आपण ही आपली प्रगती करुन घ्याच.
मराठी माणूस धंद्यात का माघे?
परप्रातीयाचे गणित समजून घ्या.
धंद्यामधे सिंडीकेटस असतात, रॅकेट्स असतात तसेच जातीय ग्रुप्ससुद्धा असतात फक्त त्याला चेंबर ऑफ कॉमर्स असे नाव नसते. ते पृष्ठभागावर देखील नसते. ही सिस्टीम इतकी स्मूथ बसली आहे कि आपल्याला रोज पाहून सुद्धा त्यातला जातीय कोन लक्षात येत नाही. ते वाईटच आहे असे म्हणता येईल का याबद्दल वेगवेगळी मतं येतील.
असा व्यवसाय केला जातो हे कोणताही अभ्यासक्रमात किव्वा कार्यक्रमात शिकवले जात नाही . हे कुठे पुस्तकातही वाचायला मिळणार नाही .
यांचे काम कसे चालते ? ते त्यांच्याकडूनच शिका .
माझे अनेक पटेल मित्र आहेत. गुजरातेत तर त्यांचे वर्चस्व आहेच. मी काही दिवस इन्श्युरन्स एजंट म्हणून काम केलं. इन्शुरन्स एजंटला अनेक गोष्टी माहीत होतात. मी फर्ग्युसन रस्त्यावरच्या एका पटेलाकडून नियमित स्टेशनरी विकत घ्यायचो. माझ्या व्यवसायासाठी लागणारी काही रजिस्टर्स मी डिझाईन केली होती. ती हा बनवून द्यायचा. पुण्यात सर्वात पहिल्यांदा त्याच्याकडे जंबो कलर झेरॉक्स मशीन आले होते. छोट्या जागेतून त्याने व्यवसाय वाढवला. त्या कष्टाचे कौतुक आणि अभिमान दोन्ही आहेच. माझ्या ब्रॅंचचा धंदा सुद्धा त्याला दिल्याने मला तो चांगला मानायचा. या विश्वासावर त्याला माझ्याकडून पॉलिसी घेण्याबद्दल विचारले. ही पॉलिसी घेतली तर भांडवलवृद्धी होणार होती आणि ती हिट जाणार याबद्दल तज्ञांना विश्वास होता. एलआयसीच्या निवडक चांगल्या पॉलिसीमधली एक होती ती. त्यालाही ते मान्य होते. मैत्रीसुद्धा मान्य होती. पण त्याने जे सांगितले ते चक्रावून टाकणारे होते.
या पटेलांचे एक मासिक (काय म्हणायचं त्याला ?) निघते. त्या मासिकात कुठला पटेल काय धंदा करतो याची माहिती, फोन नंबर वगैरे तपशील दिलेला असतो. एक पटेल औरंगाबादला आहे. त्याच्याकडे कसल्या तरी स्टील प्लेट्स बनतात. तर मग ठाण्यातल्या पटेलाला त्या प्लेट्स त्याच्याकडून घ्याव्या लागतात. मुंबईतल्या पटेलाकडे जर त्या प्लेट्स मिळत असतील तर मग तो घेऊ शकतो. पण पटेलाव्यतिरिक्त दुस-याकडून चुकूनही घ्यायचे नाही असा दंडक आहे.
इन्श्युरन्स साठी राजस्थानातून तीन पटेल पुण्यात येतात. पॉलिसी त्यांच्याकडून काढून घ्यायची हा नियम आहे. शेजारी इन्श्युरन्स एजंट राहत असेल आणि तो पटेल नसेल तर त्याच्याकडून पॉलिसी घेता येत नाही. मुंबईत सुद्धा बरेच पटेल इन्श्युरन्स एजंट्स आहेत. त्यांचे ग्राहक ठरले आहेत. थोडक्यात पटेल व्यावसायिकांनी आपसातच स्पर्धा करायची. एकाचा ग्राहक दुस-याने पळवायचा नाही. जर तो ग्राहक स्वत:हून वळाला तरच.
हे अलिखित नियम जर तोडले गेले तर समुदायाकडून त्या पटेलाला अगदी छोटासा दंड लावला जातो. त्या काळी २१ रू होता. आताचे माहीत नाही. पण अमक्या तमक्या पटेलाने २१ रू. दंडापोटी भरले हे त्यांच्या त्या पुस्तिकेत प्रकाशित झाले रे झाले की तो पटेल आयुष्यातून उठतो. त्याच्याशी सर्व प्रकारचा धंदा समुदायाकडून बंद केला जातो. त्याला समाजाच्या ब्यांका देखील कर्ज देत नाहीत. भिशीतून त्याला बाहेर काढले जाते.
कानात बाळी घालणारे मिठाईची, हार्डवेअरची, सायकल्सची, मेडीकलची, गिफ्ट आर्टिकलची दुकाने चालवणारे अस्वच्छ राजस्थानी लोक ही त्यांची ओळख आहे. पुण्यात, मुंबईत सर्वत्रच यांची दुकाने लक्षणीय आहेत. गुजराथी समाज पूर्वी जो किरकोळीचा व्यवसाय करायचा तो आता यांच्याकडे आहे. गुजराथी समाज होलसेल मधे गेला आहे.
राजस्थानी दुकानदार गावाकडून एक मुलगा आणतो. त्याला राबवून घेतो. त्याचा पगार समाजाच्या ऑफीसकडे जमा करतो. मुलगा मोठा झाल्यावर जेव्हढे पैसे पगाराचे जमा झाले असतील तेव्हढेच दुकानदार भर घालून देतो. या मुलाला मग समाज दोन लाख रूपये उचल देतो (आकडे जुने आहेत). त्यातून त्याचा मालक त्याने हेरून ठेवलेले दुकान भाड्याने मिळवून देतो. दोन लाखात पागडी आणि दोन वर्षाचे भाडे असते. पगार जमा झालेला असतो. त्यातून तो वस्तू आणतो. कमी पडलेले पैसे समाजाकडून कर्ज म्हणून मिळतात. मग त्याचं दुकान चालू लागते. (दुकान चालेल का हा प्रश्नच नसतो). मग तो गावाकडून एक मुलगा आणतो. पुढे हे सायकल रिपीट होते. अशा पद्धतीने एकाची दोन, दोनाची तीन दुकाने होत जातात. हळू हळू सगळीकडे राजस्थानीच दिसू लागले आहेत. आता या दुकानांना लागणारा माल सुद्धा राजस्थानीच पुरवणार. यांचेही विमे त्यांचा समाजातला प्रतिनिधीच उतरवणार.
आजपर्यंत समाजाकडून मिळालेल्या उचल आणि कर्जाला कुणी बुडवलेले नाही. धंदा चालला नाही असे झालेले नाही. यांना ब्यांकेची आवश्यकता नाही. कायदेशीर बाबींसाठी एखादे अकाउंट असते फक्त. यांच्यातही दंड लागतो.
तिसरे उदाहरण अग्रवाल समाजाचे. हा वेगळा समाज आहे. यांचे जैन, शहांशी सख्य असते. यांची किराणा मालाची दुकाने असतात. मार्केट यार्डातल्या अग्रवालाकडे ते माल भरतात. अग्रवाल नसेल तर मग शहा, जैन. साधारण २०, २१ तारखेला हे महिन्याचा माल भरायला येतात. त्या वेळी त्यांना पैसे द्यायचे नसतात. पैसे कधी हे शेठ विचारत नाहीत. हेच सांगतात ३ तारखेला हिसाब चुकता करेंगे. बाजूचा मराठी दुकानदारही त्य़ाच शेठकडे माल भरायला आलेला असतो. पण त्याच्या आणि अग्रवालच्या दुकानात हटकून पाच पैशाचा फरक असतो. कारण हे शेठकडे रडतात. बाजूमे पाटील का दुकान है. साब मराठी माणूस उधरच जायेंगे. मग तो याला वेगळा दर लावतो. शिवाय खरेदी रोख नाही.
याच्याकडे एखाद रूपयाचा फरक असला की सगळी गर्दी त्याच्याकडे लोटते. एक तारखेला जास्तीत जास्त जोर असतो. जवळपास सगळा माल संपलेला असतो. दोन तारखेला माणूस पाठवला जातो. शेठचा हिशेब क्लोज.
अजून बरीच उदाहरणे आहेत. इथे फक्त तीनच नमुने दिले आहेत.
भारतातली बाजारपेठ अशीही चालते आणि खुलीही चालते. पण ही बारीक कलाकुसर माहीत नसलेले जेव्हां वाद घालायला येतात तेव्हां त्यांच्याशी काय बोलायचे ?
आतातरी शहाणे व्हा .
हल्ली बिल्डरांच्या पण संघटना आहेत. त्यांच्यातही सिंडीकेट्स निर्माण झालेत. जातीच्याच बिल्डराला जमिनी द्यायचे करार होताहेत. कुठल्याही रिअल इस्टेट एजंटला नवे ट्रेण्ड्स विचारा.
खाण्यापिंयाच्या बाबतीत आजही अंधश्रद्धा, रुढी आहेत. त्या नाहीतच असे म्हणणा-यांना कोपरापासून नमस्कार. असे महानुभाव मला देवासमान आहेत. त्यामुळे त्यांचेच मत प्रमाण.
मग आपण कुठे आहोत?-
मराठी भाषिक समाज कधी असा विचार करणार.
व्यवसायात एकमेकांना मदत कधी करणार.
आता तरी आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी यावर विचार मंथन करावे.
Business Help Group करून तालुकावर मदत केंद्रे स्थापन करावीत.
आपला समाज मागास राहिला याला दुसरे कोणीही जबाबदार नाही तर आपणच जबाबदार आहोत.
समाजाला मदत होईल असे उपक्रम न राबविता आपण फक्त राजकारण करीत राहिलो.
राजकारण कराच पण राजकारणाचा फायदा समाजाला होईल असे उपक्रम सर्वांनी सुरु करावेत.
धन्यवाद
एक हितचिंतक .
कधी शिकणार आपण मराठी लोक ? का नुसतेच एकमेकांची उणीदुणी काढत बसणार ?
*नोट-जसा आला तसा मजकूर पाठवला त्यामध्ये दुमत असू शकते* *business support group*
"मांसाहार करणाऱ्या मराठी माणसाला बिल्डरने घर नाकारले..."
अशा बातम्या आपण हल्ली सर्रास ऐकतो... तेव्हा लगेच आपल्या डोक्यात विचार येतो, हा एवढा माज यांच्यात येतो कुठून...? मित्रांनो हा माज येतो आर्थिक सुबत्तेतुन... हि सुबत्ता जैन-मारवाडी समाजात प्रचंड आहे म्हणुनच अशा प्रकारे घर नाकारणारे बहुतांशी जैन-मारवाडीच असतात...
मित्रांनो साधी गोष्ट सांगतो... यांच्या आर्थिक सुबत्तेच सगळ्यात महत्वाच कारण यांनी खर्च केलेल्या १०० रूपयातले ७० रूपये जैन-मारवाडी समाजातच परत येतात... कारण कोणतीही खरेदी ते स्वत:च्या समाजबांधवा कडुनच करतात म्हणुन पैसा त्यांच्या समाजातच फिरत राहतो... अगदीच नाईलाज झाला तरच ते बाहेरच्या माणसाकडून खरेदी करतात...
हे आपल्यालाही शक्य आहे... आज मराठी माणसाने खर्च केलेल्या १०० रूपयातले जवळजवळ ९० रूपये बाहेर जात आहेत... मराठी समाजात फक्त १० रूपयेच परत येत आहेत... हेच कारण आहे कि आपल्यातले काहीच आर्थिक सबळ होत आहेत... परंतु समाज म्हणुन आपण सबळ होत नाही...
म्हणुनच माझी सर्वांना विनंती आहे... मी जे सांगतोय त्याची सुरूवात करा... कठीण आहे पण अशक्य नाही... आपल्याकडे धंद्यात उतरणारी मुल कमी आहेत... पण मी जे सांगतोय ते केल तर त्यांना धंद्यात यश मिळण्याची शक्यता वाढेल आणि जास्तीत जास्त मराठी मुले धंद्यात उतरतील... आपली एक साधी कृती त्यांना प्रोत्साहन देईल....
हे नक्कीच करा
1) डॉक्टर मराठी निवडा
2) वकील मराठी निवडा
3) इंजीनियर मराठी निवडा
4) सी.ए मराठी निवडा
5) भाजी वाला मराठी निवडा
6) मोबाइल रिचार्ज स्टोअर्स मराठी निवडा
7) मेडिकल स्टोअर्स मराठी निवडा
8) दूध डेअरी मराठी निवडा
9) प्रिटींग प्रेस मराठी निवडा
10) पेपर मराठी निवडा
11) स्टेशनरी स्टोअर्स मराठी निवडा
12) कपडयाचे दुकान मराठी निवडा
13) इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल स्टोअर्स मराठी निवडा
14) शेती कृषि सेवा केंद्र मराठी निवडा
15) ट्रॅव्हल बुकींग मराठी निवडा
16) फ्लोअर मिल मराठी निवडा
17) किराणा स्टोअर्स मराठी निवडा
18) हार्डवेअर दुकान मराठी निवडा
19) झेरॉक्स सेंटर मराठी निवडा
20) हॉटेल मराठी निवडा
21) इतर उपयोगी वस्तुसाठी मराठी व्यापारी निवडा
समाजाच्या माणसाला मोठे करणे म्हणजेच समाज आर्थिक दृष्टया सुदृढ़ करणे होय।
मग बघा 10 वर्षात मराठी समाजाची आर्थिक सुधारणा कशी होते ती....
जेव्हा घेणारे , विकणारे आणि निर्माता आपणच राहु तेव्हा नक्की मराठी समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल..!!
मग ह्या नवीन वर्षाला संकल्प करताय ना ?
आपल्याच माणसांकडून जास्तीत जास्त खरेदी करण्याचा
आपण जास्तीत जास्त मराठी व्यवसायिक निवड करावी.
वरील लेख एका संघटनेने लिहला असून तो त्यांनी जास्तीत जास्त मराठी माणसांन कडे पोहचण्याची विनंती केली आहे
धन्यवाद.
वाचने
16265
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
अफाट शक्ति
जग बदलत चालले आहे
आपली आर्थिक परिस्थिती सुधारवली पाहिजे.
In reply to जग बदलत चालले आहे by Rajesh188
रद्दीवाले .. राजस्थानी असतात.
मराठी व्यवसाईक अशी लबाडी करत नाही, म्हणून तो अपयशी झाला.
In reply to रद्दीवाले .. राजस्थानी असतात. by अभिजित - १
आदरणीय मिपा संमं,
उद्योग व्ययसायत सुद्धा मराठी लोकांचा ठसा आहे
मराठी Talent व कतृत्व विकले जात आहे
In reply to उद्योग व्ययसायत सुद्धा मराठी लोकांचा ठसा आहे by Rajesh188
मी गुजरात मध्ये असताना
In reply to मराठी Talent व कतृत्व विकले जात आहे by स्वामि १
विमान
मेलो....
का???
वरुण मोहीतेजी कृ. स्वतःचे स्वतःस माफ करून दाखवावे
In reply to का??? by वरुण मोहिते
प्रतिसादा मधे परत एकदा हीन
सं.मं. : मिपाकर आणि समस्त मराठी समाज कुठे कमी पडतो आहे?
मिपावरील प्रतिसादांची पातळी
सहमत !
In reply to मिपावरील प्रतिसादांची पातळी by यशोधरा
माझा अंदाज
तुमचा अंदाज आवडला.
In reply to माझा अंदाज by जालिम लोशन
त्यांचे तीर्थरूप निवडणूक आयोगाच्या
In reply to तुमचा अंदाज आवडला. by चौथा कोनाडा
गड्डा साहेब
In reply to त्यांचे तीर्थरूप निवडणूक आयोगाच्या by गड्डा झब्बू
विनोदाचे वावड़े नाही
In reply to गड्डा साहेब by भंकस बाबा
विले पार्ल्यात मला मराठी
साधं करण आहे
पुण्यातले सुतार - एक अनुभव
https://www.loksatta.com
अरे पण मराठीसाठी एव्हढे
VRS घेतली.
In reply to अरे पण मराठीसाठी एव्हढे by प्रमोद देर्देकर
दगड मारण्यात मजा नाही
In reply to VRS घेतली. by जालिम लोशन
नाही हो गड्डा कुठे स्वर्गवासी