दुसर्या दिवशी सकाळी 'सेवन वेल्स'नावाचा धबधबा पाहण्यास गेलो.
डोंगरात वर चढायचे होते.पण माझ्या दुखर्या पायांनी आणि इच्छाशक्तीने साथ दिल्यामुळे वर चढून गेले आणि सार्थक झाल्यासारखे वाटले.'धबाधबा पाणी वाहे'अशी अवस्था होती.सारेजण पाण्यात उतरुन मनमुराद आनंद लुटत होते.मग आम्हीही मागे कसे राहणार?
तिथून पुढे 'गॅलरिया परदाना'पाहिली.
माजी पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूसंग्रह होता तो.अनेक उत्तमोत्तमवस्तूंचे ते संग्रहालय खरोखरच पहाण्यासारखे होते.त्या वास्तूचे छत तर अप्रतिम होते.
मलेशिया 'बाटीक'प्रिंटसाठी प्रसिध्द आहे.त्यामुळे आम्ही तिकडे वळलो.अत्यंत सुंदर डिझाईनचे स्त्रीपुरुषांचे कपडे पाहिले.हस्तकलेचे सुंदर नमुने पाहिले.पण अत्यंत महाग त्यामुळे थोडेसे घेतले.
'लमनपाडी'येथे कृषीवस्तुसंग्रहालय आहे.
तसेच मलेशियात चालणार्या भातशेतीचे प्रात्यक्षिक येथे दाखविले जाते.
लंग्कावीचे आणखी एक आकर्षण म्हणजे 'अंडरवॉटरवर्ल्ड'.
इथे एकाच ठिकाणी उष्ण्,समशीतोष्ण व थंड प्रदेशात राहणारे १००हून अधिक निरनिराळ्या आकाराच्या टॅंकस् मध्ये ५००पेक्षाही जास्त जलचर प्राणी आहेत.
पेंग्विन,शार्क,स्टींगरेज,सील्,निरनिराळी कासवे,अनाकोंडा,अरापैमा,मार्मोसेट नावाचे पाण्यातील छोटे माकड इ.विविध जलचर पहाता येतात.कांचेच्या बोगद्यातून जाताना आपल्या सर्व बाजूना हे प्राणी फिरत असतात.इथे घालवावा तेवढा वेळ कमीच !एक स्लाईड शो दाखविला जातो.तसेच इथल्या 'वाईल्ड लाईफ पार्क'मध्ये निरनिराळे साप,मगरी,१५०हून अधिक निरनिराळे पक्षी आहेत.
येथे एक आख्यायिकापूर्ण 'ताशिक दायांग बुन्टिग'(लेक ऑफ दि प्रेग्नंट वुमन) नावाचे गोड पाण्याचे तळे आहे.
अपत्यहीन स्त्रीने ह्यात अंघोळ केल्यास ती गरोदर राहते असे सांगतात.'कोटा महसुरि'नावाचे आख्यायिकापूर्ण बेट आहे.लंग्कावी हे प्रामुख्याने 'जिओपार्क'म्हणून प्रसिध्द आहे.दक्षिणपूर्व आशियातील हे पहिले जिओपार्क आहे.
लंग्कावी हे मलेशियातील प्रमुख पर्यटन स्थळ असल्यामुळे इतर अनेक प्रकारचे खेळ येथे चालतात.गो कार्टिंग,वॉटर स्पोर्टस्,सेलिंग,गोल्फिंग,इ.खेळ खेळ्ले जातात.इथले 'सीफूड्'फारच चविष्ट असते.'इकान बकार,बार्बे॑क्यूड फिश,मी उडांग इ.मासे आवडीने खाल्ले जातात.
तर अशी ही आमची लंग्कावी सफर !
प्रतिक्रिया
19 Mar 2009 - 9:46 pm | गणपा
वाह मस्त सफर करवुन आणलीत वैशाली ताई, धन्यवाद..
शेवटुन तिसरा आणि दुसरा फोटो दिसत नाहीये.
19 Mar 2009 - 10:17 pm | क्रान्ति
खूप छान प्रवासवर्णन लिहिलय वैशालीताई. फोटोही सुन्दर आहेत. पण काही फोटो दिसत नाहीत.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
19 Mar 2009 - 10:59 pm | शितल
फोटो आणि वर्णन मस्तच.:)
19 Mar 2009 - 11:58 pm | प्राजु
मस्त आहेत सगळे फोटो. पण मधले २ फोटो दिसत नाहीयेत.
वर्णन खूपच छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Mar 2009 - 6:59 am | सहज
लंग्कावी सफर आवडली.
"गॅलरीया परधाना" कल्पना छान आहे. दिल्लीत आहे का असे काही आपल्या पंतप्रधांनाना मिळालेल्या वस्तुचे संग्रहालय?
शेवटचे पांढर्या फुलाचे छायाचित्र मस्त!
20 Mar 2009 - 9:29 am | दिपक
छान आहेत सगळे फोटो. मोराने फोटोसाठी चांगली पोझ दिलिये. सुंदर :)
20 Mar 2009 - 9:44 am | भाग्यश्री
सर्व वर्णन व फोटोज सुंदर ... मोराचा फोटो तर क्लासिक!
20 Mar 2009 - 9:52 am | मराठी_माणूस
सर्व फोटो छान आहेत
20 Mar 2009 - 2:11 pm | सुनील
या भागात फोटो सुंदर आहेत पण वर्णन फारच त्रोटक वाटले. विस्ताराने लिहिले असतेत तर चांगले झाले असते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
23 Mar 2009 - 7:12 am | छोटुली
काकू,
असं वाटतंय आता यावं लंग्कावीला.सुंदर आणि मनमोहक असे फोटो दिल्याबद्दल अभार.
23 Mar 2009 - 11:47 am | वैशाली हसमनीस
या मलेशियात ,स्वागत आहे.
23 Mar 2009 - 9:53 am | विसोबा खेचर
वैशालीताई, जियो..!
एक अप्रतीम सचित्र लेख वाचायला मिळाला..
तात्या.
23 Mar 2009 - 11:51 am | वैशाली हसमनीस
आभारी आहे.आपण सर्वांनी मनापासून दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.