाय अत्यंत व्यवस्थित मराठी लोक सांभाळत आहेत
संख्या थोडी कमी असेल हे मान्य
आणि आताची पिढी जुन्या मानसिकते मधून बाहेर पडली आहे आणि व्यवसाय करण्या चे प्रयत्न करून तो यशस्वी करण्याची त्यांची वृत्ती आहे
आणि अशी खुप उदाहरणे आहेत

राजेश१८८ आपण बरोबर सांगितले मराठी मध्ये ही कतृवात व्यापारी आहेत. पण आपल्याडील हुशार व बुद्धिवान तरूण भर पगाराच्या नोकरीत समाधान मानुन शांत बसतात. व आज दुदैवाने मराठी Talent केवळ परप्रातीयांना विकले जाते. आपल्या महाराष्ट्राच्या कायदा व घटणेत अशा कतृवात मराठी तरूणांचा व्यवसाई उपयोग करून मराठी व महाराष्ट्राची प्रगती करावी अशी तरतूद किंवा शिक्षण किंवा समज असती तर महाराष्ट्र व मराठी माणूस जपान जर्मनी कोरीया च्या बरोबर असता.

रानरेडा's picture

10 May 2019 - 8:50 pm | रानरेडा

मी गुजरात मध्ये असताना माझा बेकायदेशीर दारू पुरवठा दार मराठी होता . तो धंद्याला चोख होता . एकदा दुप्लीकेट माल आला तर त्याने पैसे परत केले
मी तुमच्या आदरास पात्र आहे का ?

रानरेडा's picture

10 May 2019 - 8:52 pm | रानरेडा

मला जर विमान घ्यायचे असेल तर मग बोईंग मध्ये मराठी माणूस उच्चपदस्थ आहे म्हणून बोईंग घ्यावे कि गरज बघून एअरबस घ्यावे ?

फुटूवाला's picture

11 May 2019 - 2:02 am | फुटूवाला

:)))

वरुण मोहिते's picture

11 May 2019 - 12:14 pm | वरुण मोहिते

आणि आपण कोण??

वरुण मोहीतेजी मराठी विकिपीडियावरील "मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी" लेख -कुणि लिहिला आहे माहित नाही , त्यातील माहितीच्या अचूकतेचीही कल्पना नाही- पण एकदा लेखातील एका आडनावाच्या इतिहासाची माहिती डोळ्या खालून घालाच. आणि ती माहिती बरोबर असण्याची अत्यल्प शक्यताही तुम्ही गृहीत धरली तर तुम्हीस्वतःच्या भाषेबद्दल स्वतःलाच माफ करू शकणार नाही. इथेतर इतरांनी तुम्हाला प्रश्न विचारण्यचीही गरज नाही तुम्ही लेख डोळ्या खालून घाला आणि स्वतःचा स्वतःलाच प्रश्न विचारा आपल्या स्वतःच्या भाषेतील चुक कोणती ?

मराठी_माणूस's picture

11 May 2019 - 12:20 pm | मराठी_माणूस

प्रतिसादा मधे परत एकदा हीन पातळीचे प्रदर्शन

आधीच्या प्रतिसादात फक्त वरुण मोहितेंचेच विचार कमी पडताहेत असे वाटत होते. त्यांची मिपा कारकिर्द ९ वर्षांची आहे आणि इथल्या पहिल्या प्रतिसादा आक्षेप दाखवल्यावर 'का आणि आपण कोण' असा प्रतिसाद येतो तेव्हा वरुण मोहितेंपेक्षा मिपाकर आणि समस्त मराठी समाज कुठे कमी पडतो आहे असा प्रश्न पडतो आहे.

बाकी संपादक मंडळ बघतीलच

मिपावरील प्रतिसादांची पातळी अजून किती घसरत जाणार.

प्रसाद_१९८२'s picture

11 May 2019 - 1:55 pm | प्रसाद_१९८२

सहमत !

जालिम लोशन's picture

11 May 2019 - 10:32 pm | जालिम लोशन

महाराट्र एकुण जागा ४८

भाजपा ०
काँग्रेस ०
रा.काँग्रेस ०
शिवसेना ०
वंचीत आ. १
मनसे ४७

चौथा कोनाडा's picture

14 May 2019 - 5:45 pm | चौथा कोनाडा

तुमचा अंदाज आवडला.
आता २३ मे ला लावणाऱ्या व्हिडिओत काय दिसतं हे बघायचं.

त्यांचे तीर्थरूप निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी असावेत :-) एकपण जागी उमेदवार नसतना ते ४७ जागा मनसेला देत आहेत :-))

भंकस बाबा's picture

14 May 2019 - 8:04 pm | भंकस बाबा

तुम्ही ओरंगजेब आहात क़ाय? नाही तुम्हाला विनोदाचे वावड़े दिसते म्हणून विचारले?
तुमच्या प्रतिसादाच्या शैलीवरुन मोगाखाँची आठवण झाली.
सर्जिकल स्ट्राईकमधे भारतात बळी पडलेला एक आयडी!

गड्डा झब्बू's picture

14 May 2019 - 8:20 pm | गड्डा झब्बू

विनोदाचे वावड़े नाही जर ४८/४८ मनसेला असा अंदाज दिला असता तर तो विनोद समजून मनमुराद हसलो असतो पण वंचित आघाडीला १ आणि मनसेला ४७ :-))
>>>तुमच्या प्रतिसादाच्या शैलीवरुन मोगाखाँची आठवण झाली.>>> चला कोणाची आठवण तरी झाली हे खूप झाले.
>>>
सर्जिकल स्ट्राईकमधे भारतात बळी पडलेला एक आयडी!>>> ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

विजुभाऊ's picture

15 May 2019 - 9:55 am | विजुभाऊ

विले पार्ल्यात मला मराठी सुतार , मराठी रंगारी , मराठी प्लंबर शोधून द्या.
पार्ले सोडा हो. सातारा कोल्हापूर भागातही मराठी सुतार मिळणे दुरापास्त झालंय.
याला कारण काय असावे????
पूर्वी राजस्थानी सुतार असायचे पण आजकाल फक्त बीहारी सुतारच दिसतात

Rajesh188's picture

15 May 2019 - 10:33 am | Rajesh188

लोकांनी व्यवसाय बदलला आहे सुतार कामात 500 रुपये रोज मिळत असेन आणि बाकी कामात 600
मिळत असेल आणि रोज काम असेल तर सुतार काम का करेल ,
सातारा चा विचार केला तर लोकांचा कल सैन्यात जास्त आहे आणि गल्फ मध्ये जाण्याचा
पुणे जवळ आहे लहान मोठया नोकऱ्या मिळतात
आणि कृष्णा माई च्या कृपेने पाणी सुद्धा आहे शेतीला

सुधारक's picture

15 May 2019 - 12:15 pm | सुधारक

नुकतेच bro4u या संकेत स्थळावरून सुताराची मागणी नोंदवली. एक राजस्थानी सुतार उगवला व त्याने काम व्यवस्थित करून दिले. बोलता बोलता त्याने सांगितले कि त्यांच्या गावाचे अनेक सुतार पुण्यात कार्यरत आहेत. मोठ्या कामाखेरीज किरकोळ कामे करण्यात पण ते पुढे आहेत. सर्व मार्केट ताब्यात घेताहेत. दिवशी दीड हजार रुपये मजुरी कमावतात.

प्रमोद देर्देकर's picture

17 May 2019 - 10:07 pm | प्रमोद देर्देकर

अरे पण मराठीसाठी एव्हढे लढणारे स्वामि यांचा आयडीला का बरे पंख लागले आणि आश्चर्य म्हणजे ते सुध्दा एका मराठ संकेत स्थळावरून.

जालिम लोशन's picture

18 May 2019 - 1:15 am | जालिम लोशन

नंतर गड्डा झब्बु नावाने उगवले आणी सगळ्यांना दगड मारायला लागले. ६दिवस होते मोजुन नंतर ठाण्याच्या मेंटल हाॅस्पीटलवाल्यांनी धरुन नेले त्याला.

गड्डा झब्बू's picture

18 May 2019 - 10:17 pm | गड्डा झब्बू

दगड मारण्यात मजा नाही. धोंडे मारायची ट्रेनिंग घ्यायला गेलो होतो :-)) बादवे ठाण्याच्या मेंटल हाॅस्पीटलमधे खूप जणांना गजकर्ण झालाय. तिकडे बाधित रुग्णांच्या पार्श्वभागावर लावायला जालीम लोशन तत्काळ पाहिजे असे ऐकिवात आहे :-))

प्रमोद देर्देकर's picture

18 May 2019 - 1:28 am | प्रमोद देर्देकर

नाही हो गड्डा कुठे स्वर्गवासी झालाय अजून आहे की जिवंत .